Fraud: जमिनीच्या नोंदीसाठी 25 हजारची लाच घेतना तलाठी लाचलूचपतच्या जाळ्यात; कोतवालावरही कारवाई

मीन खरेदी केलेल्या खरेदी दस्ताची सातबारा उताऱ्यावर नोंद करून देण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्यांकडून पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना देशिंगचा तलाठी सचिन रघुनाथ पाटील (वय 38) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.

Fraud: जमिनीच्या नोंदीसाठी 25 हजारची लाच घेतना तलाठी लाचलूचपतच्या जाळ्यात; कोतवालावरही कारवाई
सांगलीत तलाठी आणि कोतवाल लाचलुचपतच्या जाळ्यातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 8:21 PM

सांगलीः जमीन खरेदी केलेल्या खरेदी दस्ताची (Land purchase ) सातबारा उताऱ्यावर नोंद करून देण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्यांकडून पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना देशिंगचा (Deshing Sangli) तलाठी सचिन रघुनाथ पाटील (वय 38) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. त्याचबरोबर कोतवाल आनंदा पाटील यांनी तक्रारदार यांनी तलाठ्यास लाच द्यावी यासाठी प्रोत्साहन दिल्याने कोतवाल आनंदा पाटीललाही (Anand Patil ) दोषी ठरवून त्याच्यावरही कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. सात बारावर  जमिनीच्या नोंद करण्यासाठी तलाट्याने  30 हजारची मागणी केली होती, मात्र वाटाघाठी करुन रक्कम कमी केली गेली होती.

तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदीपत्राच्या दस्ताची सातबारावर नोंद करून देण्यासाठी देशिंगचे तलाठी सचिन पाटील यांनी 30 हजार रुपयांची मागणी केल्याचा तक्रार अर्ज सांगली लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाच्या पथकाला याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पडताळणी करण्यात आली. या प्रकरणात तलाठी सचिन पाटील याने तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या कागदपत्रांची सातबारावर नोंद करून देण्यासाठी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, मात्र त्यानंतर चर्चा केल्यानंतर 25 हजार रुपये लाचेची मागणी केली गेली.

सांगली पथकाची कारवाई

यावेळी कोतवाल आनंदा पाटील याने तलाठी सचिन पाटील यांना लाच देण्यासाठी तक्रारदार यांना प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधच्या अधिकाऱ्यांनी व सांगली पथकाने देशिंगच्या तलाठ्या विरुद्ध तलाठी कार्यालयात सापळा लावला होता. यावळी लोकसेवक तलाठी सचिन रघुनाथ पाटील, तहसिल कार्यालयाजवळ मिरज, यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली गेली, त्यानंतर 25 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

कोतवालही ताब्यात

त्याचबरोबर देशिंग येथील आनंदा शिवा पाटील या कोतवालास ही देशिंग तलाठी कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. तलाठी सचिन पाटील आणि कोतवाल आनंदा पाटील यांच्याविरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

Raj Thackeray Sabha : नुसती गाणी वाजवून चालणार नाहीये!’ ठाण्यातील उत्तरसभेत ‘राजगर्जने’आधी वसंत मोरे गरजले

भरधाव डंपारने बाप-लेकाला संपवले; सांगलीतील आष्टा मार्गावर भीषण अपघात

Raj Thackeray Sabha : ‘वसंत सेना ते शरद सेना असा प्रवास करणाऱ्यांनी आमच्याबद्दल बोलू नये ‘, संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.