लासलगाव बाजार समितीत टोमॅटोचा लिलाव सुरू, शेतकऱ्यांची तोबा गर्दी
कांद्याची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासलगाव येथील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याबरोबर टोमॅटोचे ही लिलाव गेल्या काही वर्षापासून पार पाडले जात आहेत.
नाशिक: आशिया खंडातील कांद्याची अग्रसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज टोमॅटो लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. कर्मचारी व्यापारी आणि शेतकऱ्यांनी टोमॅटो लिलावप्रसंगी मोठी गर्दी केल्याचंही पाहायला मिळालं. कांद्याची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासलगाव येथील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याबरोबर टोमॅटोचे ही लिलाव गेल्या काही वर्षापासून पार पाडले जात आहेत.
संध्याकाळी पाच वाजता टोमॅटो लिलावाचा शुभारंभ
आज प. पु. भगरीबाबा धान्य आणि भाजीपाला आवारात संध्याकाळी पाच वाजता टोमॅटो लिलावाचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी शेतकऱ्यांनी 1790 क्रेट्समधून टोमॅटो लिलावासाठी आणला होता. टोमॅटो लिलाव शुभारंभप्रसंगी 20 किलोच्या टोमॅटो क्रेट्सला कमाल 601, किमान 151 तर सर्वसाधारण 431 रुपये इतका बाजार भाव मिळाला, पण यावेळी व्यापारी, बाजार समिती कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच त्यानंतर टोमॅटोचे लिलाव सुरू करण्यात आले.
10 ते 12 दिवस बाजार समित्या होत्या बंद
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह कांद्याच्या प्रमुख 15 बाजार समित्या तसेच धान्य व भाजीपाला लिलाव ही नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांचा रोष झेलत 10 ते 12 दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. यामुळे ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात येण्यास मोठी मदत झाली होती, आता मात्र भारतात केरळ राज्याच्या माध्यमातून कोरोनाची तिसरी लाट आल्याचे चित्र दिसत असल्याचं भीतीचं वातावरण आहे. त्यातच लासलगाव बाजार समितीच्या या टोमॅटो लिलावाच्या माध्यमातून होणार गर्दीमुळेही प्रशासन काहीसं घाबरलेलं आहे.
संबंधित बातम्या
ई-कॉमर्स कंपन्यांनो नवीन नियम त्वरित लागू करा, देशातील व्यापाऱ्यांनी उघडला मोर्चा
मोठी बातमी! यापुढे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होणार नाही, मोदी सरकारचा निर्णय
Lasalgaon market committee starts auctioning tomatoes, farmers repent