Maharashtra News Live : मुंबईतील दोन मोठे कार्यक्रम, उद्धव ठाकरेंचा घणाघात, तर एकनाथ शिंदे, राज ठाकरेंचे चिमटे

| Updated on: Jan 24, 2023 | 7:37 AM

Maharashtra Breaking News Live : महाराष्ट्राचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आज विधानसभेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विधान भवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून मुंबईत षन्मुखानंद सभागृहात मेळाव्याचं आयोजित करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या कार्यक्रमावर अभिमान वाटत असल्याचं म्हटलं. पण ते तैलचित्र बसवण्यामागचा हेतू वाईट होता, असा आरोप त्यांनी केला.

Maharashtra News Live : मुंबईतील दोन मोठे कार्यक्रम, उद्धव ठाकरेंचा घणाघात, तर एकनाथ शिंदे, राज ठाकरेंचे चिमटे
Image Credit source: tv9 marathi

मुंबई: महाराष्ट्राचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आज विधानसभेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विधान भवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून मुंबईत षन्मुखानंद सभागृहात मेळाव्याचं आयोजित करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या कार्यक्रमावर अभिमान वाटत असल्याचं म्हटलं. पण ते तैलचित्र बसवण्यामागचा हेतू वाईट होता, असा आरोप त्यांनी केला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Jan 2023 07:36 AM (IST)

    येत्या प्रजासत्ताक दिनी एसटीच्या 780 विनाअपघात सेवा देणाऱ्या चालकांचा सत्कार

    एसटी महामंडळाच्या तब्बल 780  चालकांचा त्यांनी विनाअपघात बजावलेल्या सेवेबद्दल येत्या प्रजासत्ताक दिनी खास गौरव होणार.

    25 वर्षे किंवा जास्त कालावधीत कोणताही अपघात न करता एसटीची सेवा केलेल्यांचा त्यात समावेश आहे.

    एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातर्फे प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे

  • 24 Jan 2023 12:27 AM (IST)

    धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांचा विचित्र अपघात

    धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांचा विचित्र अपघात

    सावळदे जवळील तापी नदी पुलावर घडली दुर्घटना

    क्रुझर मागे असणारा ट्रक थेट नदीत कोसळला

    अपघातात चार जण गंभीर

    शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू

    नदीत कोसळलेल्या ट्रकचा शोध सुरु

  • 24 Jan 2023 12:05 AM (IST)

    सांगली जिल्ह्यातील मिरजमधील बरकत फिश स्टॉलच्या सर्व ग्राहकांना पठाण चित्रपटाचे तिकीट मोफत

    बरकत फिश स्टॉल ला 50 वर्ष पूर्ण

    बुधवार 25 रोजी संध्याकाळी साडे नऊचा शो बुक

    चित्रपटाची 212 तिकीटे बुक,

    सकाळीपासून तिकिटांचे होणार वाटप

  • 23 Jan 2023 11:24 PM (IST)

    क्रिकेटर केएल राहुल अभिनेत्री आथिया शेट्टीसह लग्नबेडीत, जाणून घ्या क्रिकेट आणि बॉलिवूड कनेक्शन

    टीम इंडियाचा क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी विवाहबद्ध झाले आहेत. आतापर्यंत अनेक भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्र्यांनी आपसात लग्न केलं आहे. केएल आणि आथियाच्या लग्नानिमित्ताने बॉलिवूड-क्रिकेट कनेक्शन जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

    क्रिकेट आणि बॉलिवूडचं लव्ह कनेक्शन

  • 23 Jan 2023 11:11 PM (IST)

    मुंबईली कोंबडीची उपमा देणे उचित नाही; सुधीर मुनगंटीवार यांची ठाकरेंवर टीका

    मुंबईली कोंबडीची उपमा देणे उचित नाही

    मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार

    मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबड़ी असून भाजप तिला भीकेला लावणार असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला

    उद्धव ठाकरे यांनी टीका करण्याचा अधिकार गमाविला

  • 23 Jan 2023 10:33 PM (IST)

    मुंबई आग्रा महामार्गावर विचित्र अपघात

    दोन वाहन धडकली, त्यापैकी एक अपघातग्रस्त वाहन तापी नदी पात्रात कोसळले

    क्रूझर गाडीतील प्रवासी किरकोळ जखमी

    मागून धडक देणारा कंटेनर तापी नदीत कोसळला

    रात्रीची वेळ असल्याने शोधकार्यात अडचण

    पोलीस घटनास्थळी दाखल

  • 23 Jan 2023 10:28 PM (IST)

    मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उद्या दिल्ली दौऱ्यावर

    सहकार विभागातील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी जाणार

    बैठकीसाठी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस जाणार दिल्लीला

    दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दोघेही घेणार भेट

    राज्यातील इतर विकास कामांबाबतही होणार चर्चा

  • 23 Jan 2023 09:31 PM (IST)

    Athiya Shetty KL Rahul Wedding : क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

    टीम इंडियाचा क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांचा विवाह अगदी साध्या पद्धतीने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

    सविस्तर बातमी : केएल राहुल-आथिया शेट्टी लग्नबंधनात, फोटो व्हायरल

  • 23 Jan 2023 09:25 PM (IST)

    काँग्रेसची सत्ता येते जाते ,पण लोकांच्या मनात काँग्रेस ; सुशीलकुमार शिंदे

    पुणेः

    काँग्रेसची सत्ता येते जाते ,पण लोकांच्या मनात काँग्रेस ; सुशीलकुमार शिंदे

    भारत जोडो नंतर ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू झालं

    1971 पासून पाहतो आहे कधी काँग्रेसची सत्ता येते जाते ,पण लोकांच्या मनात काँग्रेस आहे

    3 वाजता मी इथे आलो तर सर्व लोक भर उन्हात बसले होते हेच काँग्रेसचे प्रेम

  • 23 Jan 2023 09:16 PM (IST)

    मुंबई : मनसेकडून नाटकाचं आयोजन

    मनसेकडून ‘बाळासाहेबांचा राज’ नाटकाचं आयोजन

    बाळासाहेबांच्या जयंतीदिनी शुभारंभाचा प्रयोग

    बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचं नातं समोर आणणारं नाटक

  • 23 Jan 2023 08:50 PM (IST)

    मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज; ठिकठिकाणी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक

    मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज..

    ठिकठिकाणी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक..

    मतदार यादीवर अभ्यास करून मतदारांची संपर्क साधा ..

    वार्डात त्रुटी असतील किंवा ज्या सुख सोयी हव्या असतील त्याची मागणी 28 तारखेच्या आत महापालिकेकडे करा

    मनसे कार्यकर्त्यांना सूचना

    आमची स्वबळावर लढण्याची तयारी मनसे नेते शिरीष सावंत

    2012 पेक्षा जास्त चांगली परिस्थिती महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला

    सगळं निवडणुकी साठी अॅडजेस्टमेंट युती आघाड्या झाल्या तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मतदार हा ठाम

  • 23 Jan 2023 08:42 PM (IST)

    एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे :

    एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे :

    आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे

    सगळ्यांची भाषणं झाली आहेत.  सगळ्यांनी चौकार, षटकार लावले आहेत. माझी पंचायत झाली आहे

    आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे

    खरं म्हणजे बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या, त्यांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकसाठी हा कार्यक्रम अनमोल आहे. त्याचं मोल करता येणार नाही. म्हणून मी सुरुवातीलाच बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो

    विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आभार मानतो आणि अभिवादन करतो. त्यांनी बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित केला

    शिवसेनाप्रमुखांमुळे माझ्यासारखे असंख्य शिवसैनिक विधानसभा, लोकसभा पर्यंत पोहोचू शकले.

    खरं म्हणजे ज्यांना पाहत, ज्यांच्या विचारांनी माझ्यासारखे कार्यकर्ते प्रभावित झाले, त्यांचा प्रभाव, त्यांचे भाषण पाहत, त्यांनी दिलेले आदेश पाळत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि बाळासाहेबांच्या विचारांचं सरकारदेखील आपण स्थापन केलं. मी मुख्यमंत्री असताना आज विधान भवनाच्या सर्वोच्च सभागृहात बाळासाहेबांचं तैलचित्र लावलं जात आहे. हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा क्षण आहे. दुर्मिळ योग आहे. म्हणून मी बाळासाहेबांना पुन्हा एकदा वंदन करतो.

    लोकांनी लोकांसाठी चालवलेलं सरकार म्हणजे लोकशाही. बाळासाहेबांनी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली

    एकेकाळी महाराष्ट्रात ठराविक घराण्यांची सत्ता होती. पण बाळासाहेबांनी सर्वसामान्यांना इथपर्यंत पोहोचवण्यातं काम केलं. असे अनेक कार्यकर्ते समोर बसले आहेत. बाळासाहेबांच्या परिस्पर्शाने हे सोन्याचे दिवस आले आहेत. नाहीतर एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री कसा होऊ शकला असता? ही जादू केवळ बाळासाहेबांचीच.

    बाळासाहेबांच्या विचारांनी स्फुर्ती मिळते. अन्यायाविरुद्धल लढा ही बाळासाहेबांची शिकवण. म्हणून त्यांच्याबद्दल बोलताना आज अतिशय कंठ दाटून येतो. त्यांच्या शुभेच्छा, योगदान पाठिशी असताना इथपर्यंत सगळं घडलं आहे

    बाळासाहेबांचं म्हणणं होतं की, शब्द दिला की फिरवायचा नाही. तेच आम्ही त्यांच्याकडून शिकलो. त्यांच्यामुळे धाडस करायचो शिकलो. त्यामुळे या महाराष्ट्रात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

    बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख होते. गुरुस्थानी होते. आज मला आनंद दिघे यांचीही आठवण येते. आनंद दिघे असते तर त्यांना आज वेगळं समाधान असतं. ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली. ठाणे आणि शिवसेना हे नातं काही औरच होतं.

    दिघे साहेबांनंतर बाळासाहेब ठाण्यात यायचे तेव्हा एकनाथ शिंदे आहे, चिंता नाही, असं म्हणायचे. त्यामुळे उर भरुन यायचा.

    त्यावेळेस पाकिस्तानसुद्धा कोणत्याही पंतप्रधान, मुख्यमंत्र्याला घाबरत नव्हता, पण बाळासाहेबांना घाबरायचा

    पाणी प्रश्न असेल,  फुटपाथवर पडलं, कुणी झाडं तोडतंय अशी बातमी वृत्तपत्रात आली की बाळासाहेबांचा फोन यायचा. बाळासाहेबांचा फोन यायचा तेव्हा आमची काय परिस्थिती व्हायची. ते निसर्गप्रेमी होते. त्यामुळे काय चाललंय? असा जाबही विचारायचे. ते सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यायचे.

    बाळासाहेब नेहमी सांगायचे की, तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठिवर कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकणार नाही. आपण सगळेच त्याचा अनुभव आता घेतोय.

    बाळासाहेबांचे विचार आणि शिकवण सोबत घेऊन चाललो आहोत.

    बाळासाहेबांनी सत्तेसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. हे देखील आम्ही त्यांच्याकडून शिकलो आहोत. त्यांचाच विचार घेऊन आम्ही पुढे चालत होते.

    ते नेहमी म्हणायचे की ते रिमोट कंट्रोल होते. पण त्यांनी सर्वसामान्यांसाठी ते रिमोट कंट्रोल चालवलं. आम्ही स्वत: साक्षीदार आहोत.

    संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल किंवा महाराष्ट्राची अस्मिताचा मुद्दा असेल बाळासाहेबांनी भरपूर कामं केली. त्यांच्यासोबत अनेकजणं आली. ते पुढे विधानसभेत आली.

    बाळासाहेबांनी विविध क्षेत्रातील कलाकार, आणि इतरांना वेळोवेळी पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिमागे उभे राहिले.

    कार्यकर्त्यांच्या पाठीमागे कसं उभं राहायचं ते बाळासाहेबांकडून शिकलं पाहिजे.

  • 23 Jan 2023 08:32 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला बाळासाहेबांचा किस्सा

    देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे :

    मी राहुल नार्वेकर यांचे आभार मानतो. मी त्यांना बाळासाहेबांच्या तैलचित्राबद्दल विनंती केली होती. त्यांनी ती विनंती मान्य केली. याशिवाय आजच्या कार्यक्रमाचं सर्व नियोजन त्यांनी स्वत: केलं. बाळासाहेबांच्या जीवनावरची चित्रफित ही त्यांच्याच संकल्पनेतून तयार झाली.

    बाळासाहेब महासागरा सारखे होते. प्रसंगी अतिशय शांत आणि जेव्हा आवश्यक असेल तुफानापेक्षाही प्रचंड अशा प्रकारचा संघर्ष करणारे, अतिशय अथांग असे व्यक्तिमत्व होते.

    बाळासाहेबांचं तैलचित्र या ठिकाणी लागलं आहे. पण या सभागृहात येण्याचा मोह त्यांना कधीच झाला नाही. त्यांनी विचार केला असता तर ते मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण या सभागृहात येण्याचा त्यांचा प्रवेशाचं कारण वेगळं आहे.

    राज ठाकरेंनी एक कार्टून काढलं होतं. ते त्यावेळच्या विधानसभा अध्यक्ष होतं. त्यामुळे आर आर पाटील यांनी हक्कभंग आणला होता. तो हक्कभंग समितीकडे गेला. समितीने कार्टून काढणारा कुणीही असो, जे संपादक आहेत त्यांना बोलावलं पाहिजे, असं म्हटलं होतं. बाळासाहेबांना समितीसमोर आणण्याचा आदेश काढला होता.

    बाळासाहेब हे तत्वाने चालणारे होते. एक पत्रकार म्हणून अभिव्यक्ती म्हणून स्वातंत्र्य आहे. लोकशाहीच्या मुल्ल्यांनुसार समितीपुढे जावं या विचाराने ते हक्कभंग समितीपुढे चार वेळा गेले. तिथेही त्यांची विनोदबुद्धी चालू असायची. त्या समितीपुढे सगळ्यांना आदर होता. त्यामुळे कुणीतरी त्यांना चहा ठेवायचं.

    बाळासाहेब तुम्हाला गोड चालतं का? विचारलं तेव्हा बाळासाहेबांनी गोड सोडून सगळं खातो म्हटलं

    त्या समितीने बाळासाहेबांना शिक्षा जाहीर केली. पण त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी सभागृहात ठराव मांडला आणि बाळासाहेबांची शिक्षा माफ केली होती

  • 23 Jan 2023 08:14 PM (IST)

    Steve Smith : फलंदाजाने असा घेतला फ्री हीटचा फायदा, ठोकल्या 1 बॉलमध्ये 16 धावा

    स्टीव्ह स्मिथची बिग बॅश लीगमध्ये वादळी खेळी

    स्मिथच्या एकूण 33 बॉलमध्ये 66 धावा

    तसेच 1 बॉलमध्ये ठोकल्या 16 धावा

    सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

    VIDEO : 1 बॉल आणि 16 धावा, फलंदाजाची चौफेर फटेबाजी, व्हीडिओ व्हायरल

  • 23 Jan 2023 08:13 PM (IST)

    स्वतःच्या कुटुंब, पक्ष, सरकार जे टिकवू शकत नाही त्यांनी भाजपाला शिकवण्याची गरज नाही; आशिष शेलारांची टीका

    जे आज या सदनात आले नाही, ते या सदनात बाळासाहेबांमुळे आले आहे हे विसरले होते.

    एका विशिष्ट समुदायाचे मत मिळणार नाही यासाठी ते आले नसावे.

    उद्धव ठाकरे यांनी आम्हाला शिकवायची गरज नाही.

    स्वतःच्या कुटुंब, पक्ष, सरकार जे टिकवू शकत नाही त्यांनी भाजपाला शिकवण्याची गरज नाही

  • 23 Jan 2023 07:57 PM (IST)

    वारसा वास्तूचा नसतो तर तो विचारांचा असतो, तो मी जपला : राज ठाकरे

    राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे :

    कार्यक्रम पाहत असताना त्या परदेशी लोकांचं काय होत असेल तो मला प्रश्न पडला होता. त्यांना नंतर कोणीतरी समजवून सांगा की कार्यक्रम कशाचा होता तो. आपण तामिळनाडूत जाऊन कार्यक्रम

    जवळपास तीन वर्षांनंतर बाहेरच्या होर्डिंग्सवर आणि मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट असं नाव लागतंय त्याबद्दल राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करतो. आज उपस्थित असेलेल अनेक जण आणि उपस्थित नसलेले अनेक जण, ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला ही इमारत बघायला मिळाली त्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकेर यांच्या तैलचित्राचं आज अनावरण होतंय. माझी अशी विनंती आहे, अशी दोन तैलचित्र असावीत, एक विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या सभागृहात असावं.

    बाळासाहेबांचा मिळालेला सहवासाबद्दल सुरुवात कुठून करायची मला समजत नाही. मी शिशू वर्गात होतो तेव्हा बाळासाहेब स्वत: गाडी चालवत यायचे. एक घरातील व्यक्ती, शिवसेनाप्रमुख म्हणून व्यक्ती, व्यंगचित्रकार म्हणून व्यक्ती अशी विविध अंग मी या माणसात पाहत होतो.

  • 23 Jan 2023 07:36 PM (IST)

    ‘बाळासाहेबांचे तैलचित्र लावत आहात, त्याचा अभिमान, पण…’, उद्धव ठाकरे यांची भूमिका

    उद्धव ठाकरे यांचं भाषण जसंच्या तसं:

    मी शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याला वंदन करुन आलो. त्यांचा आज जन्मदिवस. आज सुभाषचंद्र बोस यांचा सुद्धा जन्मदिवस. आज तिकडे विधान भवनात तैलचित्राचं अनावरण होतंय. मला विचारतात की त्या तैलचित्राचं काय? मी म्हटलं ते बघितलेलं नाही. ज्या कलाकाराने ते चित्र चितारलं असेल त्यांचा मला अपमान करायचा नाही. पण त्यांना पुरेसा वेळ दिला गेला असेल का? ते महत्त्वाचं आहे.

    घाईगडबडीत काहीतरी रंगवून घ्यायचं आणि हे तुझे वडील. तर अजिबात ते चालणार नाही. दुसऱ्याचे वडील चोरताना हे लक्ष ठेवा नाहीतर तेही तुम्ही विसरायचे. इकडे शिवसेनाप्रमुखांचा विचार, तिकडे मोदी का आदमी आणि तिकडे शरद पवार गोड माणूस. नक्की कोणाची बोटं लावणार तुम्ही? महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकार का पाडलं? तर हिंदुत्व सोडलं आणि शरद पवारांच्या आहारी गेले.

    आणि काल सांगतात की, शरद पवार खूप गोड माणूस. मी फोनवर त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. मग मी काय घेत होतो? ही अशी सगळी माणसी आहेत. तुमची कृती चांगली आहे. बाळासाहेबांचे तैलचित्र लावत आहेत. त्याचा अभिमान आहे. पण त्यामागचा हेतू वाईट आहे

    जसं नेताजींच्या मुलीने सांगितलं, शताब्दी जरुर साजरी करा. पण त्यांचे विचार मान्य आहे का? त्या बोलल्या आहेत की, सरळसरळ वारसा हडपण्याचा प्रकार आहे

  • 23 Jan 2023 07:28 PM (IST)

    ‘दोघं नातू एकत्र आल्यानंतर जे डोक्यावर बसेल, त्याला सांगणार जा तू’, उद्धव ठाकरेंचा इशारा

    “आज प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आले आहेत. काही दिवसांपूर्वी रामदास आठवले एकत्र आले होते. पण त्यानंतर ते भाजपच्या कळपात गेले. आज दोन्ही वारसाचे आणि विचारांचे नातू एकत्र आले आहेत. दोघं नातू एकत्र आल्यानंतर जे डोक्यावर बसेल, त्याला सांगणार जा तू. आता तुझं काही काम नाही. कारण देश हुकूमशाहीच्या दिशेला चाललं आहे. हिंदुत्व सगळं थोतांड आहे. हिंदुत्वाच्या आधारावर धोक्याची भींत उभी करायची आणि त्याआडून देशावर पोलादी पकड घट्ट बसवायची. ती असी बसवायची तुम्ही हु का चू केलं तर याद राखा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 23 Jan 2023 07:20 PM (IST)

    ‘गद्दार विकले जातात, विकत घेता येऊ शकतात’, उद्धव ठाकरे यांचा निशाणा

    उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे :

    तेच चैतन्य, तोच उत्साह आणि तीच गर्दी पाच-दहा मिनिटंच बोलणार आहे गद्दार विकले जाऊ शकतात. ते खोक्यांनी विकले किंवा घेता येऊ शकतात. पण जे आहे ते विकलं किंवा विकत घेता येऊ शकत नाही. संजय राऊत त्यांचे अनुभव सांगत होते. त्यांनी गोऱ्या माणसांची आठवण सांगितली. मलाही येतायेत एक माहिती सापडली.

    नेत्याला एखादी माहिती पडते आणि पक्षप्रमुखाला पडत नाही असं थोडीना होतं? संजय तुला पोलंडचा पंतप्रधान भेटला, मला तर थेट अमेरिकेचे अध्यक्ष भेटले. मला म्हणाले की, मी आज इथे आलो, उद्या मी भाजपात चाललोय. कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या घरावर रेड पडली आणि कागदपत्रे सापडली अशी बातमी ऐकलीय. मग लगेच आपल्या इथल्या खोकेविरांनी सांगितलं की, अरे तू कसं जगणार? न झोपेचा पत्ता, न कसलं काही. भाजपात ये किंवा मिंधे गटात ये, बघ सगळं मस्त. हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं आहे. त्यामुळे उद्या कदाचित बातमी येण्याची शक्यता आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भाजप किंवा मिंधे गटात गेले.

  • 23 Jan 2023 07:17 PM (IST)

    बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात सर्वधर्मीयांबद्दल आस्था होती : अजित पवार

    अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे :

    बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात सर्वधर्मीयांबद्दल आस्था होती बाळासाहेब मुस्लिम विरोधात होते हे म्हणणं योग्य नाही. पण भारतविरोधी पाकिस्तानधार्जिंणांच्या विरोधात होते. बाळासाहेबांनी काळाची गरज ओळखून वेगवेगळ्या पक्षांसोबत युती केली.

  • 23 Jan 2023 07:17 PM (IST)

    सांगली : कुस्ती स्पर्धेत पैलवानांवर अन्याय

    महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवानांवर अन्याय होतोय

    डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील याचा आरोप

    महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये होत असलेले वाद कायमस्वरूपी टाळावेत

    सांगलीमध्ये यंदाची “महाराष्ट्र केसरी कुस्ती”स्पर्धा भरवण्याचा मानस

    या स्पर्धेसाठी एक कोटींचे बक्षीस देण्याची तयारी -चंद्रहार पाटील

  • 23 Jan 2023 07:15 PM (IST)

    ‘हे मूर्तीचोर आहेत’, संजय राऊत यांचा शिंदे गटावर निशाणा

    “हे मूर्तीचोर आहेत, दुर्लक्ष करा. पावसाळ्यात गांडूळ जन्माला येतो. पण पावसाळ्यानंतर निघून जातो. त्या गांडूळांचं अस्तित्व आपल्याला दिसत नाही. संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात शिवसेना म्हटलं की, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं जातं. शिंदे-मिंधे काही नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केलं.

  • 23 Jan 2023 07:10 PM (IST)

    संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्याची उडवली खिल्ली

    संजय राऊत यांची जोरदार फटकेबाजी, त्यांच्या भाषणातील मुद्दे :

    आपल्या देशाच्या राजकारणात फार गंमतीजमती होत असतात मुख्यमंत्री दावोसला गेले, आपल्याला माहिती नाही ते दावोस कुठंय? आपल्याला दापोली माहिती आहे दावोसला तिथे महाराष्ट्रात गुंतवणीकीचं कार्यालय केलं तिथे आपले मुख्यमंत्री बसले होते. तिथे दोन-चार लोक अचानक आले. हे गडबडले, बोलायचं काय? विचारात पडले तिथल्या देशाचे पंतप्रधान म्हणाले, अरे तुम्ही येथे हो आम्ही इथे, किती खोके देऊ तुम्हाला? येता आमच्या पक्षात येता? ते म्हणतात, नाही मला खोके नको, आम्ही मोदीचे माणसं आहोत. तुम्हीपण मोदीचे माणसं आहात. आम्हीपण मोदीचे माणसं आहोत. बरं झालं. मग त्यांनी एक सेल्फी काढला. फोटो काढा आणि मोदींना दाखवा

  • 23 Jan 2023 07:04 PM (IST)

    उद्धव ठाकरे हे सुद्धा आपले सदैव पक्षप्रमुख आहेत : संजय राऊत

    संजय राऊत यांच्या भाषणातील मुद्दे :

    उद्धव ठाकरे हे सुद्धा आपले सदैव पक्षप्रमुख आहेत जनतेने बहाल केलेली ही पदं आहेत निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय हे सगळे कागदी प्रकार आहेत आणि आपण कागदी वाघ नाहीत शिवसेना हा धगधगता निखार आहे शिवसेना हा रक्तातून निर्माण झालेला इतिहास आहे रक्तातून निर्माण झालेला इतिहास हा कोणत्याही शाहीला मिटवता येत नाही. मग ते न्यायालय असेल किंवा निवडणूक आयोग असेल, कोणत्याही शाहीला ते मिटवता येणार नाही

    आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे. शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस आहे. शिवसेना आज आपल्यात असते तर ९७ वर्षांचे असते. आज नेताशी सुभाषचंद्र बोस यांचाही वाढदिवस आहे. दोन महापुरुषांचा जन्म आजच्या दिवशी झाला.

  • 23 Jan 2023 06:44 PM (IST)

    संविधानी व्यवस्थेला छेद देण्याच काम राज्यपाल भाजपसाठी करत होते; नाना पटोले यांची टीका

    राज्यपाल भवन भाजप भवन झालं होतं

    संविधानी व्यवस्थेला छेद देण्याच काम राज्यपाल भाजपसाठी करत होते,

    अनेकदा महापुरुषाबाबत अवमानकारक वक्तव्य करत होते

    त्यांची हकालपट्टी करून त्यांना पाठवा

    काँग्रेसच्या नाना पटोले यांची मागणी

  • 23 Jan 2023 06:35 PM (IST)

    राज्य सरकारने एमपीएससी आयोगात सदस्यांची केली नियुक्ती

    डॉ. अभय वाघ आणि सतीश देशपांडे यांची नियुक्ती

    राज्यपालांच्या आदेशानं सामान्य प्रशासन विभागानं काढले आदेश

  • 23 Jan 2023 06:35 PM (IST)

    बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात

    बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात

    अभिनेता प्रसाद ओक यांच्याकडून कार्यक्रमाचं सूत्रसंचालन

  • 23 Jan 2023 06:29 PM (IST)

    भाजप अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात

    आदित्य ठाकरेनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला हार घालताच तुटला

    विचारांशी गद्दारी करणाऱ्या आदित्य ठाकरे यांची सुमनांजली बाळासाहेबांना मान्य नाही

    एकीकडे हिंदुत्वाशी गद्दारी तर दुसरीकडे सोनियांसमोर लोटांगण हे बाळासाहेबांना मान्य नाही हे स्पष्ट

  • 23 Jan 2023 06:28 PM (IST)

    ठाकरे कुटुंबियांची विधान भवनात उपस्थिती

    बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी ठाकरे कुटुंबातील राज ठाकरे, निहार ठाकरे आणि स्मिता ठाकरे विधान भवनात उपस्थित

  • 23 Jan 2023 06:19 PM (IST)

    नारायण राणे विधान भवनात दाखल

    भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे विधान भवनात दाखल

    देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे लवकरच दाखल होण्याची शक्यता

  • 23 Jan 2023 06:05 PM (IST)

    अथर्व अंकोलेकर याचं शानदार द्विशतक, हैदराबाद विरुद्ध धमाकेदार खेळी

    अथर्व अंकोलेकर याची द्विशतकी खेळी

    सीके नायडू स्पर्धेत हैदराबाद विरुद्ध ठोकलं द्विशतक

    अथर्वची 249 बॉलमध्ये 214 धावांची खेळी, 15 चौकार आणि 11 गगनचुंबी षटकारांचा समावेश

    सविस्तर बातमीसाठी क्लिक करा खालील लिंकवर

    15 चौकार, 11 षटकार, टीम इंडियाच्या फलंदाजाचं खणखणीत द्विशतक

  • 23 Jan 2023 06:02 PM (IST)

    राज ठाकरे विधान भवनात दाखल

    बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधान भवनात दाखल

    थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार

  • 23 Jan 2023 05:27 PM (IST)

    बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त ठाकरे गटाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय

    बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने ठाकरे गटाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय

    ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मेळाव्यासाठी रवाना

    उद्धव ठाकरे आधी रिगल सिनेमाजवळ बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करणार षन्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा मेळावा आयोजित

    उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरे रिगल सिनेमाजवळ दाखल

  • 23 Jan 2023 05:18 PM (IST)

    महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी, राज ठाकरे विधान भवनाच्या दिशेला निघाले

    मुंबई : महाराष्ट्राचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आज विधानसभेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. विधान भवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आलाय. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल. विरोधी पक्षनेते अजित पवार कार्यक्रमासाठी विधान भवनात दाखल झाले आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील विधान भवनाच्या दिशेला रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. पण उद्धव ठाकरे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार नाहीत. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत.

  • 23 Jan 2023 05:09 PM (IST)

    राष्ट्रपती द्रोपर्दी मुर्मू यांच्या हस्ते देशातील 11 मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कार

    नवी दिल्ली :

    राष्ट्रपती द्रोपर्दी मुर्मू यांच्या हस्ते देशातील 11 मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कारांने सन्मानीत केलं जाणार आहे. यामध्ये ६ मुली आणि 5 मुलांचा समावेश आहे. 5 ते 18 वर्षादरम्यानच्या मुलांना हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचं स्वरूप एक लाख रूपये, पदक आणि प्रमाणपत्र असं आहे.

    कला, संस्कृती, खेळ, वीरता, सामाजिक सेवा अशा ६ क्षेत्रातील मुलांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ जानेवारीला या मुलांशी संवाद साधणार आहेत.

  • 23 Jan 2023 04:42 PM (IST)

    राज्यातील भाजप पक्ष उन्मत्त झालेला पक्ष; भास्कर जाधव यांची जोरदार टीका

    मुंबई

    आधीसारखी भाजपा आता राहिली नाही

    आता सत्तेनं उन्मत्त झालेली भाजपा आहे

    अटलबिहारी वाजपेयींना पंडीत नेहरुंचा फोटो चालणार नाही

    कारण मोदीजी म्हणतात तसं नया भारत तसं ही नया भाजपा आहे

    नारायण राणे हा राजकीय शक्तीपात झालेला माणूस आहे

    त्यामुळे त्यांनी शक्तीविषयी बोलू नये

    त्यांना स्वतः निवडून येता येत नाही त्यांनी यावर बोलू नये

    राज्यपालांनी आतापर्यंत महाराष्ट्राचा करावा तेवढा उपमर्द केला

    नाना पटोले म्हणतायेत ते खरं आहे कारण राजीनामा देण्याची इच्छा त्यांनी राष्ट्रपतींकडे करायला हवी होती

  • 23 Jan 2023 04:38 PM (IST)

    Bhagatsigh Koshyari | महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान झाला, त्याची परतफेड काय होणार?

    राज्यपालांच्या राजीनाम्यावरून जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

    राज्यपालांची हकालपट्टीच झाली पाहिजे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे राजीनामा देण्याची इच्छा केली व्यक्त

  • 23 Jan 2023 04:37 PM (IST)

    शिक्षक मतदानावर बहिष्काराचा निर्णय

    हिंगोली : पेन्शनपीडित शिक्षकांचा औरंगाबाद शिक्षक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

    हिंगोली जिल्ह्यातील 500 पेक्षा जास्त शिक्षक टाकणार बहिष्कार

    2005 पूर्वी नियुक्ती व 2005 नंतर अनुदानित शाळेतील सर्व शिक्षकांचा निर्णय

    शिक्षक मतदारसंघातील कोणत्याही उमेदवाराला मतदान न करण्याचा केला संकल्प

  • 23 Jan 2023 04:28 PM (IST)

    Bhagatsigh Koshyari | उशिरा का होईना राज्यपालांना सबुध्दी झाली- भास्कर जाधव

    राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली

  • 23 Jan 2023 04:26 PM (IST)

    नागपूर पोलीस भवनमधील रूमला आग

    लेखा विभागाची आहे रूम

    अग्निशमन विभागाचे जवान दाखल

    सहा मजली आहे पोलीस भवनची इमारत

    तिसऱ्या मजल्यावर लागली

    या ठिकाणी रेकॉर्ड असण्याची शक्यता

    आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही

  • 23 Jan 2023 04:25 PM (IST)

    Bhagatsigh Koshyari : राज्यपालांची हकालपट्टी करा, स्वेच्छेने जाऊ देऊ नका- नाना पटोले

    राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची स्वेच्छेने राजीनामा देण्याची पंतप्रधानांकडे विनंती

    महाविकास आघाडीच्या नेत्यांची तीव्र प्रतिक्रिया

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आक्रमक प्रतिक्रिया

  • 23 Jan 2023 04:23 PM (IST)

    तुमच्याबद्दल काय चीड आहे हे बघायचं असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढून दाखवा; ठाकरे गटाची टीका

    कोल्हापूर

    निष्ठावंत आणि मातोश्रीची नाळ निस्वार्थीपणे जोडलेले शिवसैनिक जयंती साजरी करत आहेत

    राजकारण करायचं असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो बाजूला काढून मोदींचा लावा

    तुमच्याबद्दल काय चीड आहे हे बघायचं असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढून दाखवा

    मातोश्रीला धोका देणारे वारस कसे होऊ शकतात

    निष्ठावंत शिवसैनिक हेच बाळासाहेबांच्या विचारांचे वारस

    आरोप करणाऱ्यांनी किती पक्ष बदलले हे आधी पाहावं म्हणत नारायण राणे, दीपक केसरकर यांच्यावर टीका

  • 23 Jan 2023 04:22 PM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एन एस यु आय कार्यकर्त्यांनी घातला सचिवांना घेराव

    परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करा NSUI ची मागणी

    गेट बंद करून अडवलं असता गेटवरून कार्यकर्त्यांनी मारल्या उड्या

    सचिवांना घेराव घालत कार्यकर्त्यांनी दिलं निवेदन

  • 23 Jan 2023 04:20 PM (IST)

    Bhagatsingh Koshyari : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनाम्याची इच्छा केली व्यक्त

    पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यात इच्छा व्यक्त

    राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस पंतप्रधानांना कळविल्याची दिली माहिती

  • 23 Jan 2023 04:20 PM (IST)

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजीनाम्याची इच्छा

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल पदावरुन पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केलीय.

    राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस असल्याचं राज्यपालांनी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांना सांगितलंय.

  • 23 Jan 2023 03:44 PM (IST)

    Pune Live- कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली बैठक

    निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीचे आदेश

    जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे निर्देश

    मतदारसंघात मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचेही निर्देश

    कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली बैठक

  • 23 Jan 2023 03:35 PM (IST)

    बीडमध्ये 52 शिक्षकांचे निलंबन

    बीड जिल्ह्यातील 248 पैकी तब्बल 52 शिक्षकांचे निलंबन

    दिव्यांग असल्याचे खोटे प्रमाणपत्र जोडले

    बदली होऊ नये, त्याच शाळेत नोकरी हवी म्हणून बनाव

    जिल्हा परिषदेच्या सीईओ अजित पवार यांनी केली कारवाई

    शिक्षकांच्या विभागीय चौकशीचे दिले आदेश

  • 23 Jan 2023 03:03 PM (IST)

    VIDEO – याला म्हणतात नशीब, लास्ट ओव्हरचा थरार, बॉल स्टम्पला लागला, पण….

    लास्ट ओव्हरमध्ये जे पहायला मिळालं, त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. वाचा सविस्तर…..

  • 23 Jan 2023 03:02 PM (IST)

    Mumbai News Live: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या आईने सून आलियाविरोधात दाखल केली FIR

    अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या आईने सून आलियाविरोधात दाखल केली एफआयआर

    नवाजुद्दीनची आई मेहरुनिसा सिद्दिकी यांच्या तक्रारीनंतर आलियाला चौकशीसाठी पोलिसांनी बजावले समन्स

    आलिया आणि नवाजुद्दीनच्या आईमध्ये प्रॉपर्टीवरून वाद सुरू असल्याची माहिती

  • 23 Jan 2023 02:56 PM (IST)

    200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची सुनावणी 15 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली

    200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची सुनावणी 15 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली

    दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला कोर्टात हजर राहण्यापासून दिली सूट

    जॅकलिनने दाखल केला होता अर्ज

  • 23 Jan 2023 02:23 PM (IST)

    खारघर रेल्वे स्थानक येथे धावती लोकल पकडत असताना महिलेचा तोल गेला

    महिलेचा पाय प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमध्ये अडकला

    काही प्रवाशांनी त्या महिलेला सुखरूप लोकल बाहेर काढलं

    या महिलेचे वय 50 ते 55 असल्याचे प्राथमिक माहिती

    ही घटना सीसीटीव्ही कैद

  • 23 Jan 2023 02:21 PM (IST)

    मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात वाहतूक कोंडी

    30 मिनिटांपासून वाहतूक ठप्प

    मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाचा वाहतुकीला फटका

    डोंगर खोदकाम करत असताना डोंगराचे कोसळणारे दगड महामार्गावर येण्याची भीती

    परशुराम घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा

  • 23 Jan 2023 02:20 PM (IST)

    शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीचे मी स्वागत करतो: नाना पटोले

    मात्र आमच्याकडे अद्याप कुठलाही प्रस्ताव आला नाहीय,

    प्रस्ताव नेमका काय आहे ते पाहू आणि पुढे जाऊ, असं मी उद्धव ठाकरेंना आज सकाळी सांगितले आहे

    आमचे मागच्या काळातील अनुभव वाईट आहे, त्यामुळे ताक फुंकून आम्ही पितोय

    प्रकाश आंबेडकर यांनी नेमका काय प्रस्ताव दिला आहे ते अजून माहिती नाही

    वंचितने केलेल्या एमआयएमसोबतच्या युतीचा विषय नंतर चर्चिला जाऊ शकतो

    कसबा पेठ मधील उमेदवार 2 तारखेपर्यंत घोषित करणार

    महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला समोर जाणार

    इच्छुक उमेदवार मला आज भेटून गेले

  • 23 Jan 2023 01:39 PM (IST)

    Sarfaraz Khan चा छोटा भाऊ सुद्धा कमाल, मुंबईच्या टीममधून OUT होताच, बोलला नाय, डायरेक्ट करुन दाखवलं

    सर्फराजच्या भावामुळे मुंबईची धावसंख्या 600 च्या पुढे, किती फोर-किती सिक्स मारले? वाचा सविस्तर….

  • 23 Jan 2023 01:39 PM (IST)

    Ravindra Jadeja – त्याच्याजागी जाडेजाला बनवलं कॅप्टन, 3 मॅचमध्ये 17 विकेट घेणारा बॉलर नाही खेळणार

    Ravindra Jadeja – विनिंग टीमचा कॅप्टन का बदलला? जाडेजाला का बनवलं कॅप्टन? वाचा सविस्तर….

  • 23 Jan 2023 01:38 PM (IST)

    Yuzvendra Chahal – धनश्री वर्मा नाही, चहलने ‘या’ मुलीला बनवलं ट्रॅव्हल पार्ट्नर, जाणून घ्या कोण आहे ती मुलगी?

    Yuzvendra Chahal – युजवेंद्र चहलने इंदोरला जाताना इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका मुलीचा फोटो शेअर केलाय. ती मुलगी आपली ट्रॅव्हल पार्ट्नर असल्याच चहलने सांगितलय. वाचा सविस्तर….

  • 23 Jan 2023 01:36 PM (IST)

    Athiya Shetty-KL Rahul Wedding – BCCI, IPL आणि जाहीरातींमधून किती कमावतो केएल राहुल? जाणून घ्या नेटवर्थ

    Athiya Shetty-KL Rahul Wedding – केएल राहुल आज अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. वाचा सविस्तर….

  • 23 Jan 2023 12:47 PM (IST)

    Mumbai News Live: वरळीत 20 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपीला अटक

    मुंबईतील वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार

    35 वर्षीय व्यक्तीला अटक

    आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 376 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

    मुंबई पोलिसांकडून पुढील तपास सुरू

  • 23 Jan 2023 12:26 PM (IST)

    आदिवासी विद्यार्थ्यांचा नाशिकमधील आदिवासी विकासभवनला घेराव

    आदिवासी विद्यार्थ्यांचा नाशिकमधील आदिवासी विकासभवनला घेराव

    नाशिकमध्ये दोनशे ते तीनशे विद्यार्थ्यांचा आदिवासी भवनाला घेराव

    प्रलंबित पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ मिळण्याची मागणी

    DBT लागू करण्याची मागणी

    हॉस्टेलमध्ये वाढीव जागा करण्याची मागणी

    मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा

  • 23 Jan 2023 11:29 AM (IST)

    Aurangabad Live- बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त औरंगाबाद शहरात भव्य बाईक रॅली

    शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्याकडून बाईक रॅलीचे आयोजन

    औरंगाबाद शहरातील क्रांती चौकातून बाईक रॅलीला सुरुवात

    बाईक रॅलीत शेकडो बाईक सहभागी

  • 23 Jan 2023 10:58 AM (IST)

    Sarfaraz Khan: AUS विरुद्ध सीरीजसाठी सर्फराज खान टीममध्ये का हवा? ‘या’ रोलमध्ये दाखवेल धडाकेबाज खेळ

    Sarfaraz Khan: AUS विरुद्ध सीरीजसाठी सर्फराज खान टीममध्ये का हवा? ‘या’ रोलमध्ये दाखवेल धडाकेबाज खेळ. वाचा सविस्तर….

  • 23 Jan 2023 10:33 AM (IST)

    Anil deshmukh : अनिल देशमुख यांच्या जमीन अर्जावर आज सुनावणी

    अनिल देशमुख यांच्या जमीन अर्जावर आज सुनावणी

    सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

    देशमुख यांचा जामीन रद्द करावा यासाठी सीबीआयकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका

    मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सीबीआयची सर्वोच्च न्यायालयात याचिका

    आज होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

  • 23 Jan 2023 10:05 AM (IST)

    National News Live: तामिळनाडूमध्ये क्रेन कोसळल्याने चौघांचा मृत्यू

    तामिळनाडूतील अरक्कोनममधील कीलवेठी इथल्या मंदिर उत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान कोसळली क्रेन

    क्रेन कोसळल्याने 4 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी

    घटनास्थळी क्रेन वापरण्याची नव्हती परवानगी

    क्रेन ऑपरेटरला घेतलं ताब्यात, तपास सुरू

    राणीपेटचे जिल्हाधिकारी भास्कर पांडियन यांची माहिती

  • 23 Jan 2023 10:05 AM (IST)

    बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती पोस्टरवर प्रतिकृती साकारली

    नाशिकमध्ये शिवसेवा युवक मित्र मंडळाकडून सर्वात मोठी बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

    बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी महापौर विनायक पांडे यांचा अनोखा उपक्रम

    तब्बल 32 बाय 26 फुटाची बाळासाहेबांची साकारली पोस्टरवर प्रतिकृती

    अकरा हजार एकशे अकरा लाडूंचे करणार वाटप

    मशाल चिन्ह असलेले अकराशे अकरा फुगे आकाशात सोडणार

  • 23 Jan 2023 10:05 AM (IST)

    Video: ‘तो’ संपला असं सगळ्यांना वाटलं, टीममधून बाहेर केलं, आता एक ओव्हरमध्ये कुटल्या 2,4,4,2,7,6 6,

    या बॅट्समनने T20 च्या सामन्यात समोरच्या बॉलरचा बेकार कुटलं. समोरच्या बॉलरला संधीच दिली नाही. वाचा सविस्तर….

  • 23 Jan 2023 10:04 AM (IST)

    IND vs NZ – देवदर्शनासाठी टीम इंडियाचे खेळाडू पोहोचले ‘या’ मंदिरात, ऋषभ पंतसाठी विशेष पार्थना

    IND vs NZ – शेवटचा वनडे सामना खेळण्याआधी टीम इंडियाकडून देवदर्शन. वाचा सविस्तर….

  • 23 Jan 2023 10:03 AM (IST)

    VIDEO – David miller ने काय कॅच पकडली राव, तुम्ही सुद्धा तोंडभरुन कौतुक कराल

    डेविड मिलरची ही कॅच पाहून सगळेच थक्क झाले. वाचा सविस्तर….

  • 23 Jan 2023 10:00 AM (IST)

    International News Live: पाकिस्तानमधील बऱ्याच भागांमध्ये वीजपुरवठा खंडित

    पाकिस्तानमधील बऱ्याच भागांमध्ये वीजपुरवठा खंडित

    इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीच्या महत्त्वपूर्ण भागांमध्ये गेल्या अनेक तासांपासून वीज नाही

  • 23 Jan 2023 09:56 AM (IST)

    Entertainment News Live: अवघ्या 9 वर्षांच्या जेटशेननं पटकावलं ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चं विजेतेपद

    नऊ वर्षांच्या जेटशेन दोहना लामाने ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या नवव्या सिझनचं विजेतेपद पटकावलं

    हर्ष सिकंदर आणि ज्ञानेश्वरी गाडगे यांना मागे टाकत जेटशन ठरली विजेती, वाचा सविस्तर..

  • 23 Jan 2023 09:56 AM (IST)

    लडाखचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा उपोषणाचा इशारा

    लडाखचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लडाखमध्ये ‘ऑल इज नॉट वेल लडाख’ असे म्हणत लक्ष घालण्यासाठी येत्या प्रजासत्ताक दिनी पाच दिवसांच्या लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे.

    सोनम वांगचूक यांचे कॅरेक्टर प्रख्यात अभिनेता आमीर खान यांनी ‘थ्री इडीएट’ चित्रपटात फूनसूख वांगडू नावाने साकारले होते.

  • 23 Jan 2023 09:48 AM (IST)

    नाशिक आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना अटक करून 1 फेब्रुवारी रोजी हजर करा

    केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिला आदेश

    वेठबिगारीसाठी 1 मेंढी आणि 5 हजार रुपयांच्या बदल्यात मुलांच्या विक्रीप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत हे चारही उच्चाधिकारी गैरहजर राहिले

    9 जानेवारीला आयोगासमोर साक्षीसाठी हे अधिकारी हजर राहिले नाहीत

    म्हणून हे अटक वॉरंट काढण्यात आले आहे

  • 23 Jan 2023 09:09 AM (IST)

    बागेश्वर धाम वादात महाराष्ट्रातल्या साधुसंतांची उडी

    नाशिक -बागेश्वर धाम वादात महाराष्ट्रातल्या साधुसंतांची उडी

    – अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्यासाठी साधू महंत एकवटणार

    – नाशिकच्या रामकुंडावर आज होणार आंदोलन

    – महंत अनिकेत शास्त्री महाराज यांची टीव्ही 9 ला माहिती

    – आंदोलनात 10 आखाड्याचे साधू-महंत होणार सहभागी – हिंदू धर्माला अनिस कडून टारगेट केलं जात असल्याचा साधुमहंतांचा आरोप

    – बागेश्वर धाम प्रकरणानंतर देशभरात साधू महंत आक्रमक

  • 23 Jan 2023 08:40 AM (IST)

    पेपर फुटीचा धक्का घेतल्यानंतर केंद्रावर पाठवले जाणार ऑनलाईन पेपर

    औरंगाबाद : डी फार्मसी च्या बॅगलोक चा पेपर फुटण्याचा प्रकार आला होता समोर,

    पेपर फुटी समोर आल्यानंतर तंत्र शिक्षण मंडळ झाले खडबडून जागे,

    समितीचा तपास सुरू असताना राज्य मंडळाने वितरण प्रणालीत केला मोठा बदल,

    थेट परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका ऑनलाईन पद्धतीने येणार पोहोचवण्यात.

  • 23 Jan 2023 08:35 AM (IST)

    पुणे शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर व कोथरूडच्या हवेची गुणवत्ता संवेदनशील गटांसाठी घातक

    पुणे शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर व कोथरूडच्या हवेची गुणवत्ता संवेदनशील गटांसाठी घातक

    श्वसनाचे विकार असलेल्यांनी स्वारगेट, शिवाजीनगर, कोथरूडसह जेथे हवेची गुणवत्ता खराब आहे त्या ठिकाणी जाताना मास्क व गॉगल वापरण्याचा डॅाक्टरांचा सल्ला

    नोव्हेंबर महिन्यापासून शहराच्या हवेची गुणवत्ता सतत खालवतेय

    स्वारगेट, शिवाजीनगर, कोथरूड, भूमकर चौक, कात्रज चौक या भागांत धूलिकणांचे प्रमाण सतत वाढतेय

    अतिसूक्ष्म धुलिकण (पी.एम.२.५) व सूक्ष्म धूलिकण (पीएम10) यासह कार्बन मोनाक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले

    अशा प्रकारच्या हवेमुळे खोकला, धाप लागणे, सीओपीडी, फुफ्फुसावर विपरीत परिणाम होऊ शकतो

  • 23 Jan 2023 08:13 AM (IST)

    अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा राडा

    पुण्याच्या येरवडा कारागृहातून रिटर्न आलेल्या कैद्यांनी धुडगुस घालत दोन कैद्यांना केली बेदम मारहाण

    फ्रेजरपुरा पोलिसांनी केला आठ कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल

    राडा थांबवण्यासाठी कारागृहातील पोलिसांनी केला सौम्य बळाचा वापर

    जखमी कैद्यांवर कारागृहाच्या रुग्णालयात उपचार सुरू

  • 23 Jan 2023 08:11 AM (IST)

    मातोश्री गेट फुलांनी सजविण्यास सुरुवात

    शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती असल्याने मातोश्रीच्या गेटवर फुलांची आरास करण्यास सुरुवात झाली आहे

    मातोश्रीच्या परिसरात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणारे बॅनर देखील लावण्यात आले आहेत

    शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतरची बाळासाहेब ठाकरे यांची ही पहिली जयंती आहे

    ठाकरे गट व शिंदे गट ही जयंती साजरी करत असून दोन्ही गटांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे

  • 23 Jan 2023 07:52 AM (IST)

    आमदार बच्चू कडू आज शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रचारासाठी औरंगाबाद दौऱ्यावर

    औरंगाबाद मधील शिक्षक मतदार संघाचे उमेदवार संजय तायडे पाटील यांचा बच्चू कडू करणार प्रचार,

    राज्यात होणाऱ्या शिक्षक व पदवीधर निवडणूकीसाठीच्या 5 जागेपैकी एका जागेवर निवडणूक लढणार आहे,

    अमरावती पदवीधर निवडणूकीत भाजप उमेदवार रणजित पाटील यांना पाठींबा.

  • 23 Jan 2023 07:44 AM (IST)

    Athiya Shetty-KL Rahul Wedding – आज शुभमंगल सावधान, लग्नाबद्दल जाणून घ्या सर्व काही

    लग्नात मेन्यू काय? रिसेप्शन कुठे होणार? लग्नाचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर. वाचा सविस्तर…

  • 23 Jan 2023 07:08 AM (IST)

    पतंग उडवत असताना चार वर्षीय चिमुकल्याचा विहीर पडून दुर्दैवी मृत्यू

    अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील धनोडी गावात पतंग उडवत असताना चार वर्षीय चिमुकल्याचा विहीर पडून दुर्दैवी मृत्यू….

    शिव मानकर असे विहीरीत पडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव.

    घराच्या माळीवर पतंग उडवत असताना लोखंडी ग्रीलला अडकलेली पंतग काढत असताना गेला तोल..

    विहिरीतील पाणी मोटर पंपाच्या सहाय्याने काढून बाहेर काढण्यात आला मृतदेह…

  • 23 Jan 2023 06:21 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहुर येथे पोलिसांवर हल्ला करणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक

    अटकेनंतर पोलिसांनी गुंडांची काढली गावभर धिंड

    पोलिसांवर हल्ला करत दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांची धिंड काढत घडवली अद्दल

    दहशत व गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी गुन्हेगारांची काढण्यात आली गावभर धिंड

  • 23 Jan 2023 06:19 AM (IST)

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे आज अनावरण

    आज सायंकाळी 6 वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात तैलचित्राचे अनावरण

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही कार्यक्रमाचं आमंत्रण

  • 23 Jan 2023 06:16 AM (IST)

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

    आज संध्याकाळी 5 वाजता षण्मुखानंद हॉलमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा

    उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

    उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप असणार असल्याची शक्यता

  • 23 Jan 2023 06:09 AM (IST)

    वंचित आघाडी आणि शिवसेनेच्या युतीची आज घोषणा; दुपारी होणार पत्रकार परिषद

    उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार

    दुपारी 12.30 वाजता होणार पत्रकार परिषद

    पत्रकार परिषदेत शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीची होणार घोषणा

Published On - Jan 23,2023 6:06 AM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.