Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा हाहा:कार; दिवसभरात 36902 नव्या रुग्णांची नोंद, मृत्यूदर 2.04 टक्क्यांवर
आज दिवसभरात कोरोनाचे तब्बल 36,902 नवे रुग्ण आढळले आहेत. मृतांचा आकडासुद्धा शंभरी पार गेला असून आज दिवसभरात कोरोनामुळे 112 जणांचा मृत्यू झाला आहे. (latest maharashtra corona update)
मुंबई : राज्यात कोरोनाने हाहा:कार उडवला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहे. राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले असले तरी, कोरोना संसर्ग (Maharashtra Corona) आटोक्यात आणणे शक्य होत नाहीये. या पार्श्वभूमीवर आजसुद्धा कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आज दिवसभरात कोरोनाचे तब्बल 36,902 नवे रुग्ण आढळले आहेत. मृतांचा आकडासुद्धा शंभरी पार गेला असून आज दिवसभरात कोरोनामुळे 112 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दगावलेल्या रुग्णांमुळे राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही ताजी आकडेवारी पाहता, कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढली तर आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. (latest Maharashtra Corona Update total 36902 patient found on Friday)
कोरोना रुग्णांची आजची स्थिती काय?
राज्यात आज दिवसभरात 36,902 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर एकूण 17,019 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चारर्ज देण्यात आला आहे. आजची आकडेवारी मिळून राज्यात आतापर्यंत 23,000,56 रुग्ण कोरोनातून नुक्त झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 87.2 टक्क्यांवर आले आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे एकूण 112 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर सध्या 2.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 36,37,735 वर पोहोचला आहे.
मुंबई महापालिकेत आज 5515 नवे रुग्ण
मुंबई महापालिकेत आज दिवसभरात कोरोनाचे 5515 नवे रुग्ण आढळले. आद दिवसभरात एकूण 10 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. आजच्या 10 रुग्णांच्या मृत्यूमुळे आजमुंबई मनपा परिसरात मृतांचा आकडा 11633 वर पोहोचला आहे. मुंबई मनपा परिसरातील रुग्णांची संख्या 3,85,661 वर पोहोचली आहे.
ठाणे मनपामध्ये 1020 एकूण रुग्ण
मुंबई तसेच उपनगरांमध्येसुद्धा कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. ठाणे मनाप हद्दीत आज दिवसभरात कोरोनाचे तब्बल 1020 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 63,914 वर पोहोचली. आज दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे येथे मृतांचा आकडा 1255 वर पोहोचला आहे.
नाशिकमध्ये रुग्म दोन हजारांच्या पलिकडे
नाशिकमध्ये कोरोनाला थोपवण्यासाठी अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, येथे अूजनही कोरोनाला थोपवण्यात यश आलेले नाही. नाशिकमध्ये आज दिवसभरात कोरोनाचे 2080 नवे रुग्ण आढळले आहेत. तर येथे दिवसभरात कोरोनामुळे एकूण 3 जणांचा मृत्यू झाला असून मनपा क्षेत्रातील मृतांचा आकडा 1131 वर पोहोचला आहे.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये चिंताजनक स्थिती
पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागात कोरोना झपाट्याने वाढत आहे. येथे पुणे मनपा हद्दीत एकूण 2679 नवे रुग्ण आढळले आहेत. पुण्यात आज दिवसभरात 3 जणांचा मृत्यू झाल्यामुळे येथे मृतांचा आकडा आता 4396 वर पोहोचला आहे. पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 258728 वर पोहोचली आहे. पिंपरी चिंचवडमध्येसुद्धा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज दिवसभरात 1782 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. आज येथे एका रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा 1362 वर पोहोचला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 1,26,376 वर पोहोचला आहे.
औरंगाबादेत कोरोनाचे 1563 नवे रुग्ण
औरंगाबाद शहरामध्येसुद्धा कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. औरंगाबादेत आज दिवसभरात कोरोनाचे 1563 नवे रुग्ण आढळले. तर दिवसभरात येथे कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला. आजच्या मृत्यूनंतर येथे मृतांचा आकडा 973 वर पोहोचला आहे. औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 55839 वर पोहोचली आहे.
नागपुरात कोरोनाची स्थिती चिंताजनक, दिवसभरात 3055 नवे रुग्ण
नागपूर मनपा क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. येथे मनपा क्षेत्रात तब्बल 3055 नवे रुग्ण आढळले आहेत.तर दिवसभारात येथे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात कोरोना बाधितांचा आकडा 1,81,490 वर पोहोचला असून येथे आतापर्यंत 2887 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने कडक पवित्रा धारण केला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (28 मार्च) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
इतर बातम्या :
RFO दीपाली चव्हाण आत्महत्या : DFO विनोद शिवकुमार निलंबित, APCCF श्रीनिवास रेड्डींची उचलबांगडी
(latest Maharashtra Corona Update total 36902 patient found on Friday)