NEET UG 2024: नीट पेपर लीक, लातूरमधील मुख्याध्यापक घेत होता 50,000 अॅडव्हान्स, संपूर्ण डिल 5 लाखांची
NEET UG 2024: नीट आणि यूजीसी घोटाळ्यातील आरोपी जलील पठाण याला 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्याचा आरोप जलील पठाण आणि त्याच्या सहकाऱ्यावर करण्यात आला आहे.
नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात लातूर पोलिसांचा वेगाने तपास सुरू आहे. जलील पठाण आणि संजय जाधव या दोन शिक्षकांसह चार जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी दोन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत या प्रकरणात सहा जणांचा सहभाग दिसून येत आहे. त्यातील जलील पठाण याला 2 जुलै पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर संजय जाधव यालाही अटक करण्यात आली आहे. तसेच आणखी दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.धाराशिवमध्ये आयटीआय सुपरवायझर असलेला इरना कोनगलवार आणि दिल्लीचा गंगाधर मुंडे या दोघांचा शोध सुरू आहे.
50 हजार रुपये अॅडव्हान्स
नीट गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत सहा जणांचा संबंध जोडला गेला आहे. जलील पठाण आणि संजय जाधव यांच्याकडून पोलिसांनी मोबाईल सेटसह काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. प्राथमिक माहितीनुसार पाच लाख रुपयांच्या मोबदल्यात नीटचा पेपर लिक करण्यात येत होता. गुणवाढीसाठी दिल्लीतील आरोपी गंगाधर याच्याशी संपर्क करुन उमरगा आयटीआयमधील इरण्णा कोनगलवर दोघ शिक्षकांकडून प्रवेशपत्र मागवून घेत होता. त्यासाठी 50 हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून घेतले जात असल्याची माहिती आहे. लातूर पोलिसांनी या प्रकरणात कमालीची गोपनीयता बाळगली असून वेगाने तपास सुरू आहे. लवकरच पोलिसांच्या ताब्यात असलेल्या जलील पठाण आणि संजय जाधव या दोन शिक्षकांना गंगाधर मुंडे यांच्या शोधासाठी दिल्लीला घेऊन जातील अशी शक्यता आहे.
इरण्णा याचा शोध सुरु
इरण्णा याच्या शोधासाठी सोमवारी एक पथक देगलूर येथे गेले होते. परंतरु इरण्णा त्या ठिकाणी सापडला नाही. तो कोनगलवार लातूर येथून उमरगा आयटीआयसाठी ये-जा करत होता. सोमवारी आणि मंगळवारी त्याने रजा टाकली होती. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
जलील पठाण याला 7 दिवसाची पोलीस कोठडी
नीट आणि यूजीसी घोटाळ्यातील आरोपी जलील पठाण याला 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्याचा आरोप जलील पठाण आणि त्याच्या सहकाऱ्यावर करण्यात आला आहे. त्याला सोमवारी कोर्टात उभे करण्यात आले होते. पोलीस प्रशासनाने 10 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र कोर्टाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा
नीट परीक्षा गैरव्यवहारात थेट लातूरमधील शिक्षक, विद्यार्थ्यांचे पैसे लातूरवरुन दिल्लीत व्हाय…