Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाकडाच्या ओंडक्यावर बसून तंरगण्याचा प्रयत्न, तीन भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच चितेवर अंत्यसंस्कार

नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latur Three siblings Drowned in manyad river)

लाकडाच्या ओंडक्यावर बसून तंरगण्याचा प्रयत्न, तीन भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच चितेवर अंत्यसंस्कार
Latur Three siblings Drowned
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 8:27 AM

लातूर : नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रोहिणी जायभाये, प्रतिक जायभाये, गणेश जायभाये असे या तिघांची नावे आहेत. या तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latur Three siblings Drowned in manyad river)

नेमकं काय घडलं?

लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्री या ठिकाणी ज्ञानोबा जायभाये आणि तुकाराम जायभाये हे दोघे सख्खे भाऊ राहतात. त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर चालतो. या ठिकाणी असणाऱ्या मन्याड नदीपात्राच्या जवळ त्यांचे शेत आहे. काल नेहमीप्रमाणे दोन भाऊ शेतावर गेले होते. त्यावेळी ते आपल्या तिन्ही मुलांनाही शेताकडे घेऊन गेले.

यावेळी ज्ञानोबा आणि तुकाराम हे दोघे शेतातील काम करीत होते. त्यावेळी ही तिन्ही मुले शेळ्या चरत मन्याड नदीपात्राजवळ आली. तेव्हा त्यांना लाकडाचे ओंडके दिसले. त्यामुळे त्यांना पाण्यात तरंगण्याचा मोह आवरला नाही. शेतात शेळ्या चरत असताना त्या लाकडाच्या ओंडक्यावर बसून हे तिघेजण पाण्यावर तरंगण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र अचानक त्यांचा तोल गेल्याने ते नदीपात्रात पडले. या तिघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

तीन भावंडांचे मृतदेह आढळले

दरम्यान काही वेळानंतर मुलं दिसत नसल्याचे पाहून तुकाराम आणि ज्ञानोबा यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. मात्र बराच वेळ हाका मारुनही त्या मुलांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी त्यांना नदीपात्रात लाकडाचे ओंडके दिसत होते. मात्र मुलं दिसत नव्हती. यानंतर त्या दोघांचा आवाज ऐकून परिसरातील शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यातील काही गावकऱ्यांनी पाण्यात उडी मारुन शोधशोध केली असता, त्यांना तिथे तीन भावंडांचे मृतदेह आढळून आले.

दरम्यान शवविच्छेदनानंतर मृत तिन्ही भावंडांवर शनिवारी रात्री एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांचा आक्रोश पाहायला मिळाला. तसेच या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाहा व्हिडीओ : 

(Latur Three siblings Drowned in manyad river)

संबंधित बातम्या :

दादा कोंडकेंच्या घराची दयनीय अवस्था, प्रथमेश परबने शेअर केला फोटो

पुण्याच्या ‘या’ भागातील 81 टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज; सिरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष

इन्स्टाग्रामवरील मैत्री महागात, तरुणावर लग्नासाठी दबाव, युवती ब्लॅकमेल करत महाराष्ट्रातून राजस्थानला

धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा.
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?.
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं.
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया.
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका.
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा.