Latur : मुबलक पाणी असतानाही पाणीप्रश्न पेटला..! भाजपाचे लातुरात निदर्शने

लातूर शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे खासगीकरण करण्याच्या हलचाली प्रशासकीय स्तरावर सुरु आहेत. मात्र, या हॉस्पिटलमुळे गरिबांवर कमी किंमतीमध्ये उपचार होत आहेत. याचे खासगीकरण करुन गरिबांवर अन्याय करण्याचा घाट प्रशासनाकडून केला जात आहे. केवळ अर्थार्जनाच्या अनुशंगाने हा निर्णय घेतला जात आहे.

Latur : मुबलक पाणी असतानाही पाणीप्रश्न पेटला..! भाजपाचे लातुरात निदर्शने
लातूरमध्ये शुध्द पाणी पुरवठा आणि लातूर सुपर स्पेशालिटी ह़स्पीटलचे खासगीकरण रोखण्यासाठी भाजपाने मनपावर मोर्चा काढला होता.
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 4:09 PM

लातूर : लातूर शहरात 10 दिवसांपासून दोन विषय मोठे चर्चेत आहेत. एकतर (Latur City) लातूर शहराला गेल्या काही दिवसांपासून पिवळसर रंगाचे पाणी नळाला येत आहे तर दुसरा (Super Specialty Hospital) सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे खासगीकरण हे दोन्ही विषय घेऊन शुक्रवारी (Latur BJP) भाजपाच्यावतीने शहरात निदर्शने करण्यात आली. पिवळसर पाण्याचे नमुने घेऊनच लातुरकर हे महानगरपालिकेत एकवटले होते तर दुसरीकडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे खासगीकरण करु नये मागणीसाठी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. लातूर शहराला मांजरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. यंदा मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे तर महानगरपालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत आहे. यामुळे नागरिकांना गढूळ पाण्यामुळे साथीचे आजार उद्भवत आहेत. हीच बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पिवळ्या पाण्याच्या बाटल्या घेऊन लातुरकर हे मनपा कार्यालयात दाखल झाले होते.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल खासगीकरण

लातूर शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे खासगीकरण करण्याच्या हलचाली प्रशासकीय स्तरावर सुरु आहेत. मात्र, या हॉस्पिटलमुळे गरिबांवर कमी किंमतीमध्ये उपचार होत आहेत. याचे खासगीकरण करुन गरिबांवर अन्याय करण्याचा घाट प्रशासनाकडून केला जात आहे. केवळ अर्थार्जनाच्या अनुशंगाने हा निर्णय घेतला जात आहे. पण सर्व लातुरकरांचा याला विरोध असून राज्य सरकार याच निर्णयावर ठाम असेल तर मात्र, यापेक्षा वेगळ्या पध्दतीने आंदोलन करावे लागेल असा इशाराच आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.

आता शुध्द पाणीपुरवठा

मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यांमधून पाणी सोडण्यात आल्याने तळाशी असलेले पाणी वर आले त्यामुळे पिवळसर पाण्याचा पुरवठा काही दिवस झाल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले. त्यानंतर सर्व जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी करण्यात आली होती . शिवाय वेळीच दुरुस्ती केल्याने आता लातूरमधील नागरिकांना शुध्द पाणी पुरवठा होत आहे. तर दुसरीकडे भाजपेच सर्व आरोप फेटाळत पिवळसर पाण्याची एक समस्या निर्माण झाली होती. आता लातूरमधील जनतेला शुध्द पाणी मिळत असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी लोकप्रतिनीधी रस्त्यावर

लातूर शहरात आता नव्यानेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. भाजपाच्या या लातूर बचाव मोर्चामध्ये सुपर स्पेशालिटीच्या खासगीकरणाचाही मुद्दा होता. हे हॉस्पीटल म्हणजे गरिबांसाठीचा दवाखाना आहे. खासगीकरण झाल्यास येथील उपचार हे सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे आहेत. त्यामुळे खासगीकरणाचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी आ. संभाजी पाटील, आ. रमेश कराड, खा, सुधाकर शृंगारे हे रस्त्यावर उतरले होते.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.