Latur : शेतकऱ्यांची तक्रार, प्रशासनाची कारवाई, मांजरा – तेरणा नदीच्या संगमावरच वाळू उपसा करणाऱ्या बोटी उध्वस्त

लातूर जिल्ह्यातून मांजरा अन् तेरणा नदी मार्गस्थ होतात. दरम्यान, औराद शहाजनी येथे या दोन नद्यांचा संगमही होतो. याच भागात अवैध वाळू उपसा केला जात आहे. दरवर्षी हे नित्याचेच झाले असल्याने याचा परिणाम नदी पात्रावर होत आहे. अवैध उपाशामुळे मुसळधार पाऊस झाल्यावर नदीपात्राबाहेर पाणी येते. त्यामुळे नदी लगतच्या शेतीचे नुकसान होत आहे.

Latur : शेतकऱ्यांची तक्रार, प्रशासनाची कारवाई, मांजरा - तेरणा नदीच्या संगमावरच वाळू उपसा करणाऱ्या बोटी उध्वस्त
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 12:29 PM

लातूर : जिल्ह्यातून मार्गस्थ होणाऱ्या (Manjra River) मांजरा आणि तेरणा नदी पात्रातून (Illegal sand mining) अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर होत आहे. विशेषत: दुर्गम भागात असलेल्या औराद-शहाजनी परिसरात हे प्रकार वाढले आहेत. अवैध वाळू उपशामुळे (River basin) नदी पात्राचा खराबा होत असून पाऊस पडल्यानंतर लगतच्या शेत जमिनीचे नुकसान होत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीवरुन पोलिस प्रशासनाने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. एवढेच नाही तर मांजरा – तेरणाच्या संगमावरच दोन बोटी उध्वस्त करण्यात आल्या आहेत.

वाळू उपश्याचा परिणाम शेती क्षेत्रावर

लातूर जिल्ह्यातून मांजरा अन् तेरणा नदी मार्गस्थ होतात. दरम्यान, औराद शहाजनी येथे या दोन नद्यांचा संगमही होतो. याच भागात अवैध वाळू उपसा केला जात आहे. दरवर्षी हे नित्याचेच झाले असल्याने याचा परिणाम नदी पात्रावर होत आहे. अवैध उपाशामुळे मुसळधार पाऊस झाल्यावर नदीपात्राबाहेर पाणी येते. त्यामुळे नदी लगतच्या शेतीचे नुकसान होत आहे. गतवर्षी झालेल्या पावसाच्या दरम्यान याचा प्रत्यय आला असून अनेक शेतकऱ्यांची शेत जमिन ही खरडून गेली आहे. त्यामुळे याच घटनांचा पु्न्नवृत्ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती.

कर्नाटक-महाराष्ट्र पोलिसांकडून कारवाई

कर्नाटक आणि महाराष्ट्र हद्द अगदी जवळ जवळ असल्याचा गैर फायदा घेत वाळू माफिया गेली अनेक महिने या भागात अवैध रित्या वाळू उपसा करीत होते . त्यांनी अनेक बोटीही नदी पात्रात उतरविल्या होत्या. जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेताच अवैध वाळू उपसा केला जात होता. शिवाय वाळू माफियांनी अनेक बोटी नदी पात्रात उतरिवल्या होत्या. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा

मध्यरात्रीच उडविल्या बोटी

निलंगा तालुक्यातल्या मांजरा आणि तेरणा नदीच्या संगमावर अवैधरित्या अनेक दिवसांपासून वाळू उपसा सुरु होता. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळताच कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी रविवारी मध्यरात्री जिलेटीनच्या सहाय्याने नदी पात्रातील दोन बोटी उडवून दिल्या आहेत. त्यामुळे आता नदीपात्राचा खराबा तर होणार नाहीच पण शेतकऱ्यांचे होणारे नुकसानही टळणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.