Latur : अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू, दोघांचीही शाळा अर्धवट

शहरालगतच्या म्हाडा कॉलनी समोरील रस्त्यावरुन मुलीला शाळेत घेऊन निघालेल्या जिल्हा परिषद शिक्षकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. ही धडक एवढी जोराची होती की दुचाकीवरील शिक्षक आणि त्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. दत्तात्रय पांचाळ (38) आणि मुलगी प्रतीक्षा पांचाळ (13) अशी मृतांची नावे आहेत.

Latur : अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू, दोघांचीही शाळा अर्धवट
लातूर शहराजवळ झालेल्या अपघातामध्ये वडील आणि मुलीचाही मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे.
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 2:48 PM

लातूर : शहरालगतच्या म्हाडा कॉलनी समोरील रस्त्यावरुन मुलीला शाळेत घेऊन निघालेल्या जिल्हा परिषद (Teacher) शिक्षकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने (Accident) धडक दिल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. ही धडक एवढी जोराची होती की दुचाकीवरील शिक्षक आणि त्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. दत्तात्रय पांचाळ (38) आणि मुलगी प्रतीक्षा पांचाळ (13) अशी मृतांची नावे आहेत. दत्तात्रय पांचाळ हे मुळचे लातूर तालुक्यातील भुसणी येथे वास्तव्यास होते. मात्र, मुलगी प्रतीक्षा ही (Latur) लातूरातील ज्ञानेश्वर इंग्लिश स्तूलमध्ये इयत्ता 8 वीच्या वर्गात शिकत होती. त्यामुळे तिचे वडील दत्तात्रय पांचाळ हे तिला दररोज लातूर येथे शाळेत सोडून पुन्हा पानचिंचोली येथे सेवा बजावण्यासाठी जात होते. नेहमीप्रमाणेच सोमवारी सकाळी मुलीला घेऊन ते लातूरला येत असताना म्हाडा कॉलनी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेच ही दुर्घटना घडली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या संबंधी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

प्रतीक्षाला शाळेत सोडूनच पांचाळ हे सेवेवर हजर रहायचे

दत्तात्रय पांचाळ यांची काही दिवसापूर्वीच जिल्हा अंतर्गत बदली झाली होती. त्यांचे मुळ गाव हे भुसणी तर पानचिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेवर ते शिक्षक होते. मात्र, मुलगी प्रतीक्षा ही लातूरातील शाळेत असल्याने ते रोज अगोदर मुलीला दुचाकीवरुन शाळेत सोडत असत व नंतर पानचिंचोलीकडे मार्गस्थ होत असत. हे त्यांचे नित्याचेच होते. सोमवारी सकाळीही ते भुसणी येथून लातूरकडे निघाले होते. दरम्यान, शहरा लगत असलेल्या म्हाडा कॉलनीजवळ येताच अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे.

रस्त्याचीही दुरावस्था

लातूर-बाभूळगाव या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून रखडलेले आहे. शिवाय या मार्गावर रहद्दारी अधिक असून रस्त्याचे काम कासवगतीने होत आहे. त्यामुळे लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. शिवाय या भागातूनच लातूर-नांदेड हा बाह्यमार्ग जात असल्याने मोठी वर्दळ असते. गेल्या सहा महिन्यापासून रस्त्याचे काम सुरु असून केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचे प्रमाण हे वाढत आहे.

संबंधित बातम्या :

Nanded School| नांदेडमध्ये आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु, जिल्ह्यातल्या कॉलेजची स्थिती काय?

Latur: आता ‘लालपरी’ धावणार, प्रशासनाच्या एका निर्णयामुळे 5 आगारातील प्रवाशांची होणार वाहतूक

Corona Update | औरंगाबादसह नांदेड, लातूरातही कोरोनाची लाट ओसरण्याच्या वाटेवर, काय आहे मराठवाड्याची स्थिती?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.