Latur : अगोदर महापौरांनी पाणी पिऊन दाखवले अन् मगच लातुरकरांच्या नळाला स्वच्छ पाणी, महिन्याभरानंतर मिटला प्रश्न

गढूळ आणि पिवळसर पाण्याचे नेमके कारण काय आहे हे शोधून काढण्यासाठी पाईपलाईद्वारे जो पाणीपुरवठा होता तो बंद करण्यात आला होता. शिवाय मांजरा धरणावरील वरचे गेटही उघडण्य़ात आले होते. त्यानंतरच गढूळ पाण्याचे नेमके कारण काय हे समोर आले होते. आता देखील नळाला पाणी सोडल्यानंतर पहिले 20 मिनिट हे पिवळसर पाणी राहणारच आहे. त्यानंतर मात्र, शुध्द पाण्याचा पुरवठा होणार आहे.

Latur : अगोदर महापौरांनी पाणी पिऊन दाखवले अन् मगच लातुरकरांच्या नळाला स्वच्छ पाणी, महिन्याभरानंतर मिटला प्रश्न
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 4:18 PM

लातूर : गेल्या 30 दिवसांपासून (Latur) लातुरात गढूळ आणि पिवळसर रंगाच्या पाण्याची चर्चा सुरु होती. तब्बल महिनाभर गढूळ (Water Supply) पाणीपुरवठ्याचे नेमके कारण काय हे शोधण्यात (Latur Muncipal) मनपा प्रशासनाची दमछाक झाली होती. अखेर शनिवारी लातुरकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा झालेला आहे. विशेष म्हणजे लातुरकरांच्या नळाला पाणी सोडण्यापूर्वी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही यासाठी पाणी पिऊन दाखवले. गढूळ पाण्याबरोबर येथील राजकारणही चांगलेच ढवळून निघाले होते. अखेर याला पूर्णविराम मिळाला असून शनिवारी सकाळी शहरातील काही भागात झालेला पाणीपुरवठा हा स्वच्छ असल्याचे दिसून आले.दरम्यानच्या काळात नागरिकांच्या तक्रारी आणि विरोधकांकडून टिकास्त्र यामुळे मनपा प्रशासनाची झोप उडाली होती.

दोन दिवस पाणीपुरवठा होता बंद

गढूळ आणि पिवळसर पाण्याचे नेमके कारण काय आहे हे शोधून काढण्यासाठी पाईपलाईद्वारे जो पाणीपुरवठा होता तो बंद करण्यात आला होता. शिवाय मांजरा धरणावरील वरचे गेटही उघडण्य़ात आले होते. त्यानंतरच गढूळ पाण्याचे नेमके कारण काय हे समोर आले होते. आता देखील नळाला पाणी सोडल्यानंतर पहिले 20 मिनिट हे पिवळसर पाणी राहणारच आहे. त्यानंतर मात्र, शुध्द पाण्याचा पुरवठा होणार आहे. त्याअनुशंगाने काही दिवस अधिकचा काळ पाणी सोडले जाणार असल्याचा निर्णय झाल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले आहे.

पिवळसर पाण्यावरुन राजकारणही

शहरातील नागरिकांना तब्बल 30 दिवस पिवळसर पाणी पुरवठा होतोय हा मुद्दा घेऊन विरोधकांना सत्ताधारी कॉंग्रेसला चांगलेच धारेवर धरले होते. केवळ निषेधच व्यक्त नाही तर पिवळे पाणी घेऊन थेट मनपामध्ये भाजपा पदाधिकारी दाखल झाले होते. तर दुसरीकडे नेमकी समस्या काय आहे याचा उलगडा मनपा प्रशासनाला झाला नव्हता. ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर हा पाण्याचा मुद्दा विरोधकांना मिळाल्याने निवडणुकीची चाहूल लागल्याची जाणीव लातुरकरांना झाली हे मात्र नक्की.

हे सुद्धा वाचा

पाणीपुरवठ्याचा कालावधी वाढला

गेल्या महिन्याभरापासून लातुरकरांना गढूळ पाणी पुरवठा होत होता. आगामी काळातही नळाला पाणी सोडल्यापासून 15 ते 20 मिनिट काही प्रमाणात का होईना गढूळ पाणीच येणार त्यामुळे पुढील काही दिवस अधिकचा वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. दरम्यानच्या काळात लातूरकरांना बोअरच्या पाण्यावर तहान भागवावी लागली होती. त्यामुळे वाढीव वेळेमुळे अधिकच्या पाण्याचा साठा करता येणार आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.