सकाळचा व्यायाम बेतला जीवावर; व्यायाम करताना अंगावरुन गेली भरधाव कार

पोलीस भरतीसाठी हे दोघेही युवक गेल्या काही दिवसांपासून व्यायाम करत होते, त्यासाठी ते दोघेही दगडवाडीच्या जवळ व्यायामासाठी येत होते. मात्र त्यांच्यावर आज काळाने घाला घातला. या अपघातामुळे आणि त्यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळचा व्यायाम बेतला जीवावर; व्यायाम करताना अंगावरुन गेली भरधाव कार
सकाळी व्यायाम करताना दोघा युवकाना कारने उडवलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 6:23 PM

लातूरः सकाळी व्यायामाला निघालेल्या दोन युवकांच्या  (two Young Boys Death) अंगावरून भरधाव कार (Car Accident) गेल्याची घटना लातूर जिल्ह्यातल्या किनगाव (Kingaon District Latur) इथं घडली आहे. दगडवाडी जवळच्या रस्त्यावर हे दोन युवक सकाळी पोलीस भरतीच्या तयारीसाठी दररोज व्यायामाला जात होते. मात्र आज सकाळी या युवकांना भरधाव वेगात आलेल्या कारने जोराची धडक दिली. त्यामुळे एका युवकाचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

कारचालकाला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलीस  पुढील तपास करत आहेत.

पोलीस भरतीसाठी दोघांचेही प्रयत्न

पोलीस भरतीसाठी हे दोघेही युवक गेल्या काही दिवसांपासून व्यायाम करत होते, त्यासाठी ते दोघेही दगडवाडीच्या जवळ व्यायामासाठी येत होते. मात्र त्यांच्यावर आज काळाने घाला घातला. या अपघातामुळे आणि त्यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

एकाचा मृत्यू; एक गंभीर

अपघात घडला त्यावेळेला रस्त्याच्या कडेला हे दोघे युवक व्यायाम करीत होते . यामध्ये मुकुंद मुंडे (वय 21) याचा मृत्यू झाला तर प्रतीक मुंडे (वय 22 ) हा गंभीररित्या जखमी झाला आहे. ज्या कारमुळे हा अपघात झाला आहे, त्या कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांमधील एकाचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या युवकाचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे, त्याच्या घरातील व्यक्तींना जबर मानसिक धक्का बसला आहे. हा अपघात कसा झाला याची चौकशी पोलीस करत आहेत.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पहाटेच्या वेळी अनेक जण व्यायामासाठी जात असतात. मात्र यावेळी वाहनांची गर्दी आणि वाहनांचा वेग यामुळे नागरिकांमधेय भीतीचे वातावरण पसरले आहे. या दोघां युवकांच्या अपघातामुळे या परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडे पहाटेच्या वेळी या भागात राऊंड मारण्याची आणि वाहने व्यवस्थित चालवण्याची मागणी केली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.