शेतकऱ्यांवर संकटाचा फेरा सुरुच; लातूरमध्ये शेतकऱ्याचा ऊस परस्पर विकला, ऊस विकणारे कारखान्याचे कर्मचारी

लातूर तालुक्यातल्या रामेश्वर येथील शेतकरी हणमंत कराड यांचा ऊस, वाहतूकदार आणि मांजरा साखर कारखान्याच्या एका कर्मचाऱ्याने संगनमत करून ऊस आपलाच असल्याचे भासवत मांजरा साखर कारखान्याला विकण्यात आला. विशेष म्हणजे ऊस तोड केल्याची स्लिप ही हणमंत कराड यांच्या नावे न फाडता विकण्यात आली.

शेतकऱ्यांवर संकटाचा फेरा सुरुच; लातूरमध्ये शेतकऱ्याचा ऊस परस्पर विकला, ऊस विकणारे कारखान्याचे कर्मचारी
ऊस चोरी प्रकरणी कारखान्याच्या दोघा कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले.Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 5:50 PM

लातूरः शेतकऱ्याचा ऊस वाहतूकदार आणि साखर कारखान्याच्या (Sugar Factory) कर्मचाऱ्यानी परस्पर विकल्याचा प्रकार लातूर जिल्ह्यातील रामेश्वर इथे उघडकीस आला आहे. शेतकऱ्याच्या परस्पर ४९ टन ऊस (sugarcane )कारखान्याला विकल्याची (sell) घटना समजल्यानंतर शेतकऱ्यांनी वाहतूकदार आणि कारखान्याच्या दोन कर्मचाऱ्यांना रामेश्वर गावात पकडून ठेवण्यात आले होते. या घटनेची माहिती पोलिसांना सांगितल्यानंतर या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. उसाचीही चोरी करण्यात येत असल्याने आणि कागदोपत्रांची फेरफार करुन जर कारखाना कामगारांकडून असे प्रकार होत असतील तर शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारच्या घटना धोकादायक असल्याचे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

लातूर तालुक्यातल्या रामेश्वर येथील शेतकरी हणमंत कराड यांचा ऊस, वाहतूकदार आणि मांजरा साखर कारखान्याच्या एका कर्मचाऱ्याने संगनमत करून ऊस आपलाच असल्याचे भासवत मांजरा साखर कारखान्याला विकण्यात आला.

असाच प्रकार ताडकीतही…

विशेष म्हणजे ऊस तोड केल्याची स्लिप ही हणमंत कराड यांच्या नावे न फाडता वाहतूकदार कैलास शिंदे यांचे वडील मेघराज शिंदे यांच्या नावानी विकण्यात आली.या प्रकारासारखाच प्रकार ताडकीतील शेतकऱ्यासोबतही घडला होता. शेतकऱ्याचा ऊस असा परस्पर कारखान्याला विकून पैसे घेणाऱ्या वाहतूकदार आणि कारखान्याच्या सुपरवायझर वर पोलीस कार्यवाही करा . दोषीं कर्मचाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी करण्यात येत आहे .

ऊस विकल्याची कबूली

लातूरमध्ये असा प्रकार घडल्याने अनेक शेतकऱ्यांना धक्का बसला आहे. शेतकरी रात्रंदिवस शेतात राबत असतो, मात्र असे प्रकार होत असतील तर शेतकऱ्यांनी करायचे काय असा सवालही उपस्थित केला आहे. या प्रकरणातील दोघांना पकडून ठेवण्यात आल्यानंतर त्याला यासंबंधात अनेकदा सवाल उपस्थित करण्यात आले. याप्रकरणातील ताब्यात घेतलेल्या एक जणांनी या गुन्ह्याची कबूली दिली आहे. ऊस चोरी प्रकरणात रामेश्वरचे शेतकरी सभासद राजेश कराड यांचे नुकसान झाले असून माझ्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आपला ऊस परस्पर विकला गेल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या कामगारांना पकडून ठेवण्यात आले. त्यानंतर हा प्रकार पोलिसांना सांगण्यात आला. पोलिसांनाही हा प्रकार समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली.

संबंधित बातम्या

Metro 2A आणि Metro 7 रविवारपासून सेवेत! ईस्ट-वेस्टच्या ट्रफिकची चिंता मिटणार

Dilip Walse Patil: मुख्यमंत्री, काँग्रेस, राऊत, तुमच्यावर नाराज आहे का? आघाडीत पेटलेल्या 5 वादांवर वळसे पाटलांनी मौन सोडलं

Sanjay Raut Video: राज्याचे गृहमंत्री होणार का? राऊत हसले अन् म्हणाले, मी राज्याच्याच…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.