AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Killari Earthquake : मी घरावर झोपलेलो, अचानक खाली कोसळलो; किल्लारीमधील भूकंपग्रस्तांनी आठवणी सांगितल्या

Latur Killari Earthquake : किल्लारी भूकंपाला 30 वर्षे पूर्ण; ती घटना आठवताच स्थानिकांना अश्रू अनावर, म्हणाले, गावात नुसता मृतदेहांचा खच पडलेला होता. आम्ही आमच्या घरातली माणसं गमावली. आमची गुरढोरं गेली. संसार मातीखाली गाडला गेला. आमचं सगळं सगळं गेलं.

Killari Earthquake : मी घरावर झोपलेलो, अचानक खाली कोसळलो; किल्लारीमधील भूकंपग्रस्तांनी आठवणी सांगितल्या
| Updated on: Sep 30, 2023 | 12:00 PM
Share

किल्लारी | 30 सप्टेंबर 2023, सागर सुरवसे : किल्लारी भूकंप दुर्घटनेला आज 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर भूकंपग्रस्तांकडून शरद पवारांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात पार पडणार शरद पवारांचा सन्मान केला जाणार आहे. किल्लारीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी भव्य असा मंडप उभारण्यात आला आहे. किल्लारी गावातील क्रांतिकारी मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही स्थानिकांसी संवाद साधला. तेव्हा या भूकंपग्रस्त नागरिकांनी आपल्या दु:खद आठवणी सांगितल्या. यावेळी या कटू आठवणी सांगताना अनेकांना आपले अश्रू अनावर झाले.

फुलचंद शिंदे आणि धनंजय माळी या भूकंपग्रस्त नागरिकांशी आम्ही संवाद साधला. तेव्हा किल्लारी त्यांनी 30 वर्षांपूर्वी किल्लारीत झालेल्या भूकंपाच्या आठवणी सांगितल्या. 30 सप्टेंबर 1993 रोजी पहाटेच्या सुमारास अचानक मोठा गोंधळ सुरु झाला. मी घराच्या छतावर झोपलो होतो. अचानक खाली कोसळलो. सुरूवातीला आमच्या गावाजवळचा तलाव फुटला, अशी अफवा पसरली. गावातील लोक अचानकपणे गावाबाहेर पळत सुटली. मात्र प्रत्यक्षात भूकंप झाल्याचं आम्हाला उशिरा कळालं, असं ते म्हणाले.

या भूकंपात माझा मुलगा आणि सून मृत पावली. तेव्हापासून आजपर्यंत आम्हाला रोज त्यांची आठवण येते. आम्ही घराबाहेर आलो. तेव्हा गावात दोन तास फक्त धुरळाच होता. आजही त्या आठवणी जागल्या की डोळ्यात पाणी येतं. गावात नुसता मृतदेहांचा खच पडलेला पाहायला मिळत होता, असं स्थानिकांनी सांगितलं.

किल्लारीतील दुर्घटनेला आज 30 वर्षे पूर्ण झालेली आहेत. अशात आज शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे. किल्लारीतील सन्मान सोहळ्यासाठी जात असताना शरद पवारांना त्यांच्या एका समर्थकाने त्यांना अडवलं. मी शरद पवार यांचं व्यक्तीमत्व मला प्रभावित करतं. शरद पवार साहेबांनी किल्लारी भूकंपग्रस्तांना खूप मदत केली आहे. 30 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामाची मी आज पाहणी केली. किल्लारीतील लोक त्यांना प्रचंड मानतात. हे इथे आल्यावर लक्षात आलं. मी मागील आठ वर्षांपासून पवार साहेबांच्या कामाने प्रभावीत झालोय. तेव्हापासून मी त्यांचा चाहता झालोय. पवार साहेबांना कोणी कितीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्यामागे महाराष्ट्रातील जनता आहे, असं शरद पवारांचे समर्थक जॉन जोसेफ यांनी म्हटलं आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.