Latur Crime : तीन मुलीनंतर जन्मला, लाडक्या मुलाला शिक्षणासाठी होस्टेलला पाठवलं, पण नियतीच्या मनात काही वेगळंच!

एकुलता एक मुलगा म्हणून चांगल्या शिक्षणासाठी वसतिगृहात ठेवला. मग पुढे जे घडलं त्याची आई-वडिलांनी कधी कल्पनाही केली नसेल.

Latur Crime : तीन मुलीनंतर जन्मला, लाडक्या मुलाला शिक्षणासाठी होस्टेलला पाठवलं, पण नियतीच्या मनात काही वेगळंच!
Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 3:43 PM

लातूर / 8 ऑगस्ट 2023 : सध्या पावसाळा सुरु असल्याने नदी, नाले, ओढे प्रवाहित झाले आहेत. यामुळे धरण परिसरत,धबधबे या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढला आहे. तसेच शाळकरी मुलेही गावातील ओढे, डबके यात पोहण्याचा आनंद लुटत आहेत. मात्र यामुळे दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना लातूर जिल्ह्यातील रामेश्वर येथे घडली. आठवीत शिकणारा मुलगा मित्रांसोबत ओढ्यावर पोहायला गेला. मात्र पोहता येत नसल्याने तो ओढ्यात बुडाला. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूमुळे आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या गावावरही शोककळा पसरली आहे.

शिक्षणासाठी मुलाला वसतिगृहात ठेवले होते

निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथे कैलास गंगणे हे आपल्या कुटुंबासह राहतात. गंगणे हे बांधकाम मजूर आहेत. गंगणे यांना तीन मुली एक मुलगा अशी चार मुले आहेत. तीन मुलींनंतर मुलगा झाल्याने तो लाडका होता. त्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून गंगणे यांनी मुलाला रामेश्वर येथील शाळेत शिकायला ठेवले होते. मुलगा इयत्ता आठवीत शिकत असून, तेथेच वसतिगृहात राहत होता.

मित्रांसोबत ओढ्यावर पोहायला गेला अन् बुडाला

मुलगा मित्रांसोबत शाळेजवळ असलेल्या ओढ्यावर पोहायला गेला. मात्र पाण्यात उडी घेतल्यानंतर ओढ्यातील गाळात फसला. त्याला बुडताना पाहून इतर तीन मुलांनी आरडाओरडा केला. मात्र मुलांचा आवाज ऐकून कुणी मदतीला येईपर्यंत मुलाचा बुडून मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच आई-वडिल आणि नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. एकुलत्या एक मुलाच्या जाण्याने कुटुंब शोकात बुडाले आहे. याबाबत गातेगाव पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.