Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur : ग्राम पंचायत निवडणुकीच्या प्रचाराचं भाषण संपवून बसले आणि आयुष्यातून उठले!

लातूर जिल्ह्यातील मुरुड ग्राम पंचायतीच्या प्रचार सभेत घडली धक्कादायक घटना! वाचा सविस्तर

Latur : ग्राम पंचायत निवडणुकीच्या प्रचाराचं भाषण संपवून बसले आणि आयुष्यातून उठले!
लातूरमधील दुर्दैवी घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 9:22 AM

लातूर : महाराष्ट्रात सध्या ग्राम पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. गावागावात प्रचारसभांची लगबग पाहायला मिळतेय. अशातच एक दुर्दैवी बातमी लातूर जिल्ह्यातील मुरुड ग्राम पंचायतीतून समोर आली आहे. ग्राम पंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत भाषण संपवून खुर्चीवर बसलेल्या एका व्यक्तीचा स्टेजवर मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने ही व्यक्ती दगावली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव अमर नाडे असं आहे. ते मुरुड परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अमर यांची पत्नी अमृता नाडे ह्या सरपंच पदाच्या उमेदवार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पतीच्या मृत्यूने अमृता यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जातेय.

प्रचाराच्या सभेत अमर नाडे यांनी आपलं भाषण केलं. मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केल्यानंतर ते स्टेजवर असलेल्या खुर्चावर जाऊन बसले. पण अचानक त्यांनी छातीत दुखून लागलं. त्याबाबत त्यांनी शेजारीच बसलेल्या आपल्या पत्नीलाही सांगितलं. पण काही कळायच्या आतच ते खुर्चीवरुन खाली कोसळले.

पाहा व्हिडीओ :

स्टेजवरच खुर्चीवरुन खाली कोसळललेल्या अमर नाडे यांच्या मदतीसाठी सगळेजण तातडीने धावले. अमर नाडे यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सगळेच बादरले. अमर नाडे यांच्या मृत्यूने मुरुडसह लातूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मुरुड ही लातूर जिल्ह्यातली सर्वात मोठी ग्राम पंचायत असून यामध्ये 18 सदस्य संख्या आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमर नाडे यांचे चुलते दिलीप नाडे यांच्याकडे पंचायतीची सत्ता आहे. ही सत्ता बदलण्यासाठी अमर यांनी स्वतः पुढाकार घेत मुरुड परिवर्तन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.

त्यांच्या पत्नी अमृता नाडे या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. मयत अमर यांच्या पश्चात पत्नीसह एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अगदी वयाच्या 43व्या वर्षी असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अमर नाडे यांच्या पॅनेलमधील त्यांचे सहकारी हणमंत बापू टिळक यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना म्हटलं की, अमर बापूंच्या भाषणानंतर माझं भाषण होतं. गेल्या 8-10 दिवसांपासून ते प्रचंड उत्साहात होते. जवळपास 20-25 मिनिटं त्यांनी भाषण केलं. त्यांनी पत्नीच्या कानात सांगितलं होतं, की छातीत दुखतंय. पण तितक्यात सेकंदात त्यांनी मान टाकली. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. तिथून सिव्हीलला आणलं. पण डॉक्टरांना त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या मृत्यूने आम्हा सगळ्यांना मोठा धक्काच बसलाय, असंही हणमंत बापू टिळक यांनी म्हटलंय.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.