Indurikar Maharaj : तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच, इंदोरीकर महाराजांनी ठणकावलं; लॉजिकवर लोक लोटपोट

तुम्ही-आम्ही भाग्यवान आहोत. कारण आपण दुसऱ्या लाटेतून वाचलो आहोत. तुमचा आणि आमचा जन्म नाही, तर पुनर्जन्म असल्याचं विधान ज्येष्ठ कीर्तन(Kirtan)कार निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर (Nivrutti Maharaj Deshmukh Indurikar) यांनी केलं आहे.

Indurikar Maharaj : तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच, इंदोरीकर महाराजांनी ठणकावलं; लॉजिकवर लोक लोटपोट
निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 4:14 PM

लातूर/मुंबई : तुम्ही-आम्ही भाग्यवान आहोत. कारण आपण दुसऱ्या लाटेतून वाचलो आहोत. तुमचा आणि आमचा जन्म नाही, तर पुनर्जन्म असल्याचं विधान ज्येष्ठ कीर्तन(Kirtan)कार निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर (Nivrutti Maharaj Deshmukh Indurikar) यांनी केलं आहे. आता तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच, असं ते यावेळी म्हणाले. लातूरमध्ये आयोजित कीर्तनात ते यांसदर्भात बोलत होते.

‘हे आपलं भाग्य आहे’ कोरोनाचा प्रकोप जगभरात पाहायला मिळतोय. आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा येवून गेल्या. यात अनेकांना आपल्या प्राणास मुकावं लागलं. आता आपण सर्वचजण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहोत. इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनातही या कोरोनाचा दाखला देण्यात आला. एका भाविकास उद्देशून ते म्हणाले, की कीर्तनात उत्साहानं बसायला हवं. कोरोना पॉझिटिव्ह असल्यासारखं वागू नये. दोन लाटांतही आपण जिवंत आहोत, हे आपलं भाग्य आहे. हा आपला जन्म नसून पूनर्जन्म आहे.

‘हसत हसत जगा’ पुढे ते म्हणाले, की हॉस्पिटल विकत घेणारे गेले. आता डॉक्टरच गेले तर हॉस्पिटल कोण चालवेल? त्यामुळे हसत हसत जगा, असा उपदेश त्यांनी दिला. हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टर महिन्याला ठेवणारे गेले. यमानं लाच घेतली असती, तर यांनी यमालाही चेक पाठवला असता. पण यमानं लाच घेतली नाही, असं ते यावेळी म्हणाले.

‘पुण्य 2021साली कामाला आलं’ कधीतरी वारकऱ्याची सेवा केली, तुळशीला पाणी घातलं, काळ्या आईची सेवा, कधीतरी कीर्तनकाराच्या पाया पडलो, हे पुण्य आपल्याला 2021साली कामाला आलं. आता खोकला का ठोकला, असा जीआरच देवानं काढलाय, असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. काही लोक खोकला दाबून मेली, पण खोकली नाहीत. त्यामुळे आनंदानं, हसत हसत जगा, असा सल्ला त्यांनी दिला. इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाची लिंक खाली देत आहोत. सोळाव्या मिनिटांपासून कोरोना महामारीवर त्यांनी भाष्य केलंय. (व्हिडिओ सौजन्य – Raja Pandharicha/राजा पंढरीचा)

Shri Dehu Temple closed| श्री देहू मंदिर मकर संक्रांतीला 15 तास बंद राहणार; जाणून घ्या नेमकं कोणत्या वेळी बंद राहणार

Drone Attack Alert | महाराष्ट्रावर ड्रोन हल्ल्याचं सावट, डार्कनेटवर शिजला दहशतवाद्यांचा कट, यंत्रणा अलर्ट

मुख्यमंत्रीजी, आम्ही काळजी घेतो, तुम्ही शाळा सुरु करा, पाचवीच्या विद्यार्थ्यानी काय लिहिले पत्रात?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.