Latur Video: शिक्षण पंढरी लातुरात दलितांवर बहिष्कार, मंदिरात नारळ फोडल्यानं गाव रागावलं, खाण्यापिण्यावरही संक्रात
पुरोगामी महाराष्ट्र म्हणून पाठ थोपटली जात असली तरी याच राज्यात माणुसकीला काळीमा घटनाही घडत आहेत. निलंगा तालुक्यातील एका गावामध्ये तरुणाने मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि नारळ वाढवला. या क्षुल्लक कारणावरुन गावातील संपूर्ण समाजानेच या कुटूंबावर बहिष्कार टाकल्याची घटना निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावात घडली आहे.
लातूर : पुरोगामी महाराष्ट्र म्हणून पाठ थोपटली जात असली तरी याच (Maharashtra) राज्यात माणुसकीला काळीमा घटनाही घडत आहेत. निलंगा तालुक्यातील एका गावामध्ये तरुणाने (Temple) मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि नारळ वाढवला. या क्षुल्लक कारणावरुन गावातील संपूर्ण समाजानेच या कुटूंबावर बहिष्कार टाकल्याची घटना निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावात घडली आहे. तब्बल तीन दिवस या कुटूंबाला गावकऱ्यांनी वाळीत टाकले होते. (Boycott on Family) बहिष्कार टाकल्यानंतर सदरील कुटूंबातील सदस्यांना साधे पीठही दळून दिले नसल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ नंतर पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर हे बहिष्कार प्रकरण मिटले आहे. पण एका समाजातील तरुणाने मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानेच हा प्रकार घडला आहे. अद्याप याबाबत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला नाही पण या प्रकरामुळे संताप व्यक्त होत आहे.
दवंडी देऊन कुटूंबावर बहिष्कार
समाज व्यवस्थेत बदल घडत आहे तो केवळ कागदावर आणि राजकीय नेत्यांच्या भाषणांमध्ये. मात्र, गावातील वास्तव हे वेगळेच आहे. ताडमुगळी हे निलंगा तालुक्यातील गाव असून येथे एका तरुणाने मंदिरात प्रवेश करुन नारळ फोडला एवढाच काय तो त्याचा रोल. मात्र, त्यानंतर गावकऱ्यांनी त्याच्या कुटूंबावरच बहिष्कार टाकला. त्याच्या कुटूंबीयांना कोणती वस्तू गावात मिळू नये शिवाय हे कुटूंब बहिष्कृत आहे याची माहिती सर्वांना व्हावी याकरिता थेट दवंडी देण्यात आली. त्यामुळे तीन दिवस किराणा माल, गिरणीतून दळणही या कुटूंबियांना मिळालेले नाही.
काय आहे व्हिडीओमध्ये..?
बहिष्कृत कुटूंबातील महिला ही दळण दळून आणण्यासाठी गेली असता चक्क दळन देण्यास नकार दिला आहे. शिवाय घरात पीठ नसल्याने उपासमारीची वेळ आल्याचे ती महिला सांगत असतानाही तिला विरोध केला जात आहे. आज दळण दिले तर गावातील लोक काय म्हणतील? असे म्हणत तिला टाळले जात होते. कारण मदत केली तर 50 हजाराचा दंड असा फतवाच काढला होता. त्यामुळे कुटूंबियावर उपासमारीची वेळ आली होती. अखेर प्रशासनाच्या मध्यस्तीने हे प्रकरण मिटले आहे. मात्र, पुरोगामी महाराष्ट्र कुठंय? हा प्रश्न कायम राहत आहे.
संबंधित बातम्या :
हिंगणघाटातील अंकिता जळीतकांडाचा निकाल आता नऊ फेब्रुवारीला; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती
Latur: कर भरणा करणाऱ्या ग्रामपंचायतींचा ‘असा’ हा गौरव, उद्दिष्टपूर्तीसाठी उरला महिना?
रणजितसिंह डिसलेंच्या अडचणी वाढणार? पुरस्कारासाठी खोटी माहिती दिली, जिल्हा परिषदेच्या सभेत गंभीर आरोप