झेरॉक्सचे पैसे तातडीने भागवा, असीम सरोदेंची ED ला नोटीस!

वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी चक्क ईडीलाच नोटीस पाठवली आहे. झेरॉक्सचे पैसे न भागवल्याने असीम सरोदेंनी ही नोटीस पाठवली

झेरॉक्सचे पैसे तातडीने भागवा, असीम सरोदेंची ED ला नोटीस!
असिम सरोदे, वकील
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 10:50 AM

पुणे : अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने (ED) दिग्गजांना नोटीस पाठवल्याच्या घटना सध्या समोर येत आहेत. मात्र अशातच वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी चक्क ईडीलाच नोटीस पाठवली आहे. झेरॉक्सचे पैसे न भागवल्याने असीम सरोदेंनी ही नोटीस पाठवली आहे. महत्त्वाचं म्हणजे ईडीने असीम सरोदेंचे 1 हजार 440 रुपये थकवल्याने असीम सरोदेंनी थेट नोटीस पाठवली आहे. (Lawyer Asim Sarode sends legal notice to ED Enforcement Directorate)

नेमकं प्रकरण काय?

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कथित भूखंड घोटाळ्याची चौकशी ईडी करत आहे. ईडीने त्यासाठी तक्रारदार अंजली दमानिया यांचे वकील असीम सरोदे यांची मदत घेतली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही हजार कागदपत्रांची माहिती असीम सरोदे यांच्या कार्यालयातून घेतली होती.

मात्र माहिती देताना कागदपत्रांच्या झेरॉक्सचा खर्च हा ईडीला द्यावा लागेल, अशी अट असीम सरोदेंनी घातली होती. ते ईडीने मान्यही केलं होतं. पण ईडीने अजूनही त्यांचे 1 हजार 440 रुपये दिलेले नाहीत. त्यामुळे असीम सरोदेंनीचक्क ईडीलाच नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी थकीत पैशांची मागणी केली आहे.

ईडीच्या अधिकृत मेलवरती बिलाची प्रत देऊनही ईडीनं त्यांचे पैसे जमा केलेले नाहीत. त्यामुळे सरोदेंनी ईडीलाचा नोटीस पाठवल्यावरती आता ईडी त्यांच्या नोटीसला काय उत्तर देते? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आर्थिक अफरातफरी, पैशांच्या गैरव्यवहारांची चौकशी ईडी करतं. सध्या अनेक राजकारण्यांना ईडीने नोटीस धाडली आहे. मात्र आता ईडीलाच नोटीस मिळाल्याने, कार्यालयाकडून काय उत्तर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अंजली दमानिया ED विरोधात कोर्टात जाणार? 

दरम्यान अंजली दमानिया (Anjali Damania) यांनीही ईडीविरोधात कोर्टात जाण्याचा पवित्रा घेतला होता. “ईडी, सीबीआय आणि पोलीस यांचा सर्रास वापर राजकारणात होतो. एनडीए किंवा भाजप सगळ्यांनीच या यंत्रणांचा वापर केला. खडसेंनी आपल्याला नोटीस मिळाली नाही असं म्हटलंय. पण याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. आमच्या दोन याचिका कोर्टात आहेत. ईडीने याची सर्रास चौकशी करावी. ईडीने स्टेटमेंटसाठी बोलावलं की मी नक्कीच जाणार”, असं अंजली दमानिया म्हणाल्या होत्या.

(Lawyer Asim Sarode sends legal notice to ED Enforcement Directorate)

संबंधित बातम्या  

भोसरी भूखंड प्रकरणात नोटीस, 30 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहणार, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

एकनाथ खडसेंवर वक्रदृष्टी का? ED नोटीस येण्याची 5 कारणे 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.