मोठी बातमी! राजकीय घडामोडींना वेग, भाजपचा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, उमेदवाराने सोडली उद्धव ठाकरेंची साथ

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजपनं शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. नेत्यानं उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.

मोठी बातमी! राजकीय घडामोडींना वेग, भाजपचा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, उमेदवाराने सोडली उद्धव ठाकरेंची साथ
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 4:59 PM

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक आहे. बुधवारी वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर शनिवारी तेवीस तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक असातना शिवसेना उद्धव ठाकरे गटाला वाशिममध्ये मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजाभैय्या पवार आणि गजानन ठेंगडे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

वाशिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी असलेले राजाभैय्या पवार आणि युवासेनेचे जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यातील राजाभैय्या पवार यांनी आधीच बंडखोरी केली होती, ते वाशिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.   आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या दोन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा ऐन विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटालासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मनसेलाही भाजपचा धक्का 

हे सुद्धा वाचा

दरम्यान दुसरीकडे नाशिकमध्ये भाजपनं मनसेला देखील धक्का दिला आहे.  मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सभागृह नेते दिलीप दातीर यांनी ऐनवेळी भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील  भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकत वाढली आहे. दिलीप दातीर हे नाशिक पश्चिममधून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते, मात्र मनसेनं त्यांना तिकीट न दिल्यानं ते नाराज होते. त्यांच्या नाराजीचा मोठा फटका हा मनसेला बसला आहे. विधानसभेच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना दिलीप दातीर यांनी आपली भूमिका जाहीर करत भाजपच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सीमा हिरे यांना पाठिंबा दिला आहे.  हा मसनेसाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.