ऑनलाईन मतदार यादीत EPIC क्रमांकाद्वारे आपली मतदार ओळख कसे शोधाल, जाणून घ्या
nvsp.in वरील ऑनलाईन मतदार यादीत EPIC क्रमांकाद्वारे आपली मतदार ओळख कशी पटवाल, यासंदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आलीय. आजच तुमच्या मतदारसंघानुसार यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही? हे नक्की तपासून पाहा. नाव नसल्यास ते ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने रजिस्टर करण्याची संधी निवडणूक आयोगाने दिलीय. त्यासाठी www.nvsp.in तुम्हाला भेट दिल्यास सर्व माहिती मिळणार आहे.

मुंबईः राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होत असून, 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक जण सकाळी 8 वाजल्यापासून मतदान केंद्रांवर गर्दी करतील. पण अनेकांना मतदार यादीत आपला क्रमांक कसा शोधावा हे माहीत नाही. त्यासंदर्भातच आता निवडणूक आयोगानं nvsp.in वर माहिती उपलब्ध करून दिलीय. nvsp.in वरील ऑनलाईन मतदार यादीत EPIC क्रमांकाद्वारे आपली मतदार ओळख कशी पटवाल, यासंदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आलीय. आजच तुमच्या मतदारसंघानुसार यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही? हे नक्की तपासून पाहा. नाव नसल्यास ते ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने रजिस्टर करण्याची संधी निवडणूक आयोगाने दिलीय. त्यासाठी www.nvsp.in तुम्हाला भेट दिल्यास सर्व माहिती मिळणार आहे.
?nvsp.in वर नाव कसे शोधाल?
? निवडणूक आयोगाच्या www.nvsp.in या वेबसाईटला भेट द्या. ? तुम्हाला या वेबसाईटवर पहिल्यांदा ऑनलाईन माध्यमातून काही अपडेट्स करत असाल तर साईन अप करून रजिस्ट्रेशन करावं लागेल. ? तुम्ही यापूर्वी अकाऊंट बनवलेले असेल तर केवळ लॉगिन करावं लागेल. ? मतदार यादीत तुमचे नाव नसल्यास तुम्ही www.nvsp.in या वेबसाईटवर डाव्या बाजूला असलेल्या Registration for New Electoral या पर्यायावर क्लिक करा. ? त्यानंतर नाव, जन्मतारीख, पत्ता, आवश्यक कागदपत्र ऑनलाईन माध्यमातून अपलोड करा. ? त्यानंतर तुम्हाला एक ट्रॅकिंग आयडी मिळेल. ज्याद्वारा तुम्ही तुमच्या अर्जाची प्रक्रिया कोणत्या टप्प्यात आहे? हे पाहू शकता.
?ऑफलाईन मतदार नोंदणी कशी कराल?
?ऑनलाईनप्रमाणेच नागरिकांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी Form 6 उपलब्ध असतो. ? तो भरून आवश्यक कागदपत्रांसोबत नजिकच्या कार्यालयात सादर केल्यास तुमचं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट केलं जाऊ शकतं. ? डिजिटल बनत चाललेल्या भारतामध्ये आता निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या मदतीसाठी 1950 ही हेल्पलाईन 24 तास सेवेसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. ? तक्रार नोंदवण्यासाठी ceo.maharashtra.gov.in संकेतस्थळ उपलब्ध आहे. तसेच मोबाईल अॅप देखील उपलब्ध आहे. ? लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये 21 लाखाहून अधिक मतदारांची नोंदणी झाली आहे.
? 6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी
अपील असलेल्या ठिकाणी 29 सप्टेंबर 2021 पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान; तर 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण 144 निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होईल. त्यासाठी कोरोना संदर्भातील आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजून दक्षता घेण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले असल्याचे मदान यांनी सांगितले.
? कोणत्या जिल्हा परिषदेतील किती जागांवर मतदान?
नागपुर जिल्हा परिषदेच्या 16 मतदारसंघांसाठी तर पंचायत समितीच्या 31 मतदारसंघांसाठी उद्या पोटनिवडणूक होत असून प्रशासनाने त्यासाठीची तयारी पूर्ण केलीय, तर धुळे जिल्हा परिषदेच्या 14 गट आणि 28 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडत असून मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. दुसरीकडे पालघर जिल्हा परिषदेच्या 15 तर पंचायत समित्यांच्या 14 जागांसाठी मतदान होणार आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 व पंचायत समितीच्या 27 गणांसाठी पोट निवडणुकी साठी मतदान होत आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी ही पोटनिवडणूक होतेय.
संबंधित बातम्या