विधानपरिषद निवडणुकीतही चुरस; सपा, बविआ, एमआयएम ठरणार किंग मेकर?

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मतांची जुळवाजळुव सुरु केली आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार असल्यानं एक उमेदवार पडणार हे निश्चित आहे. पण या निवडणुकीत समाजवादी पार्टी, बच्चू कडूंची प्रहार आणि एमआयएम किंगमेकरच्या भूमिकेत आहे.

विधानपरिषद निवडणुकीतही चुरस; सपा, बविआ, एमआयएम ठरणार किंग मेकर?
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 9:42 PM

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे कोणता एक उमेदवार पडणार हे निश्चित आहे. आता गुप्त मतदान असल्यानं कोणाची मतं फुटणार ?.यावरुन तर्कवितर्क सुरु झाले आहेत. भाजपकडे स्वत:चे 103 आणि अपक्ष आणि इतर पकडून 111 आमदार आहेत. त्यामुळं 23 मतांच्या कोट्यानुसार भाजपचे 4 आमदार सहज निवडून येणार आहेत. पण 5व्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भाजपला 4 मतांची गरज आहे.

शिंदेंच्या शिवसेनेकडे स्वत:चे 37 आणि अपक्ष 6 असे 43 आमदार आहेत. शिंदेंचे 2 उमेदवार आहेत. दुसऱ्या उमेदवारासाठी शिंदेंना 3 मतांची गरज आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही 2 उमेदवार दिले आहेत. दादांकडे 40 आणि इतर 3 असे एकूण 43 आमदार आहेत. त्यांना देखील दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी 3 मतांची आवश्यकता आहे.

महाविकासआघाडीबाबत बोलायचे झाले तर काँग्रेसकडे 37 आमदार असल्यानं प्रज्ञा सातव या सहज निवडून येतील. ठाकरेंच्या शिवसेनेकडे स्वत:चे 15 आणि अपक्ष शंकरराव गडाख असे एकूण 16 आमदार आहेत. म्हणजेच त्यांना 7 मतांची गरज आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिलाय. पवारांच्या राष्ट्रवादीकडे 12 आमदार आहेत. म्हणजेच जयंत पाटलांना विजयासाठी 13 मतं हवी आहेत.

आता गेम चेंजर आहेत ते छोटे पक्ष आणि याच छोट्या पक्षांकडे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांच्या नजरा आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत. बच्चू कडू यांच्या प्रहारचे 2 आमदार आहेत. समाजवादी पार्टीकडे 2 आमदार आहेत आणि एमआयएमचे 2 आमदार आहेत. तर मनसेचा 1 आमदार आहे, त्यामुळं हे छोटे पक्ष गेम बदलवू शकतात.

बच्चू कडूंनी तर परफेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं सांगून गेम खेळणार असल्याचं म्हटलंय. गुप्त मतदान होणार असल्यानं मतं फुटण्याची शक्यता दाट आहे. त्यातच अजित पवार गटाचे आमदार पुन्हा परतणार असल्याचे दावे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरु झालेत. 2 वर्षांआधी काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंकडे पुरेसे मतं असताना, मतं फुटल्यानं त्यांचा पराभव झाला. तर राज्यसभेच्या निवडणुकीतही ठाकरेंच्या शिवसेनेची 9 मतं फुटून संजय पवारांचा पराभव झाला होता. आणि भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले होते.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे उमेदवार आहेत. मात्र आमच्याकडे मतांचा कोटा असल्याचं मिटकरींचं म्हणणंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी 7 मतं आणि शिंदेंच्या शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी 3 मतांची गरज आहे. मात्र राऊतांनी मविआच्या तिन्ही उमेदवारांच्या विजयाचा दावा केलाय.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वांनीच फिल्डिंग सुरु केलीय. आता कोणाची मतं फुटणार आणि कोण पडणार ? हे 12 तारखेलाच कळेल.

Non Stop LIVE Update
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.