Corona Live Update | राज्यात तब्बल 1008 रुग्ण वाढले, बाधितांची संख्या 11 हजार 506 वर
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, कोरोना अपडेट, ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेटसह दिवसभरातील मोठ्या बातम्या एकाच ठिकाणी (Corona Live Update) एकाच क्लिकवर
[svt-event title=”राज्यात तब्बल 1008 रुग्ण वाढले” date=”01/05/2020,8:36PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 11,506 वर, आज एकाच दिवसात तब्बल 1008 रुग्णांची वाढ, दिवसभरात 26 रुग्णांचा मृत्यू [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादेत एकाच दिवसात 32 नवे रुग्ण” date=”01/05/2020,7:43PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबाद शहराला सलग पाचव्या दिवशी मोठा धक्का, औरंगाबाद शहरात नव्याने आढळले 32 कोरोना रुग्ण, एकट्या संजय नगर मुकुंदवाडीत आढळले 18 रुग्ण, औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 209 वर [/svt-event]
[svt-event title=”कोटा येथे शिकणारे 51 विद्यार्थी तीन बसमधून चंद्रपुरात दाखल” date=”01/05/2020,7:32PM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूर : कोटा येथे शिकणारे 51 विद्यार्थी तीन बसमधून चंद्रपुरात दाखल, सुमारे 2000 किमीचा प्रवास, सर्व बसेस थेट जिल्हा रुग्णालयातील कोविड उपचार कक्ष परिसरात दाखल, सर्व विद्यार्थी आणि चालक-वाहकांची वैद्यकीय तपासणी, लक्षणे आढळलेले विद्यार्थी आयसोलेशन वॉर्डात, तर सदृढ असलेले घरी क्वारंटाईन केले जाणार, जिल्हाधिकारी स्वतः ठेवत आहेत स्थितीवर लक्ष [/svt-event]
[svt-event title=”देशातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवला” date=”01/05/2020,7:28PM” class=”svt-cd-green” ]
Lockdown 3 | देशातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवलाhttps://t.co/hKGphxthck
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 1, 2020
[/svt-event]
[svt-event title=”देशभरात लॉकडाऊनची मुदत 17 मेपर्यंत वाढली” date=”01/05/2020,6:34PM” class=”svt-cd-green” ]
LIVE TV: देशभरात लॉकडाऊनची मुदत 17 मेपर्यंत वाढली, देशातील मॉल, थिएटर बंदच राहणारhttps://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/rclVDV3rLX
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 1, 2020
[/svt-event]
[svt-event title=”भारतीय लष्कराची महत्त्वाची पत्रकार परिषद” date=”01/05/2020,3:44PM” class=”svt-cd-green” ] भारतीय लष्कराची महत्त्वाची पत्रकार परिषद, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यासह तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित राहणार, संध्याकाळी 6 वाजता माध्यमांशी संवाद [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात दिवसभरात 7 कोरोनाबळी” date=”01/05/2020,3:27PM” class=”svt-cd-green” ] पुणे शहरात काल रात्रीपासून आतापर्यंत कोरोनाचे 7 बळी, पुण्यात कोरोनाबळींची संख्या 92 वर [/svt-event]
[svt-event title=”सोलापुरात वैद्यकीय कर्मचाऱ्याला बेदम मारहाण” date=”01/05/2020,3:20PM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : हॉस्पिटलमध्ये कामाला का जातो म्हणून न्यूरो विभागात काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, सुजीत कुंभारे असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव, सुजीत कुंभारे बार्शीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत, सौंदरे गावातल्या तीन लोकांकडून मारहाण, तुझ्यामुळे कोरोना होईल तू हॉस्पिटलला जाऊ नको, गेला तर तिकडून पुन्हा येऊ नको असं म्हणत मारहाण, मारहाणीत सुजीत कुंभारे गंभीर जखमी, सुजीतवर बार्शीतल्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु, सुजीत कुंभारे यांची पोलिसात तक्रार [/svt-event]
[svt-event title=”नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक” date=”01/05/2020,12:06PM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक, ‘कोरोना’ आणि संचारबंदीच्या मुद्द्यावर चर्चा, बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, कॅबिनेट सचिव राजीव गौबा, सीडीएस प्रमुख बिपिन रावत उपस्थित [/svt-event]
[svt-event title=”धारावीत काम करणाऱ्या इंजीनिअरला कोरोनाची लागण” date=”01/05/2020,10:48AM” class=”svt-cd-green” ] धारावीत काम करणाऱ्या इंजीनिअरला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेला इंजीनिअर हा धारावीत पाण्याच्या पाईपलाईनचा मुख्य इंचार्ज होता. काम करताना स्थानिकांच्या संपर्कात आल्याने लागण झाली आहे. बीएमसी जी नॉर्थ इथल्या जल खात्यातील रिपेअर आणि मेंटेनंस प्रमुख इंजीनिअरला कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण स्टाफ क्वारंटाईन करण्यात आला आहे. [/svt-event]
[svt-event title=”नागपुरात रस्त्यावर घाण करणाऱ्या आणि मास्क न घालणाऱ्या 1339 लोकांवर कारवाई” date=”01/05/2020,10:41AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात रस्त्यावर घाण करणाऱ्या आणि मास्क न घालणाऱ्या 1339 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये तब्बल 17.64 लाखा रुपयांचा दड वसूल करण्यात आला आहे. मास्क न घालणाऱ्या 301 लोकांवर कारवाई करत 1.8 लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहो. [/svt-event]
[svt-event title=”कराड येथील कृष्णा रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी ICMR कडून मान्यता” date=”01/05/2020,10:36AM” class=”svt-cd-green” ] कराड येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या कृष्णा हॉस्पिटलला कोरोना चाचणीसाठी ICMR कडून मान्यता देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील एकमेव चाचणी केंद्र आता कराड येथे तयार करण्यात आले आहे. आता चाचणीसाठी पुण्याला जाण्याची गरज भासणार नाही. [/svt-event]
[svt-event title=”पुणे शहरासह जिल्ह्यात पुन्हा 102 नवीन कोरोना रुग्ण” date=”01/05/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] पुणे शहरासह जिल्ह्यात पुन्हा 102 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या 1697 झाली आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात 7 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण 97 जणांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात पुणे शहरातील 44 रुग्णांना डीचार्ज देण्यात आला आहे. [/svt-event]
[svt-event title=”पीएमपीएलच्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण” date=”01/05/2020,10:08AM” class=”svt-cd-green” ] पीएमपीएलच्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एक लिपिक असून दुसरा वर्कशॉप विभागात कामाला आहे. हे दोन्ही कर्मचारी सुट्टीवर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात आली आहे. [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादमध्ये आजपासून तीन दिवस कडकडीत बंद” date=”01/05/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये आजपासून तीन दिवस कडकडीत बंद राहणार आहे. मेडिकल आणि रुग्णालय वगळता सर्व सुविधा बंद राहणार आहेत. दूध भाजीपाला किराणा यासारख्या सर्व अत्यावश्यक सुविधाही बंद राहणार आहेत. कोरोनाचा वाढता विळखा पाहता औरंगाबाद पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून ते तीन मे पर्यंत कडकडीत बंद राहणार. [/svt-event]
[svt-event title=” औरंगाबादमध्ये करोनाचा आणखी एक बळी” date=”01/05/2020,9:39AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये कोरोनामुळे आणखी एकाचा बळी गेला आहे. 47 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबाद शहरातील मृतांचा आकडा 8 वर पोहोचला आहे. [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू” date=”01/05/2020,9:36AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात नव्याने तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुण्यात 88 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी LIVE” date=”01/05/2020,10:03AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]