LIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेची मुंबई महापालिका निवडणुकीची खलबतं

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट, महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (tv9 marathi live)

LIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेची मुंबई महापालिका निवडणुकीची खलबतं
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 7:15 PM

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेची मुंबई महापालिका निवडणुकीची खलबतं” date=”20/11/2020,7:12PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्या बरोबर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खलबतं सुरू झाली आहेत. वर्षा बंगल्यावर आज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा निवडणुक मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे. [/svt-event]

[svt-event title=”किल्ले रायगडावर दुसरा रोप वे उभारणार, खासदार छत्रपती संभाजी राजे यांची महत्वपूर्ण घोषणा” date=”20/11/2020,6:42PM” class=”svt-cd-green” ] स्वराज्याची राजधानी अशी जगभरात ओळख असलेल्या किल्ले रायगडावरील रोप वे वादाच्या भोवर्‍यात सापडले. मागील काही महिन्यांपासून ही सेवा बंद करण्यात आल्याने गडावरती येणाऱ्या शिवभक्तांचे मोठे हाल होत आहेत. अस्तित्वात असलेले रोप वे प्रशासन मनमानी कारभार करत आहे. आतापर्यंत त्यांनी पुरातत्व विभागासोबत अधिकृत करार देखील केलेला नसल्याची धक्कादायक बाब खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केली. रोप वे प्रशासनाची मनमानी सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. रायगडावर नव्याने दुसरा रोप वे प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केली. [/svt-event]

[svt-event title=”ठाणे जिल्ह्यातही शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार” date=”20/11/2020,6:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”100 युनिट मोफत देऊ म्हणणाऱ्यांनी यू टर्न मारला, प्रवीण दरेकरांचं टीकास्त्र” date=”20/11/2020,6:14PM” class=”svt-cd-green” ] राज्य सरकारनं 100 युनिटपर्यंतचं वीज मोफत देऊ म्हटलं होते. मात्र, त्यांनी यू टर्न मारला, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे. राज्यातील सरकारनं सवलत देखील दिली नाही, उलट जखमेवर मीठ चोळत आहेत. जी बिले पाठवली ती योग्य कशी आहेत, ते पटवण्यासाठी मेळावा घेत आहेत, असा आरोप दरेकरांनी केला. [/svt-event]

[svt-event title=”चंद्रशेखर बावनकुळेंचा अभ्यास इतकाच चांगला होता, तर त्यांचे तिकीट का कापले?” date=”20/11/2020,5:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वाडा तालुक्यातील तिळगावात भाताचे भारे पेटवले, शेतकऱ्याचे साडे तीन लाखांचे नुकसान” date=”20/11/2020,4:37PM” class=”svt-cd-green” ] वाडा तालुक्यातील तिळगाव  गावातील  शेतकरी अविनाश पाटील याच्या शेतावरील अज्ञात व्यक्तीने 2000 हजार भाताचे भारे पेटवून दिल्याने शेतकऱ्याचे  साडेतीन लाखाचे नुकसान  झाले आहे. अनुसूचित जमाती विधिमंडळ समितीचे अध्यक्ष  व शहापूर विधानसभा  आमदार दौलत दरोडा यांच्या सोबत जि.प सदस्य नरेश आक्रे,यांनी शेतकऱ्याच्या घरी जाऊन भेट घेतली. दौलत दरोडा यांनी कृषी विभाग उपविभागीय आधीकारी  मिलिंद जाधव,याना आदेश देऊन लवकरात लवकर सरकारकडून सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार दौलत दरोडा यांनी दिले आहे. [/svt-event]

[svt-event title=”भाजप नेत्यांनी वीजबिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं: नितीन राऊत” date=”20/11/2020,4:34PM” class=”svt-cd-green” ] भाजप नेत्यांनी वीजबिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं, सर्वांची मी तपासणी करुन देईन, जर वाढीव वीजबिलं नसतील, तर त्यांनी प्रॉमीस करावं, आम्ही सर्व वीजबिलं भरु – नितीन राऊत [/svt-event]

[svt-event title=”भाजपनं केंद्र सरकार विरोधात आंदोलन करावे, नितीन राऊत यांचा टोला” date=”20/11/2020,4:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर दिंड्या आणि पालख्यांना पंढरपुरात प्रवेश बंदी” date=”20/11/2020,3:34PM” class=”svt-cd-green” ] राज्य शासनाने विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना पंढरपूरकडे दिंड्या पाठवू नका, असे आदेश दिले आहेत. कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय, 26 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. या वारीसाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातून शेकडोंच्या संख्येने दिंड्या आणि पालख्या पंढरीत होत असतात. या सर्व सोहळ्यांना राज्य शासनाने घातली बंदी, आषाढी यात्रेनंतर कार्तिक वारी ही निर्बंधातच होणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाची दुसरी लाट आली तर महाराष्ट्रातील सर्वांना महागात पडेल” date=”20/11/2020,2:57PM” class=”svt-cd-green” ] कोरोनाची दुसरी लाट आली तर महाराष्ट्रातील सर्वांना महागात पडेल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. महाराष्ट्रात दुसरी लाट येवू नये असं मला वाटतं पण मनाला भिती वाटते. मुंबईत सुद्धा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत थोडी थोडी वाढ होतेय. महाराष्ट्रातल्या जनतेने केरळ आणि दिल्लीचा बोध घेतला पाहिजे, असं वक्तव्य आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केले आहे. [/svt-event]

[svt-event title=”वसईत मुस्लिम बांधवांनी 8 महिन्या नंतर आज पहिला शुक्रवारचा नमाज केला आदा” date=”20/11/2020,2:49PM” class=”svt-cd-green” ] मागच्या 8 महिन्यानंतर आज पहिल्यांदा वसई विरार नालासोपाऱ्यातील मुस्लीम बांधवांनी मशिदीमध्ये नमाज अदा केली आहे. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी प्रत्येक गेटला सॅनिटायझरचा वापर आणि, टेम्प्रेचर तपासणी करून प्रवेश देण्यात आला. प्रत्येकाला मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला होता. [/svt-event]

[svt-event title=”फायद्यात असलेली महावितरण कंपनी 11 महिन्यात तोट्यात कशी?” date=”20/11/2020,1:41PM” class=”svt-cd-green” ] महावितरण महाराष्ट्र सरकारची कंपनी आहे, आमच्या सरकारमध्ये तीन्ही कंपन्या फायद्यात होत्या. आमच्या काळात फायद्यात असलेली महावितरण कंपनी ११ महिन्यात तोट्यात कशी?, राज्य सरकारने वीज बिल माफीसाठी 5 हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागणी केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्रावर भाजपनं मोठ संकट आणलंय, महावितरणचे 67 हजार कोटी मागील सरकारकडून थकले, जयंत पाटलांचा आरोप” date=”20/11/2020,1:23PM” class=”svt-cd-green” ] महावितरणचे 67 हजार कोटी मागील सरकारकडून थकले आहेत. महाराष्ट्रवर भाजपने मोठं संकट आणलं आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. देशातील आर्थिक परिस्थितीमुळं पदवीधरांसमोर संकट निर्माण झालं आहे. देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली म्हणून पदवीधरांसमोर मोठं संकट, पदवीधरांवर कोरोनाच्या आधीपासूनचं संकट आहे. केंद्र सरकामुळं पदवीधरांसमोर ही परिस्थिती निर्माण झालीय. महाराष्ट्रातील पदवीधरांच्या समस्यांवर मार्ग काढणार. [/svt-event]

[svt-event title=”भाजपचे वाढीव वीजबिलांविरोधात आंदोलन, राज्य सरकारवर टीकास्त्र” date=”20/11/2020,1:12PM” class=”svt-cd-green” ] भाजपच्या कार्यकाळात 4 वर्ष दुष्काळ होता. भाजप सरकारचा कार्यकाळ संपला तेव्हा महावितरण नफ्यामध्ये होते. राज्य सरकार वीज ग्राहकांच्या आत्महत्येची वाट पाहतय का? भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सरकारला सवाल

[/svt-event]

[svt-event title=”शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती” date=”20/11/2020,1:05PM” class=”svt-cd-green” ] कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्य़ातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशा सुचना देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”कर्तृत्वान मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, आशिष शेलारांचं पवारांसमोर भाषण” date=”20/11/2020,12:59PM” class=”svt-cd-green” ] ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी संपादित केलेल्या ‘कतृत्ववान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात भाजप नेते आशिष शेलार यांनी कतृत्वान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, या भावनेला समर्थन असल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी आशिष शेलार यांना भावी मुख्यमंत्री संबोधले होते. त्यावर शेलार यांनी उत्तर दिले. [/svt-event]

[svt-event title=”वीजबिल माफीवर ठाकरे सरकारचे घुमजाव म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार, काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर” date=”20/11/2020,12:40PM” class=”svt-cd-green” ] वीजबिल माफीवर ठाकरे सरकारचा घुमजाव म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेसने जनतेच्या हितासाठी सरकारला शॉक देण्याची तयारी ठेवावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. महाविकास आघाडी सरकारने वीजबिल माफ करण्याची घोषणा करावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली. [/svt-event]

[svt-event title=”नाशिकच्या ओझर विमानतळावरुन स्पाईसजेटची विमानसेवा सुरु होणार, दिल्ली, बंगळुरू,हैदराबादला उड्डाण” date=”20/11/2020,12:29PM” class=”svt-cd-green” ] नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ ओझर विमानतळावर स्पाईसजेटच्या फर्स्ट फ्लाईटचं उदघाटन करणार आहेत. आजपासून बंगळुरु, दिल्ली हैद्राबादला उड्डाण होणार [/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार, महापालिका आयुक्तांचे आदेश ” date=”20/11/2020,12:08PM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली आहे. त्यानुसार येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा या बंदच ठेवण्यात येणार आहे.

[/svt-event]

[svt-event title=”कल्याणमध्ये कोरोना चाचणीसाठी शिक्षकांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा” date=”20/11/2020,12:00PM” class=”svt-cd-green” ] कल्याणमध्ये वसंत व्हॅली येथील महापालिकेच्या कोविड सेंटरवर शिक्षकांची गर्दी, शाळा सुरु होण्यापूर्वी कोविड टेस्ट करण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षक जमल्यानं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा तर नियोजनाचा अभाव असल्याने हॉस्पिटल प्रशासनाची उडाली तारांबळ [/svt-event]

[svt-event title=”विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकासआघाडीची पुण्यात बैठक, राजकीय हालचालींना वेग ” date=”20/11/2020,11:51AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील काँग्रेस भवनात आघाडीची बैठक सुरू आहे. पदवीधर निवडणूकीबाबत आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची खलबतं, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, अमोल कोल्हे, काँग्रेसचे विश्वजित कदम, सतेज पाटील, शिवसेनेचे रमेश कोंढे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत. मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्यानं राजकीय हालचालींना वेग. [/svt-event]

[svt-event title=”ICC कडून 2022 मध्ये होणाऱ्या विश्वकप स्पर्धेला स्थगिती” date=”20/11/2020,11:46AM” class=”svt-cd-green” ] आयसीसीने 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या महिला टी-20 विश्वकप स्पर्धेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही स्पर्धा फेब्रुवारी 2023 मध्ये होणार आहे. 2022 मध्ये महिला क्रिकेटमध्ये दोन मोठ्या स्पर्धा होणार असल्याने ही स्पर्धा 2023 मध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेच्या भगव्यात भेसळ, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना, फडणवीसांची जळजळीत टीका” date=”20/11/2020,11:17AM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेच्या भगव्यामध्ये भेसळ झालीय, त्यांचा भगवा उरला नाही. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना आहे, त्यांचा कुठला भगवा? देवेंद्र फडणवीसांची नागपूरमध्ये शिवसेनेवर जळजळीत टीका,महाविकास आघाडी सरकारने पदवीधरांचा, शिक्षकांचा भ्रमनिरास केलाय नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं वर्चस्व आहे. आमच्या सरकारच्या काळात ऊर्जा विभागाने उत्तम काम केलंय. आमच्या काळात थकबाकी असेल याचा अर्थ आम्ही गरिबांना सवलत दिलीय. देवेंद्र फडणवीसांचे नागपूरमध्ये स्पष्टीकरण. [/svt-event]

[svt-event title=”आमचा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा, हात लावाल तर राख व्हाल, संजय राऊत यांचा भाजपला इशारा” date=”20/11/2020,11:02AM” class=”svt-cd-green” ] आमचा भगवा शुद्ध आहे. महाराष्ट्रातील जनतेला आमच्या भगव्याची माहिती आहे कोणीही आमच्या भगव्या विषयी बोलू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे, हात लावाल तर राख व्हाल. असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला. भगवा फडकवायचा असेल तर बेळगाव मध्ये फडकवा. भगवा फडकवायचा असेल तर पाकव्याप्त काश्मीर मध्ये फडकवा, असा टोला राऊत यांनी लगावला.

[/svt-event][svt-event title=”सीबीआयची अवस्था पानटपरी सारखी झालीय, मंत्री अस्लम शेख यांचे वक्तव्य” date=”20/11/2020,10:55AM” class=”svt-cd-green” ] सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असल्यास राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. महाराष्ट्राचे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी ‘भाजप सरकारच्या काळातची अवस्था पानटपरी सारखी झालीय’ असं एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे.

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई महापालिकेच्या सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी होणार ” date=”20/11/2020,10:45AM” class=”svt-cd-green” ] मुंबई मनपाच्या सर्व शाळांमध्ये पुढच्या ४८ तासांत सर्व शिक्षकांची कोरोना आरटीपीसीआर टेस्ट होणार,शिक्षकांसोबत वाॉचमन आणि क्लार्कसोबत सफाई कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी होणारस, 23 तारखेपासून 9 ते 12 वीचे वर्ग सुरू होत आहेत. मुंबई महापालिका तर्फे शिक्षकांच्या कोविड टेस्ट केल्या जात आहेत , भोयवाडा , पालिका स्कुलमध्ये शिक्षकांनी कोरोना चाचणी करून घेतली आहे. वर्ग स्वच्छ धुतलेत, सोशल डिस्टेंसही मेंटेन ठेवण्यात येईल. पण, पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत, असं मत शिक्षकांनी व्यक्त केलंय. [/svt-event]

[svt-event title=”विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज आणि उद्या नागपूर दौऱ्यावर” date=”20/11/2020,10:18AM” class=”svt-cd-green” ] विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज आणि उद्या नागपूर दौऱ्यावर, भाजपचे पदवीधर उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी फडणवीसांच्या सभा, नागपुरातील सहा विधानसभा मतदारसंघात घेणार प्रचारसभा, पदवीधर निवडणुकीत भाजपचे दिग्गज प्रचाराच्या मैदानात [/svt-event]

[svt-event title=”वीज बिल माफीच्या मुद्द्यावर विदर्भातही मनसे आक्रमक” date=”20/11/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ] वीज बिल माफीच्या मुद्द्यावर विदर्भातही मनसे आक्रमक, सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम, मंगळवारी आंदोलन, विदर्भातील हिंगणघाट शहरात मनसेचं मंगळवारी आंदोलन, मनसे नेते अतुल वादिलेंचं वीज बिलमाफीसाठी मंगळवारी आंदोलन, सरकारनं वी बिल माफी न केल्याने मनसे आक्रमक, 24 तारखेला ऊर्जामंत्र्यांचा 21 फुटांचा पुतळा जाळण्याचा मनसेचा इशारा, राज ठाकरे यांच्या आदेशानंतर विदर्भात मनसे आक्रमक [/svt-event]

[svt-event title=”मनसेचा हुकमी एक्का मैदानात उतरणार; राज ठाकरे पदवीधर निवडणुकीसाठी प्रचार करणार?” date=”20/11/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कनाथ खडसे यांचा कोरोना अहवाल नेगेटिव्ह” date=”20/11/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह | TV9 Marathi Live” date=”20/11/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.