Lockdown extension | पुणे-पिंपरी, ठाणे ते नांदेड, कुठे-कुठे लॉकडाऊन वाढवला? काय सुरु, काय बंद?
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे (Lockdown extension in three district of Maharashtra).
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे (Lockdown extension in three district of Maharashtra). मुंबई पाठोपाठ ठाणे आणि पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळल्याने या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा काही दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातही आठवडाभर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे (Lockdown extension in three district of Maharashtra).
पुणे आणि पिंपरी चिंवडमध्ये 10 दिवसांचा लॉकडाऊन
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिल्यानंतर विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढचे 10 दिवस लॉकडाऊन असेल. लवकरच याची सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे.
हेही वाचा : भाजीपाला भरुन ठेवा, खरेदी असेल ती करुन घ्या, पुणे-पिंपरीत कडक लॉकडाऊन
ठाणे जिल्ह्यातही लॉकडाऊन वाढवला
ठाण्यात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे ठाण्यात 2 जुलैपासून 12 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा लॉकडाऊन 19 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात लॉकडाऊनदरम्यान घरकाम करणाऱ्यांना कामावर जाण्याची मुभा देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय 2 जुलैपासून जारी केलेले पूर्ववत नियमच सुरु राहतील, अशीदेखील माहिती परिपत्रकात देण्यात आली आहे.
1) आकर्षक आणि नाशवंत वस्तूंच्या ने-आण करण्याशिवाय इतर आणि सर्व कारणांकरिता महापालिका हद्दीत लॉकडाऊन लागू असेल.
2) इंटरसिटी एमएसआरटीसी बसेस आणि मेट्रो सह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी नाही .
3) टॅक्सी, ऑटो रिक्षा यांना परवानगी नाही. मात्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा घेण्यासाठी देण्यासाठी प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी असेल. या ऑर्डरअंतर्गत ड्रायव्हरशिवाय केवळ एका प्रवाशाचा खाजगी वाहनांना परवानगी असलेल्या जीवनाश्यक वस्तू आरोग्य सेवा आणि या अंतर्गत मान्य कृतीकरिता परवानगी असेल.
4) सर्व आंतरराज्य बस आणि प्रवासी वाहतूक सेवांचे (खाजगी वाहनांसह) तसेच खाजगी ऑपरेटरकडून कामकाज बंद असेल. तर बाहेरून येऊन बाहेर जाणाऱ्या वाहनांना परवानगी असेल.
5) ज्या प्रत्येक व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे त्यांनी त्यांचे सक्त पालन केले पाहिजे. नाहीतर तो/ ती कठोर दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार असेल. त्या व्यक्तीला महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरित केले जाईल.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
6) सर्व रहिवासी घरीच राहतील. सामाजिक परवानगीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. केवळ परवानगी असलेल्या कामासाठी बाहेर येतील.
7) सार्वजनिक ठिकाणी आकर्षक बाबीच्या खरेदीसाठी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे.
8) व्यावसायिक आस्थापना कार्यालय आणि कारखाने, कार्यशाळा, गोदाम इत्यादींसह सर्व दुकानांनी त्यांचे कामकाज बंद ठेवावे.
9) सतत प्रक्रिया आणि फार्मासयुटीकल्स इत्यादी आवश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक युनिटला परवानगी असेल .
10) डाळ व तांदूळ गिरणी खाद्य आणि संबंधित उद्योग दुग्धशाळा खाद्य व चारा इत्यादींचा आवश्यक वस्तूंच्या उत्पादनांत गुंतलेल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवण्यास परवानगी असेल.
11) सरकारी कार्यालये या कालावधीत कमीत कमी कर्मचाऱ्यांचा ऑपरेट करण्याची परवानगी असेल. चेक काऊंटरजवळ एकमेकांपासून तीन फूट अंतर ठेवणे बंधनकारक, आवारात योग्य स्वच्छता आणि सॅनिटायझर हात धुण्याच्या सुविधांची उपलब्धता गरजेची
12) वस्तू आवश्यक वस्तू आणि सेवा प्रदान करणाऱ्या खालील दुकाने आस्थापना वरील प्रतिबंधा बँका एटीएम विमा आणि संबंधित बाबी, आयटी आणि आयपीएस टेलिकॉम टपाल इंटरनेट आणि डेटा सेवांना वगळण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातही लॉकडाऊनची घोषणा
नांदेड जिल्ह्यात 12 जुलैच्या मध्यरात्रीपासून आठवडाभरासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. नांदेडमध्ये आतापर्यंत 541 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
नांदेडमध्ये लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुढचे आठ दिवस फक्त जीवनाश्यक वस्तूंची दुकानं दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने आठवडाभर बंदच राहणार आहेत. दरम्यान, नागरिकांनी अत्यावश्यक गरजांचा विनाकारण साठा करु नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.