Loksabha Election 2024 : लोकसभा की विधानसभा? नाना पटोले कुणाला देणार टक्कर? ‘या’ नेत्याने दिली महत्वाची माहिती

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. अनेक मातब्बर नेते या निवडणुकीत आपले नशीब अजमावणार आहेत. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मात्र ते लोकसभा लढविणार की विधानसभा याची एका बड्या नेत्याने माहिती दिलीय.

Loksabha Election 2024 : लोकसभा की विधानसभा? नाना पटोले कुणाला देणार टक्कर? 'या' नेत्याने दिली महत्वाची माहिती
NANA PATOLE, NITIN GADKARI AND DEVENDRA FADNAVISImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 10:15 PM

नागपूर : 7 ऑक्टोबर 2023 | आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणारा आहे. निवडणुकीसाठी दोन्ही बाजूने जोरदार तयारी करण्यात येत आहे. मात्तबर नेत्यांना या निवडणुकीत उतरवून आपल्या जास्त जागा कशा निवडून येतील यावर महाविकास आघाडीचा आणि महायुतीचा भर आहे. अशातच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लोकसभा लढविणार की विधानसभा यावर नागपूरमधील एका बड्या नेत्याने महत्वाचं विधान केलंय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघातून नाना पटोले खासदार म्हणून निवडून आले होते.

पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा सुमारे 1.5 लाख मताधिक्याने त्यांनी पराभव केला होता. तर, 2019 मध्ये नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपूरमधून निवडणूक लढविली होती. पण, गडकरी यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

नाना पटोले हे भंडारा-गोंदियामधील साकोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. भंडारा-गोंदिया हा खऱ्या अर्थाने भाजपचा गड आहे. सातत्याने दोन-तीन दशकापासून भंडारा येथील खासदार, आमदार हे बहुसंख्याने भाजपचे आहेत. नाना पटोले यांना हा गड त्यांचा आहे असे जर वाटत असेल तर ते दक्षिण नागपूरमधून 2024 ची निवडणुकीची तयारी का करत आहेत असा सवाल नागपूरचे माजी आमदार आणि भाजप नेते आशिष देशमुख यांनी केलाय.

हे सुद्धा वाचा

भंडारा गोंदिया साकोली विधानसभा क्षेत्र सोडून नाना पटोले दक्षिण नागपूरमधून निवडणूक लढविणार आहेत अशी खात्रीलायक माहिती मला सूत्रांनी दिली आहे, असे आशिष देशमुख म्हणाले. नागपुरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांशी बोला तेव्हा कळेल भंडारा जिल्हा साकोली विधानसभा क्षेत्र सोडून नागपूरला जात आहे.

ज्याप्रकारे नाना पटोले यांनी लोकसभा निवडणूक नागपूरमधून लढविली त्याचप्रमाणे 2024 ची विधानसभा निवडणूक दक्षिण नागपूरमधून लढवण्याच्या तयारीत आहेत, असे त्यांनी सांगितले. ओबीसी नेते म्हणणारे नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसापासून ओबीसी आंदोलनाला पाठ दाखविली आहे अशी टीकाही आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर केली.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....