AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lt Manoj Pandey Batchmate : असाही योगायोग, लष्कराच्या तीनही दलाचे प्रमुख बॅचमेट, तिघांचही पुणे कनेक्शन, ले. जनरल मनोज पांडेंच्या नियुक्तीनं सर्कल पूर्ण

सध्या देशाचे 29 वे लष्करप्रमुख म्हणून जनरल मनोज नरवणे (Manoj Naravane) हे कार्यरत आहेत. त्यांचा कार्यकाळ 30 एप्रिल रोजी पूर्ण होणार असून, त्यांची जागा लष्कराचे उपप्रमुख मनोज पांडे घेणार आहेत.

Lt Manoj Pandey Batchmate : असाही योगायोग, लष्कराच्या तीनही दलाचे प्रमुख बॅचमेट, तिघांचही पुणे कनेक्शन, ले. जनरल मनोज पांडेंच्या नियुक्तीनं सर्कल पूर्ण
डावीकडून मनोज पांडे, विवेक राम चौधरी आणि हरी कुमार.
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 12:01 PM

नवी दिल्लीः काही-काही योगायोग दुर्मिळ आणि सुखद धक्के देणारे असतात. काही-काही योगायोग संस्थांची शान, मान-मरातब वाढवणारे असतात. आताही तसेच होताना दिसतेय. देशाचे नवे लष्करप्रमुख (New Army Chief) म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Lt Gen Manoj Pandey) यांनी धुरा सांभाळल्यानंतर खडसवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. कारण पांडे यांच्यासह नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल हरी कुमार आणि एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी असे देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या तिन्ही शिलेदारपदी खडकवासल्या येथील एनडीएच्या 61 व्या तुकडीचे विद्यार्थी असणार आहेत. सध्या देशाचे 29 वे लष्करप्रमुख म्हणून जनरल मनोज नरवणे (Manoj Naravane) हे कार्यरत आहेत. त्यांचा कार्यकाळ 30 एप्रिल रोजी पूर्ण होणार असून, त्यांची जागा लष्कराचे उपप्रमुख मनोज पांडे घेणार आहेत.

काय होणार लाभ?

देशाच्या संरक्षण विषयक तिन्ही भागाच्या महत्त्वाची जबाबदारी आता खडकवासला येथील एनडीएच्या 61 व्या तुकडीचे विद्यार्थी सांभाळणार आहेत. संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेफ्टनंट जनरल पांडे हे लिमा स्क्वॉड्रनचे आहेत, तर इतर दोन प्रमुख एनडीए अधिकार्‍यांच्या ज्युएट स्क्वॉड्रनचे आहेत. हे तीन प्रमुख सहकारी असल्याने या तिन्ही सेवेतील समंजसपणा आणखी वाढवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षा अभेद्य होण्यासाठी लाभच होणार आहे.

पांडे पहिले इंजिनिअर

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करप्रमुख म्हणून नियुक्त होणारे पहिले इंजिनिअर असतील, तर लष्कर प्रमुख बनणारे कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्सचे पहिले अधिकारी असतील. या पदावर आतापर्यंत इन्फैंट्री, आर्मर्ड और आर्टिलरी अधिकारी कार्यरत राहिले आहेत. नॅशनल डिफेन्स अकादमीचे माजी विद्यार्थी, मनोज पांडे यांना डिसेंबर 1982 मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समध्ये नियुक्त करण्यात आले.

अनेक मोहिमांचे नेतृत्व

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील पल्लनवाला सेक्टरमध्ये ऑपरेशन पराक्रम दरम्यान एका इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले. डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ऑपरेशन पराक्रमचा भाग म्हणून, त्यांनी सैन्य आणि शस्त्रे मोठ्या प्रमाणावर भारत- पाकिस्तानच्या सीमेवर हलवली होती. त्यांनी इतरही अनेक मोहिमांचे नेतृत्व केले आहे.

इतर बातम्याः

Sadhvi Rithambara : हिंदूराष्ट्रासाठी प्रत्येक हिंदुंनी 4 मुलं जन्माला घाला, 2 मुलं RSS, विश्व हिंदू परिषदला द्या, साध्वी ऋतंभरांचा अजब सल्ला

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आता देशाचे नवे सेना प्रमुख; त्यांच्या नियुक्तीसाठी सरकारचा ग्रीन सिग्नल

Sharad Pawar on Raj Thackeray: कुणाला धोका असेल आणि सुरक्षा पुरवली जात असेल तर हरकत नाही: शरद पवार

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.