किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचं?; महादेव जानकरांचा सवाल
राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांची भाजपवरील नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. (mahadev jankar reaction on bjp's statewide protests over inflated power bills)
पंढरपूर: राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांची भाजपवरील नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. त्याचाच भाग म्हणून जानकर यांनी भाजपच्या वीजबिल आंदोलनातून माघार घेतली आहे. किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचे? आपला पक्षही राष्ट्रीय पक्ष आहे, असं सांगत महादेव जानकर यांनी आगामी काळात भाजपासून अंतर ठेवून राजकारण करणार असल्याचे संकेत दिले आहेत. (mahadev jankar reaction on bjp’s statewide protests over inflated power bills)
पंढरपूर येथे ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना महादेव जानकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपने वीजबिला संदर्भात आंदोलन जाहीर केलं आहे. चांगली गोष्ट आहे. प्रत्येक पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण आम्ही मात्र भाजपसोबतच्या आंदोलनात सहभागी होणार नाही. आम्ही स्वतंत्रपणे आमची आंदोलने करू, असं महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं.
भाजपच्या आंदोलनाला पाठिंबा, पण…
भाजप हा आमचा मित्र पक्ष आहे. पण आम्हालाही आमचं अस्तित्व टिकवायचं आहे. त्यांच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही सहभागी होऊ शकत नाही. किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचं? आमचा पक्षही राष्ट्रीय पक्ष आहे. आमचा पक्ष वाढला तर कार्यकर्त्यांनाही ताकद मिळेल, असं जानकर म्हणाले. भाजप वीज बिलासंदर्भात आंदोलन करत असेल तर आमचा त्याला पाठिंबाच राहील. पण त्यांच्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
जानकरांकडून अंतर का?
राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपने महादेव जानकर यांच्या पक्षाकडे म्हणावं तसं लक्ष दिलं नाही. तसेच विधानपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जानकरांच्या पक्षाला जागा देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे जानकर हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज होते. मधल्या काळात जानकर यांनी त्यांच्या पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यालयावर ईडीच्या धाडी पडल्या होत्या. त्यामुळे रासपमध्ये भाजपविरोधातील नाराजी अधिकच वाढली होती. त्याचा परिणाम म्हणूनही जानकरांनी भाजपपासून अंतर ठेवून राजकारण करण्यास सुरुवात केल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. (mahadev jankar reaction on bjp’s statewide protests over inflated power bills)
भाजपचे वीजबिल माफीसाठी आंदोलन
दरम्यान, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी आणि वीजमाफी दिलेली नाहीत. त्यामुळे त्याच्याविरोधात भाजप येत्या काही दिवसात आंदोलन करणार आहे. आधीच करोनाच्या संकटाने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना वीज बीलमाफी द्यावी, अर्थसंकल्पात तशी तरतूदच करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. (mahadev jankar reaction on bjp’s statewide protests over inflated power bills)
LIVE | महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/AgV2vfPde0
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 2, 2021
संबंधित बातम्या:
मनसेला 24 तासात दुसरा झटका, आधी राजेश कदम शिवसेनेत, आता बडा नेता भाजपमध्ये
सदाभाऊ खोत बारामती न्यायालयात साक्षीसाठी हजर, राजू शेट्टींच्या ‘टायमिंग’ने भेट टळली!
यवतमाळमध्ये पोलिओऐवजी 12 चिमुकल्यांना सॅनिटायजर्स पाजलं, आरोग्यमंत्री टोपेंची कडक कारवाई
(mahadev jankar reaction on bjp’s statewide protests over inflated power bills)