H3N2 Virus : महाराष्ट्रात वाढली H3N2 ची भीती, आत्तापर्यंत समोर आले 352 रुग्ण, सरकार अलर्ट मोडवर

H3N2 मुळे महाराष्ट्रात एक तरूणाचा मृत्यू झाला असून राज्यातही संसर्गजन्य रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

H3N2 Virus : महाराष्ट्रात वाढली H3N2 ची भीती, आत्तापर्यंत समोर आले 352 रुग्ण, सरकार अलर्ट मोडवर
Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 4:18 PM

मुंबई : महाराष्ट्रामध्ये H3N2 विषाणूचा (H3N2 Virus) धोका वेगाने वाढताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत H3N2 व्हायरसच्या रुग्णांची (patients)संख्या 352 वर पोहोचली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र सध्या परिस्थिती आटोक्यात असल्याचे आरोग्यमंत्री (health minister)तानाजी सावंत यांनी सांगितले आहे. दरम्यान अहमदनगरमध्ये या आजारामुळे एकाचा मृत्यू झाला असून हा राज्यातील पहिला मृत्यू आहे.

एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाला संसर्गजन्य आजाराची लागण झाली होती. त्यानंतर तरुणावरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे हा तरुण औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या तो नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झा या संसर्गजन्य आजारामुळे त्याचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाले आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात आत्तापर्यंत H3N2 चे 352 रुग्ण

राज्यात H3N2 व्हायरसच्या रुग्णांची संख्या 352 इतकी आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी आज सांगितले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून रुग्णालयांना अलर्ट राहण्यास सांगितले. H3N2 हा घातक नाही, योग्य उपचारांनी तो बरा होऊ शकतो. कोणीही घाबरण्याची गरज नाही, असेही आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले.

दोन मृत्यूंबाबत शंका

दरम्यान गेल्या आठवड्याभरात दोन रुग्णांच्या झालेले मृत्यू हे H3N2 व्हायरसमुळे झाल्याबाबत डॉक्टरांना अद्याप शंका आहे. मात्र याबाबत अधिक तपशीलांसह अहवालाची प्रतीक्षा आहे. खरंतर या दोन्ही रुग्णांना H3N2 ची बाधा होतीच.मात्र त्यासोबतच कोविड 19 आणि इतर आजारदेखील त्यांच्या मृत्यूसाठी कारण ठरल्याचं प्राथमिक अहवालात समोर आलं आहे. अहमदनगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 23 वर्षीय विद्यार्थाचा मृत्यू झाला होता. यासंदर्भातील सविस्तर अहवाल अजून येणं बाकी आहे. तर नागपूरमध्ये 78 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यूही H3N2मुळे झाल्याची डॉक्टरांना शंका आहे.

ही आहेत लक्षणे

– खोकला

– सर्दी

– 100 डिग्रीपेक्षा जास्त ताप

– अशक्तपणा जाणवणे

– श्वास घेण्यास त्रास होणे

– श्वासोच्छवासाचा वेग वाढणे

– छातीत दुखणे

– अंगदुखी

– शरीरातली पाण्याची पातळी कमी होणे

– अचानक चक्कर येणे

काळजी कशी घ्यावी ?

– सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा

– गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा

– हात स्वच्छ ठेवा. सॅनिटायझरचा वापर करा.

– डोळे, नाकाला, तोंडाला वारंवार स्पर्श करु नका

– खोकताना किंवा शिंकताना मास्क लावा

– सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

– भरपूर पाणी प्या

– ताजी फळे आणि फळांचा रस यांचे सेवन करा.

– पौष्टिक आहाराचे सेवन करून प्रतिकारशक्ती वाढवा.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.