मित्रासोबत पिकनिकला गेला आणि पाय घसरून जिवानिशी गेला, दीड हजार फुट उंचावरून घसरला…आणि
पिकनिकला आलेल्या तरुणांनी गरम पाण्याच्या झरा असल्याने आंघोळ करण्यास सुरुवात केली होती, गरम पाण्याच्या झऱ्याखाली सर्व मित्रपरिवार आंघोळ करत होते.
नाशिक : गुजरातवरुन पिकनिकला आलेल्या विद्यार्थ्याचा नाशिकमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असलेल्या तक्षिल संजाभाई प्रजापती याचा मृत्यू झाला आहे. तब्बल दीड हजार फुट उंच असलेल्या धबधब्यावरुन खाली तो खडकावर कोसळला होता. त्यामुळे खडकावर तक्षिल आदळला आणि जागेवर त्याचा मृत्यू झाला आहे. सुट्टीच्या निमित्ताने तक्षिलसह त्यांचे दहा-बारा मित्र नाशिकच्या सुरगाणा येथे एका रिसॉर्टवर आलेले होते. जवळच गरम पाण्याच्या धबधबा असल्याने तक्षिलसह त्याचे मित्र गरम पाण्याच्या झऱ्याखाली आनंद लुटत होते. मात्र, त्या झऱ्याखाली असलेल्या खडकावर शेवाळ आलेले होते. त्यावरून तक्षिलचा पाय घसरला आणि दीड हजार उंचीवर तक्षिल खाली कोसळला. खाली खडक असल्याने तक्षिलचा मृत्यू झाला आहे. या घटणेने तक्षिलच्या मित्रपरिवारात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
नाशिकच्या सुरगाणा येथे साखळचोंड धबधबा प्रसिद्ध आहे. त्याच ठिकाणी गुजरातचे काही विद्यार्थी पिकनिक साठी आले होते.
पिकनिकला आलेल्या तरुणांनी गरम पाण्याच्या झरा असल्याने आंघोळ करण्यास सुरुवात केली होती, गरम पाण्याच्या झऱ्याखाली सर्व मित्रपरिवार आंघोळ करत होते.
त्याच दरम्यान तक्षिलचा पाय शेवाळ असल्याने खडकावरून घसरला आणि दीड हजार खोल दरीत तक्षिल कोसळला आणि त्याच्या जागेवरच मृत्यू झाला.
ग्रामस्थांनी ही बाब पोलिसांना कळविली होती, त्यावरून पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी देखील दाखल झाले होते, त्यावरून पंचनामा करण्यात आला.
तक्षिलचे नातेवाईकही तोपर्यंत गुजरावरून नाशिकमध्ये दाखल झाले होते, पोलीसांनी खात्री करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता.
मात्र, या घटनेवरुन पर्यटनच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या व्यक्तींनी माहिती असेल तरच कुठेही जाण्याचे धाडस करावे अन्यथा जीवावर बेतणारी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.