जालन्यातील लाठीचार्जच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले, याबाबत…; अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना काय म्हणाले? वाचा

Additional Director General of Police Sanjay Saxena in Jalna : अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना काय म्हणाले? जालन्यातील लाठीचार्जच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले, याबाबत... वाचा सविस्तर प्रतिक्रिया...

जालन्यातील लाठीचार्जच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले, याबाबत...; अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना काय म्हणाले? वाचा
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 4:28 PM

जालना | 04 सप्टेंबर 2023 : राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना हे जालन्यात दाखल झाले. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांनी इथे बैठक घेतलीय जालन्यात घडलेल्या घटनेचा राज्याच्या अतिरीक्त महासंचालकांनी आढावा घेतला. या बैठकीला तत्कालीन पोलीस अधिक्षक तुषार दोषी देखील उपस्थित होते. जालन्यातील या लाठीमाराप्रकरणी सर्व पोलीस अधिकाऱ्यांची प्राथमिक चौकशी सुरू झाली आहे.या बैठकीनंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मला मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश होते. ती चौकशी करण्यासाठी मी आलो होतो. चौकशी सुरू आहे. त्याबाबत अधिक काही सांगता येणार नाही. चौकशी संपल्यानंतर याबाबत सविस्तर सांगता येईल. चौकशीला वेळ लागू शकतो, असं संजय सक्सेना म्हणाले.

घटनास्थळी नेमक काय घडलं? याची प्राथमिक माहिती राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी जाणून घेतली. या बैठकीला औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, जालन्याचे पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधिक्षक देखील उपस्थीत होते. जालन्यात लाठीमार झाला तेव्हा घटनास्थळी असणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे.

उपमुख्यमंत्र्यांकडून माफी

जालन्यातील लाठीचारानंतर राज्यात एकच संतापाची लाट उसळली. याच पार्शवभूमीवर पत्रकार परिषद घेत सरकारची बाजू मांडण्यात आली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. 2014 लाही युतीचं सरकार सत्तेत होतं. यावेळी माझ्या सरकारच्या काळात पाच हजार आंदोलनं झाली. तेव्हा कधीच बळाचा वापर केला नव्हता. आता बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे, जखमी झाले आहे. त्यांची मी क्षमा याचना करतो. क्षमा मागतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ठिकठिकाणी बंद

जालन्यातील लाठीमार प्रकरणी राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या या लाठीमाराचा निषेध केला जात आहे. राज्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला आहे.  बार्शी शहरातील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. हॉस्पिटल, मेडिकल आणि शाळा वगळता इतर सर्व आस्थापना बंद आहेत. पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकावरून जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नांदेडकडे जाणाऱ्या बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....