Maharashtra APMC Election Result LIVE updates : राज्यभरातील बाजार समित्यांचा निकाल LIVE

| Updated on: Apr 30, 2023 | 6:57 AM

Maharashtra APMC Election Results 2023 LIVE Counting updates : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निकाल आता हाती यायला लागला आहे. पाहा कोणी कुठे बाजी मारली आहे.

Maharashtra APMC Election Result LIVE updates : राज्यभरातील बाजार समित्यांचा निकाल LIVE

मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका आज पार पडल्या. तर इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी ३० एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. २८ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकांचा निकाल हाती येऊ लागला आहे. ग्रामिण भागातील राजकारणात कृषी उत्पन्न बाजार समित्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. (Agricultural Market Committee Election) यासाठी शुक्रवारी मतदान पार पडलं होतं.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Apr 2023 10:23 PM (IST)

    अहमदनगर
    राहुरी बाजार समीती –
    एकुण जागा – 18
    मविआ – 16 जागा
    भाजप – 02 जागा
    विजयी – मविआ
    संगमनेर बाजार समीती –
    एकुण जागा – 18
    मविआ – 18 जागा
    भाजप – 02 जागी
    विजयी – मविआ
    पाथर्डी बाजार समिती
    मविआ – 1 जागा
    भाजप – 17 जागी
    विजयी –  भाजप
    कर्जत बाजार समिती
    मविआ – 9 जागा
    भाजप – 9 जागी
    श्रीगोंदा बाजार समिती
    राष्ट्रवादी –  11जागा
    भाजप आणि काँग्रेस – 7 जागी
    विजयी –  राष्ट्रवादी
    पारनेर बाजार समिती
    मविआ – 18 जागा
    भाजप – 0 जागी
    विजयी –  मविआ
  • 29 Apr 2023 05:17 PM (IST)

    Parli AMPC Election result 2023

    परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर

    18 पैकी 18 जागा धनंजय मुंडे यांच्या ताब्यात,

    पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचे वर्चस्व

    पंकजा मुंडे यांना मोठा धक्का

  • 29 Apr 2023 05:15 PM (IST)

    Parola APMC Election Result

    -पारोळा बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांना मोठा धक्का

    -पारोळा बाजार समिती निवडणुकीत महाविकासआघाडी पॅनलचा 15 जागांवर विजय

    -भाजप-शिवसेनेकडे केवळ 3 जागा

    -राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीश पाटील यांचे पारोळा बाजार समितीवर वर्चस्व….

  • 29 Apr 2023 05:14 PM (IST)

    Gondia APMC Election Result

    -गोंदियात कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत प्रफुल पटेल यांना मोठा धक्का….

    -गोंदियात काँग्रेस व अपक्ष ची सत्ता.

    -दोन कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये भाजप ची सत्ता.

    -एक कृषि उत्पन्न बाजार समितीत भाजप व महाविकास आघाडी बरोबरीवर.

    -देवरी कृषि उत्पन्न बाजार समिती भाजप बिनविरोध.

  • 29 Apr 2023 02:49 PM (IST)

    Maharashtra APMC Election Result | हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

    भाजपा आणि सर्वपक्षीय पॅनलला 7 जागा

    विकास सेवा सोसायटी गटाअंतर्गत 7 जागा भाजपा आणि सर्वपक्षीयांकडे

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेल्या विकास दांगट यांचा राष्ट्रवादीला धक्का

    आतापर्यंत 9 जागा भाजपा आणि सर्वपक्षीय गटाकडे

  • 29 Apr 2023 02:40 PM (IST)

    Maharashtra APMC Election Result | वाशिम बाजार समिती मतमोजणी निकाल…

    18 जागांचे निकाल जाहीर…

    भाजपा – 01

    राष्ट्रवादी – 03

    काँग्रेस – 05

    शिंदेगट – 01

    वंचित – 02

    शिवसेना ठाकरे गट – 03

    इतर – 03

  • 29 Apr 2023 02:33 PM (IST)

    Maharashtra APMC Election Result | भिवंडी | केंद्रीय पंचायतीवर राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या गटाचं वर्चस्व

    कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपा शिवसेना श्रमजीवी संघटनेने मिळवला विजय

    भाजपा शिवसेना श्रमजीवी -10

    महाविकास आघाडी – 08

  • 29 Apr 2023 02:18 PM (IST)

    Shahada APMC Election Result

    शहादा बाजार समितीत भाजपाला मोठा धक्का बसला.

    शहादा बाजार समिती भाजपचे दोन गट पडले पडल्याने त्याच्या फायदा स्थानिक नेते शेतकरी विकास पॅनलला

    शहादा बाजार समिती मंत्री आणि आमदारांना मोठा धक्का देत स्थानिक नेते अभिजीत पाटील यांचा शेतकरी विकास पॅनल यांच्या १० जागांवर विजयी मिळाला.

    उर्वरित सहा जागेचे मतमोजणी सुरू आहे.

  • 29 Apr 2023 02:16 PM (IST)

    Maharashtra APMC Election Result | पुणे : मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती अंतिम निकाल

    निवडणूक निकाल जाहीर – सर्व जागांचे अंतिम निकाल

    बिनविरोध – 00

    शिवसेना शिंदे गट – 00

    उद्धव ठाकरे गट – 00

    भाजप-01

    राष्ट्रवादी काँग्रेस – 15

    काँग्रेस – 02

    मनसे – 00

    इतर- 00

  • 29 Apr 2023 02:11 PM (IST)

    नाशिक | लासलगाव बाजार समितीत ‘कांटे की टक्कर…

    भुजबळ विरोधी शेतकरी पॅनलला नऊ जागा…

    भुजबळ समर्थक शेतकरी विकास पॅनलला आठ जागा….

    तर एक जागेवर व्यापारी गटातून आला अपक्ष..

    अपक्षच्या हाती लासलगाव बाजार समितीच्या सत्तेच्या चाव्या?

  • 29 Apr 2023 02:07 PM (IST)

    लासलगाव बाजार समितीचे आतापर्यंत अकरा निकाल हाती…

    भुजबळ विरोधी शेतकरी पॅनलला सात जागा…

    तर भुजबळ समर्थक शेतकरी विकास पॅनलला अवघ्या तीन जागा…

    एक जागेवर अपक्ष विजयी…

    सोसायटी गटाच्या सात जागेचे निकाल अद्याप बाकी ….

  • 29 Apr 2023 02:05 PM (IST)

    परभणी | कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

    एकूण 18 जागा,

    महाविकास आघाडी 12 जागांवर आघाडी,

    भाजप 4 जागांवर आघाडीवर,

    तर अपक्ष 2 ठिकाणी विजयी

  • 29 Apr 2023 01:32 PM (IST)

    Chalisgaon APMC Election Result

    • चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपाई पुरस्कृत पॅनलचे वर्चस्व.
    • कार्यकर्त्यांचा फटाके फोडून गुलाल उधळत एकच जल्लोश
    • भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वर्चस्व कायम.
    • आमदार मंगेश चव्हाण यांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी धरला ढोल ताशाचा तालावर ठेवा.
    • मंगेश चव्हाण समर्थकांची यावेळी जोरदार घोषणाबाजी.
    • आजचा हा निकाल सर्वसामान्य शेतकरी व मतदारांना समर्पित करतो – आमदार मंगेश चव्हाण
    • आरोप करणाऱ्यांना लोकांनी मत पेटवून उत्तर दिलं – आमदार मंगेश चव्हाण
    • कृषी उत्पन्न बाजार समिती उद्यापासूनच कामाला सुरुवात करणार – आमदार मंगेश चव्हाण
  • 29 Apr 2023 01:23 PM (IST)

    Bhandara APMC election Result

      • काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा गृह जिल्ह्यात दारुण पराभव.
      • भाजपने जोरदार मुसंडी मारत तब्बल 14 जागांवर विजय मिळविला. काँग्रेसला 4 जागेवर विजय संपादन करता आलं.
      • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासाठी बाजार समितीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. \
      • राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपशी हातमिळवणी करून काँग्रेसचे नाना पटोले यांना त्यांच्या गृह जिल्ह्यातचं सत्तेपासून दूर ठेवत काँग्रेसचा पराभव केला.

  • 29 Apr 2023 01:09 PM (IST)

    sambhaji nagar APMC Election Result : वैजापुर बाजार समितीवर भाजप शिंदे गटाची सत्ता

    संभाजीनगर मधील वैजापुर बाजार समितीवर भाजप शिंदे गटाने 15 पैकी 10 जागा जिंकून सत्तेत आली आहे.

    – महाविकास आघाडीला येथे 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

    या निवडणुकीत शिवसेना भाजपचे रामहरी बापू, काकासाहेब पाटील, कल्याण दागोडे, कल्याण जगताप, शिवकन्या पवार, नजन रजनीकांत, गणेश पोपटराव इंगळे, प्रवीण लक्ष्मण पवार, गोरख प्रल्हाद आहेर, प्रशांत उत्तमराव त्रिभुवन हे दहा उमेदवार विजयी झाले आहेत.

    तर महाविकास आघाडीचे अविनाश गलांडे, संजय निकम, ज्ञानेश्वर जगताप, अनिता वाणी, प्रशांत सदाफळ असे पाच उमेदवार विजयी झाले आहेत.

  • 29 Apr 2023 01:01 PM (IST)

    Chalishaon APMC Election Result : भाजप, शिवसेनेची विजयी वाटचाल सुरूच

    – चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपाई, महायुती पुरस्कृत पॅनलची विजयी वाटचाल सुरूच…

    – कृषी उत्पन्न बाजार समितीत मतदारांनी कपबशीला पसंती दिली आहे.

    – भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या समर्थकांचा पाचव्या जागेवर विजय झाला आहे.

    – महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलने एका जागेवर खाते उघडले असून प्रदीप देशमुख व्यापारी गटातून विजयी झाले आहेत.

    – भाजप , शिवसेना, रिपाईच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

  • 29 Apr 2023 12:56 PM (IST)

    Sangamner APMC Election Result : संगमनेर कृषी बाजार समितीत तिसऱ्या फेरीतही थोरातांच्या पॅनलची आघाडी

    – तिसऱ्या फेरीत महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी

    – 18 पैकी 11 जागांचा निकाल जाहीर

    – 10 जागा महाविकास आघाडीला तर 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

    – विखे गटाला अद्याप एकही जागा मिळालेली नाही

    – उर्वरित 7 जागांची मतमोजणी सुरू आहे

  • 29 Apr 2023 12:49 PM (IST)

    बारामतीत राष्ट्रवादीने गड राखला, राष्ट्रवादीचे 17 उमेदवार आघाडीवर

    – पुरंदर नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर

    – दौंडमध्ये खासदार संजय राऊत यांच्याविरोधात घोषणबाजी

    – राहुल कुल यांच्या समर्थकांनी केली घोषणाबाजी

    – आमदार राहुल कुल यांचे पॅनल आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष..

    – इंदापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे पॅनल निर्विवाद विजयी

  • 29 Apr 2023 12:46 PM (IST)

    Baramath APMC Election Result 2023

    बारामतीत राष्ट्रवादीने गड राखला, राष्ट्रवादीचे 17 उमेदवार आघाडीवर

    पुरंदर नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत महविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर.

    आमदार राहुल कुल यांचे पॅनल आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष.

    इंदापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे पॅनल निर्विवाद विजयी आघाडीवर.

  • 29 Apr 2023 12:36 PM (IST)

    नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या ‘आपला’ पॅनलची विजयी घौडदौड कायम

    – ग्रामपंचायत गट आर्थिक दुर्बल प्रवर्गातून निर्मला कड या विजयी झाल्या आहेत.

    – महाविकास आघाडीच्या ‘आपला’ पॅनलचा २ जागांवर विजय

  • 29 Apr 2023 12:21 PM (IST)

    Ambejogai APMC Election Result : अंबाजोगाई बाजार समितीवर धनंजय मुंडे यांचे वर्चस्व, पंकजा मुंडे यांना धक्का

    – अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी

    – भाजपला मात्र 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

    – 1 जागेचा निकाल येणे अद्याप बाकी आहे.

    – अंबाजोगाई हे परळी आणि केज विधानसभा मतदारसंघ अंतर्गत संयुक्त आहे.

  • 29 Apr 2023 12:17 PM (IST)

    Sangali APMC Election Result : सांगली येथील विटा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी पिछाडीवर

    – विटा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि काँग्रेस अशी युती झाली आहे.

    – या निवडणुकीत युती आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल पिछाडीवर आहे.

    – राष्ट्रवादी काँग्रेस पॅनल विरुद्ध शिवसेना,भाजपा आणि काँग्रेस आघाडी यांच्यात येथे लढत होत आहे.

    – शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर, भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी एकत्रित येत हे पॅनल उभे केले होते.

  • 29 Apr 2023 12:15 PM (IST)

    Nandurbar APMC election Result

    – नंदुरबार बाजार समितीत मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मोठा धक्का.

    – नंदुरबार बाजार समितीच्या ११ जागांच्या निकाल आला आहे.

    – १८ पैकी ११ जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला.

    – मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मोठा धक्का बाजार समितीत.

    – डॉ. विजयकुमार गावित यांच्यासाठी नंदुरबार बाजार समिती प्रतिष्ठेची होती मात्र गावित यांना मोठा धक्का.

  • 29 Apr 2023 12:08 PM (IST)

    Nandurbar APMC Election Result : मोठी बातमी : नंदुरबारमध्ये पुन्हा मतमोजणी, मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मोठा धक्का

    – नंदुरबार बाजार समितीत मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मोठा धक्का बसला आहे.

    – डॉ. गावित यांचे बंधू प्रकाश गावित यांचा बाजार समिती निवडणुकीत पराभव झाला आहे.

    – शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विक्रम वळवी यांनी 09 मतांनी प्रकाश गावित यांचा पराभव केला.

    – मात्र, प्रकाश गावित यांनी ऑब्जेक्शन घेतल्याने पुन्हा मतमोजणी करण्यात येत आहे.

  • 29 Apr 2023 12:01 PM (IST)

    Chandrapur APMC Election Result : चंद्रपूरमध्ये माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा दुसरा मोठा विजय

    – चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे.

    – ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 15 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत.

    – काँग्रेस समर्थित शेतकरी विकास परिवर्तन पॅनलने 15 जागा जिंकल्या आहेत.

    – भाजपा समर्पित शेतकरी परिवर्तन पॅनलला मात्र अवघ्या 03 जागांवर सामान मानावे लागले आहे.

    – माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा या दुसरा मोठा विजय मानला जात आहे.

  • 29 Apr 2023 11:54 AM (IST)

    Sambhajinagar APMC election Result

    छत्रपती संभाजीनगर बाजार समिती भाजप- शिंदे गटाच्या ताब्यात

    18 पैकी 11 सदस्य भाजप-शिवसेनेचे विजयी

    छत्रपत्री संभाजीनगरमध्ये भाजपचा जल्लोष सुरू

  • 29 Apr 2023 11:50 AM (IST)

    Washim APMC Election Result 2023

    वाशिम बाजार समिती मतमोजणी निकाल…

    एकूण : 18 जागा

    11 जागांचे निकाल जाहीर…

    भाजपा – 00

    राष्ट्रवादी – 02..

    काँग्रेस – 04…

    शिंदेगट – 01..

    वंचित – 02…

    शिवसेना ठाकरे गट – 02…

    इतर – 00

  • 29 Apr 2023 11:48 AM (IST)

    Gadchiroli APMC Election Result 2023

    व्यापारी संघातून बीजेपी शिवसेना युतीच्या पॅनेलचे 7 उमेदवार विजयी

    गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप शिवसेना युतीचे पॅनल आघाडीवर

    गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेसाठी काल मतदान पार पडलं. आज मतमोजणी सुरू आहे.

    व्यापारी व अडते संघासाठी 2 जागेकरिता 5 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी भाजप- शिवसेना पॅनलचे दोन उमेदवार निवडून आले.

  • 29 Apr 2023 11:45 AM (IST)

    हवेली बाजार समितीत भाजप आणि सर्वपक्षीय पॅनल आघाडीवर

    पुण्यात हवेली बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीला पिछाडी

    प्रदिप कंद आणि विकास दांगट याचे पॅनल आघाडीवर

  • 29 Apr 2023 11:39 AM (IST)

    केज कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपची बाजी

    केजमध्ये भाजपचे बारा तर राष्ट्रवादीचे पाच उमेदवार विजयी

    सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचा तीन जागांवर विजय

  • 29 Apr 2023 11:28 AM (IST)

    Samgamner APMC election Result 2023

    • विखे थोरातांच्या लढतीत अपक्षांची बाजी.
    • दोन्ही पॅनलच्या उमेदवारांचा केला पराभव…
    • संगमनेर कृषी बाजार समितीत अपक्षाने मारली बाजी.
    • हमाल मापाडी संघात अपक्ष उमेदवार विजयी…
    • सचिन कर्पे अपक्ष उमेदवार म्हणून विजयी.
    • 147 पैकी 90 मते घेत मिळवला विजय.
    • थोरात आणि विखेंच्या लढतीत अपक्षाची बाजी.
    • निवडून आल्यानंतर महाविकासआघाडीला पाठिंबा.
  • 29 Apr 2023 11:21 AM (IST)

    Bhiwandi APMC Election Result

    • भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकासआघाडीने मारली बाजी
    • 11 पैकी 7 जागांवर महाविकासआघाडीचे उमेदवारी विजयी
    • तर 4 जागांवर भाजपा-शिवसेना पक्षाचे उमेदवार विजयी
  • 29 Apr 2023 11:14 AM (IST)

    Gondia APMC election Result
    – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने गोंदिया येथील कृषी बाजार समितीत आपले खाते उघडले आहे.
    – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पंकज यादव यांचा सेवा सहकारी गटातून विजय.
  • 29 Apr 2023 10:44 AM (IST)

    सांगली ब्रेकिग – सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल, महाविकास आघाडीला 3 जागा

    महाविकास आघाडी 3, तर भाजपला शून्य जागा

    हमाल गटात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी, मारुती बाळू बंडगर हमाल-तोलाईदार गटातून विजयी.

    बाळासाहेब बाळू माळी यांचा विजय, भाजपाच्या दिग्विजय सुनीलराव चव्हाण यांचा केला पराभव.

    अनुसूचित जाती ग्रामपंचायत गटातून, महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत नागे विजयी. भाजपाचे रमेश साबळे यांचा 571 मतांनी केला पराभव.

  • 29 Apr 2023 10:31 AM (IST)

    ब्रेकिंग छत्रपती संभाजी नगर :- छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा वर

    महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी

    कैलास उकीरडे विजयी – ग्रामपंचायत सर्वसामान्य

    महाविकास आघाडीचे महेंद्र कोतकर विजयी

    महाविकास आघाडीचे पारडं होतंय जड

  • 29 Apr 2023 10:28 AM (IST)

    संगमनेर , अहमदनगर – संगमनेर कृषी बाजार समितीत पहिल्या फेरीत कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या पॅनलची आघाडी

    18 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर

    4 ही जागा महाविकास आघाडीला मिळाल्या

    थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने उघडले खाते

    बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आहे एकहाती सत्ता

    महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( भाजप ) यांचे पॅनल पिछाडीवर

  • 29 Apr 2023 10:24 AM (IST)

    अमरावती ब्रेकिंग – अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी सुरू

    यशोमती ठाकूर यांच्या पॅनलचे मिलींद तायडे जवळपास 90 मतांनी विजयी..

    वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांचा पराभव..

    यशोमती ठाकूर यांचे सहकार पॅनल आघाडीवर….

  • 29 Apr 2023 10:21 AM (IST)

    Nashik Pimpalgaon APMC Election result 2023

    – नाशिक पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचा पहिला निकाल आला हाती.

    -हमाल/तोलारी गटातून नारायण पोटे हे 73 मतांनी विजयी.

    – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या ‘शेतकरी विकास पॅनल’चे उमेदवार झाले विजयी.

  • 29 Apr 2023 10:19 AM (IST)

    Jalgaon APMC Election result 2023

    रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन उमेदवार आतापर्यंत विजयी

    भाजपाला मोठा धक्का

    खासदार रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या असल्यामुळे त्यांना धक्का मानला जात आहे.

  • 29 Apr 2023 10:16 AM (IST)

    बीड: कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक

    बीडमध्ये मतमोजणीला सुरूवात

    आमदार संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला

    जयदत्त क्षीरसागरांविरोधात सर्वच पक्ष एकवटले

    थोड्याच वेळात निकाल हाती येणार

    बीडच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष

  • 29 Apr 2023 10:11 AM (IST)

    नाशिक – पिंपळगाव बाजार समितीच्या ३ जागांचे निकाल जाहीर

    -पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचा पहिला निकाल आला हाती

    -हमाल/तोलारी गटातून नारायण पोटे हे 73 मतांनी विजयी..

    -राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या ‘शेतकरी विकास पॅनल’चे उमेदवार झाले विजयी

  • 29 Apr 2023 09:59 AM (IST)

    भंडारा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेसला धक्का

    भाजपा, राष्ट्रवादी, शिंदे गटाचा शेतकरी एकता पॅनलचे सात उमेदवारी विजयी

    एकूण जागा – 18

    ग्रामपंचायत गटातील 4 व्यापारी गट 2 हमाल गट 1 असे सात उमेदवारी आले निवडून

  • 29 Apr 2023 09:53 AM (IST)

    रावेरमध्ये महाविकास आघाडीला विजय

    रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचा विजय

    हमाल मापारी मतदारसंघातून सय्यद अजगर तुकडू विजयी

  • 29 Apr 2023 09:50 AM (IST)

    सांगलीचा पहिला निकाल भाजपच्या विरोधात

    सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग गटातून महाविकास आघाडी उमेदवारी विजयी.

    बाळासाहेब बाळू माळी यांचा विजय. भाजपाच्या दिग्विजय सुनीलराव चव्हाण यांचा केला पराभव.

    अनुसूचित जाती ग्रामपंचायत गटातून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत नागे विजयी.

    भाजपाचे रमेश साबळे यांचा 571 मतांनी केला पराभव

  • 29 Apr 2023 09:46 AM (IST)

    राज्यातील ४७ बाजार समित्यांचे निकाल जाहीर

    भाजप १०

    शिवसेना ३

    राष्ट्रवादी १४

    काँग्रेस १०

    ठाकरे गट ४

    इतर ६

  • 29 Apr 2023 09:26 AM (IST)

    रावेरमध्ये पहिला निकाल

    जळगाव जिल्ह्यातील बारा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यात 6 बाजार समित्यांची मतमोजणी

    रावेर बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यात जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या हमाल मापारी मतदार संघातून एक उमेदवार विजयी झाला आहे.

    रावेर बाजार समितीची मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात आहेत. यात हमाल मापरी मतदार संघातून एक उमेदवार विजयी झाला आहे.

  • 29 Apr 2023 09:21 AM (IST)

    सांगलीत आज मतमोजणी

    सांगली जिल्ह्यातल्या सांगली, इस्लामपूर आणि विटा कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी आज होणार आहे. सांगली बाजार समितीसाठी 93. 45 टक्के तर इस्लामपूर बाजार समिती साठी 86. 57 टक्के आणि विटा बाजार समितीसाठी 91.30 टक्के इतके मतदान झाले आहे. तिन्ही बाजार समितीत चुरशीने मतदान झालेले आहे. यामुळे सर्वच पक्षातील गटाची धाकधूक वाढली आहे.

  • 29 Apr 2023 09:17 AM (IST)

    मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती

    मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे.

    18 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात

    मावळ तालुक्यातील आजी-माजी आमदाराची प्रतिष्ठा पणाला

    महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत

  • 29 Apr 2023 09:12 AM (IST)

    भूममध्ये काटे की टक्कर

    धाराशिवमधील भूम बाजार समिती निवडणुकीत काटे की टक्कर

    महाविकास आघाडी व महायुती प्रत्येकी 1 उमेदवार जिंकला

    मंत्री तानाजी सावंत व माजी आमदार राहुल मोटे, ज्ञानराज चौगुले यांच्या पॅनल मध्ये काटे की टक्कर

  • 29 Apr 2023 08:32 AM (IST)

    Parbhani APMC Election result 2023

    परभणी जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला अवघ्या काही वेळात सुरुवात होणार.

    मविआ, भाजप, रासप अशी रंगणार लढत.

    खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपूडकर, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार राहुल पाटील आमदार रत्नाकर गुट्टे यांची प्रतिष्ठा पणाला.

    वर्चस्वाचा या लढाईत कोण बाजी मारणार याकडे लक्ष.

  • 29 Apr 2023 08:31 AM (IST)

    राज्यभरातील 147 पैकी 37 बाजार समित्यांचा निकाल जाहीर, 18 बिनविरोध

    30 बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा झेंडा

    14 ठिकाणी भाजप-शिवसेना विजयी

    95 बाजार समित्यांचा निकाल आज जाहीर होणार, मतमोजणी सुरू

  • 29 Apr 2023 07:57 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील 6 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी पैकी 5 कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल हाती

    5 पैकी 4 कृषि उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

    अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीची मतमोजणी आज

    आमदार रवी राणांच्या पॅनल विरुद्ध काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या पॅनलमध्ये थेट लढत

    आमदार रवी राणांचे भाऊ सुनील राणा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने रवी राणांची प्रतिष्ठा पणाला

    अमरावतीच्या मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत खासदार अनिल बोंडें यांच्या पॅनलचा दोन जागांनी पराभव

    तिवसा, मोर्शी, चांदुर रेल्वे, अंजनगाव सुर्जी बाजार समितीवर मविआचा झेंडा

  • 29 Apr 2023 07:12 AM (IST)

    Jalgaon APMC Election result 2023

    • जिल्ह्यात काल 12 कृषी उत्पन्न बाजार समिती साठी मतदान झाले. त्यापैकी आज सहा कृषी उत्पन्न बाजार समितीचा मतमोजणीचा निकाल आहे
    • रावेर, भुसावळ, चोपडा, चाळीसगाव, पारोळा आणि जामनेर. जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचं किती मतदार संघात वर्चस्व आहे, ते आज समजेल.
    • भाजपा नेते गिरीश महाजन ,खासदार रक्षा खडसे ,आ शिरीष चौधरी मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे जिल्ह्यातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे
  • 29 Apr 2023 06:57 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक निकाल

    भाजप खासदार अनिल बोंडे, काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे यांच्या गटाचे 8 उमेदवार विजयी

    तर आमदार यशोमती ठाकूर,माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार देवेंद्र भुयार यांच्या पॅनलचे 10 उमेदवार विजयी झाले

  • 29 Apr 2023 06:56 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यात काल 12 कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी आज सहा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल

    रावेर, भुसावळ, चोपडा चाळीसगाव, पारोळा आणि जामनेर बाजार समितीचा निकाल लागणार

    त्यामुळे आज समजेल जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचं वर्चस्व मतदार संघात किती?

    भाजपा गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आ शिरीष चौधरी मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे जिल्ह्याचे अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे

  • 29 Apr 2023 06:54 AM (IST)

    वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती साठी मतमोजणी

    4 मतदार संघ (सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत, व्यापारी व अडते आणि हमाल)

    एकूण : 18 जागा, 58 उमेदवार

    कोरोनेशन हॉल मध्ये सकाळी 8 वाजता पासून मतमोजणीला सुरुवात

    6 टेबल वर 4 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी

    शेतकरी विकास पॅनल, शेतकरी सहकार पॅनल आणि मार्केट बचाव पॅनल अशी तिरंगी लढत आहे

    2) मानोरा बाजार समिती मतमोजणी

    एकूण : 18 जागा, 55 उमेदवार

    कृषी उत्पन्न बाजार समिती उपहारगृहामध्ये सकाळी 8 वातापासून चार टेबल वर तीन फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार आहे

    मानोरा तालुका शेतकरी सर्व समावेशक आघाडी.(तिसरी आघाडी), महाविकास आघाडी (सुभाष ठाकरे गट) आणि शेतकरी पॅनल.(भाजपा) यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली आहे

  • 29 Apr 2023 06:04 AM (IST)

    यवतमाळ- नेर बाजार समिती शिंदे गट आणि राष्ट्रवादी युतीच्या ताब्यात

    मंत्री संजय राठोड यांचे – नेर बाजार समितीवर वर्चस्व कायम

    नेर बाजार समितीत 18 पैकी 10 जागी संजय राठोड यांचे संचालक विजयी

    तर 8 जागा या कॉग्रेस-शिवसेना (उबाठा ) युतीला

  • 29 Apr 2023 06:02 AM (IST)

    मुरबाड बाजार समितीत शिंदे गटाची सरशी, उद्धव ठाकरे गटाच्या वाट्याला भोपळा

    मुरबाड बाजार समीती निवणूक निकाल

    17 जागे पैकी 17 जागेवर निकाल जाहीर

    शिवसेना शिंदे गट –15

    उद्धव ठाकरे —–

    भाजप —-02

  • 28 Apr 2023 11:01 PM (IST)

    Pusad APMC election Result 2023

    • पुसद कृषी उत्पन्न बाजार समिती मविआकडे
    • मविआ – १८, भाजप-शिवसेना – ००
    • भाजपचे आमदार निलय नाईक यांना धक्का खाते ही उघडता आले नाही
    • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर नाईक, आमदार इंद्रनील नाईक यांचे वर्चस्व कायम
  • 28 Apr 2023 10:55 PM (IST)

    • पुण्याच्या भोर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा
    • भोर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता
    • काँग्रेस विरुद्ध सर्व पक्ष एकत्र लढल्यानंतरही 18 पैकी 18 जागांवर काँग्रेस विजयी
    • काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंनी गड राखला
    • निवडणूकीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष एकत्र लढूनही काँग्रेसचं वरचढ
  • 28 Apr 2023 10:54 PM (IST)

    Kalwan APMC Election result 2023

    कळवण बाजार समितीचा निकाल

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचे वर्चस्व

    18 पैकी 15 जागांवर मिळविला विजय.

    माजी आमदार जे पी गावित यांनी पाठींबा दिलेल्या परिवर्तन पॅनलला फक्त 3 जागावर मानावे लागले समाधान.

  • 28 Apr 2023 09:55 PM (IST)

    Ghoti APMC Election Result 2023

    घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीवर लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

    18 पैकी 16 जागेवर मिळवला विजय

    शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या 2 जागांवर मानावे लागले समाधान

    विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत साजरा केला जल्लोष

  • 28 Apr 2023 09:51 PM (IST)

    Mangalvedha APMC Election Result 2023

    सोलापूर – मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निकाल

    मंगळवेढा बाजार समिती भाजप आमदार समाधान आवताडे यांच्याकडे..

    13 जागा बिनविरोध, तर 5 जागांसाठी आज मतदान

    भाजपाचे आमदार अमाधान आवताडे यांच्याकडे 18 जागा ..

    मंगळवेढा बाजार समितीवर भाजपाचे वर्चस्व

  • 28 Apr 2023 09:47 PM (IST)

    Vani APMC election Result 2023

    यवतमाळ – वणी बाजार समितीत भाजप-शिंदे गट 15 जागेवर विजयी

    महाविकास आघाडीला 3 जागेवर मानावे लागले समाधान

    काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावर आणि ठाकरे गटाचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांना झटका.

    भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात बाजार समितीत मोठे यश.

  • 28 Apr 2023 09:40 PM (IST)

    Murbad APMC Election Result 2023

    मुरबाड बाजार समिती निवडणुकीचा निकाल

    17 जागे पैकी 15 जागेचा निकाल जाहीर

    शिवसेना शिंदे गट – 12

    उद्धव ठाकरे – 00

    भाजप  – 03

    राष्ट्रवादी काँग्रेस – 00

    काँग्रेस – 00

    मनसे – 00

    इतर – 00

  • 28 Apr 2023 09:22 PM (IST)

    Rahuri APMC election Result 2023

    अहमदनगर – राहुरी बाजार समितीत आमदार प्राजक्त तनपुरेच

    खा.सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजी कर्डीले यांना तनपुरेंचा शह

    18 पैकी 16 जागा जिंकत मिळवला विजय….

    विखे आणि कर्डिले गटाचा पराभव.

    20 वर्षांपासून तनपूरे गटाची राहुरी बाजार समितीवर एकहाती सत्ता

    विखे – कर्डीले गटाचे सोसायटी मतदारसंघातून दोन सदस्य आले निवडून.

  • 28 Apr 2023 09:19 PM (IST)

    Mahagaon APMC Election Result 2023

    महागाव बाजार समिती भाजपच्या ताब्यात

    गेल्या अनेक वर्षांपासूनची नाईक परिवाराची राष्ट्रवादीची सत्ता भाजपने उलथवली

    भाजप शिंदे गट युतीकडे बाजार समिती

    महागाव मध्ये भाजप 9 जागी शिवसेना शिंदे गट 2 जागी

    कॉग्रेस 2 राष्ट्रवादी काँग्रेस 3

    आमदार नामदेव ससाणेना मोठे यश

  • 28 Apr 2023 09:04 PM (IST)

    Parbhani APMC Election 2023 Result

    गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत रासप+ भाजप विरुद्ध मवीआ अशी लढत होणार आहे.

    राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे, भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य संतोष मुरकुटे आणि धनंजय मुंडे यांचे मेहुणे माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांची प्रतिष्ठा पणाला

  • 28 Apr 2023 09:02 PM (IST)

    Maval Apmc Election Result 2023

    मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात

    मावळ तालुक्यातील आजी-माजी आमदाराची प्रतिष्ठा पणाला

    महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होणार असून ह्या निवडणुकीत काँग्रेस मध्ये 2 गट पडले आहेत. एक गट भाजप बरोबर तर दुसरा गट मविआ बरोबर

  • 28 Apr 2023 08:55 PM (IST)

    मुरबाड बाजार समिती निवडणूक निकाल

    17 जागे पैकी 10 जागेचा निकाल जाहीर

    सर्व जागा शिवसेनेला

    सेवा सोसायटी सर्वसाधारण बाजार समिती मध्ये 7 जागा

    सेवा सर्वसाधारण महिला मध्ये 2 जागा

    तर हमाल व तोलाई बाजार समीती एक जागा बिनविरोध निवडून आली आहे

  • 28 Apr 2023 08:54 PM (IST)

    सोलापूर – मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल

    मंगळवेढा बाजार समिती भाजप आमदार समाधान आवताडे यांच्याकडे.

    १३ जागा बिनविरोध तर पाच जागांसाठी आज झाले मतदान

    भाजपाचे आमदार अमाधान आवताडे यांच्याकडे १८ जागा

    मंगळवेढा बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व

  • 28 Apr 2023 08:49 PM (IST)

    यवतमाळ : बाभूळगाव बाजार समितीत भाजपचे आमदार अशोक उईके यांना धक्का

    बाभूळगाव बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

    महाविकास आघाडीला 13 जागा तर भाजप-शिंदे गटाला 4 जागा

Published On - Apr 28,2023 8:46 PM

Follow us
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.