भाकरी मातोश्रीची, चाकरी पवारांची, संजय राऊत महागद्दार, विधानसभेत कुणी केले गंभीर आरोप?

Sanjay Raut | मालेगाव येथील गिरणा साखर कारखान्यावरून संजय राऊत यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पडसाद आज विधानसभेत उमटले.

भाकरी मातोश्रीची, चाकरी पवारांची, संजय राऊत महागद्दार, विधानसभेत कुणी केले गंभीर आरोप?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 2:19 PM

मुंबई | कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या गिरना अॅग्रो कंपनीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केला. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. विधानसभेतही याचे जोरदार पडसाद उमटले. दादा भुसे यांनी आज विधानसभेत या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. जगातली कोणतीही यंत्रणा लावून या आरोपांची चौकशी करा. मी दोषी ठरलो तर राजीनामा देईन. पण आरोप खोटे निघाले तर महागद्दार संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा, असं आव्हान दादा भुसे यांनी दिलंय. संजय राऊत हे मातोश्रीची चाकरी खातात तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची चाकरी करतात, असा गंभीर आरोप दादा भुसे यांनी केला.

दादा भुसे काय म्हणाले?

शिंदेंची शिवसेना समर्थक दादा भुसे यांनी आज संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, हे आरोप खरे ठरले तर मी आमदारकी, मंत्रीपद सोडेन, राजकारणातूनही निवृत्त होईन. हे लोक आम्हाला गद्दार म्हणतात. पण आमच्याच मतावर हे महागद्दार निवडून आले आहेत. ते खोटे ठरले तर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. दैनिक सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा द्यावा.

चाकरी मातोश्रीची…

हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीची, पवारांची करतात, असा आरोप दादा

भुसे यांनी केलाय. यानंतर विधानसभेत एकच गदारोळ उठला. संजय राऊत यांनी मालेगावच्या नागरिकांची माफी मागावी. येत्या २६ तारखेपर्यंत मालेगावची माफी मागितली नाही तर शिवसैनिक गद्दारांना त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा दादा भुसे यांनी दिला.

अजित पवारांचं उत्तर काय?

दादा भुसे यांच्या आरोपांवर अजित पवार यांनी सभागृहातच उत्तर दिलंय. शरद पवार यांचं नाव सभागृहात घेण्याचं काही कारण नव्हतं. सभागृहाच्या रेकॉर्डवरून हे काढून टाकण्याची मागणी अजित पवार यांनी केली.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.