वयाची 80 पार केलेला तरुण पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, शरद पवार कुठे, किती सभा घेणार?

शरद पवार पुढच्या 10 दिवसांत तब्बल 36 सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या शेवटच्या सभेचे ठिकाणही खास असणार आहे.

वयाची 80 पार केलेला तरुण पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, शरद पवार कुठे, किती सभा घेणार?
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 3:40 PM

Sharad Pawar Rally : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी अवघे 11 दिवस शिल्लक आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. सध्या सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांच्या एकाच दिवशी चार ते पाच सभा पाहायला मिळत आहे. त्यातच आता शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांच्या सभा कुठे कधी होणार याचे वेळापत्रक समोर आले आहे.

शरद पवारांच्या शेवटच्या सभेचे ठिकाणही खास

खासदार शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा तगडा अॅक्शन प्लॅन बनवला आहे. शरद पवार पुढच्या 10 दिवसांत तब्बल 36 सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या शेवटच्या सभेचे ठिकाणही खास असणार आहे. शरद पवार हे 6 नोव्हेंबरपासून ते 18 नोव्हेंबरपर्यंत एकूण 50 सभा घेणार आहेत. यात उत्तर कराड, तासगाव कवठे महांकाळ, इंदापूर, कर्जत जामखेड अशा महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.

शरद पवार आज (9 नोव्हेंबर) उदगीर, परळी, आष्टी आणि बीड विधानसभेसाठी सभा घेणार आहेत. यावेळी ते सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधताना दिसणार आहेत. शरद पवारांच्या आगामी विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रकही समोर आले आहे. शरद पवार हे शेवटची सभा ही बारामतीमध्ये युगेंद्र पवारांसाठी घेणार आहेत.

शरद पवार कुठे किती सभा घेणार?

9 नोव्हेंबर – दगीर, परळी, आष्टी, बीड

10 नोव्हेंबर- परंडा, शेवगाव, गंगापूर, घनसावंगी

11 नोव्हेंबर- एरंडोल, सिंदखेडा, जामनेर, मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण

12 नोव्हेंबर- कळवण, दिंडोरी, निफाड, सिन्नर, येवला, कोपरगाव

13 नोव्हेंबर- रहाता, श्रीवर्धन, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, भोसरी

14 नोव्हेंबर- चिंचवड/पिंपरी रॅली

15 नोव्हेंबर – तासगाव कवठे महाकाळ, चंदगड, कराड उत्तर

16 नोव्हेंबर – वाई, कोरेगाव, माण, फलटण

17 नोव्हेंबर – करमाळा, माढा, कर्जत जामखेड

18 नोव्हेंबर – भोर, दौंड, इंदापूर, बारामती

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.