विधानसभेचं बिगूल वाजलं, मविआ आणि महायुतीत कोण किती जागांवर लढणार? सूत्रांची माहिती काय सांगते?

निवडणुकीची घोषणा झाली. आता नजरा जागा वाटपाकडे लागल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून येत्या 2-3 दिवसांत फॉर्म्युला आणि उमेदवारांची पहिली यादी जारी होईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोणाला किती जागा मिळण्याची शक्यता आहे ते जाणून घेऊयात.

विधानसभेचं बिगूल वाजलं, मविआ आणि महायुतीत कोण किती जागांवर लढणार? सूत्रांची माहिती काय सांगते?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 10:24 PM

महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा झालीय आणि आता जागा वाटप तसंच उमेदवारांची पहिली यादीही लवकरच जाहीर होईल. भाजपची दिल्लीत केंद्रीय बोर्डासोबत बैठक झाली. तर काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांसोबतही काँग्रेस हायकमांड सोबत बैठका झाल्या आहेत. महायुतीचा जर विचार केला, तर महायुतीची पहिली यादी बुधवारी रात्री अपेक्षित आहे. कारण भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे. या बैठकीनंतर तात्काळ पहिली यादी येवू शकते. महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युल्याचा विचार केला तर सध्या भाजपकडे 105 आमदार आहेत. 8 अपक्ष भाजपसोबत आहेत. एकूण 113 आमदार आहेत.

शिंदेंच्या शिवसेनेकडे 40 आमदार आहेत. सध्या 8 अपक्ष शिवसेनेसोबत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे एकूण 48 आमदार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 41 आमदार आहेत. संजय मामा शिंदे आणि देवेंद्र भुयार हे 2 अपक्ष अजित पवारांसोबत आहेत, म्हणजेच एकूण 43 आमदार आहेत. महायुतीची एकूण बेरीज ही 204 आमदार इतकी होते. विधानसभेच्या एकूण जागा या 288 इतक्या आहेत. त्यातून 204 आमदार वजा केल्यावर 84 जागा शिल्लक राहतात. याच 84 जागांमधून भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागांचं वाटप होईल.

महायुतीचं जागावाटप कसं असू शकतं?

भाजपनं मिशन 125 ठरवल्याची माहिती आहे आणि त्यासाठी भाजप 155-160 जागा लढणार असल्याची माहिती आहे. शिंदेंच्या शिवसेनेला 75-80 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 55-60 जागा मिळू शकतात. विशेष म्हणजे अजित पवारांनी महायुती सरकारमध्ये सगभागी झाल्यानंतर 90-95 जागा लढणार असल्याची घोषणा केली होती. पण काही दिवसांआधीच अजित पवारांनी 60 जागांवर कामाला लागू शकता असं सांगून 60 जागांवर लढण्याचे संकेत दिले होते.

मविआचं जागावाटप कसं असू शकतं?

इकडे महाविकास आघाडीतही फक्त 15 टक्के जागांचा तिढा असल्याचं अनिल देशमुख म्हणाले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत जागा वाटपात काँग्रेसच मोठा भावाच्या भूमिकेत असेल. कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसचाच स्ट्राईकरेट ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा अधिक राहिला आहे. काँग्रेसलाच मविआत सर्वाधिक 105 जागा मिळू शकतात. ठाकरेंची शिवसेना 95-100 जागा लढण्याची शक्यता आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 85-90 जागा मिळू शकतात. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचंही जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पुढच्या 2 दिवसांत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.