मोठी बातमी! राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पाहा कोणाला कुठून संधी?
मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 22 उमेदवारांचा समावेश आहे.
मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. दुसऱ्या यादीमध्ये एकूण 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसरी यादी समोर आली आहे.
दुसऱ्या यादीमध्ये अकोल्यामधून अमित भांगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर एरंडोलमधून सतिश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गंगापूरमधून सतिश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पर्वतीमधून आश्विनी कदम, बीडमधून संदीप क्षीरसागर, माळशिरसमधून उत्तम जाणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी
1. 16 एरंडोल सतीश अण्णा पाटील 2. 111 गंगापूर सतीश चव्हाण 3. 135 शहापूर पांडुरंग बरोरा 4. 243 परांडा राहुल मोटे 5. 230 बीड संदीप क्षीरसागर 6. 44 आर्वी मयुरा काळे 7. 116 बागलान दीपिका चव्हाण 8. 119 येवला माणिकराव शिंदे 9. 120 सिन्नर उदय सांगळे 10. 122 दिंडोरी सुनीता चारोस्कर 11. 123 नाशिक पूर्व गणेश गीते 12. 141 उल्हासनगर ओमी कलानी 13. 195 जुन्नर सत्यशील शेरकर 14. 206 पिंपरी सुलक्षणा शीलवंत 15. 211 खडकवासला सचिन दोडके 16. 212 पर्वती अश्विनीताई कदम 17. 216 अकोले श्री अमित भांगरे 18. 225 अहिल्या नगर शहर अभिषेक कळमकर 19. 254 माळशिरस उत्तमराव जानकर 20. 255 फलटण दीपक चव्हाण 21. 271 चंदगड नंदिनीताई भाबुळकर कुपेकर 22. 279 इचलकरंजी मदन कारंडे
दरम्यान यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. लाडक्या बहिणींना निवडणुकीपुरतच गोंरजण्याचं काम सुरू आहे. जयश्री थोरात यांच्याबद्दल जे विधान करण्यात आलं ते अत्यंत दुर्दैवी होतं. लाडक्या बहिणींना कसं वागवलं जात हे राज्यानं पाहिलं. कापूस आणि सोयाबिणचं मोठं नुकसानं झालं आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मात्र महायुतीच्या सरकारनं शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही, आज दिवसाला दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पहिल्या यादीत एकूण 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती, तर दुसऱ्या यादीमध्ये आता 22 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत एकूण 67 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.