महायुतीतील 6 नेत्यांना लागणार विधान परिषदेची लॉटरी, कुणाला मिळणार संधी? जागेसाठी जोरदार लॉबिंग होणार?

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानपरिषदेवर असलेल्या आमदारांचा विजय झाला आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या ६ जागा रिक्त झाल्या आहेत.

महायुतीतील 6 नेत्यांना लागणार विधान परिषदेची लॉटरी, कुणाला मिळणार संधी? जागेसाठी जोरदार लॉबिंग होणार?
Follow us
| Updated on: Nov 24, 2024 | 2:56 PM

Maharashtra Election 2024 Result : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. यात महायुतीला स्पष्टपणे बहुमत मिळाले आहे. तर महाविकासआघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे विधानसभेत डावललेल्या नाराजांना आता महायुती विधान परिषदेवर संधी देणार आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनेक दिग्गजांना मैदानात उतरवले होते. यात विधानपरिषदेवर आमदार असलेल्या काही नेत्यांच्या नावांचाही समावेश होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानपरिषदेवर असलेल्या आमदारांचा विजय झाला आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या ६ जागा रिक्त झाल्या आहेत. आता या रिक्त जागांवर नाराज असलेल्यांना संधी दिली जाणार आहे.

भाजपच्या 4 जागा रिक्त

विधानसभेच्या निकालानंतर विधानपरिषदेच्या एकूण सहा जागा रिक्त झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेतील भाजपच्या ४ आमदारांची विधानसभेवर वर्णी लागली. सध्या चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. हे चार नेते विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत भाजपच्या ४ जागा रिक्त झाल्या आहेत.

कोणाला संधी देणार?

तर दुसरीकडे शिवसेनेकडून आमश्या पाडवी यांचीही विधानसभेवर निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेनेची एक जागा विधानपरिषदेत रिक्त झाली आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या एका नाराजाला शांत करण्याची एकनाथ शिंदे यांना संधी आहे. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर हे देखील विधानपरिषदेवर आमदार आहेत. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांची विधानपरिषदेची जागा रिक्त झाली आहे. यानुसार महायुतीच्या विधानपरिषदेच्या एकूण ६ जागा रिक्त झाल्या आहेत. यामुळे आता महायुतीचे तिन्ही घटकपक्ष नेमकं कोणाला संधी देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.