Nitesh Rane | ‘पाकिस्तानात निघून जा, कशाला इथे राहता?’, नितेश राणे सभागृहात आक्रमक
Nitesh Rane | "वंदे मातरम म्हणत नाहीत, पण जिल्ह्या, जिल्ह्यात सर तनसे जुदा, औरंग्या बाप आहे अशा घोषणा देऊन राज्यातील वातावरण खराब केल जातय" असं नितेश राणे म्हणाले.
मुंबई : औरंगजेबाच स्टेटस ठेवण्याच्या मुद्यावरुन आमदार नितेश राणे आज सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी या विषयावर सभागृहात काही मागण्या केल्या आहेत. मध्यंतरी औरंगजेबाच स्टेटस ठेवण्याच्या मुद्यावरुन राज्याच्या काही भागात जातीय तणाव निर्माण झाला होता. आज नितेश राणे यांनी यावरुन सभागृहात आक्रमक भाषण केलं. यावेळी सभागृहात विरोधकांचा गोंधळ सुरु होता.
“छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजाच्या राज्यात औरंगजेबाच स्टेटस ठेवलं जातं. ज्या औरंग्याने छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांविरुद्ध कटकारस्थान केलं, जो स्वराज्याचा एक नंबरचा शत्रू होता. त्याच औरंग्याच स्टेटस ठेवून राज्यातील वातावरण खराब केलं जातय” असं नितेश राणे म्हणाले.
सर तनसे जुदा घोषणा दिल्या जातात
“आपल्या राज्यात अशी लोकं आहेत की, जे वंदे मातरम म्हणत नाही, पण मिरवणूक काढली जाते, तेव्हा सर तनसे जुदा, औरंग्या माझा बाप आहे, असे सांगणार काही लोक आहेत. यांना राज्यात ठेवायच की, नाही ते ठरवा. हे गद्दार आहेत. मुद्दामून ते हे बोलतायत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात या गोष्टी चालल्या आहेत” असं नितेश राणे म्हणाले.
‘पाकिस्तानात निघून जा, कशाला इथे राहता?’
“वंदे मातरम म्हणत नाहीत, पण जिल्ह्या, जिल्ह्यात सर तनसे जुदा, औरंग्या बाप आहे अशा घोषणा देऊन राज्यातील वातावरण खराब केल जातय. यांना शिवरायांच्या राज्यात राहण्याचा अधिकार नाही. पाकिस्तानात निघून जा. कशाला इथे राहता?” अशी आक्रमक भाषा नितेश राणे यांनी वापरली. नितेश राणेंची मागणी काय?
“आपले गृहमंत्री शिवभक्त आहेत. प्रत्येक भाषणा अगोदर ते शिवरायांच नाव घेतल्याशिवाय भाषण सुरु करत नाहीत. आमच्या शिवरायांच्या राज्यात कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची आहे. हे औरंग्याच स्टेटस ठेवणारी जी मुलं आहेत, त्या मागचा मास्टर माइंड शोधण्यासाठी SIT स्थापन करा” अशी मागणी नितेश राणे यांनी केली.