Maharashtra Breaking News LIVE updates : सुधाकर बडगुजर यांच्यावर झालेल्या आरोपानंतर ठाकरे गट आक्रमक
Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates : आज 15 डिसेंबर... राज्य विधिमंडळ अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासंदर्भातील प्रत्येक घडामोडी... विरोधकांचे आरोप अन् सत्ताधाऱ्यांची उत्तरं... अधिवेशनासंदर्भातील महत्वाच्या बातम्या तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या, वाचा एका क्लिकवर...
मुंबई | 15 डिसेंबर 2023 : संसदेवर बुधवारी झालेल्या घुसखोरी प्रकरणानंतर कठोर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकरणात सहावा आरोपी ललित झा याला अटक झाली आहे. राज्य सरकार कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला आहे. आज अधिवेशनात विविध विषयांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज सकाळी राजस्थानसाठी रवाना होत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या शपथविधीसाठी ते जात आहे. त्य़ानंतर दिल्लीत जाऊन कांदा निर्यात प्रश्न केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार आहे. रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून ९ वाजेपर्यत सावर्डे ते रत्नागिरी रेल्वे स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
महुआच्या हकालपट्टीवर आता 3 जानेवारीला सुनावणी
सर्वोच्च न्यायालय 3 जानेवारीला TMC नेते महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेतून हकालपट्टीच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.
-
मुख्तार अन्सारीला साडेपाच वर्षांची शिक्षा
धमकावल्याप्रकरणी मुख्तार अन्सारीला वाराणसीच्या न्यायालयाने साडेपाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. नंदकिशोर रुंगटा याच्या अपहरण प्रकरणात न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
-
-
ललित झा याला पटियाला कोर्टात हजर करण्यात आले
संसद सुरक्षा प्रकरणी गुरुवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणारा पाचवा आरोपी ललित झा याला त्याची वैद्यकीय तपासणी करून पटियाला न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच चार आरोपींना अटक केली असून त्यांची कोठडीत चौकशी सुरू आहे.
-
मुंबईतील मनीष मार्केटमध्ये पोलिसांचा छापा
अमरावती पोलिसांनी दक्षिण मुंबईतील मनीष मार्केटवर छापा टाकला आहे. छाप्यादरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलिसांनी कमर नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.
-
संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींची चौकशी सुरू
संसदेच्या सुरक्षेबाबत सीआरपीएफ महासंचालकांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला आहे. संसदेच्या स्वागत समारंभात पास मिळवण्यापासून ते व्हिजिटर गॅलरीत तैनात असलेले सर्व सुरक्षा कर्मचारी आणि कर्मचारी यांची चौकशी केली जात आहे. यासोबतच संसदेत बसवण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्हींचीही छाननी केली जात आहे ज्याद्वारे आरोपी सभागृहात पोहोचले होते.
-
-
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नितेश राणे यांचा निषेध
नाशिक | धाकर बडगुजर यांच्यावर झालेल्या आरोपानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या शालिमार येथील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांचा पुतळा जाळण्याचा केला प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेतला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांचा निषेध केला. आज अधिवेशनात नितेश राणे यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर आरोप केले.
-
MIDC उभारुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करा, आमदार सत्यजीत तांबेंची मागणी
नागपूर | राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये एमआयडीसी ह्या फक्त कागदावरच आणि जागेवरच आहेत. अनेक लोकप्रतिनिधी येतात आणि आमच्या भागात एमआयडीसी पाहिजे, अशी मागणी करतात. परंतु, पुढे त्याचं काहीही होत नाही. एमआयडीसी उभ्या करून रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या पाहिजे. नंदुरबारमध्ये एमआयडीसीचा एक प्रकल्प झाला व दुसरा प्रकल्प लवकरच करण्याची घोषणा देखील झाली. मात्र, आता नंदुरबारच्या एमआयडीसीचा उल्लेख झाल्याप्रमाणे प्रकल्प साधारण किती दिवसामध्ये सुरू होणार? तसेच त्याची कालमर्यादा काय असणार? असा प्रश्न आमदार सत्यजीत तांबेंनी सभागृहात उपस्थि केला.
-
पालकमंत्री यांनी जे सभागृहात आरोप केले त्यांनी योग्य माहिती घेतली नाही – बडगुजर
पालकमंत्री यांनी जे सभागृहात आरोप केले त्यांनी योग्य माहिती घेतली नाही. विजया रहाटकर प्रकरणात वेगळ्या विदर्भच्या मागणीसाठी सभा होती. त्यावेळी काही शिवसैनिकांनी आंदोलन केले होते त्यावेळी आमच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी माझ्यासह अनेक लोक जेल मध्ये होते. त्यावेळी बॉम्बस्फोटाचे आरोपी पण जेल मध्ये हे आम्हाला माहिती नव्हते. माझ्यावर एक साधी एनसी सुद्धा दाखल नव्हती. राजकिय हेतूने प्रेरित होऊन गुन्हे दाखल के. सलीम कुत्ता याला 93 मध्ये अटक केली. त्यामुळे ते कैदी म्हणून होते. बेबनाव केला आहे त्यामध्ये मॉर्फिंग केले आहे. गुन्हेगार जेलमध्ये असतांना तो बाहेर कसा आला. तो पेरोल मध्ये आल्यावर तो वावरू शकतो फिरु शकतो असे फडणवीस म्हणाले. माझे संबंध नव्हते यापुढे राहणार नाही. सार्वजनिक जीवनात कुठे भेट झाली असेल मला माहिती नाही.
-
अमरावतीत राणा दाम्पत्याच्या वतीने शिवमहापुराण कथेचे आयोजन.
अमरावती : अमरावतीत राणा दाम्पत्याच्या वतीने प्रसिद्ध कथा वाचक प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिव महापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर आज अमरावतीमध्ये 10 किलोमीटर भव्य कलश यात्रा निघाली. डोक्यावर कळस घेऊन खासदार नवनीत राणा कलश यात्रेत सहभागी झाले. 16 ते 20 डिसेंबर दरम्यान अमरावतीत श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत. महाशिवपुराण कथेसाठी अमरावतीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.
-
राम मंदिराच्या उद्धाटना दिवशी शासकीय सुटी जाहीर करा – प्रताप सरनाईक
अयोध्येत येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या दिवशी शासकीय सुटी जाहीर करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली आहे.
-
अपात्र आमदार सुनावणी ; विधानसभा अध्यक्षांना कोर्टाची 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
आमदार अपात्र प्रकरणात विधान सभा अध्यक्षांना सुनावणीसाठी येत्या 10 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. आमदार अपात्रताप्रकरणी मुदत वाढवून द्या अशा आशयाची याचिका विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल होती. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ३० डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याचे निर्देश न्यायालयाने गेल्या सुनावणी वेळी दिले होते.
-
श्रीकृष्ण जन्मभूमी सर्वेच्या इलाहाबाद हायकोर्ट आदेशात हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार
मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या सर्वेबाबत इलाहाबाद हायकोर्टच्या आदेशात बदल करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. या पुढील सुनावणी 9 जानेवारीला होणार आहे. हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवल्याने लवकरच श्रीकृष्ण जन्मभूमीचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
-
महानंद डेअरी वाचवण्यासाठी पाचव्या दिवशीही बेमुदत उपोषण सुरूच
महानंद डेअरी वाचवण्यासाठी पाचव्या दिवशीही बेमुदत उपोषण सुरूच आहे. उपोषणकर्त्या प्रिया मिटके यांनी केला जलत्याग. उपोषणकर्त्या प्रिया मिटके यांची प्रकृती खालावली आहे.
-
अमरावतीत कोळी महादेव समाजाचा विराट मोर्चा
अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा निघाला आहे. महादेव कोळी जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यातआलीये.
-
शरद पवारांनी आज बोलावली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची बैठक
या बैठकीला पदाधिकारी यायला सुरुवात झालीये. आज शरद पवार करणार आहेत बैठकीत मार्गदर्शन. पक्षाची आगामी दिशा ठरण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पूर्ण झाली आहे.
-
अमित शहा आणि शरद पवार यांची भेट लांबणीवर
अमित शहांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे शरद पवारांची भेट लांबणीवर. शरद पवार इथेनॉलचा प्रश्न घेवून भेटणार होते अमित शहा यांना. सोमवारी भेट होण्याची शक्यता आहे.
-
अहमदनगर ठाकरे गटाचा रास्तारोको
अहमदनगरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने रास्तारोको केला आहे. कांदा निर्यात बंदी, इथेनॉल उत्पादनावर बंदी, दुधाचे दर या विरोधात रास्तारोको केला जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार येथे महामार्ग अडवला. कोल्हार गावात नगर मनमाड महामार्ग अडवला आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात सरकारविरोधात शिवसेनेचं आंदोलन सुरु आहे. जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेच्या नेतृत्वात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.
-
सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली
सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दीड हजार गाडी कांद्याची आवक झाली आहे. अद्यापही अनेक गाड्या रांगेत थांबून असल्यामुळे सकाळी 10 वाजता सुरू होणारे कांद्याचे लिलाव दुपारी 2 वाजता करण्याचा व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला आहे. निर्यात बंदीमुळे कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर मात्र घसरण्याची शक्यता आहे. तर उद्या शनिवारी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
सुधाकर बडगुजर यांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची घोषणा
सुधाकर बडगुजर यांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
-
सुधाकर बडगुजर १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत काय करत होते?- नितेश राणें
सुधाकर बडगुजर १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत काय करत होते? फोटो दाखवत नितेश राणेंनी फडणवीसांकडे चौकशीची मागणी केली आहे.
-
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावर विधानसभेत चर्चा
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावर विधानसभेत चर्चा होत आहे. “राज्यात ड्रग्जविरोधी कारवाई सुरू आहे. मुंबई पोलिसांनी 2200 टपऱ्यांवर कारवाई केली आहे. ललित पाटीलप्रकरणी त्यावेळी काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. तो आजाराने त्रस्त असल्याचं दाखवलं गेलं होतं,” असं उत्तर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
-
मराठा आरक्षणाविषयी छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्लीत बोलावली सर्व खासदारांची बैठक
मराठा आरक्षणाविषयी छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्लीत सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. नितीन गडकरी, शरद पवार, नारायण राणे यांनाही बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. महाराष्ट्रात ऐरणीवर असलेला मराठा आरक्षण याविषयी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकमताने संसदेत आवाज उठवावा, याकरिता छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्ली येथे राज्यातील सर्व लोकसभा व राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केलेली आहे.
18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.00 वाजता महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे होणाऱ्या या बैठकीस संभाजीराजे यांच्याकडून राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीस शरद पवार, नितीन गडकरी, नारायण राणे, रामदास आठवले, सुप्रिया सुळे यांसारखे बडे खासदार उपस्थित राहणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
-
अजित पवार गट सत्तेत सहभागी कसा झाला? मुलाखतीतून खळबळजनक खुलासे
अजित पवार गट सत्तेत सहभागी कसा झाला? मुलाखतीतून खळबळजनक खुलासे होणार आहेत. अमोल कोल्हे हे शरद गटाचे आमदार आणि खासदार यांच्या मुलाखती घेणार आहेत. ‘टू द पॉइंट’ या पॉडकास्टमधून ही मुलाखत प्रसारित होणार आहे. अमोल कोल्हे हे सगळ्या आमदारांच्या मुलाखती घेणार आहेत.
-
कोल्हापूरमधील काही सरकारी कर्मचारी अद्यापही काम बंद आंदोलनावर ठाम
कोल्हापूर- कोल्हापूरमधील काही सरकारी कर्मचारी अद्यापही काम बंद आंदोलनावर ठाम आहेत. तोडगा अमान्य असलेले सरकारी कर्मचारी कोल्हापूरच्या टाऊन हॉल बागेत जमले आहेत. सरकारकडून कोणत्याही लेखी आश्वासनाशिवाय संप मागे घेतल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. बहुतांशी कर्मचारी अद्याप संपावर ठाम असल्याने कोल्हापुरातील शासकीय कामकाज आज दुसऱ्या दिवशीही ठप्प आहे.
-
ही दादागिरी आवडलेली नाही -छगन भुजबळ
आम्ही गप्प बसायचं, मग त्यांनी जाळपोळ करायची. बीडमधील जाळपोळ ठरवून करण्यात आल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला. 24 डिसेंबरचा सरकारवर दबाव टाकण्यात येत आहे. झुंडशाहीला, दादगिरीला माझा विरोध असल्याचे मत भुजबळ यांनी मांडले.
-
सरकारवर जरांगे पाटील यांची टीका
सरकारने मराठा समाजाला दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. सरकारवर विश्वास कसा ठेवायचा असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. कोपर्डी प्रकरणाचा अजूनही निकाल लागलेला नाही. आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबियांबाबत काय भूमिका घेतली हे जगजाहीर आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतची भूमिका काय आहे, असे प्रश्न विचारत सरकार मराठा समाजाच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
-
शरद पवार यांनी घेतली बैठक
शरद पवारांनी यांनी काल दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. यामध्ये २० राज्यातील पक्षाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याच्या सूचना यामध्ये देण्यात आल्याचे समोर आले. सगळ्या घटकांना सोबत घेवून संविधान वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे असे आवाहन करण्यात आले.
-
नोंदीच्या आधारे मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा
नोंदीच्या आधारे मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करा. ओबीसींमध्ये मराठा समाजाला समावेश करण्यावर आम्ही ठाम असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 24 डिसेंबरच्या आत ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. 17 डिसेंबर रोजी पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
-
भाजपचे कर्नाटक सरकारविरोधात आंदोलन
कर्नाटक राज्यातल्या बेळगावमध्ये दलित महिलेला निर्वस्त्र करून मारल्याची घटना घडली. या घटनेविरोधात आणि कर्नाटक राज्य सरकारचा निषेध म्हणून नवी दिल्लीत भाजप खासदारांकडून महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
-
बीड जाळपोळप्रकरणात मास्टरमाईंडचा शोध
बीड जाळपोळप्रकरणात काही ठराविक हॉटेल, घरांना लक्ष करण्यात आले. या जाळपोळप्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. पोलिस तपास करत आहे. हेतूपूर्वक हे करण्यात आले का, काही पक्षांच्या नेत्यांच्या घराची, हॉटेलची जाळपोळ करण्यात आली आहे. याप्रकरणात मास्टरमाईंड कोण आहे, याचा तपास करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
-
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मराठवाड्यात रोज तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याचे समोर आले. सावकारांची कर्ज, अवकाळी संकट आणि कमी अधिक पावसामुळे पिकांचे नुकसान यामुळे आत्महत्या होत आहेत.विद्यमान सरकार आत्महत्या रोखण्यास अपयशी असल्याची विरोधकांनी आरोप केला आहे. 11 महिन्यांत मराठवाड्यातील एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्या आहेत.
-
विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे टॉवरवर आंदोलन
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. कृषी कार्यालयाच्या टॉवरवर तीन तास चढून शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. पावसाचे अनुदान, पिक विमा भरपाई सह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. दुधाला चांगला भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जावेत अशी मागणी करण्यात आली.
-
सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ
सोने-चांदीने ग्राहकांना शॉक दिला. या आठवड्यात सोने-चांदीत मोठी पडझड झाली. सोन्यात जवळपास 3000 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीची पण मोठी पिछेहाट झाली. सलग तीन दिवसांत भावात मोठी घसरण झाली. गुरुवारी मात्र सोने-चांदीचा नूर पालटला. मोठ्या पडझडीनंतर सोने-चांदीने युटर्न घेतला. दिवाळीपासून मौल्यवान धातूने मुसंडी मारली होती. दोन्ही धातूंनी मोठी झेप घेतली होती.
-
Maharashtra News : बीडमध्ये 23 डिसेंबरला मनोज जरांगेंची इशारा सभा
बीडमध्ये 23 डिसेंबरला मनोज जरांगे इशारा सभा घेणार आहेत. मभेच्या पूर्व तयारीसाठी आज महत्त्वाची बैठक घेण्यात येणार आहे. सकल मराठा क्रांतीच्या वतीने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
-
Maharashtra News : धारावी बचावासाठी मोर्चा निघणार, आम्ही आंदोलन करणार- राऊत
सरकारचे उद्यागपती जावाई मुंबई गिळंकृत करायला निघाले आहेत. आम्ही ते होवू देणार नाही असं संजय राऊत म्हणाले. धारावी बचावासाठी मोर्चा निघणार, आम्ही आंदोलन करणार असंही त्यांनी सांगितलं.
-
Maharashtra News : जे निकाल देणार त्यांनीच पाचवेळा पक्षांतर केलं आहे- संजय राऊत
जे निकाल देणार त्यांनीच पाचवेळा पक्षांतर केलं आहे अशी टीका संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर केली आहे. विधानसभा अध्यक्षांना आणखी किती वेळ वाढवून हवा आहे असा सवालही त्यांनी केला आहे.
-
Maharashtra News : राज्यात सगळा खेळखंडोबा सुरू आहे- संजय राऊत
राज्यात सगळा खेळखंडोबा सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संसदेची सुरक्षा पाहायला शिंदे, फडणवीस आणि अजित दादांचा दिल्ली दौरा असल्याची टीका संजय राऊत यांनी केला आहे.
-
Maharashtra News : शालेय विद्यार्थ्यांमध्ये भर रस्त्यात सिनेस्टाईल हाणामारी
शालेय विद्यार्थ्यांमध्ये भर रस्त्यात सिनेस्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्याच्या राजगुरू नगरमधील ही घटना आहे. महात्मा गांधी शाळेतील हे विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीच्या घटना सातत्याने वाढत आहेत.
-
Mumbai News : मुंबईतील दक्षिण विभागात सोमवारी पाणी कपात
मुंबईतील दक्षिण विभागात सोमवारी पाणी कपात. मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीच्या पाहाणीसाठी पाणीकपात होणार आहे. दक्षिण मुंबईतील ए, सी, डी आणि जी दक्षिण विभागात पाणी कपात होणार आहे.
-
मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामाला सुरुवात
मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या टप्प्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. तळेकाटे ते वाकेड अशा मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला सुरुवात झाली आहे. ठेकेदार बदलल्यानंतर अखेर सव्वा वर्षानंतर रखडलेल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झालीय. तळेकाटे ते वाकेड 49 किलोमीटरचा टप्पा आहे. या टप्प्यात केवळ ते 33 टक्के काम, 800 कोटी रुपयांचा हा टप्पा आहे. 2022 सालापासून या टप्प्याचं काम बंद होतं. ते आता सुरु झालंय.
-
ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहातील डॉक्टरला जामीन मंजूर
ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहातील डॉक्टरला जामीन मंजूर झाला आहे. ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून संजय मरसाळे यांना अटक केली होती. मात्र त्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याने न्यायालयाने निर्णय दिला. त्यानंतर गुरुवारी येरवडा कारागृहातील डॉक्टरची पुणे न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याला येरवडा कारागृहातून ससून रुग्णालयात दाखल होण्यासाठी डॉ.मरसाळे याने मदत केल्याच्या संशयावरून अटक केली होती.
-
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी ‘या’ नेत्यांची नियुक्ती
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी जिल्हा समिती अध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती झाली आहे. यामुळे जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असूनही पालक मंत्रीपदाने हुलकावणी दिल्याने दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे सहअध्यक्ष, तर मंत्री छगन भुजबळ यांची राज्य शिखर समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. कुंभमेळ्यासाठी नियोजनासाठी एकूण चार समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 11 मंत्र्यांची शिखर समिती स्थापन करण्यात आलीय. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती, गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समिती, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्य समितीची स्थापना करण्यात आलीय.
-
परिचारिकांनी संपाचा ससून रुग्णालयाला मोठा फटका
परिचारिकांनी संप पुकारल्याने ससून रुग्णालयाला मोठा फटका बसला आहे. 600 परिचारिका संपावर गेल्याने ससूनमध्ये केवळ आठ शस्त्रक्रिया होऊ शकल्यात. ससूनमध्ये दररोज सरासरी 40 शस्त्रक्रिया होतात. केवळ तातडीने करावयाच्या शस्त्रक्रिया दिवसभरात करण्यात आल्या. मात्र नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या.
-
कोल्हापुरातील कोरोना साहित्य खरेदी घोटाळा प्रकरणाची चौकशी होणार
कोल्हापुरातील कोरोना साहित्य खरेदी घोटाळा प्रकरणाची चौकशी होणार आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह दोन अधिकाऱ्यांची चौकशी झाली आहे. घोटाळा प्रकरणातील तक्रारीची शहानिशा करण्याचं आरोग्य सहसंचालकांनी पत्र लिहिलं आहे. आरोग्य सहसंचालकांच्या पत्रानंतर जिल्हा परिषदेकडून चौकशीच्या कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. कोरोना काळात मास्क,हॅन्ड ग्लोज सॅनिटायझर असं साहित्य चढ्या दराने खरेदी केल्याचा आरोप आहे.
-
Marathi News | कोल्हापूर तिरुपती थेट विमानसेवा आजपासून बंद
प्रवासी संख्या अपुरी असल्यामुळे कोल्हापूर तिरुपती थेट विमानसेवा आजपासून बंद कारण्यात आली. आता प्रवाशांना कोल्हापूर हैदराबाद मार्गे तिरुपतीला जावे लागणार आहे. यामुळे कोल्हापुरातून तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ आणि खर्चही वाढणार आहे.
-
Mumbai News | एसी लोकलमध्ये फुकटे वाढले
मध्य रेल्वेवर गेल्या ११ महिन्यांत एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३६ हजार ९८७ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एक कोटी २४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. फक्त नोव्हेंबर महिन्यात २,४०३ फुकट्या प्रवाशांना पकडून ७ लाख ९७ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.
-
Gold Rate | सोन्याचे दर घसरले
ऐन लग्नसराईत सोन्याचे दर घसरल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जळगावात आठवडाभरापासून सोने चांदीच्या दरात चढउतार होती. आठवडाभरामध्ये सोन्याचे दर १३०० रुपयांनी घसरले आहे.
-
Maharashtra News | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राजस्थानमध्ये जाणार
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे शुक्रवारी सकाळी राजस्थानसाठी रवाना होणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी ते जात आहे. दुपारी १२ वाजेनंतर तिन्ही नेते विधानसभा कामकाजात सहभागी होतील. यानंतर संध्याकाळी तिन्ही नेते पुन्हा दिल्लीसाठी रवाना होणार आहे.
Published On - Dec 15,2023 7:20 AM