Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE : नाशिक जिल्ह्यात पुन्हा बेमुदत कांदा लिलाव बंदचा निर्णय
Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates : आज 08 डिसेंबर... राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरु झालं आहे. आपले लोकप्रतिनिधी अधिवेशनात काय करतात....जनतेचे कोणते प्रश्न मांडतात, यासंदर्भातील प्रत्येक घडामोडी... विरोधकांचे आरोप अन् सत्ताधाऱ्यांची उत्तरं... अधिवेशनासंदर्भातील महत्वाच्या बातम्या तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या, वाचा एका क्लिकवर...
मुंबई | 08 डिसेंबर 2023 : संसदेचे अधिवेशन सुरु झाले असताना राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. नवाब मलीक प्रकरणावरुन महायुतीत सर्व आलबेल नसल्याचे समोर आले. या विषयावर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहिलेले पत्र माध्यमांपर्यंत आले. आता अधिवेशनातील दुसरा दिवस कसा असणार? कोणत्या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणार आहे. या अधिवेशनातील सर्व घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा. या शिवाय राज्याच्या राजकारणातील सर्व अपडेट तुम्हाला इथे वाचायला मिळेल.क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचाही या लाईव्ह ब्लॉगमधून आपण आढावा घेणार आहोत. शिवाय टीव्ही 9 मराठी चॅनेल आणि यूट्यूब लाईव्हवरही तुम्हाला सगळे अपडेट्स पाहायला मिळतील.
LIVE NEWS & UPDATES
-
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद पूर्ण, निवडणूक आयोगाच्या निकालाकडे लक्ष
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा केंद्रीय निवडणूक आयोगातील युक्तिवाद आता संपला आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर निवडणूक आयोग निकाल जाहीर करणार आहे.
-
मनोज जरांगे यांच्या सभेच्या दिवशी पहिल्यांदाच दारू विक्री बंदीचा आदेश
धाराशिव : मनोज जरांगे यांच्या सभेच्या दिवशी पहिल्यांदाच दारू विक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी उमरगा येथील सभेदिवशी दारू विक्री बंदीचा आदेश दिला आहे. जरांगेंची 10 डिसेंबरला उमरगा येथे सभा आहे. सभास्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सार्वजनिक शांतता अबाधित रहावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. उमरगा शहरातील आणि उमरगा नगर परिषद हद्दीतील सर्व देशी, विदेशी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
-
महुआ मोईत्रा यांच्यावरील कारवाईनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की…
महुआ मोईत्रा यांच्या निलंबनानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. लोकशाहीची हत्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी खूप दुःखी आहे. अर्ध्या तासात 400 पेक्षा जास्त पाने कशी वाचली हे समजत नाही. इंडिया आघाडीचे आभार, कारण सर्वजण एकत्र आले. महुआला बोलण्याची संधी देण्यात आलेली नाही. हा पूर्ण अन्याय आहे.
-
पिंपरी चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला
महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे परिसरात मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे
-
महुआ मोईत्राच्या हकालपट्टीवर प्रल्हाद जोशी यांचे उत्तर
महुआ मोइत्रा यांची टीएमसी खासदार म्हणून हकालपट्टी केल्याबद्दल संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, 2005 मध्ये जेव्हा 10 खासदारांची हकालपट्टी करण्यात आली होती. तेव्हा त्याच दिवशी अहवाल सादर करण्यात आला होता त्याच दिवशी चर्चा झाली होती.
-
-
नाशिक जिल्ह्यात पुन्हा बेमुदत कांदा लिलाव बंदचा निर्णय
नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा बेमुदत कांदा लिलाव बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा निर्यातीसंदर्भात तोडगा निघेपर्यंत बाजारात लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रीसाठी आणलेले कांदे घेऊन शेतकरी आता परतीच्या मार्गावर निघाले आहेत. चांदवडमधील व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
-
राहुल गांधींचा परदेश दौरा रद्द! सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशियाला जाणार होते
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा विदेश दौरा रद्द करण्यात आला आहे. रात्री 8 ते 9 च्या दरम्यान राहुल सिंगापूर, इंडोनेशिया आणि मलेशियाला जाणार होता. दौरा पुढे ढकलण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे.
-
प्रफुल्ल पटेलांचे दाऊद आणि त्याच्या हस्तकाशी संबंध : अंबादास दानवे
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून प्रफुल्ल पटेला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रफुल्ल पटेल यांचे दाऊद आणि त्याच्या हस्तकाशी संबंद असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे. मलिकांप्रमाणेच पटेलांबाबतही तीव्र भावना आहेत का? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी विचारला आहे.
-
कांदा उत्पादक शेतकरी परतीच्या मार्गावर
कांदा लिलाव बंद ठेवण्याचा व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला. चांदवड येथील व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर कांदा उत्पादक शेतकरी गावाकडे परतत आहेत. बाजारात विक्रीसाठी आणलेले हजारो ट्रॅकर घेऊन शेतकरी आले होते. ते आता परतीच्या मार्गावर आहेत. हजारो वाहने लिलावाच्या प्रतिक्षेत थांबलेली होती.
-
दहिसरमध्ये गॅस पाइपलाइन दुरुस्तीचे काम सुरू
दहिसर पूर्व जरीमरी गार्डनच्या बाहेर रस्त्याच्या कडेला फूटपाथ खोदणाऱ्या जेसीबीमुले भारत गॅसची पाइपलाइन फुटली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. सध्या गॅस पाइपलाइन बंद करण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम सुरू आहे. नाला खोदण्याचे काम सुरू असून नाल्याच्या आत भारत गॅसची पाइपलाइन टाकण्यात आली होती. जेसीबीने खोदकाम करताना गॅस पाइपलाइन फुटली.
-
UPI व्यवहाराबाबत झाला हा बदल
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नही. पण UPI पेमेंटबाबत दिलासा दिला आहे. आरबीआयने युपीआय व्यवहाराची मर्यादा आता 1 लाखांहून थेट 5 लाख रुपये केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली. या कामासाठी ही सुविधा मिळणार आहे. प्रत्येक व्यवहारासाठी ही सुविधा नाही.
-
महापुरुषाबद्दल आक्षेपार्ह कमेंटमुळे तणाव
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम गावात महापुरुषांबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट केल्यामुळे गावात तणावाचे वातावरण आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह कमेंट केल्याने केम ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आक्षेपार्ह कमेंटमुळे संपूर्ण केम गावात बंद पाळण्यात आला. केम गावात ठिकठिकाणी टायर जाळून घटनेचा निषेध नोंदविण्यात येत आहे.
-
एनएसईने रचला असा पण इतिहास
RBI ने पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात कुठलाही बदल न करण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय येताच शेअर बाजाराला ताकद मिळाली. जोरदार तेजीचे सत्र आले. NSE ने नवीन उच्चांक गाठला. पण या उच्चांकासोबतच एनएसईने अजून एक रेकॉर्ड नावावर केला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थतज्ज्ञांना धक्का बसला आहे.
-
शेतकऱ्यांचा रास्ता रोको
विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला. लासलगाव येथील कोटमगाव चौफुली वर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. रस्ता रोको न करण्याची पोलिसांची विनंती शेतकऱ्यांनी धुडकावली. रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
-
बेमुदत कांदा लिलाव बंदची हाक
नाशिक जिल्ह्यात पुन्हा बेमुदत कांदा लिलाव बंदचा निर्णय घेण्यात आला. कांदा लिलाव बंद ठेवण्याचा व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला. चांदवड येथील व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जोपर्यंत निर्याती संदर्भात तोडगा निघत नाही तोपर्यंत बाजार लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे.
-
सात जणांचा होरपळून मृत्यू
पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागलेली आहे, आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर आणखी काही कामगार त्यात फसल्याच बोललं जातं आहे. तळवडे येथील फटाका गोदामाला ही आग लागली असून ती विनापरवाना सुरू होती,अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवलं आहे.दुसरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत.आत्तापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरु आहे.
-
धडाकेबाज फीचर, बजेट स्मार्टफोन बाजारात
बजेट स्मार्टफोनमध्ये इनफिनिक्सने फीचर्सचा पाऊस पाडला आहे. अनेक फीचर्ससह दमदार बॅटरीने या फोनकडे युझर्सचे लक्ष वेधले आहे. Infinix Smart 8 HD स्मार्टफोन बाजारात आला आहे. किंमत कमी असली तरी हा डिव्हाईस त्याच्या जबरदस्त फीचरमुळे चर्चेत आला आहे. जाणून घ्या या स्मार्टफोनची किंमत, विक्रीची तारीख आणि त्याचे खास फीचर
-
नाना पटोले पोलिसांच्या ताब्यात
नागपुरात विविध मागण्यांसाठी काँग्रेसने मोर्चा काढला होता. यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिसांनी अटक केली तरी युवकांच्या प्रश्नांवर लढत राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ठिय्या आंदोलनावर ठाम होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ऑनलाईनच्या नावाखाली तरुणांना लुटलं जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी 40 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
-
चार सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा
भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्यातील पाच सहकारी बँकांवर कठोर कारवाई केली. उत्तर प्रदेशातील एका सहकारी बँकेचा परवाना रद्द केला तर इतर चार बँकांना दंड ठोठावण्यात आला. यातील काही सहकारी बँकांना आरबीआयने दंड ठोठावला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
-
छगन भुजबळ यांची जाहीर सभा
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या इंदापूर येथे होणाऱ्या जाहीर सभेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत,वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून इंदापूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीत शहरातील संविधान चौक ते स्मशानभुमी चौक १०० फुटी रस्त्यावरील वाहतूक ९ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तात्पुरती बंद करुन बाबा चौक ते खुळे चौक ते राजेवलीनगर या मार्गे वळविण्यात येत आहे. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
-
परभणी : 23 वर्षीय युवकाच्या हत्येनं परिसरात खळबळ
परभणीमधील पूर्णा इथं एका 23 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. तीन अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. आकाश कदम असं मृत युवकाचं नाव आहे. घटनास्थळी फेकलेली रिवाल्वरसुद्धा सापडली आहे. याप्रकरणी आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही नाहीत.
-
नाशिक : भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेला घेऊन पोलिस शिंदे पळसे गावात दाखल
नाशिक : भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेला घेऊन नाशिक पोलिस शिंदे पळसे गावात दाखल झाले आहेत. चौकशीसाठी दोघांना एमडी ड्रग्स कारखान्यावर आणलं आहे.
-
इंदापूर शहरातील वाहतुकीत बदल
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या इंदापूर येथे होणाऱ्या जाहीर सभेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून इंदापूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीत शहरातील संविधान चौक ते स्मशानभूमी चौक १०० फुटी रस्त्यावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. 9 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही वाहतूक तात्पुरती बंद करुन बाबा चौक ते खुळे चौक ते राजेवलीनगर या मार्गे वाहतूक वळविण्यात येत आहे.
-
नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात जवळपास 15 मिनिटं बैठक
नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात जवळपास 15 मिनिटं बैठक झाली. अजित पवारांच्या कॅबिनमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत नवाब मलिक यांना घेऊन सुरू झालेल्या वादंगावर चर्चा झाली. नवाब मलिक यांना वेट एंड वाॅचचा सल्ला अजित पवारांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनावणी सुरू असेपर्यंत आणि आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत नवाब मलिक यांच्या बाबतीत मित्रपक्षांनी आपली भूमिका मवाळ करावी असा नेत्यांचा सूर आहे. लवकरच अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत सविस्तर बोलणार आहेत.
-
आप बरोबर युती करण्यास पंजाब काँग्रेसचा विरोध
नवी दिल्ली – इंडिया आघाडीत मोठी फुट पडल्याचं दिसत आहे. पंजाब काँग्रेस आप बरोबर कदापि युती करणार नाही असं पंजाब काँग्रेसने म्हटले आहे. पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश चौधरी यांची वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीनंतर पंजाब काँग्रेसने हे स्पष्टीकरण दिले आहे. पंजाब मधील लोकसभेच्या सर्व म्हणजेच 13 जागा पंजाब काँग्रेस स्वबळावर लढवणार असं म्हटले आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात फूट पडल्याने इंडिया आघाडी मध्ये अलबेल नसल्याचीच चर्चा आहे.
-
TET घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे यांच्या अडचणीत वाढ
TET घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे यांची आणखी 4 कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तुकाराम सुपे यांची 3 कोटी 59 लाख रुपयांची मालमत्ता केली जप्त केली होती. बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी तुकाराम सुपे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच अनुषंगाने आज पुन्हा तुकाराम सुपे यांची आणखीन 4 कोटी रुपयांची मालमत्ता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जप्त करण्यात आली आहे.
-
नवाब मलिक यांचा जामीन कोर्टाने रद्द करावा – मोहित कंबोज
नवाब मलिक यांचा जामीन सुप्रीम कोर्टाने रद्द करुन त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवावे – मोहित कंबोज यांची मागणी
-
निर्मळ पिंप्री येथील दोन कुटूंबावर हल्ला प्रकरण, विखे पाटील घेणार पीडित कुटूंबाची भेट
राहाता : राधाकृष्ण विखे पाटील पीडित कुटूंबाची भेट घेणार आहेत. राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री येथील दोन कुटूंबावर जमावाने हल्ला केला होता. विखे पाटील थोड्या वेळात निर्मळ पिंप्री गावात पोहचणार आहेत. पिडीत कुटूंब आणि गावकऱ्यांची भेट घेणार आहेत. नागपूरहून विखे पाटील विमानाने शिर्डीकडे रवाना झाला आहेत. घटनास्थळी जावून ते घटनेचे कारण जाणून घेणार आहेत.
-
जनतेला अपेक्षित असलेली भूमिका फडणवीसांनी घेतली – बावणकुळे
नवाब मलीक यांच्याबद्दल जनतेला अपेक्षित असलेली भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असल्याचं चंद्रशेखर बावणकुळे यांनी म्हटले आहे.
-
आळेफाटा बाजार समिती मधील कांदा लिलाव पाडले बंद
आळेफाटा : कांदा निर्यात बंदी विरोधात जुन्नरच्या आळेफाटा बाजार समितीत शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले आहे. आळेफाटा बाजार समिती मधील कांदा लिलाव बंद पाडले आहे. बाजार समितीत आळेफाटा पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
-
जगातला सर्वात मोठा ढोंगी सोंगाड्या म्हणजे संजय राऊत- नितेश राणे
जगातला सर्वात मोठा ढोंगी सोंगाड्या म्हणजे संजय राऊत. आयुष्यभर ढोंगी असलेला दुसऱ्यांना ढोंगी बोलतो हे हास्यास्पद आहे. एक्सप्रेस मध्ये असताना ह्याला नोकरीवरून का काढून टाकल. राऊतचा इतिहास आम्हाला विस्तृत पणे सांगावं लागेल. फडणवीस साहेबांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत म्हणून ते अजितदादांना पत्र दिले आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
-
चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्गावर सुरूअसलेले आंदोलन चिघळलं
चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्गावर सुरू असलेले आंदोलनक चिघळलं. 1 तासा पेक्षा जास्त काळ आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या आंदोलनात बाहेर गावाहून कांदा विक्रीस आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जास्त संख्या आहे. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-
सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनात झोकून देऊन काम करेल- भारती पवार
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना केंद्रीय आदिवासी मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार घोषित केला होता. निर्माण भवन कार्यालयात मंत्रालयाचा पदभार त्या स्वीकारत आहेत. मी सगळ्यात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. महिलांना नेतृत्व करण्याची संधी दिली. आदिवासी समाज मोठा असून सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनात झोकून देऊन काम करेल, असं भारती पवार म्हणाल्या.
-
दुकानदारांनो, इंग्रजी पाटया काढून मराठी लावा- गोंदिया मुख्याधिकाऱ्यांचे आदेश
दुकानदारांनो, इंग्रजी पाटया काढून मराठी लावा, अन्यथा कारवाई होणार आहे. गोंदिया मुख्याधिकाऱ्यांनी दोन महिन्याच्या आत पाटया बदलण्याचे आदेश दिलेत. मराठी पाटया लावण्यासाठी गोंदिया शहरात देखील फलक लावण्यात आले आहेत.
–
-
एसटी बॅंकेतील सत्ता अडचणीत, गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का
एसटी बँकेतील गुणरत्न सदावर्ते यांची सत्ता अडचणीत आली आहे. एकाधिकारशाहीला कंटाळून 15 संचालक पाठिंबा घेणार काढून घेणार आहेत असा दावा जनसंघाचे माजी जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.
-
कांदा लिलाव पुन्हा बंद राहणार
नाशिक – संतप्त कांदा उत्पादकांनी जिल्हाभर रस्ता रोको केल्यानंतर व्यापारी आणि शेतकऱ्यांची बैठक घेतली आहे. पुढील निर्यात संदर्भात जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
धाराशिव – दुष्काळ पाहणीसाठी केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात येणार
दुष्काळ पाहणीसाठी केंद्र सरकारचे पाहणी पथक महाराष्ट्रात येणार असून 8 जिल्ह्यात पाहणी होणार आहे. केंद्र सरकारचे अधिकारी असलेल्या 4 टीम दुष्काळी गावात जाऊन करणार आढावा घेणार आहेत. 13 आणि 14 डिसेंबर रोजी धाराशिव व बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर हे पथक असणार आहे.
-
Live Update : दादर स्टेशन परिसरात भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन
दादर स्टेशन परिसरात भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन सुरु आहे. कर्नाटकाचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन सुरू केलं. नारबाजी करत सुरू केले आंदोलन सुरु आहे…
-
Live Update : अवकाळी पावसामुळे ७ हजार ८०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
पुणे जिल्ह्यात अवकाळीमुळे ७ हजार ८०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. ११ कोटी ३८ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी.. अशा मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली आहे. अवकाळी पावसाचा फटका ४३३ गावांमधील १९ हजार ७२७ शेतकऱ्यांना बसला आहे.
-
Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचं आक्रमक आंदोलन
प्रियांक खर्गेंविरोधात भाजपचं आंदोलन सुरु झालं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचं आक्रमक आंदोलन सुरु झालं आहे. खर्गे आणि राहुल गांधी यांचे फोटो जाळण्याचा आंदोलकांता प्रयत्न…
-
Live Update : केंद्र शासनाच्या कांदा निर्यात बंदीचे तीव्र पडसाद
केंद्र शासनाच्या कांदा निर्यात बंदीचे तीव्र पडसाद … उमराण्यामध्ये व्यापाऱ्यांनी लिलाव पाडले बंद… शेकडो शेतकऱ्यांनी रोखला मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्ग… मनमाड , नांदगावमध्येही बंद…
-
Live Update : 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध
31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध… नाशिकचे पिंपळगाव, लासलगाव, उमराना, मुंगसरासह 75 टक्के बाजार बंद… विश्वासात न घेता सरकारकडून अचानक निर्णय जाहीर… लाल कांदा येण्याची वाट न बघता निर्णय घेतल्याची व्यापाऱ्यांची भूमिका… गुजरात, राजस्थान, आंध्रमध्ये मोठी आवक होणार असताना निर्णय जाहीर…
-
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखला.
कांदा निर्यात बंदीच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून नाशिकच्या उमराने येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखला.
बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कांदा विक्रीवर थेट परिणाम होणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले असून मुंगसे,उमराने, चांदवड बाजार समितीत कांदा लिलाव बंद आहे. कांदा उत्पादकांसह शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
-
शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीसाठी विरोधकांचे आंदोलन
नागपूर : शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केलं आहे. कापूस, धान प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले आहेत.
-
जनता सत्ताधाऱ्यांकडून हिशोब घेईल – नाना पटोले
आम्ही किती राष्ट्रप्रेमी आहोत हे दाखवण्याचा भाजप प्रयत्न सुरू आहे. देशावर एवढंच प्रेम असेल तर फक्त मलिक कशाला, प्रफुल पटेल, अजित पवार यांनाही बाजूला करा ना, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
-
प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप युवा मोर्चा आक्रमक
पुणे – मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चा आक्रमक झाला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र कर्नाटक विधानसभेच्या दालनातून काढून टाकण्यात यावे असे अवमानजनक विधान खर्गे यांनी केले. त्याचाच निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सारस बागेजवळील स्वातंत्रवीर सावरकर पुतळ्या जवळ आंदोलन करण्यात आलं. प्रियांक खर्गे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले.
-
नवाब मलिकांची भूमिका ऐकल्यावरच मी माझी भूमिका मांडेन – अजित पवार
नवाब मलिकांची भूमिका काय आहे, त्यांचं मत काय आहे, हे ऐकल्यावरचं मी माझं मत मांडेन, असं अजित पवार म्हणाले. कोणी कुठे बसायचं हे सांगण माझा अधिकार नाही.
-
भाजपाचं वॉशिंग मशीन बिघडलं आहे – संजय राऊत
भाजपाचे वॉशिंग मशीन बिघडलं आहे . सभागृहात बाजूबाजूला बसतात, तरी पत्रव्यवहार कसले करता. मलिकांप्रमाणेच प्रफुल पटेल यांच्यावरही आरोप आहेत. तरीही मलिकांनाच टार्गेट करणं हे फक्त ढोंग आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
-
फडणवीसांचं पत्र हा ढोंगीपणा आहे – संजय राऊत
सर्व भ्रष्ट लोकं तुम्ही घेतलेत मग मलिकांवरच टीका का ? मलिकांवर बोलता मग प्रफुल्ल पटेल कसे चालतात ? संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना खोचक सवाल विचारला.
-
Maharashtra News : ट्रिपल इंजिन बिघडलेलं आहे- अंबादास दानवे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांनी अजिप पवार यांना नवाब मलिक यांच्या संदर्भात पत्र लिहील्याने चर्चांना उधान आले आहे. सरकालमध्ये सर्वकाही आलबेल नाही, सरकारचं ट्रिपल इंजिन बिघडलं आहे असं अंबादास दानवे म्हणाले.
-
Maharashtra News : संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
सह्यांद्री रिफ्रेशमेंटच्या खात्यातून संदीप राऊत यांच्या खात्यात 6 लाख रूपये जमा करण्यात आले होते. हे पैसे कसे जमा झाले याच्या उत्तरानं आर्थिक गुन्हेशाखा समाधानी नाही. त्यामुळ अधीराऱ्यांनी त्यांच्याकडे आणखी स्पष्टीकरण मागितले आहे. संदीप यांच्याकडून अद्याप कुठलेली उत्तर आले नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होवू शकते.
-
Maharashtra News : शरद पवार दिल्लीत, पवारांना भेटण्यासाठी मोठी गर्दी
शरद पवार सध्या दिल्लीत आहेत. पवारांना भेटण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. 6 जनपथ घराबाहेर बारामतीमधील कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. पुण्यातून बस घेऊन विद्यार्थी पवारांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत.
-
Maharashtra News : दुध दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन
दुध दरवाढीच्या मागणीसाठी रस्त्यावर दुध फेकून आंंदोलन करण्यात येत आहे. सोलापूरच्या माघशिरसमध्ये दुध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
-
Maharashtra News : विधान भवन परिसरातील कार्यालयात काँग्रेसची बैठक
काँग्रेसने विधान भवन परिसरातील पक्ष कार्यालयात सकाळी 10 वाजता बैठक बोलावली आहे. रणनिती ठरवण्यासाठी काँग्रेसने ही बैठक बोलावली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवर या बैठकीला उपस्थित राहाणार आहे.
-
Maharashtra News : संजय राऊत यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही- दरेकर
संजय राऊत यांनी भाजप व सत्ताधआरी पक्षांवर टिका केली होती. यावर उत्तर देतांना दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही. सकाळी उठले की, त्यांनी पोपटपंची सुरू होते अशा शब्दात त्यांनी टोला लगावला.
-
Maharashtra News : शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये उत्तम समन्वय- दरेकर
जेव्हा दोन तीन पक्ष एकत्र येवून सत्ता स्थापण करतात तेव्हा स्थानिक पातळीच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता असते, मात्र शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये उत्तम समनन्वय आहे असं दरेकर म्हणाले.
-
समृद्ध जीवन ग्रुपच्या संचालकाला अखेर सीआयडीकडून अटक
समृद्ध जीवन ग्रुपच्या संचालकाला अखेर सीआयडीकडून अटक करण्यात आलीये. 4700 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात फरार असलेल्या आरोपीला सात वर्षानंतर पुणे सीआयडीने ठोकल्या बेड्या. गेल्या सात वर्षांपासून आरोपी होता फरार. पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये केलेल्या चीट फंड घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपीला पुणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून अटक
-
निवडणूक आयोगाला ठाकरे गटाच पुन्हा एकदा पत्र
खासदार अनिल देसाई यांनी दिले निवडणूक आयोगाला पत्र. धर्माच्या नावाने मत मागितल्यास निवडणूक आचारसंहितेचा भंग होत नाही का, असे त्यांनी म्हटले आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून धर्माच्या नावाने उघड प्रचार अनिल देसाई यांचा पत्रातून आरोप करण्यात आलाय. निवडणूक आयोगाने याबाबत उत्तर द्यावे अनिल देसाई यांची मागणी
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हा बाबत महत्वाची सुनावणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हा बाबत सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर संध्याकाळी चार वाजता सुनावणी आहे. आज शरद पवार गटाचा युक्तिवाद संपण्याची शक्यता आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे निवडणूक आयोगात हजर राहणार तर अजित पवार गटाकडून खासदार सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत.
-
मुंबई खार पाईपलाईनमध्ये मोठी गळती
मुंबई खार पाईपलाईनमध्ये मोठी गळती आढळून आली आहे. ज्यामुळे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. BMC हायड्रोलिक विभागाच्या म्हणण्यानुसार 600 मिमी व्यासाच्या पाइपलाइनमध्ये बालगंधर्व रंग मंदिर, वांद्रे पश्चिमेजवळ, 24 व्या रोडवरील पाली हिल जलाशयाच्या इनलेटमध्ये मोठ्या प्रमाणात गळती आहे.
-
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर पुणेकर अनुभवणार वॉकिंग प्लाझा
सार्वजनिक वाहतुकीत पादाचारी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, याच उद्देशातून महापालिकेकडून सोमवारी 11 तारखेला पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्तावर वॉकिंग प्लाझा करण्यात येणारं. यादिवशी सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत रस्ता वाहनांना वापरता येणारं नाही.
-
Maharashtra News | सरन्यायाधीश चंद्रचूड शनिवारी पुणे दौऱ्यावर
सरन्यायाधीश चंद्रचूड शनिवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या 20 व्या पदवीदान समारंभाला ते हजेरी लावणार आहे. पुण्यातील लवळे येथील सिम्बॉयसिसच्या कॅम्पसमध्ये हा समारंभ होणार आहे.
-
Maharashtra News | हवेली तालुक्यात 14 हजार 334 कुणबी नोंदी
पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये मोडणाऱ्या हवेली तालुक्यात उच्चांकी कुणबी नोंद असल्याच समोर आली आले आहे. तालुक्यातील 72 गावांमध्ये 14 हजार 334 कुणबी नोंदी आढळल्या आहेत.
-
Maharashtra News | 7 हजार 800 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
पुणे जिल्ह्यात अवकाळीमुळे 7 हजार 800 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे 11 कोटी 38 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली.
-
Maharashtra Assembly Winter Session | विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या नागपुरातील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. बैठकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजेश टोपे आणि अनिल देशमुख उपस्थित होते. विधिमंडळात सरकारला घेरण्यासाठी आणि अकरा तारखेला काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा तर 12 तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत युवा संघर्ष यात्रेचा समारोप होणार आहे. यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
Published On - Dec 08,2023 7:12 AM