AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE : उद्धव ठकारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला, शिरसाट म्हणाले…

| Updated on: Mar 31, 2025 | 6:09 PM

Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE Updates : महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. नागपुरात 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन पार पडेल.

Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE : उद्धव ठकारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला, शिरसाट म्हणाले...
महत्वाची बातमीImage Credit source: tv9

महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. कालपासून अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मंत्रिपदाची संधी हुकल्याने सध्या राजकीय वर्तुळात छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा आहे. उद्धव ठाकरे आज त्यांच्या गटातील आमदारांची भेट घेणार आहेत. शिवसेना आणि चिन्हावरची सुनावणी २० डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. तात्पुरती तारीख लिस्ट करण्यात आली आहे. मात्र 21 तारखेपासून 1 जानेवारीपर्यंत कोर्टाला हिवाळी सुट्ट्या आहेत, जर 20 तारखेला सुनावणी झाली नाही तर थेट जानेवारी नवीन वर्षात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्यानं बदल होताना दिसत आहे. कुठे थंडीचा जोर आहे, तर कुठे ढगाळ वातवरण असल्याचे जाणवत आहे. मागील आठवडाभरापासून गायब झालेली थंडी पुन्हा एकदा थंड हवेचे ठिकाण असलेल्या इगतपुरी तालुक्यात परतली असून थंडीचा जोर वाढला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Dec 2024 04:01 PM (IST)

    हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेईल ही अपेक्षा- उद्धव ठाकरे

    उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर विरोधी पक्षनेतेपदाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, नव्या सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घ्यावेत ही अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

  • 17 Dec 2024 03:57 PM (IST)

    वन नेशन वन इलेक्शन विधेयक हे संविधानविरोधी : प्रियंका गांधी

    वन नेशन वन इलेक्शन विधेयकावर काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी म्हटले की, हे संविधानविरोधी विधेयक आहे. हे आपल्या राष्ट्राच्या संघराज्याच्या विरोधात आहे. आमचा या विधेयकाला विरोध आहे.

  • 17 Dec 2024 03:33 PM (IST)

    उद्धव ठकारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला, शिरसाट म्हणाले…

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.  ठाकरे-फडणवीस यांच्यात 10 ते 15 मिनिटं चर्चा झाली. फडणवीस यांच्या भेटीनंतर उद्धव ठकारे राहुल नार्वेकरांच्या भेटीला गेले. दरम्यान, शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरून चिमटा काढला. असं आधीच केलं असतं तर चित्र वेगळं असतं, असा टोमणाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना मारला.

  • 17 Dec 2024 03:25 PM (IST)

    ठाणे स्टेशन परिसरातील वामन शंकर मराठे ज्वेलर्समध्ये चोरीची घटना

    ठाणे स्टेशन परिसरातील वामन शंकर मराठे ज्वेलर्समध्ये चोरीची घटना घडली. रात्री ज्वेलर्सचं शटर तोडून चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने लंपास केले. या गुन्ह्याची नोंद ठाणे पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. स्टेशन परिसरात गर्दीच्या ठिकाणी ज्वेलर्सच्या दुकानातील तीन गेट व शटर तोडून चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे. दुकानातून पाच ते सहा किलो सोने चोरीला गेले असून ही चोरी नसून दरोडा असल्याचा काही व्यापारींचा आरोप आहे.

  • 17 Dec 2024 03:12 PM (IST)

    वन नेशन वन इलेक्शन विधेयकाच्या वेळी गैरहजर राहिलेल्या खासदारांना भाजप नोटीस पाठवणार

    एक राष्ट्र एक निवडणूक विधेयक सादर करताना आज लोकसभेत उपस्थित नसलेल्या भाजप खासदारांना पक्ष नोटीस पाठवणार आहे. भाजपने आज आपल्या लोकसभा सदस्यांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे.

  • 17 Dec 2024 03:01 PM (IST)

    वस्तू व सेवा कर विभाग संघटनेकडून बेमुदत धरणे आंदोलन

    मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे. वस्तू व सेवा कर विभाग संघटनेकडून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. धरणे आंदोलनासह संघटनेकडून निषेध सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने GST कर्मचारी सहभागी झाले आहेत. प्रलंबित पदोन्नती, प्रशासकीय आणि विनंती बादल्या तसेच इतर मागण्यांसाठी हे आंदोलन उभारण्यात आलं आहे.

  • 17 Dec 2024 02:54 PM (IST)

    तृतीयपंथीयांचाही लाडकी बहीण योजनेत समावेश करा : आमदार प्रवीण दटके

    तृतीयपंथीयांचाही लाडकी बहीण योजनेत समावेश करा, अशी मागणी भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केली आहे. आमदार दटके यांनी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत ही मागणी केली आहे.

  • 17 Dec 2024 02:47 PM (IST)

    आमदार रोहित पवार सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीला

    आमदार रोहित पवार सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीला गेले आहेत. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होवून आठ दिवस उलटले आहेत. या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 4 आरोपी अद्याप फरार आहेत.

  • 17 Dec 2024 02:08 PM (IST)

    सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात डावलल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये खदखद

    चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार आणि ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात डावलल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये खदखद पाहायला मिळत आहे. चंद्रपूर भाजप कार्यकर्त्यांनी नागपुरपर्यंत पायी यात्रा काढली आहे. नागपुरात न्याय न मिळाल्यास दिल्ली पायी यात्रा करण्याचा निर्धार या कार्यकर्त्यांनी केला आहे. विकास पुरुष सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करण्याची जोरकस मागणी या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

  • 17 Dec 2024 01:42 PM (IST)

    ‘ON OE’ विधेयकाविरोधात 149 तर समर्थनार्थ 220 मते

    ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकावर संसदेत मतदान सुरु अूसून विधेयकाविरोधात 149 तर समर्थनार्थ 220 मते पडली असली तरी पुन्हा मतदान घेतले जात आहे.

  • 17 Dec 2024 01:39 PM (IST)

    मंत्रिमंडळात जेवढी खदखद तेवढी इंडिया आघाडीत नाही – ठाकरे

    मंत्रिमंडळात जेवढी खाते वाटपावरुन खदखद आहे तेवढी तर इंडिया आघाडीत नक्कीच नाही असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

  • 17 Dec 2024 01:32 PM (IST)

    ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकावर संसदेत मतदान सुरु

    नरेंद्र मोदी सरकारचा महत्वाकांक्षी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ वर संसदेत मतदान सुरु झालेले आहे.

  • 17 Dec 2024 01:29 PM (IST)

    खाते वाटप झालेले नाही मग अधिवेशन काय टाईमपास म्हणून सुरु आहे का ? – ठाकरे

    निवडणूकांचे निकाल लागून महिना होत आला तरी खातेवाटप नाही मग अधिवेशन काय टाईमपास म्हणून करताय का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

  • 17 Dec 2024 01:18 PM (IST)

    भास्कर जाधव यांच्या राज्यपालांवरील सवालवरुन विधानसभेत खडाजंगी

    शिवसेनेचे सदस्य भास्कर जाधव यांच्या राज्यपालांच्या सरकार स्थापन्याच्या वक्तव्यावरुन सभागृहात सत्ताधारी सदस्यांनी जाधव यांना जाब विचारला आहे.

  • 17 Dec 2024 12:47 PM (IST)

    मलाईदार खात्यांसाठी मंत्रीमंडळाचं वाटप रखडलं – नाना पटोलेंचा टोला

    मलाईदार खात्यांसाठी मंत्रीमंडळाचं वाटप रखडल्याचा टोला नाना पटोले यांनी लगावाल. मलई कुणाला जास्त मिळते यासाठी सध्या सरकारचे प्रयत्न सुरू आहे, अशा शब्दांत पटोले यांनी जोरदार हल्ला चढवला.

  • 17 Dec 2024 12:38 PM (IST)

    वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे संबध असल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप

    वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे संबध  असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. कराड यांची चौकशी करा, सगळे धागेदोरे बाहेर येतील, आव्हाडांची मागणी.

  • 17 Dec 2024 12:21 PM (IST)

    लोकसभेत एक देश एक निवडणूक विधेयक सादर

    लोकसभेत एक देश एक निवडणूक विधेयक सादर, कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी मांडलं विधेयक. विरोधकांकडून ‘एक देश एक निवडणूक ‘ विधेयकाला विरोध.

  • 17 Dec 2024 12:13 PM (IST)

    बीडमधल्या त्या घटनेवर अखेर धनंजय मुंडेंनी सोडलं मौन

    बीडमधल्या त्या घटनेवर अखेर धनंजय मुंडेंनी मौन सोडलं. देशमुख हत्याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.  या घटनेमध्ये माझा संबंध लावणं म्हणजे राजकारण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे धनंजय मुंंडे म्हणाले.

  • 17 Dec 2024 12:07 PM (IST)

    परभणी आणि बीड प्रकरणी काँग्रेसचा सभात्याग

    परभणी आणि बीड प्रकरणी काँग्रेसचा सभात्याग, आजच्या पूर्ण दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.

    परभणी इथे संविधानाची विटंबना करण्यात आली, भीम सैनिक सोमंथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला, बीड इथे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली.  या दोन्ही प्रकरणी विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता, पण अध्यक्षांनी हे स्थगन फेटाळले.  त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला

  • 17 Dec 2024 11:54 AM (IST)

    लोकशाहीत तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार- भुजबळ

    “उद्या राज्यात सगळे कार्यकर्त्यांशी चर्चा करू. लोकशाहीत तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कुठंही वातावरण बिघडवू नका, मी सांगितलं. मंत्रिपद कोणी नाकारलं ते शोधावं लागेल. अमित शहा यांनी सांगितलं होतं नाशिकला भुजबळ उभे राहणार. सगळी तयारी झाली, सर्व लोक आले. त्यांनी आठ-पंधरा दिवसांत नाव जाहीर करायचं होतं. त्यांनी एक महिना लावला, मी माघार घेतली,” असं छगन भुजबळ म्हणाले.

  • 17 Dec 2024 11:47 AM (IST)

    विरोधक बीड आणि परभणीला भेट देणार- वडेट्टीवार

    “सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी मारहाण केली, म्हणून त्याचा मृत्यू झाला. सरकार आम्हाला सभागृहात का बोलू देत नाही? गुंडांना सुरक्षा देण्यासाठी सरकारला बहुमत दिलंय का? बीडमध्ये संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण झाली. विरोधक बीड आणि परभणीला भेट देणार”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

  • 17 Dec 2024 11:40 AM (IST)

    अजित पवार आजही विधानभवनात अनुपस्थित

    अजित पवार आजही विधानभवनात उपस्थित नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत असून ते आजही सभागृहात उपस्थित नाहीत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही अजित पवार अनुपस्थित आहेत.

  • 17 Dec 2024 11:37 AM (IST)

    बीड, परभणीच्या मुद्द्यावर आम्हाला बोलू दिलं जात नाही- जितेंद्र आव्हाड

    ‘वाल्मिक कराडला खंडणीत आरोपी केलं, हत्येच्या गुन्ह्यात का नाही? वाल्मिक कराड सरकारपेक्षा मोठा आहे का? बीड, परभणीच्या मुद्द्यावर आम्हाला बोलू दिलं जात नाही. आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार आहोत. पुढील आठवड्यात बीडमध्ये प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहोत,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

  • 17 Dec 2024 11:33 AM (IST)

    मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये 25 जानेवारीला उपोषण सुरू करणार

    “सरकारने कुठेही कुणबी नोंद सापडली तरी त्या व्यक्तीला त्याच्या तालुका ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. यासाठी अंतरवाली सराटीमध्ये 25 जानेवारीला उपोषण सुरू करणार. 25 जानेवारीपूर्वी मागण्या मान्य करा. अन्यथा सरकार पश्चात्ताप करेल. 25 जानेवारीला राज्यातील मराठा समाजाने अंतरवाली सराटीमध्ये यायचं आहे. मराठा समाजाने पुन्हा आपली शक्ती दाखवायची आहे,” असं आवाहन जरांगेंनी केलंय.

  • 17 Dec 2024 11:25 AM (IST)

    मनोज जरांगे सामूहिक आमरण उपोषण आंदोलनाची दिशा, तारीख करणार जाहीर

    जालना, अंतरवाली सराटी- मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. विधानसभा निवडणूक पार पडल्यावर पुन्हा मराठा आरक्षण आंदोलन सुरू करण्याचा जरांगे यांनी इशारा दिला होता. अंतरवाली सराटीमध्ये सामूहिक आमरण उपोषण करणार असल्याचा त्यांनी इशारा दिला होता. आज जरांगे आंदोलनाची दिशा आणि तारीख जाहीर करणार आहेत.

  • 17 Dec 2024 11:20 AM (IST)

    वाल्मिक कराडचे फोन रेकॉर्ड सापडले तर सर्व गोष्टी स्पष्ट होतील- क्षीरसागर

    गुन्हेगाराला दोन बॉडीगार्ड कसे? वाल्मिक कराडवरून संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत सवाल केला. “आमदाराला एक मग गुन्हेगाराला दोन अंगरक्षक कसे? वाल्मिक कराडचे फोन रेकॉर्ड सापडले तर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. बीडचा गुन्हेगारीचा पॅटर्न संपवा. अधिवेशन संपण्यापूर्वी वाल्मिक कराडला अटक व्हायला हवी. नाहीतर बीडमध्ये मोठा मोर्चा काढला जाईल”, असं क्षीरसागर म्हणाले.

  • 17 Dec 2024 11:16 AM (IST)

    रोहित पवारांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट

    परभणी- आमदार रोहित पवारांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली. शहरातील नवा मोंढा परिसरातील घरी त्यांनी ही भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.

  • 17 Dec 2024 11:10 AM (IST)

    चार तासांपेक्षा जास्त वेळ परभणीतला प्रकार पेटत ठेवला- नाना पटोले

    नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. विधानसभेत नाना पटोले म्हणाले, “परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. चार तासांपेक्षा जास्त वेळ परभणीतला प्रकार पेटत ठेवला. चार तासांनंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं. “

  • 17 Dec 2024 10:59 AM (IST)

    बीड आणि परभणीतील घटनेवरुन विरोधक आक्रमक

    बीड आणि परभणीतील घटनेवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी आज सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी  केली. पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला.

  • 17 Dec 2024 10:47 AM (IST)

    महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार – नाना पटोले

    महाराष्ट्रात गुजरातमधून ईव्हीएम मशीन आणले. महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. योग्यवेळी त्याची निवड केली जाईल, काँग्रेस नेते नाना पटोले यांची प्रतिक्रिया

  • 17 Dec 2024 10:32 AM (IST)

    नाशिकमध्ये उद्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक, छगन भुजबळ राहणार उपस्थित

    नाशिक : नाशिकमध्ये उद्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार बैठक होणार आहे. या बैठकीसाठी समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समता सैनिक उपस्थितीत राहणार आहेत. मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने समता परिषद आक्रमक झाली आहे. उद्या सकाळी दहा वाजता नाशिकच्या जय शंकर फेस्टिवल लॉन्स येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 17 Dec 2024 10:30 AM (IST)

    अजित पवारांसोबत माझी भेट झाली नाही, नाराज प्रकाश सोळंके यांची पहिली प्रतिक्रिया

    मंत्रिपद न मिळाल्याने आमदार प्रकाश सोळंके नागपूरहून माजलगावला रवाना झाले. अजित पवारांसोबत माझी भेट झाली नाही. तसेच कोणतीही चर्चा झाली नाही. अधिवेशनात फार काही महत्त्वाची कामे नव्हती, अशी प्रतिक्रिया प्रकाश सोळंके यांनी दिली.

  • 17 Dec 2024 10:16 AM (IST)

    शिवसेना आमदारांची थोड्याच वेळात बैठक, नाराजांवर होणार चर्चा

    शिवसेना आमदारांची थोड्याच वेळात बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक वरिष्ठ नेते सहभागी होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांना संधी मिळाली नाही, अशा आमदारांच्या नाराजीवर या बैठकीत मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. आज १० वाजता शिवसेना पक्ष कार्यालयात शिवसेना आमदारांची बैठक होईल, अशी माहिती समोर येत आहे.

  • 17 Dec 2024 10:12 AM (IST)

    ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी एकनाथ शिंदे की गणेश नाईक?

    ठाणे जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यात दोन शिंदेसेनेकडे आणि एक भाजपला दिली गेली आहे. भाजपने गणेश नाईक यांना मंत्रिपद देऊन शिंदेसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे आणि नाईक यांच्यात सुप्त राजकीय संघर्ष असून, नाईक यांनी शिंदेच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. या संघर्षाचे परिणाम ऐरोली आणि नवी मुंबईतील राजकारणावर होण्याची शक्यता आहे.

    शिंदे आणि नाईक यांचे पालकमंत्रिपदावर दावा असल्याने, आगामी काळात ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर भाजप आणि शिंदेसेनेत रस्सीखेच सुरू राहील.

  • 17 Dec 2024 09:54 AM (IST)

    Maharashtra News: मुख्यमंत्र्यांनी बीड आणि परभणीतील घटनांकडे लक्ष द्यावं – संजय राऊत

    मुख्यमंत्र्यांनी बीड आणि परभणीतील घटनांकडे लक्ष द्यावं… इतरही जण अश्रू ढाळत आहेत, पण त्यांच्या अश्रूंना कोण विचारतंय… संजय राऊतांचा महायुतील नराजवीरांन टोला…

  • 17 Dec 2024 09:42 AM (IST)

    Maharashtra News: ठाणे महापालिकेचा मागासवर्गीय वस्त्यांमध्ये 1.95 कोटी रुपये खर्चून नवीन एलईडी पथदिवे बसवण्याचा निर्णय

    नऊ प्रभाग समित्यांतील झोपडपट्ट्या आणि मागासवर्गीय वस्त्यांमध्ये अंधाराचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या मागासवर्गीय निधीतून प्रकल्प राबवला जाणार… या प्रकल्पामुळे सुरक्षितता आणि प्रकाश व्यवस्था सुधारून नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची पालिका प्रशासनाची माहिती…

  • 17 Dec 2024 09:32 AM (IST)

    Maharashtra News: कुत्रा चावल्याने 66 जण जखमी….

    आळंदीत कुत्रा चावल्याने 66 जण जखमी झालेत… लहान मुलांना देखील कुत्रा चावल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आलेत… रविवारी 20, सोमवारी 46 जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलाय… अखेर आळंदी नगरपरिषदेने लोखंडी पिंजऱ्यात पिसाळलेल्या कुत्र्याला जेरबंद केलंय… यानिमित्ताने मोकाट कुत्र्यांच्या प्रश्न देखील ऐरणीवर आलाय. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आळंदीकर करत आहेत.

  • 17 Dec 2024 09:19 AM (IST)

    Maharashtra News: खातेवाटपात कुठलाही तिढा नाही, 2 दिवसात निर्णय – उदय सामंत

    खातेवाटपात कुठलाही तिढा नाही, 2 दिवसात निर्णय… भुजबळांची नाराजी हा त्यांच्या पक्षांतर्गत मुद्दा… भुजबळांच्या बाबतीत मी बोलणं योग्य नाही… मंत्रिपद न मिळाल्याने नाराद झालेल्यांची शिंगे समजूत काढतील… असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे.

  • 17 Dec 2024 09:07 AM (IST)

    Maharashtra News: कुटनीती जमली नाही म्हणून प्रवाहातून बाजूल राहण्याचा प्रसंग – संजय कुटे

    कुटनीती जमली नाही म्हणून प्रवाहातून बाजूल राहण्याचा प्रसंग… अशी प्रतिक्रिया भाजप आमदार संजय कुटे यांनी दिली आहे. मंत्रीपद न मिळाल्यामुळे कुटे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली नाराजी…

  • 17 Dec 2024 08:54 AM (IST)

    Jalgaon News : अनिल पाटील यांना मंत्री पद न मिळाल्यामुळे नाराजी

    अनिल पाटील यांना मंत्री पद न मिळाल्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. खानदेशातले एकमेव आमदार असताना आम्हाला संधी मिळायला पाहिजे होती. आम्हालाही यावेळी न्याय मिळाला पाहिजे होता. या शब्दात जळगावचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • 17 Dec 2024 08:45 AM (IST)

    One nation One Election bill : लोकसभेत आज सादर होणार वन नेशन, वन इलेक्शन बिल

    आज वन नेशन, वन इलेक्शन बिल लोकसभेत सादर होणार आहे. शिवसेना खासदारांना त्यासाठी व्हीप बजावण्यात आला आहे. शिवसेनेचे सर्व खासदार आज संसदेत उपस्थित राहणार आहेत.

  • 17 Dec 2024 08:05 AM (IST)

    Mumbai Winter : मुंबईत समुद्रावर थंडीमुळे धुक्याची चादर

    मुंबईत समुद्रावर थंडीमुळे धुक्याची चादर. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटे सदृश परिस्थिती. मुंबईतही किमान तापमान घसरले. सकाळी-सकाळी दादर चौपाटीवर दिसत आहे. मनमोहक दृश्य. गुरुवारपर्यंत थंडीचा कडाका कायम असणार अशी हवामान विभागाची माहिती.

  • 17 Dec 2024 08:04 AM (IST)

    Fire in Kurla : कुर्ला पश्चिमेला इलेक्ट्रिक मीटर बॉक्समध्ये आग

    कुर्ल्यातील अब्दुला मेंशन येथील इलेक्ट्रिक मीटर बॉक्समध्ये आग लागल्याची घटना. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर मीटर बॉक्स असल्यामुळे नागरिकांना आत बाहेर करण्यात अडचण. घटनास्थळी अग्निशमन दल उपस्थित. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश.

  • 17 Dec 2024 08:01 AM (IST)

    Solapur News : सोलापुरात शिवशाही बस जाळली

    सोलापुरात अज्ञात व्यक्तीने बस डेपोतील एसटी जाळली. एसटी डेपोमध्ये लावलेली शिवशाही बस पेटवून दिल्याची घटना समोर. परभणी घटनेच्या पार्श्वभूमीवर कालपासून सोलापुरात तीन बसेसच्या काचा फोडल्या तर एक बस पेटवून दिली. मध्यरात्री एक ते दोन च्या सुमारास बस पेटवून देण्याची घटना घडली आहे. काल सायंकाळच्या सुमारास तीन बसेसच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. सोलापूर शहर आणि परिसरात पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Published On - Dec 17,2024 8:00 AM

Follow us
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य.
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच.
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला.
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही.
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला.
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा...
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा....
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे.
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला.
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर.
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO.