महाराष्ट्र बंदबाबत मोठी अपडेट… हायकोर्टमध्ये सुनावणी सुरू; बंदबाबत काय होणार निर्णय?

महाविकास आघाडीने उद्या पुकारलेला महाराष्ट्र बंद बेकायदेशीर आहे. लहान मुलींच्या अत्याचाराचं राजकारण करण्याचं गलिच्छ राजकारण महाविकास आघाडी करत आहे. त्यामुळेच आम्ही या बंदच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळेल याची आशा आहे, असं याचिकाकर्ते ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र बंदबाबत मोठी अपडेट... हायकोर्टमध्ये सुनावणी सुरू; बंदबाबत काय होणार निर्णय?
Follow us
| Updated on: Aug 23, 2024 | 11:59 AM

महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंद पुकारला आहे. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस या बंदमध्ये उतरणार आहेत. बदलापूर येथील दोन चिमूरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे उद्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी बंद राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बंदचा सार्वजनिक सेवांवरही परिणाम होणार असल्याचे सांगितलं जात आहे. असं असतानाच मुंबई हायकोर्टात या बंदबाबतची याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर तातडीची सुनावणी करण्यात येत असून आज दुपारीच त्यावर निर्णय येण्याची शक्यता आहे.

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतरांनी बंदविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन महाविकास आघाडीने हा बंद पुकारला आहे. या बंदमुळे शाळा, महाविद्यालये, रुग्णालये यांच्यासह सर्वसर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. हा बंद बेकायदेशीर आहे, असं या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायामूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायामूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.

बंद बेकायकदेशीर, कारवाई करू

24 ऑगस्टचा बंद पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कुणालाही अशाप्रकारे बंद पुकारण्याचा अधिकार नाही. बंद करणाऱ्यांवर कायद्यानं कारवाई केली जाईल. बंदमध्ये सहभागी होणाऱ्या आंदोलकांवरही कारवाई केली जाणार आहे, असं महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी कोर्टात सरकारच्यावतीने स्पष्ट केलं.

आम्हाला त्यात का खेचता?

याबाबत कायदा स्पष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत तर आमच्या हस्तक्षेपाची गरज काय? जर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे तर यात कोर्टाला का खेचताय?, असा सवाल मुख्य न्यायामूर्तींनी याचिकाकर्त्यांना केला आहे. आज दुपारीच 2:30 वाजता याप्रकरणावर निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तुम्हाला बंद करता येणार नाही

दोन मुलींवर अत्याचार झाला, त्याचं दु:ख आहे. त्यांच्या पालकांना न्याय मिळावा ही भूमिका आहे. पण उद्याचा बंद न्यायासाठी नाही, तर गलिच्छ राजकारणासाठी आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी बंद केला होता, त्यांच्यावर कोर्टाने कारवाई केली होती. हे माहीत असतानाही उद्धव ठाकरे बंद पुकारत आहेत. त्याबाबत ट्विट करत आहेत. या बंदमुळे असंघटीत कामगारांचे अतोनात नुकसान होणार आहे. यांची काळजी आहे का तुम्हाला? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. तुम्हाला असा बंद करता येणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....