Ambajogai Oxygen Shortage | धक्कादायक ! नाशिकनंतर आता अंबाजोगाईमध्ये ऑक्सिजनचा अभाव, 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप
अंबाजोगाई येथेसुद्धा ऑक्सिजनअभावी 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Ambajogai Corona virus shortage of Oxygen)
बीड : नाशिक येथे ऑक्सिजन अभावी तब्बल 22 जणांचा दु्र्दैवी मृत्यू झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथेसुद्धा ऑक्सिजनअभावी 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसा आरोप मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी केला आहे. याबाबत विचारले असता रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या अभावामुळे (Ambajogai Oxygen Shortage) झाला नसल्याचे रुग्णालयाचे डीन शिवाजी शुक्रे यांनी सांगितलं आहे. (Maharashtra Beed Ambajogai five Corona virus infected patient died due to lack of Oxygen)
ऑक्सिजनअभावी 5 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप
राज्यात कोरोनाने हाहा:कार माजवला आहे. रोज हजारो रुग्ण आढळत असल्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातवरण आहे. आज ऑक्सिजन अभावी नाशिकमध्ये तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने राज्य सुन्न झालेलं असताना आता अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिनच्या तुटवड्यामुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसे आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केले आहेत.
रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी नाही- डॉ.शिवाजी सुक्रे
नाशिकची धटना ताजी असताना अंबाजोगाई येथेसुद्धा रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचे आरोप झाल्यानंंतर पुन्हा मोठी खळबळ उडाली. ऑक्सिजन कमतरता होती तर रुग्णालय प्रशासनाने आधीच खबरदारी का घेतली नाही, असे आरोप होऊ लागले. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे यांनी याबाबत अधिकचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच त्यांनी सध्या आमच्याकडे रुग्णांसाठी लागणारा आवश्यक तो ऑक्सिजनचा पुरवठा आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
शारीरिक व्याधी असलेल्यांचाच मृत्यू
यावेळी पुढे स्पष्टीकरण देताना त्यांनी दिवसभरात उपचार करताना एकूण 11 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच, आज मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांचे वय हे 60 वर्षे आहे. यामध्ये बहुतांश रुग्ण हे शारीरिक व्याधी किंवा रक्तदाब, हायपरटेन्शन असलेले रुग्ण आहेत, असंसुद्धा त्यांनी सांगितलं.
नाशिकमध्ये ऑक्सिजनअभावी 22 जणांचा मृत्यू
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात आज (21 एप्रिल) दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात आली. या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोललं जात आहे.
दरम्यान, नाशिकची घटना ताजी असताना अंबाजोगाई येथेसुद्धा ऑक्सिजन नसल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे खळबळ उडाली आहे. रुग्णांचे वाढते प्रमाण आणि ऑक्सिजनचा भासणारा तुटवडा हा चिंताजनक असल्याचं म्हटलं जातंय.
इतर बातम्याा :
Nashik Oxygen Tank Leak Video : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, तब्बल 22 जणांचा मृत्यू
(Maharashtra Beed Ambajogai five Corona virus infected patient died due to lack of Oxygen)