Maharashtra Marathi Breaking News Live | भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत आणखी वाढ
Maharashtra Breaking News in Marathi : आज 4 फेब्रुवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
मुंबई, दि.4 फेब्रुवारी 2024 | ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन निर्माण झालेल्या वादामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. भुजबळ यांनी शनिवारी हा गौप्यस्फोट केल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असणाऱ्या ललित कला अकादमीत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीत सुरश्री संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आहे. मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या सादरीकरणाने या महोत्सवाची सुरुवात झालीय. भाजपने गाव चलो अभियान सुरु केले आहे. या अभियाना अंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या धापेवाडा या गावात तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारडसिंगा आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे वडोदा (कामठी ) गावात करणार मुक्काम करणार आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
‘जितेंद्र आव्हाड पवार कुटुंबात टेंभा घेऊन आग लावण्याचे काम करताहेत’, रुपाली चाकणकर यांची टीका
मुंबई | “राज्यात द्वेष पसरवून समाधान झालं नसावं म्हणून जितेंद्र आव्हाड पवार कुटुंबात टेंभा घेऊन आग लावण्याचे काम करत आहेत. अजितदादा यांच्या बोलण्याचा मतितार्थ वेगळा काढून लोकांची दिशाभूल करू नका. लोकं हुशार आहेत त्यांना दुधात मिठाचा खडा टाकणारे आव्हाड सहज कळतात. त्यामुळे तेलघाले आव्हाड तुम्ही आता गप्पच बसा”, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
-
दररोज दिवसातील 18 तास काम करा, चंद्रशेखर बावनकुळे यांचा कार्यकर्त्यांना आदेश
मुंबई : दररोज दिवसातील १८ तास काम करा, असे आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्चे आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांनी मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघांच्या आढावा बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
-
-
भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
उल्हासनगर | भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी उल्हासनगर न्यायालयाबाहेर घोषणाबाजी केली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
माझा राजीनामा अद्याप मुख्यमंत्र्यांकडे : छगन भुजबळ
मुंबई | जो पर्यंत राजीनामा मंजूर होत नाही, तोवर मला काम करावंच लागेल ना. मंत्रिमंडळात कुणाला ठेवायचं आणि काढायचं हे मुख्यमंत्री ठरवतात. माझा राजीनामा अद्याप मुख्यमंत्र्यांकडे आहे, असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
-
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे बैठकीत आदेश
मुंबई | दररोज 18 तास काम करा, असा आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. ऑनलाईन बैठकीत बावनकुळेंना कार्यकर्त्यांना हा आदेश दिला आहे. मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघातील आढाव्यासाठी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत हा आदेश देण्यात आला.
-
-
राज्यात पावणे तीन कोटी कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण
पुणे | मराठा समाजाच्या सर्वेक्षणात पुणे विभाग अव्वल ठरलं आहे. राज्यात पावणे तीन कोटी कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. यामध्ये पुणे विभागाचे 100 टक्के तर छत्रपती संभाजीनगरचे 97 टक्के सर्व्हेक्षण पूर्ण झालं आहे. सर्वेक्षणाचा माहिती गोखले इन्स्टिट्यूटकडे सुपूर्द करण्यात आली आहे. गोखले इन्स्टिट्यूटकडून दुबार माहिती तसंच अन्य माहितीचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे.
-
बंजारा समाज काढणार जन जागरण रथ यात्रा
नांदेड : भारतात बंजारा समाज वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रवर्गात विखुरला आहे. ज्याची लोकसंख्या 15 कोटीच्या जवळपास आहे. ज्या राज्यात बंजारा समाजाचा एससी, एसटीमध्ये समावेश नाही त्या राज्यातील बंजारा समाजाचा एससी, एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी बंजारा समाजाने केली आहे. या मागण्यांसाठी जन जागरण रथ यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण भारत, मध्यभारत बंजारा सेवा समितीचे अध्यक्ष तेलंगणाचे माजी मंत्री रवींद्र नाईक यांनी नांदेड येथे दिली.
-
जितेंद्र आव्हाड यांची अजित पवार यांच्यावर शेलकी टीका
इंदापूर : सत्ता गेली तरी चालेल पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देणारच असे म्हणणारे शरद पवार, महिलांना आरक्षण देणारे शरद पवार, त्यांच्या घोषणा आणि पॉलिसी ऐका, लातूरला भूकंप झाला, दीड महिना तिथेच राहिले आणि घर उभारली हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. दुष्मनाचाही बाप मरू नये असे म्हणणारे आम्ही आहोत. आणि अजित पवारांनी तर सर्व हद्द ओलांडली असी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
-
भाजपा महाराष्ट्राला बिहारच्या वाटेवर घेवून चालली, एमआयएमची टीका
भिवंडी : मीरा भाईंदर येथील मुस्लिम समाजाच्या घरांवर बुलडोझर चालवणारे गायकवाड यांच्या घरावर बुलडोझर चालवणार का? असा सवाल केला उपस्थित करतानाच भाजपा महाराष्ट्राला बिहारच्या वाटेवर घेवून चालली आहे असी टीका एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल कादरी यांनी केली.
-
माझ्या विचाराच्या व्यक्तीला मतदान करा, अजित पवार याचं आवाहन
बारामती : देशात वातावरण तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या बाजूने आहे. कारण मोदींना व्हिजन आहे. मोदींमुळे परदेशात देखील देशाची मान उंचावली. बारामतीत काम का होतात तर सत्तेत असल्यामुळे होतात. जर आपल्या विचाराचा खासदार गेला तर नक्कीच मोठा निधी मिळेल. लोकसभा आणि विधानसभा दोन्ही ठिकाणी माझ्या विचाराच्या व्यक्तीला मतदान करावं असे आवाहन अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना केले.
-
योग्य वेळेस बोलेन, अजित पवार यांचा इशारा
बारामती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली त्यावेळेस पन्नास खोके एकदम ओक अशी टीका झाली. परंतु, मी सरकारमध्ये जाण्याची भूमिका घेतली त्यानंतर एकनाथ शिंदे गटावरील टीका देखील बंद झाली. राष्ट्रवादीमधील सर्वाना मंत्रिमंडळात सामील व्हायचे होते. सर्वांनी पत्र देखील सरकारमध्ये सामील होण्याचे दिलं होतं. परंतु, मला ज्यास्त यावर बोलायचे नाही योग्य वेळेस बोलेन असा इशारा अजित पवार यांनी दिला.
-
Live Update : जनसंघाचे खासदार लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांची जयंती उत्साहात साजरी
जनसंघाचे खासदार लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांची जयंती उत्साहात साजरी… गुणवंत विद्यार्थी आणि समाजसेवकांचा करण्यात आला सत्कार…
-
Live Update : आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ
आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात जाधव कुटुंबीयांनी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोरली गावातील जाधव कुटुंबाने उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
-
Live Update : महाराष्ट्रचा बिहार झालाय – जयंत पाटील
पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो म्हणजे बिहारशी आपण स्पर्धा करत नसून बिहारला महाराष्ट्रने गुन्हेगारीत मागे टाकले आहे. महाराष्ट्रचा बिहार झालाय… असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.
-
Live Update : आरक्षणाच्या बाबतीत हे सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे – जयंत पाटील
आरक्षणाच्या बाबतीत हे सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे, सर्व समाजाला आरक्षणावरून खेळवले जातेय आणि आपला खेळण्यासारखा वापर होतोय आणि त्यामुळे दोन्ही समाजात अस्वस्थता आहे.मराठा,ओबीसी समाज अस्वस्थ आहे. असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.
-
गॅंगवॉर करणारे पुन्हा सत्तेत नको – उद्धव ठाकरे
गॅंगवॉर करणारे पुन्हा सत्तेत नको आहेत असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यातील सभेत केले आहे.
-
मंत्री शंभूराज देसाई ज्युपिटर हॉस्पिटलला भेट देणार
मंत्री शंभूराज देसाई ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल दुपारी भेट देऊन जखमी महेश गायकवाड यांची विचारपूस करणार आहेत.
-
उद्धव ठाकरे यांचा झंझावात हा असाच सुरू राहणार – राजन साळवी
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला कोकणातून सुरुवात झाली आहे. त्यांच्यावर टीका होत आहे. पण त्यांच्यामुळेच मानाची पदे मिळाली हे राणे कुटुंबियांनी विसरू नये असे आमदार राजन साळवी यांनी म्हटले आहे.
-
आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 6 ते 7 जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा
31 जानेवारी रोजी दुपारी 01.00 वाजण्याच्या सुमारास दोन्ही गटात जमिनीचा वाद निर्माण झाला. यावेळी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 6 ते 7 जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला गुन्हा दाखल केला आहे.
-
वांगेतुरी पोलीस स्टेशनकडे देवेंद्र फडणवीस रवाना
मार्कंडा देवस्थानाला भेट देऊन देवेंद्र फडणवीस येथून वांगेतुरी पोलीस स्टेशनला निघालेले आहेत. एटापल्ली तालुक्यातील अति संवेदनशील दुर्गम भागात आहे वांगेतुरी पोलीस स्टेशन.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे विधान
कार्यकर्त्यांच्या गटातटामुळे मला त्रास होतोय. गटतट मला आवडत नाही मी एकटा फिरेन थेट कार्यकर्त्यांना इशारा. 2 जुलै पाचव्यांदा उपमुख्यमंत्री शपथ घेतली आणि यासाठी बारामतीकरांनी साथ दिलीय.
-
उद्धव ठाकरे आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर
उद्धव ठाकरे आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. कुडाळ इथे सभेची तयारी पुर्ण, कुडाळ इथल्या जिजामाता चौकात होणार ऊद्धव ठाकरेंचं स्वागत…
-
ओबीसी युवा अधिकार मंचची ओबीसी जनगणना यात्रा नागपुरात दाखल
सेवाग्रामपासून झाली यात्रेला सुरवात झाली. विदर्भातील जिल्ह्याजिल्ह्यात आणि गावा गावात जात आहे ही यात्रा. ओबीसीची जाती निहाय जनगणना झालीच पाहिजे या मागणीला घेऊन काढण्यात आली यात्रा.
-
महालक्ष्मी रेसकोर्सवर कुठल्याही पद्धतीचं बांधकाम होणार नाही
महालक्ष्मी रेसकोर्सवर कुठल्याही पद्धतीचं बांधकाम होणार नाही. रेसकोर्सच्या जमिनीवरती फक्त हिरवळ, सायकल ट्रॅक आणि लोकांना चालण्यासाठी वॉक ट्रॅक बनवणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
-
निवासी डॉक्टरांचा संपाचा इशारा
निवासी डॉक्टरांना 7 फेब्रुवारीला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सरकारकडून मागण्याची पुर्तता होत नसल्यानं निवासी डॉक्टर संतप्त झाले आहेत.
-
नाभिकांनी आता यापुढे मराठ्यांची हजामत करू नये- भुजबळ
नाभिकांनी आता यापुढे मराठ्यांची हजामत करू नये असं म्हणत, छगन भुजबळांनी पंढरपूरातील कथीत घटनेवरून चिथावणी करणारे वक्तव्य केले आहे.
-
भुजबळांच्या तोंडून फडणवीस बोलतात मग राजिनामा मंजूर करा होईल?- राऊत
भुजबळांच्या तोंडून फडणवीस बोलतात मग राजिनामा मंजूर करा होईल? असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. भुजबळांचा राजिनामा म्हणजे केवळ नाटक असल्याचंही ते म्हणाले.
-
भुजबळांकडून स्वतःच्याच सरकारवर शंका- मनोज जरांगे
छगण भुजबळांना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करायची आहे म्हणून ते स्वतःच्याच सरकारवर शंका घेत असल्याची प्रतिक्रीया मनोज जरांगे यांनी दिली.
-
शिर्डी लोकसभेसाठी रामदास आठवले इच्छुक
संधी मिळाली तर शिर्डी लोकसभा लढण्यास मी इच्छुक असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. लोकसभेत संधी मिळाली तर पुन्हा मंत्रीपद नक्की मिळेल.संधी मिळाली तर या भागाचा विकास करणार.2009 साली शिर्डीत काही गैरसमजातून माझा पराभव झाला.मात्र आता मी केंद्रात मंत्री आहे. पुन्हा शिर्डी लोकसभा लढवावी यासाठी अनेक लोक आग्रही आहेत, असे ते म्हणाले.
-
शिंदे गटातील गटबाजी चव्हाट्यावर
मालाड पूर्वमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. खासदार गजजान किर्तीकर यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शिंदे गटातील शिवसेनेचे नगरसेवक आणि खासदार आमनेसामने आले.
-
साहित्य संमेलनाचा वाजणार सूप
जळगावमधील अंमळनेरमध्ये सुरू असलेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यासाठीचा नियोजीत दौरा रद्द झाला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या, स्थानिक आमदार, जिल्ह्यातील मंत्री यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांनी समारोप होईल.
-
बाळासाहेब ठाकरे, सावरकर यांना भारतरत्न द्या
लालकृष्ण अडवाणी यांच्या कार्याचा उल्लेख करत, त्यांना देण्यात आलेल्या भारतरत्न पुरस्काराचा आनंद आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तर बाळासाहेब ठाकरे आणि सावतंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी त्यांनी केली.
-
बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा
बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा ठोकला आहे. माजी आमदार विजयराज शिंदे यांनी हा दावा केला आहे. यापूर्वी दोन वेळा भाजपचा खासदार निवडून आल्याची आठवण शिंदे यांनी यावेळी करुन दिली.
-
भाजपचे नागपूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
भाजप जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करणार आहे. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्प पुस्तिकेवर सुनील केदार यांचा फोटो वापरल्याविरोधात हे आंदोलन करण्यात येईल,अशी माहिती भाजपचे ओबीसी सेलचे आशिष देशमुख यांनी दिली.
-
सोने-चांदीचा ग्राहकांना दिलासा
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आठवड्यात सोने-चांदीत दरवाढ झाली होती. जानेवारीच्या अखेर आणि फेब्रुवारीच्या सुरुवातील ग्राहकांच्या खिशावर भार पडला. मौल्यवान धातूचे भाव वधारले. फेब्रुवारीच्या सुरुवातीला सोने 300 रुपयांनी तर चांदीत ही मोठी वाढ झाली होती. आता या किंमतीत घसरण झाली आहे.
-
ठाकरेच्या कोकण दौऱ्यावर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे रायगड रत्नागिरीचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलीय. लोकशाहीमध्ये कोणालाही कुठेही दौरा करण्याचा अधिकार आहे. पण त्यांच्या दौऱ्याला प्रतिसाद किती मिळतो आणि त्याचं रूपांतर मतांमध्ये किती होतं. त्यावर राजकीय पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये आश्चर्य ते काय? त्यांचा दौरा करून देखील रत्नागिरी आणि रायगड मध्ये खासदार महायुतीचेच असतील. दोन्ही जिल्ह्यातील आमदार देखील महायुतीचेच असतील, असं उदय सामंत म्हणालेत.
-
गणपत गायकवाड फायरिंग प्रकरणातील अपडेट्स
कल्याणमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. शिवसेना शिंदे गटाकडून फरार आरोपींना अटक करायची मागणी करण्यात येतेय. कालपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण कोळसवाडी परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्या घर कार्यालयासह शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालय बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहे.
-
अजित पवारांनी लुटला हुरडा खाण्याचा आनंद
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्म हाऊसवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हुरडा खाण्याचा आनंद लुटला. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि अजित पवार यांची मैत्री आजही तितकीच घट्ट असल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून दिलीप माने हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. दिलीप माने हे काँग्रेसचे माजी आमदार होते. मात्र 2019 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामध्ये पराभव झाल्यानंतर मात्र ते राजकारणातून अलिप्त असल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान काल अजित पवारांनी दिलीप माने यांच्या फार्म हाऊसवर जाऊन हुरडा आणि जेवणाचा आस्वाद घेतला.
-
वादग्रस्त प्रार्थनास्थळ प्रकरणी ६०० जणांवर गुन्हा
कोल्हापुरात प्रार्थनास्थळ अतिक्रमण कारवाईला विरोध केल्याप्रकरणी मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गाणी आजरेकर यांच्यासह ६०० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. शासकीय कामात अडथळा तसेच चिथावणीखोर वक्तव्य केल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे. कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्षातिर्थ वसाहतमधील वादग्रस्त प्रार्थनास्थळ अतिक्रमण करावाईला गाणी आजरेकर यांच्यासह स्थानिकांनी विरोध केला होता. विरोधामुळे बुधवारी दिवसभर कोल्हापूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती होती.
-
Live Update : पुण्यात विद्यार्थ्यांकडून सामूहिक मनोहरी सूर्यनमस्कार
पुण्यात विद्यार्थ्यांकडून सामूहिक मनोहरी सूर्यनमस्कार… पुण्यात 600 विद्यार्थ्यांनी एकत्र येतघातले मनोहारी सूर्यनमस्कार… पुण्यात आज जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन… पुण्यातील सारसबागेत पार पडलं सामूहिक सूर्यनमस्कार… सूर्यनमस्कार स्पर्धेत पुण्यातील 40 पेक्षा अधिक शाळांतून 600 विद्यार्थी सहभागी
-
Live Update : साताऱ्यातील व्याजवाडी परिसरातील घटना
साताऱ्यातील व्याजवाडी परिसरातील घटना… धोमचा उजव्या कालव्याला भगदाड… लाखो लिटर पाणी गेले वाया… एकाच महिन्यात वाई तालूक्यात दोन ठिकाणी फुटला कालवा… पाटबंधारे विभागाने केलेले कालव्यांचे सर्वेक्षणावर संशय
-
Live Update : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले याचा दुकानात घुसून तुफान राडा ..
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांचा दुकानात घुसून तुफान राडा… जागेच्या जुन्या वादातुन झाला राडा… घटनेत चार ते पाच जण जखमी …. जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टालेसह 10ते 12 जनाविरुद्ध गुन्हा दाखल..
-
Marathi News | नागपुरात दरोडा, आठ लाख लुटले
नागपुरातील फुल व्यापार करणाऱ्या दोन भावंडांच्या घरी टाकण्यात दरोडा पडला. पाच ते सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घालून शस्त्राच्या धाकावर आठ लाख रुपये लुटले. हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
-
Marathi News | भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तोडफोड प्रकरणात भाजप युवा मोर्चाच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांवर पुण्यात करण्यात गुन्हा दाखल केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असणाऱ्या ललित कला अकादमीची भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती.
-
Marathi News | पुणे विमानतळावरून वर्षभरात ८० लाख प्रवाशांचा प्रवास
पुणे विमानतळ देशातील सगळ्यात जास्त व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. पुणे विमानतळावरून वर्षभरात ८० लाख प्रवाशांनी प्रवास केला. पुणे विमानतळाची वर्षभरात 148 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
-
Marathi News | पुणे लोणावळा मार्गावर आज रेल्वेचा मेगाब्लॉक
पुणे-लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता आज मेगाब्लॉक होणार आहे. पुणे लोणावळा मार्गावरच्या आज 16 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे लोणावळा दरम्यानच्या सर्व लोकल आज दिवसभरासाठी रद्द केल्या आहेत.
Published On - Feb 04,2024 7:18 AM