Maharashtra Breaking News in Marathi : घड्याळ जरी त्याचं असलं तरी वेळ कोणाची आहे ? – अमोल कोल्हे यांचा सूचक इशारा
Maharashtra Breaking News in Marathi : आज 14 फेब्रुवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
मुंबई, दि. 14 फेब्रुवारी 2024 | राज्यसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला राज्यात वेग आला आहे. राज्यसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची मंगळवारी रात्री दोन तास बैठक झाली. या बैठकीत उमेदवारांबाबत चर्चा झाली. मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सगे सोयरेचा कायदा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरुच आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयऱ्यासंदर्भात आतापर्यंत ३० हजारापेक्षा जास्त हरकती आल्या आहेत. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
मराठा क्रांती मोर्चा आरक्षण चिंतन बैठकीला मुंबईत सुरवात
पुणे : मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीनं मुंबईत आरक्षण चिंतन बैठकीला सुरुवात झाली आहे. रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक होत आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाचे पॉवर प्रेझेंटेशन सुद्धा दिलं जाणार आहे. ओबीसी आरक्षणाविरोधात जी याचिका दाखल करण्यात आली आहे त्याची माहिती बैठकीत दिली जाणार आहे.
-
अशोक चव्हाण म्हणजे अनपेक्षित पडलेला पाऊस, उद्धव ठाकरे यांची टीका
अशोक चव्हाण म्हणजे अनपेक्षित पडलेला पाऊस आहे. मोदी महाराष्ट्रात येऊन आपण केलेल्या कामाचे उद्घाटन करताहेत. आमच्या बरोबर असणाऱ्या आमदारांना निधी दिला जात नाही हा भेदभाव केला जातोय. जुन्या केसेस काढतात काय सलुन काढताय का? आम्ही पण हमाम करू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
-
-
घड्याळ जरी त्याचं असलं तरी वेळ कोणाची आहे ? – अमोल कोल्हे यांचा सूचक इशारा
घड्याळ जरी त्यांना मिळाले असले तरी वेळ कोणाची हे महत्वाचं असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
-
आमचा गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार नाही – सुप्रिया सुळे
आमचा गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार या बातम्यांत काही तथ्य नाही असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
-
सीपीआर रुग्णालयातील साहित्य घोटाळा विरोधात ठाकरे गट आक्रमक
कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील साहित्य घोटाळा विरोधात ठाकरे गटाचा हल्लाबोल मोर्चा. शाहू स्मारक भवन परिसरातून मोर्चाला सुरुवात. सेना उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचा हल्लाबोल.
-
-
अनिल देशमुख यांनी केले मोठे भाष्य
काॅंग्रेसमध्ये विलिन होणार ही बातमी पेरण्यात आली. यात कोणताही तथ्य नाही. आम्ही विलीन होण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही तीन पक्ष मिळून एकत्र काम करू, असे अनिल देशमुख यांनी म्हटले.
-
नागपूर पोलिसांनी केली उत्तर प्रदेश मधील बंटी बबलीच्या जोडीला अटक
विशिष्ट क्लिपच्या माध्यमातून एटीएम मधून काढायचे पैसे. सीसीटीव्हीत झाला सगळा प्रकार कैद. त्यासाठी त्यांनी घेतलं होतं खास ट्रेनिंग. एकाच दिवशी दोन ते तीन एटीएममध्ये केली चोरी
-
शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील गैरहजर
शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील गैरहजर आहे. या गैरहजरीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शरद पवारांनी पुण्यात तातडीची बैठक बोलवली आहे.
-
शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे मिळालेत का? उद्धव ठाकरेंचा सवाल
“अनेक ठिकाणी फेब्रुवारीतच पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे मिळालेत का? मी काकडी विमानतळाच्या आजूबाजूला गेलो. तिथले शेतकरी म्हणाले की निळवंडेचं पाणी वेळेत मिळायला हवं होतं. ते काम का थांबलं होतं? तेव्हा कळालं की पंतप्रधानांना वेळ मिळत नाही,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीका केली.
-
गडचिरोलीत अखंडीत वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको
गडचिरोली- २४ तास अखंडीत वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांनी तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केलं. ऊर्जा मंत्र्यांनी तत्काळ घोषणा करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. उपकार्यकारी अभियंत्यांमार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही देण्यात आलंय. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज, कुरखेडा आणि कोरची या भागातील वीजकपातीच्या विरोधात हा मोर्चा होता. लोड शेडिंग ताबडतोब बंद करण्यात यावी ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे. या शेतकऱ्यांना फक्त आठ तास नियमित वीज पुरवठा होतो.
-
पुण्यात शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक
पुण्यात शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला आमदारांसह खासदारही उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
-
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा
आताच्या घडीची सर्वांत मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा आहे. शरद पवार गटाकडून अद्याप कोणताही दुजोरा नाही.
-
शरद पवारांनी महत्वाची बैठक बोलावली
लोकसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी पुण्यात बैठक बोलवली. शरद पवार लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेणार आहेत. बैठकीला खासदार सुप्रिया सुळे,रोहित पवार,अमोल कोल्हे, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत. पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या कार्यालयात बैठक सुरू आहे.
-
शेतकरी दिल्लीच्या सीमेकडे रवाना
शेतकरी दिल्लीच्या सीमेकडे निघाले. पंजाब हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर शेतकरी आणि पोलीस यांच्यामध्ये संघर्ष सुरु आहे. संघर्षात शेतकरी जखमी झालेत. हरियाणातील 7 आणि राजस्थानमधील 3 जिल्ह्यात इंटरनेट बंद आहे. 200 शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार आहे.
-
मराठा समाजाच्या हाकेला आळंदीकरांचा प्रतिसाद
मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलनं केली जातायेत याचाच भाग म्हणून मराठा समाजाने पुण्यातील देवाची आळंदी बंद ची हाक दिली. त्याला आळंदीकरांनी प्रतिसाद दिला आहे. वारकऱ्यांची मांदियाळी असणारी अलंकापुरी आज ओस पडलेली आहे.
-
उत्तर सोलापूर बंदची हाक का देण्यात आली?
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज उत्तर सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाज बांधवाकडून सोलापुरातील कोंडी गावात ही कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. गावात सकाळपासून सर्व दुकाने बंद आहेत. केवळ दुध आणि अत्यावश्यक सेवा सुरु आहेत.
-
भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत,
भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत आहे. मेधा कुलकर्णी यांना तयारी करण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. मेधा कुलकर्णी यांनी पालिकेकडे थकबाकीबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र मागितले आहे. मेधा कुलकर्णी या कोथरुड मतदारसंघाच्या भाजपच्या माजी आमदार आहेत.
-
काँग्रेस आमदारांची आज महत्वाची बैठक
काँग्रेस आमदारांची आज महत्वाची बैठक असून सर्व आमदारांनी बैठकीला उपस्थित रहावेत असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र विदर्भातील काही आमदार या बैठकीला जाणार नाहीत. श्रेयसराम कोरोटे, सुभाष धोटे, राजू पारवे यांसह काही आमदार बैठकीला जाणार नसल्याचे माहिती समोर आली आहे.
-
जालना – मराठा आंदोलकांनी टायर जाळल्याने वाहतुकीवर परिणाम
जालना-जळगाव रोडवर मराठा आंदोलकांचं टायर जालत आंदोलन. केदारखेडा येथे मराठा आंदोलकांकडून टायर जाळत निषेध करण्यात आला. आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.
-
पुणे – टिळक रस्त्यावर माजी रणजीपटू केदार भावे यांचा मोबाईल चोरट्याने पळवला
पुण्यातील टिळक रस्त्यावर माजी रणजीपटू केदार भावे यांचा मोबाईल चोरट्याने पळवला. केदार भावे हे बाजीराव रस्त्याने पायी जात असताना दुचाकी वरून आलेल्या तिघा चोरट्याने त्यांचा मोबाईल हिसकावला.
मोबाईल चोरीची तक्रार देण्यासाठी केदार भावे हे स्वारगेट पोलीस स्थानकात गेल्यानंतर पोलिसांनी त्यांना सायबर कॅफेत जाण्याचा दिला अजब सल्ला.
-
गोळीबार प्रकरणातील आरोपी गणपत गायकवाड कोर्टासमोर हजर
गोळीबार प्रकरणातील आरोपी गणपत गायकवाड उल्हासनगर कोर्टासमोर हजर झाले आहेत. मात्र न्यायालयामध्ये कोणालाही सोडत नसल्याने गणपत गायकवाड समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. न्यायालयाच्या गेट वर उल्हासनगर भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदाने यांचा पोलिसांबरोबर वाद
-
Maharashtra news | गुन्हेगार टोळी विश्रांतवाडी पोलिसांकडून गजाआड
जबर चोरी करणारी गुन्हेगार टोळी विश्रांतवाडी पोलिसांनी केली गजाआड. अनोळखी इसमांनी फेसबुकवर ओळख करून सेक्सकरिता मुलगी देतो, असे सांगून कस्तुरबा सोसायटीच्या मोकळ्या जागेत नेले. तेथे त्यास शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करून त्याचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. शिवाय फोन पे वरून एकूण 43,000 रुपये जबरदस्तीने काढून घेऊन त्याचा मोबाईल घेऊन ते पळून गेले होते
-
Maharashtra news | मराठा समाजाच्यावतीने आज अनेक ठिकाणी बंदची हाक
हिंगोलीत सकल मराठा समाजाच्यावतीने आज अनेक ठिकाणी बंदची हाक. सरकारने काढलेल्या आदेशाच कायद्यात रूपांतर व्हावे व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बंदची हाक. वसमत, सेनगाव, कळमनुरी, औंढा नागनाथ सह अनेक ठिकाणी बाजार पेठ राहणार आज बंद.
-
Maharashtra News | राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदावरून कोणाला हटवलं?
चंद्रलाल मेश्राम यांना राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदावरून हटवलं. राज्य शासनाने काढलं पत्रक. चंद्रलाल मेश्राम यांना नोटीस काढून म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाने आता ते सदस्य पदावर नाहीत पत्रक काढून दिली माहिती.
-
Maharashtra News | आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयात हजर करण्यात येणार
आमदार गणपत गायकवाड यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. परिसरात संचारबंदी आहे. न्यायालयाच्या परिसरातील वाहतुकीत बदल करत 200 मीटर पर्यंत कोणालाही न्यायालयाच्या आवारात फिरकता येणार नाही तसेच माध्यम प्रतिनिधींना देखील मज्जाव करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
-
Marathi News | सीमेलगत नक्षलग्रस्त भागात पोलीसांकडून कार्यक्रम
डोंगरदऱ्यातील सीमेलगत नक्षलग्रस्त भागात पोलीसांकडून कार्यक्रम सुरु केले आहे. मेहताखेडा’ येथे ग्रामीण महिलांचे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आदिवासी समाजामध्ये जनजागृती करण्याच्या पोलिसांच्या उद्देश आहे.
-
Marathi News | जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेची कामे रखडली
पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याच जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेची कामे रखडली आहे. १ हजार ४७८ पैकी वर्षभरात केवळ १६६ कामे पूर्ण झाली आहेत. तब्बल २०० मक्तेदारांनी कामाला मुदत वाढवून देण्याबाबत जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव दिले आहेत. मक्तेदारांना वाळू मिळण्यासह अडचणी येत आहेत.
-
Marathi News | व्हॅलेंटाईन डे, गुलाबाच्या फुलांना मागणी
व्हॅलेंटाईन डेच्या पाश्वभूमीवर गुलाबाच्या फुलांना बाजारात मागणी वाढली आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील गुलाब फुलं विदेशात विक्रीसाठी जात आहेत. विदेशातूनही फुलांना मोठी मागणी आली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांच्या दरात 20 टक्क्यांची घसरण झाली आहे. सध्या 20 फुलांच्या एका गड्डीला 150 ते 200 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. फुलांना कमी दर मिळतं असल्यानं शेतकरी निराश झाले आहेत.
-
Marathi News | बैलगाडी शर्यत जिंकणाऱ्यास फ्लॅट
महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे सांगलीच्या कासेगावमध्ये आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत बैलगाडी विजेत्याला थार गाडी आणि लाखोंचे बक्षीस देण्यात आली आहेत .मात्र कासेगावमध्ये आयोजित जयंत केसरी बैलगाडी स्पर्धेतील विजेत्यास चक्क 1 बीएचके फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.
Published On - Feb 14,2024 7:07 AM