Maharashtra Marathi Breaking News Live : बेळगावात पुन्हा कन्नड सक्ती, मराठी फलक झाकले…

| Updated on: Jan 01, 2024 | 7:02 AM

Maharashtra Breaking News Live Updates : आज 31 डिसेंबर 2023 देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Marathi Breaking News Live : बेळगावात पुन्हा कन्नड सक्ती, मराठी फलक झाकले...

मुंबई, दि. 31 डिसेंबर 2023 | बघता बघता वर्ष संपले. अनेक कडू-गोड आठवणी मागे ठेवत सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु आहे. नवीन वर्षांचे स्वागत करताना कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून राज्यात सर्वत्र पोलीस प्रशासनाने तयारी केली. मद्य प्राशन करुन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. ठिकठिकाणी बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. राज्यातील रेशन दुकानदार 1 जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. ललित पाटील घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील येरवडा कारागृहातून कैद्यांचे तळोजा कारागृहात स्थलांतर करण्यात येणार आहे. पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 जागांसाठी भरती होणार आहे. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 31 Dec 2023 04:58 PM (IST)

    बेळगावात पुन्हा कन्नड सक्ती, मराठी फलक झाकले…

    बेळगाव : कन्नड बोर्ड लावा नाही तर परवाना रद्द केला जाईल असे आदेश बेळगाव पालिका आयुक्तांनी एका पत्रकाद्रावरे जारी केले आहेत. त्यानंतर यळलूर येथील नवहिंद सोसायटीवरील फलक झाकण्यात आले. सर्वत्र कन्नड फलक लावा यासाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. मराठी बहुल बेळगाव शहरासह सीमा भागांमध्ये मराठी भाषिक व्यवसायिक सर्व भाषेमध्ये फलक लावत आहेत. मात्र, जाणूनबुजून मराठी भाषिकांना लक्ष बनवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप महाराष्ट्र एकीककरण समितीने केला.

  • 31 Dec 2023 04:52 PM (IST)

    ट्रक आणि झायलो गाडीच्या अपघातात 3 ठार 8 जखमी

    अहमदनगर : दौड महामार्गांवर कल्याणवरून नगरकडे येत असताना दुपारी 11 च्या सुमारास ट्रक आणि झायलो गाडीचा अपघात झाला. या अपघातात शेख परिवारातील शाबाज अजीज शेख (30), गाजी रउफ बांगी (13), मुलगी लुजैन शोएब शेख (13) यांचा मृत्यू झाला. तर 8 जण या अपघातात जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तींना दौंड तर काहीना श्रीगोंदा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

  • 31 Dec 2023 04:44 PM (IST)

    दापोलीत पर्यटकांनी मारला मासळी भोजनावर ताव

    दापोली – सुरमई 1 हजार रुपये प्रतिकिलो आणि बांगडा 300 प्रति किलो असताना देखील खवैय्यांनी पापलेट, सुरमईवर ताव मारला. पर्यटकांच्या मागणीसाठी हॉटेल व्यावसायिकांनी लाखो रुपयांची मासळी खरेदी केली. मासळीचे भाव वाढले असताना देखील पर्यटकांचा मासळी भोजनावर ताव मारलाय.

  • 31 Dec 2023 04:37 PM (IST)

    रावेरमध्ये सासरे – सून यांच्यात होणार लढत? काय म्हणाल्या रक्षा खडसे

    जळगाव : रावेर लोकसभेबाबत पक्षाने पुन्हा मला संधी दिली तर मी तिसऱ्यांदा खासदारकीची उमेदवार राहणार आहे. माझी तयारी आहे परंतु शेवटी पक्ष याबाबत काय निर्णय घेईल ते महत्त्वाचं असणार आहे. माझा कोणी व्यक्तिगत विरोधक नाही. माझ्याविरोध्ता कुणी उभे राहणं असेल तरी त्यांचं नवीन वर्ष सुख-समृद्धीचे जावं अशी प्रतिक्रिया रावेर लोकसभेच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

  • 31 Dec 2023 04:33 PM (IST)

    चंद्रकांत पाटील असतील आरक्षणाला पन्नास वर्षे नक्की लागतील, मनोज जरांगे पाटील यांचा टोला

    जालना : कोर्टातून भेटणारे आरक्षणाला 50 आणि 100 वर्षे लागतील आणि चंद्रकांत पाटील असतील तर पन्नास वर्षे नक्की लागतील, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला. कोर्टातून आरक्षण भेटण्यासाठी एक वर्ष लागेल आणि मागासलेपण सिद्ध करण्यासाठी ही एक वर्ष लागेल. तेच तेच पाढे वाचण्यापेक्षा मराठा आणि कुणबी एकच आहेत हे प्रमाणपत्र सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सरसकट मराठ्यांना त्या विषयामधून आरक्षण द्यावे हीच आमची मागणी आहे. आपल्याला घरी राहायचे नाही तर मुंबईला जायचे, आरक्षण मिळवायचे असेही त्यांनी सांगितले.

  • 31 Dec 2023 04:28 PM (IST)

    जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही, थांबावे लागेल – अशोक चव्हाण

    नांदेड : महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही. केंद्रिय नेतृत्वाचा निर्णय येईपर्यंत आम्हाला थांबाव लागेल. संजय राऊतांची इच्छा 23 जागेची, आंबेडकरांची 12 जागेची. पण निवडून येण्याची परिस्थिती कोणाची हेच समीकरण असणार आहे असे कॉंगेस नेते अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील बैठकीत केंद्रिय समितीने राज्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला असेही ते म्हणाले.

  • 31 Dec 2023 04:10 PM (IST)

    वर्ध्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले पदाचे राजीनामे

    वर्धा : जिल्ह्यातील देवळी तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिलेत.. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनियुक्त जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत १५ ते २० जणांनी राजीनामे दिले. दिलेले राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविले जाणार असल्याची पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली.

  • 31 Dec 2023 03:59 PM (IST)

    मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात रेव्ह पार्टीचा भांडाफोड

    ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीचा ठाणे क्राईम ब्रँच टीमने भांडाफोड केला. कासारवडवली सेंडोबा मंदिर जवळ, खाडी किनारी जागेत माती भराव टाकून, अनाधिकृत फार्म हाऊस बांधण्यात आले आहे. येथेच रेव्ह पार्टीचे आयोजन केले होते. गणेश राऊत या व्यक्तीची ही जागा आहे. तेजस कुबल आणि त्याच्या साथीदाराने या रेव्ह पार्टीचे आयोजन केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

  • 31 Dec 2023 03:30 PM (IST)

    श्रीराम मंगल अक्षता कलशाचे भव्य शोभायात्रेने पूजन

    मिरजेत अयोध्या येथून आलेल्या श्रीराम मंगल अक्षता कलशाचे भव्य शोभायात्रेने पूजन करण्यात आलं. पालखी रथ वाद्याच्या गजरात शोभायात्रा संपन्न जागोजागी फुलांची उधळून करून स्वागत केलं. पालकमंत्री यांच्या हस्ते पूजन, अक्षता मंगल कलशाचे मिरज विधानसभा क्षेत्रात वाटप करण्यात आलं.

  • 31 Dec 2023 03:15 PM (IST)

    वाळूज येथील आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, 5 लाखांची मदत जाहीर

    छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीस लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

    मध्यरात्री लागलेल्या या आगीत सहा कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

  • 31 Dec 2023 03:15 PM (IST)

    अलिबागमध्ये खवय्यांची हाॅटेलमध्ये तूफान गर्दी

    अलिबागमध्ये खवय्यांची हाॅटेलमध्ये तूफान गर्दी झालीये. अलिबागचे मासे खाण्यासाठी हाॅटेल्सला तुडूंब गर्दी ऊसळलीये. पापलेट, सुरमई, बोंबील फ्राय, खेकडा मसाला , आणि सोलकडीवर ताव मारण्यासाठी पर्यटक दिड दिड तास रांगेत उभे आहेत अ

  • 31 Dec 2023 02:55 PM (IST)

    बीड हिंसक आंदोलनात 307 आरोपींना अटक

    30 ऑक्टोंबर रोजी बीड आंदोलन हिंसक झाले होते. जाळपोळ प्रकरणात आतापर्यंत 307 आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा देखील शोध सुरू आहे.

    31 डिसेंबर च्या पूर्वसंध्येला अनुचित प्रकार घडू नये यासाठी जाळपोळ आणि इतर उपद्रवी आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 31 डिसेंबर ची खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.

    पहाटे पाच वाजेपर्यंत मद्याविक्रीची परवानगी आहे. त्यामुळे राज्य शुल्क उत्पादन विभाग आणि पोलीस यांची संयुक्त कारवाई राहणार आहे. यासाठी पोलिसांचे गस्ती पथक वाढविण्यात आले आहेत.

    2024 वर्ष विविध निवडणुकांचा आहे. त्यामुळे पोलिसांसमोर एक आव्हान राहणार आहे. त्या पद्धतीने आम्ही नियोजन केले आहे.

  • 31 Dec 2023 02:45 PM (IST)

    Live Update : ठाण्यात खाडी किनारी रेव्ह पार्टीचं आयोजन, रात्री 10 नंतर पार्टीचं आयोजन

    ठाणे येथील कासारवडवली सेंडोबा मंदिर जवळ खाडी किनारी रेव्ह पार्टी ठेवली होती. गणेश राऊत या व्यक्तीने रेव्ह पार्टीचे आयोजन केले होते. रात्री 10 च्या नंतर रेव्ह पार्टी सुरू झाली होती, पूर्ण जंगलाचा परिसर असल्याने कुणाही याची माहिती नव्हती.

    क्राईम ब्रँच युनिट 5 च्या टीमला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी रात्री 3 वाजता रेव्हा पार्टीवर छापा टाकला होता या छाप्यात 100 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात अम्लीपदार्थ साठा जप्त केला आहे.

  • 31 Dec 2023 02:30 PM (IST)

    संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटाकडे 2 लोकसभा मतदारसंघाची मागणी

    संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटाकडे 2 लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. बुलढाणा आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघावर संभाजी ब्रिगेडचा दावा केला आहे. शिवसेनेच्या कोट्यातील 2 जागा आम्हाला मिळाव्यात संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. पुरुषोत्तम खेडेकरसह संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

  • 31 Dec 2023 02:01 PM (IST)

    संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटाकडे 2 लोकसभा मतदारसंघाची मागणी

    बुलढाणा आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघावर संभाजी ब्रिगेडने दावा केला असून शिवसेनेच्या कोट्यातील 2 जागा आपल्याला मिळाव्यात अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. पुरुषोत्तम खेडेकरसह संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

  • 31 Dec 2023 01:50 PM (IST)

    पाणबुडी प्रकल्प कोकणातून गेलेला नाही – दीपक केसरकर

    सिंधुदुर्गमध्ये निश्चितपणे पाणबुडीचा प्रकल्प होणार आहे. 2018 मध्ये महाराष्ट्राचा प्रकल्प बघून केरळ आणि गुजरातने प्रकल्प बुक केला आहे. आपल्या राज्यात ऍक्टीव्हिटी करण्याचा त्यांचा अधिकार आहे. याचा अर्थ महाराष्ट्राचा प्रकल्प बाहेर गेला असा बिलकुल नाही असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

  • 31 Dec 2023 01:36 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांची राज्यावरील पकड सुटत चालली – विजय वडेट्टीवार

    अमली पदार्थ ड्रगमुळे राज्य बुडत चाललं आहे. महाराष्ट्रात कायदा सुवस्था बिघडली आहे. गुटखा तंबाखू विकला जात आहे. रेव्ह पार्टी खुलेआम सुरू आहे. त्याकडे लक्ष नाही.देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री असताना जी पकड होती ती पकड उपमुख्यमंत्री झाल्यापासून सुटत चालली आहे अशी टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

  • 31 Dec 2023 01:20 PM (IST)

    मुंबई ट्रान्सहार्बर लिंक ब्रिजचे लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन – मुख्यमंत्री

    मुंबई ट्रान्सहार्बर लिंक समुद्रातील सर्वात मोठा 22 किमीचा ब्रिज असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार असून त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

  • 31 Dec 2023 12:59 PM (IST)

    विविध रंगांनी फुलला अलीबागचा समुद्र किनारा

    वर्षाच्या स्वागतासाठी अलीबाग बीचवर अनेक कुटूंब दाखल झाले आहेत. स्पोर्ट कार चालवणार्यांसाठी रोजगाराची सुरर्ण संधी.

  • 31 Dec 2023 12:42 PM (IST)

    एकनाथ शिंदे यांनी केले मोठे आवाहन

    आमदार कालिदास कोळमकर कार्यक्रमात आवाज आला नाही म्हणून मी स्वतः इथे आलो. हे अभियान लोकचळवळ झाली पाहिजे. खड्डे मुक्त व प्रदूषण मुक्त मुंबई करण्यासाठी सर्व शामिल व्हा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 31 Dec 2023 12:31 PM (IST)

    राजकारणात कितीही आव्हान आले तरी ती पेलण्याची सवय आम्हाला- रवी राणा

    राजकारणात कितीही आव्हान आले तरी ती पेलण्याची सवय आम्हाला आहे. नेहमी निवडणुकीमध्ये रवी राणा विरुद्ध सर्वे नेते ही भूमिका असते पण मी त्याची पर्वा करत नाही. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर राज्यातील महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होणार आहे, असे आमदार रवी राणा यांनी म्हटले.

  • 31 Dec 2023 12:22 PM (IST)

    नवनीत राणा यांचे मोठे विधान

    राम मंदिराचे उटघाटन आणि इंडिया आघाडीमध्ये मोठा स्फोट हे एकाच वेळी होणार आहे. अनेक पक्ष हे मोदींना पाठिंबा देतील. खासदार नवनीत राणांचा दावा

  • 31 Dec 2023 12:05 PM (IST)

    राम मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी

    नवीन मंदिराच काम जोरात सुरू आहे. जुन्या मंदिरात जाण्यासाठी तपासणी करूनच भाविकांना सोडण्यात येतंय. मात्र मंदिराकडे जाणारा रस्ता घाट सुशोभिकरणाच काम सुरू आहे. राम मंदिर परिसराला गर्दीच स्वरूप प्राप्त झालाय.

  • 31 Dec 2023 11:55 AM (IST)

    Live Update : अयोध्येत नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मिठाईची दुकान सजली

    अयोध्येत नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मिठाईची दुकान सजली आहेत. मोठ्या प्रमाणावर भाविक आल्याने व्यापारी वर्गात आनंदाच वातावरण आहे. रामाला आणि हनुमानाला लाडूचा प्रसाद आवडतो अशी इथल्या व्यापाऱ्यांची भावना आहे.

  • 31 Dec 2023 11:45 AM (IST)

    Live Update : नवीन वर्षाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात दाखल

    नवीन वर्षाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत. लोणावळ्यात पर्यटक वाढल्याने जुन्या मुंबई-पुणे महामार्गवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर कुमार चौक ते पोलीस उपविभागीय अधिकारी चौकापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. लोणावळा पोलिसांकडून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न सूरु

  • 31 Dec 2023 11:35 AM (IST)

    Live Update : अलिबाग येथे नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी

    अलिबाग याठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी झाली आहे. अलिबागकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर वाहतूक कोंडी झाली आहे. पुणे , ठाणे, नवी मुंबई, पेण, रायगड आणि आसपासच्या जिल्ह्यातील पर्यटक अलिबागमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

  • 31 Dec 2023 11:25 AM (IST)

    Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महास्वच्छता अभियानचा आढावा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई महानगरच्या सवारी गाडीतून गेट ऑफ इंडिया परिसराची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांना पाहून नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह वाढला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या महास्वच्छता अभियान गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला आहे.

  • 31 Dec 2023 11:09 AM (IST)

    Live Update : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पुणेकर सज्ज

    2023 ला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, तसेच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर पुणेकरांची मोठी गर्दी होते. यापार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने आज संध्याकाळी पाचनंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतुकीत बदल केले आहेत. पुण्यातील एफ सी रोड, जे एम रोड आणि एम जी रोड हे सोयीनुसार संध्याकाळी 5 नंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. वाहतूक कोंडीचा त्रास सामान्य पुणेकरांना होऊ नये तसेच सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हे रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत.

  • 31 Dec 2023 10:56 AM (IST)

    एक कोटींचे ड्रग्ज पकडले

    अंमली पदार्थ विरोधी पथकाने नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला १ करोड ४७ लाखांचे ड्रग्ज पकडल्याने वसई विरार नालासोपार परिसरात खळबळ माजली आहे. या पथकाने नालासोपाऱ्याच्या प्रगती नगर परिसरात ही कारवाई करून दोन नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे.दिवाईन चुकवूमेका आणि चिकवु फ्रेडिंनंद ओकीतो नवमारी असे अटक नायजरियन आरोपीचे नावे आहेत. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडील १ करोड १० लाख ८८ हजार रुपये किंमतीचा ५५४.४ ग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन व ३६ लाख १२ हजार रुपये किंमतीचे १२०.४ ग्रॅम वजनाचे कोकेन असा एकुण १ करोड ४७ लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे.

  • 31 Dec 2023 10:51 AM (IST)

    सतेज पाटील यांचा हल्लाबोल

    काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला. हे येणार नवीन वर्ष देशासाठी महत्त्वाचं असणार आहे. घटनेच्या आधारावर देश चालतो मात्र ही घटनाच आता बाजूला ठेवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. बेरोजगारी, महागाई अशा मुद्द्यांवर लोक या नवीन वर्षात विचार करतील अशी आशा आहे. भाजप नको म्हणून 60 ते 63% मत मागच्या वेळी पडली होती, ही मतं एकत्र करण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र आली आहे. सामुदायिक नेतृत्वातून हीइंडिया आघाडी पुढे येत आहे. लोक निवडणुकांची वाट पाहत आहेत, महाराष्ट्रात जे सत्तांतर घडलं हे लोकांना मान्य नसल्याचा आरोप त्यांनी केला.

  • 31 Dec 2023 10:44 AM (IST)

    वाळूचा ढिगारा कोसळल्याने तरुणाचा मृत्यू

    सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील खंडनाळ येथे वाळू चोरी करताना तरुणाच्या अंगावर वाळूचा ढिगारा कोसळला. त्यात त्या तरुणाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सचिन सयाप्पा कुलाळ असे मृत तरुणाचे नाव आहे.जत मधील बोर नदीपात्रात ही घटना घडली आहे. यामध्ये एक जण जखमी झाला.यामध्ये संशयित आरोपी सुरेश टेंगले, बिरुदेव टेंगल या दोघांविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • 31 Dec 2023 10:38 AM (IST)

    गोखले ओव्हरब्रिजचा पहिला गर्डर पुढील वर्षाच्या सुरुवातीला बसणार

    गोखले ओव्हरब्रिजचा पहिला गर्डर पुढील वर्षाच्या सुरुवातीला बसणार आहे. पहिला गर्डर टाकल्यानंतर, वाहनांच्या वाहतुकीसाठी पुलावरील डांबरी रस्ते तयार करण्याचे अंतिम काम बीएमसी हाती घेणार आहे. बांधकामाधीन गोखले रेल्वे ओव्हरब्रिजचा पहिला गर्डर पुढील वर्षीच्या सुरुवातीला खाली उतरवला जाणार आहे, अशी माहिती BMC अधिकाऱ्याने दिली आहे. ही प्रक्रिया 1 आणि 2 जानेवारीच्या मध्यरात्री होईल.गर्डर खाली करणे म्हणजे पुलाला आधार देणाऱ्या खांबांवर अधिरचना ठेवण्याची प्रक्रिया होय. गर्डर लॉन्चिंगचा हा अंतिम टप्पा आहे.1 ते 2 जानेवारी दरम्यान गर्डर खाली करण्यासाठी अंतिम मंजुरी मिळवण्यासाठी सर्व प्रकल्प योजनांची ब्लू प्रिंट आणि कागदपत्रे 29 डिसेंबर रोजी रेल्वे अधिकाऱ्यांना सादर करण्यात आली आहेत.

  • 31 Dec 2023 10:26 AM (IST)

    अर्बन फॉरेस्ट तयार करणार

    राज्यात महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. वृक्षारोपण करण्यासाठी आयुक्तांना आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील प्रदुषण कमी करण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात येत आहे. मुंबईत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. अर्बन फॉरेट तयार करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  • 31 Dec 2023 10:21 AM (IST)

    रेव्ह पार्टीवर छापा

    नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकून मोठी कारवाई केली. ठाण्याच्या घोडबंदर रोड वरील कासार वडवली गावात या रेव्ह पार्टीचे रात्री आयोजन केले होते. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्राईम ब्रँच 5 च्या टीम ने छापा टाकून ही कारवाई केली. यामध्ये 95 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यात 5 मुलींचा ही समावेश असल्याचे समोर आले आहे. या रेव्ह पार्टीत ड्रग्स, एल एस डी, गांजा, चरस, दारू या अम्लीपदार्थ चे सेवन करून, डीजेच्या तालावर नशेबाज तरुण थिरकत होते. क्राईम ब्रँच टीम ला याची माहिती मिळाल्या नंतर मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून सर्वाना ताब्यात घेतले आहे.

  • 31 Dec 2023 10:13 AM (IST)

    पाच लाख पर्यंटक समुद्रकिनारी

    थर्टी फस्टची सेलिब्रेशनची आतुरता शिगेला पोहचली आहे. मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरीत जय्यत तयारी सुरु आहे. कोकणातील पाच लाख पर्यटक समुद्रकिनारी येतील.थीम पार्टीचे विशेष आकर्षण, डेस्टिनेशन सेलिब्रेशनलाचा उत्साह शिगेला पोहचला आहे.

  • 31 Dec 2023 10:05 AM (IST)

    आमदार-खासदारांचा भाव वाढवला

    या दीड वर्षात नगरसेवक, आमदार, खासदार यांना फोडून भाव वाढविण्यात आल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केले. शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव कधी वाढवणारा असा खोचक सवाल त्यांनी केला. परदेशी गुंतवणुकीची आकडेवारी खोटी असल्याचा आरोप त्यांनी केला. आतापर्यंत 17 प्रकल्प राज्याबाहेर पळविण्यात आली आहे. गुजरातसाठी केंद्र सरकारची वाटमारी सुरु असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.

  • 31 Dec 2023 10:02 AM (IST)

    मराठा समाजाच्या सर्वेक्षणाबाबत महत्वाचा निर्णय

    मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याच्या कामकाजाला वेग आला आहे. आज सर्वेक्षणबाबत महत्वाचा निर्णय होणार आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे महत्वाची बैठक घेतील. राज्यातील विभागीय आयुक्त,सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांची आज दुपारी 3 वाजता महत्वाची बैठक होत आहे. शासकीय यंत्रणामार्फत मराठा समाजाचे सर्वेक्षण, अप्लिकेशन व सॉफ्टवेअर तयार करणार आहेत. जानेवारी महिन्यात हे सर्वेक्षण सुरु होणार असुन 15 दिवसात हे पुर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सर्वेक्षणसाठी नेमलेले नोडल अधिकारी,अधिकारी तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक याची गावनिहाय व लोकसंख्या निहाय माहिती आयोगाला सादर करतील.

  • 31 Dec 2023 09:57 AM (IST)

    अयोध्येतील हनुमान गढीवर भाविकांची गर्दी

    अयोध्येतील हनुमान गढीवर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.  नवीन वर्षाची सुरूवात दर्शनाने करावी या भावनेने मोठ्या प्रमाणावर भक्त दाखल झालेत.  २२ जानेवरील राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे.  मात्र त्या आधी अयोध्येत भाविकांची गर्दी पाहायला मिळतं आहे.

  • 31 Dec 2023 09:45 AM (IST)

    कुणबी नोंदींचा अंतिम अहवाल न्या. शिंदे समितीकडे सादर 

    चंद्रपूर जिल्ह्यातील कुणबी, मराठा- कुणबी आणि कुणबी-मराठा जातीच्या नोंदी शोधण्याची मोहीम पूर्ण झाली आहे.  जिल्हा समितीने तब्बल १४ लाख ५३ हजार ५४३ नोंदीची तपासणी केली. त्यामध्ये मराठा-कुणबी ११ आणि कुणबी-मराठा ४ अशा एकूण १५ नोंदी आढळून आल्या. तर कुणबी नोंदीची संख्या एक लाख ६९ हजार ३९२ आढळली. जिल्हा समितीने हा अंतिम अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत न्या. शिंदे समितीकडे सादर केला आहे.

  • 31 Dec 2023 09:30 AM (IST)

    मटनाच्या दुकानात गर्दी

    कोल्हापूरकरांसाठी थर्टी फर्स्ट आणि रविवार असा दुहेरी योग आल्याने दुहेरी योगसाधक मटन खरेदीसाठी कोल्हापूरकरांची गर्दी पाहायला मिळतेय. चिकन-मटन मार्केट सह फिश मार्केट ही हाउसफुल झाली आहेत.  आज मटणाचे दर 680 रुपयांवर आहेत.  थर्टी फर्स्टच्या निमित्ताने तांबडा पांढरा रस्यावर ताव मारण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज आहेत.

  • 31 Dec 2023 09:15 AM (IST)

    शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी

    सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. साई नामाच्या जयघोषाने साई नगरी दुमदुमून गेलीय. सलग आलेल्या सुट्यांमुळे मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाल्याने शिर्डी हाऊफुल्ल झाली आहे. संभाव्य गर्दी पाहता आज रात्रभर साई मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. सकाळपासून भाविकांची साईदर्शनासाठी मांदियाळी पाहायला मिळतेय.

  • 31 Dec 2023 08:56 AM (IST)

    Maharashtra News : नागपूरला 800 कोटी रूपयांचा डीपीडीसीचा निधी

    नागपूरला 800 कोटी रूपयांचा डीपीडीसीचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी 15 फेब्रुवारीपर्यंत खर्च करण्याचं अधिकाऱ्यांसमोर आव्हान असणार आहे. काही निधी अजुनही विभागाकडे वळता झालेला नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

  • 31 Dec 2023 08:51 AM (IST)

    Maharashtra News : वर्धेतील सामाजिक संस्थेतील पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार

    वर्धेतील सामाजिक संस्थेतील पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. आज दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

  • 31 Dec 2023 08:47 AM (IST)

    Maharashtra News : हवा तेज चल रही है, अजितराव टोपी उड जायेगी- संजय राऊत

    हवा तेज चल रही है, अजितराव टोपी उड जायेगी असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांना टोला लगावला. भाषणाच्यावेळी संजय राऊत यांनी अजित पवारांची नक्कलही केली.

  • 31 Dec 2023 08:42 AM (IST)

    Maharashtra News : पुण्यात प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची भेट झाल्याची शक्यता

    पुण्यात प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची भेट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्याच्या मोदी बागेत प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची भेट झाल्याच्या बातमीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे. तर दुसरीकडे शरद पवारांना भेटण्यासाठी मी गेलो नाही असं प्रकाश आंबेडकर सांगत आहेत.

  • 31 Dec 2023 08:28 AM (IST)

    Maharashtra News : साईंच्या दर्शनासाठी भाविकांची शिर्डीत गर्दी

    नवीन वर्षा निमित्त भाविकांनी शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी भाविक दर्शनाला आले आहेत. त्यामुळे मंदिर रात्रभर खुलं राहाणार आहे.

  • 31 Dec 2023 08:23 AM (IST)

    Maharashtra News : संभाजीनगरमधील कंपनीला आग

    संभाजीनगरच्या वाळूज MIDC मधील कंपनीला भीषण आग लागच्याची माहिती समोर आली आहे. ही कंपनी हँडग्लोव्हज बनवण्याचे काम करते. या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

  • 31 Dec 2023 08:12 AM (IST)

    Maharashtra News : सारंखेडाच्या घोडे बाजारात विक्रमी उलाढाल

    रारंखेडा येथे भरणारा घोड्यांचा बाजार हा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. यंदा या बाजारात विक्रमी उलाढाल झाली आहे. तब्बल दोन कोटी रूपयांची उलाढाल झाल्याची माहिती आहे.

  • 31 Dec 2023 07:58 AM (IST)

    Marathi News | ‘झेडपी’च्या 4 हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या

    राज्यातील ‘झेडपी’च्या 4 हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना रात्री उशिरा बदली आदेश ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यात आला आहे.

  • 31 Dec 2023 07:46 AM (IST)

    Marathi News | भीमा कोरेगाव जाणाऱ्यांसाठी पार्किंग

    कोरेगाव भीमा येथे जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या अनुयायांना जाण्याचा मार्ग, वाहनांच्या पार्किंगची सुविधा एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ‘जयस्तंभ गाइड -२०२४’ च्या लिंकचे अनावरण पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

  • 31 Dec 2023 07:33 AM (IST)

    Marathi News | येरवडा कारागृहातून कैद्यांचे स्थलांतर

    पुणे येथील येरवडा कारागृहातून कैद्यांचे तळोजा कारागृहात स्थलांतर करण्यात येणार आहे. येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या 20 कैद्यांना तळोजा जेलला हलवण्यात येणार आहे. येरवडा कारागृहाच्या सुरक्षेसाठी कारागृह प्रशासनाकडून हे पाऊल उचलले आहे.

  • 31 Dec 2023 07:20 AM (IST)

    Marathi News | राज्यातील रेशन दुकानदार संपावर

    राज्यातील रेशन दुकानदार 1 जानेवारीपासून बेमुदत संप जाणार आहेत. रेशन दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने हा संप पुकारला आहे.

Published On - Dec 31,2023 7:23 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.