Maharashtra Marathi Breaking News Live : पेट्रोल भरण्यासाठी पंपावर लोकांची तुफान गर्दी

| Updated on: Jan 02, 2024 | 7:15 AM

Maharashtra Breaking News Live Updates : आज 1 जानेवारी 2024 देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Marathi Breaking News Live : पेट्रोल भरण्यासाठी पंपावर लोकांची तुफान गर्दी

मुंबई, दि. 1 जानेवारी 2024 | नवीन वर्षाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले. नवीन वर्ष आता निवडणुकांचे वर्ष असणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका यावर्षात होणार आहे. शिर्डी, पंढरपूर येथे भाविकांनी दर्शन घेऊन नववर्षाचे स्वागत केले. नववर्षामुळे अनेक मंदिरे रात्रभर खुली होती. पुणे येथील कोरेगाव भीमा येथे 206 व्या शौर्य दिनाच्या निमित्ताने रात्री 12 वाजता विजय स्तंभावर फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. रात्रीपासूनच मोठ्या संख्येने भीम अनुयायी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी कोरेगाव भीमा येथे दाखल झाले. शारजा येथून आणलेली दोन किलो सोन्याची पेस्ट नागपूर विमानतळवर जप्त करण्यात आली. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Jan 2024 08:42 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलचा स्टॉक संपला

    वाशिम : जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जिल्ह्यातील 150 पैकी अनेक पेट्रोल पंपावरील पेट्रोल डिझेल चा स्टॉक संपला आहे. नवीन वर्षात पेट्रोल ,डिझेल चे दर कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने अनेक पंप चालकांनी पेट्रोल,डिझेल खरेदी न केल्याने अनेकांकडे कमी स्टॉक होता. त्यातच उद्या पासून केंद्र सरकारच्या नवीन वाहन चालक नियमा विरोधात देशभरातील वाहन चालक संप पुकारणार असल्याने पेट्रोल,डिझेलचे टँकर येणार नाहीत. त्यामुळे ही अनेक पेट्रोल पंपावर वाहनचालकांची गर्दी झाली आहे.

  • 01 Jan 2024 08:27 PM (IST)

    पुण्यात उद्या पेट्रोल पंप सुरु राहणार, असोसिएशन कडून खुलासा

    पुण्यात उद्या पेट्रोल पंप बंद राहणार नाहीत. उद्याचा पेट्रोल पंप बंदरावर पेट्रोल डिझेल असोसिएशन कडून खुलासा करण्यात आला आहे. पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातील देखील सर्व पेट्रोल पंप सुरळीत चालू राहणार आहेत. पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या बैठकीत एकत्रितरित्या निर्णय घेण्यात आला. पुणे शहरात पेट्रोल पंप सुरळीत सुरू राहणार आहेत. राज्यव्यापी संपामध्ये पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी होणार नाही.

  • 01 Jan 2024 08:16 PM (IST)

    धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल पंपावर गर्दी, लांबच लांब रांगा

    धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल पंपावर गर्दी होत असुन तुळजापूर येथील पंपावर दुचाकींच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. लोक आपल्या दुचाकी व चारचाकी घेऊन पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी गर्दी करत आहेत.

  • 01 Jan 2024 07:49 PM (IST)

    पेट्रोल भरण्यासाठी संभाजीनगरात पेट्रोल पंपावर तुफान गर्दी

    उद्या पेट्रोल पंप बंद राहणार असल्यामुळे पेट्रोलपंपावर तुफान गर्दी झाली आहे. पेट्रोल पंप परिसरात ट्रॅफिक जॅम झालेले पाहायला मिळत आहे.

  • 01 Jan 2024 07:01 PM (IST)

    हसन मुश्रीफ यांच्या नावाने अज्ञातांनी बनवलं बनावट फेसबुक अकाउंट

    कोल्हापूर | मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावाने अज्ञातांनी बनावट फेसबुक अकाउंट उघडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  या बनावट फेसबुक अकाउंटवर मंत्री मुश्रीफ यांच्या मूळ फेसबुक अकाउंटच्या नकलेसह मजकूर फोटो आणि व्हिडिओची देखील कॉपी करण्यात आली आहे. या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 01 Jan 2024 05:52 PM (IST)

    21 डिसेंबर रोजी मंजूर झालेल्या विधेयकांविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज

    फौजदारी कायद्यासंदर्भात 21 डिसेंबर रोजी मंजूर झालेल्या तीन विधेयकांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. अधिवक्ता विशाल तिवारी यांनी हा अर्ज दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता, पुरावा कायदा यासह तीन विधेयके विनाचर्चा मंजूर करण्याविरोधात अर्ज दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.

  • 01 Jan 2024 05:35 PM (IST)

    22 जानेवारीनंतर अयोध्येला जा, तुम्हाला त्रेतायुग आठवेल: मुख्यमंत्री योगी

    मथुरा येथे तीन दिवसीय षष्ठीपूर्ती महोत्सवाला संबोधित करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, पूर्वी अयोध्येच्या संरचनेत रस्ते, एकच रेल्वे लाईन आणि त्यावरून अधूनमधून गाड्या धावत असत. आज अयोध्येत तुम्हाला 4 आणि 6 लेनचे रस्ते पाहायला मिळतील. 22 जानेवारीनंतर अयोध्येला जा, तुम्हाला त्रेतायुग आठवेल.

  • 01 Jan 2024 05:22 PM (IST)

    आम आदमी पार्टी 4 ते 10 जानेवारी दरम्यान दिल्लीतील जनतेशी संवाद साधणार

    ईडीच्या नोटिशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक झाली तर त्यांनी राजीनामा द्यायचा की तुरुंगातून सरकार चालवायचे? जाणून घेण्यासाठी आम आदमी पार्टी 4 ते 10 जानेवारी दरम्यान दिल्लीत जनसंवाद घेणार आहे.

  • 01 Jan 2024 05:07 PM (IST)

    अडीच वर्षांची मुलगी बोअरवेलमध्ये पडली

    गुजरातमधील देवभूमी द्वारका येथील कल्याणपूर तालुक्यातील रान गावात एक अडीच वर्षांची मुलगी बोअरवेलमध्ये पडली आहे. मुलीला वाचवण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

  • 01 Jan 2024 04:48 PM (IST)

    शिवसेना कार्यालयाच्या जागेवर दोन्ही गटाकडून दावा, कार्यकर्ते आमनेसामने

    सांगली | मिरजेत ठाकरे आणि शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांना भिडले आहेत. शिवसेना कार्यालयाच्या जागेवर दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला. यातून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांच्या अंगावर धावून धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला आहे. या सर्व प्रकाराची जिल्ह्यासह राज्यात चर्चा रंगली आहे.

  • 01 Jan 2024 04:23 PM (IST)

    बीडमध्ये ओबीसींच्या बैठकीत ठराव

    बीड | मंत्री छगन भुजबळ यांची 13 जानेवारी रोजी बीडमध्ये सभा होणार आहे. बीडमध्ये ओबीसींच्या बैठकीत ठराव झाला आहे. त्यानुसार 13 जानेवारी रोजी चार वाजता होणार सभा होणार आहे. मात्र अद्याप सभास्थळ ठरलेलं नाही. सभेचं स्थळ हे 2 जानेवारी रोजी ठरणार आहे.याबाबतती माहिती समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राउत यांनी दिली.

  • 01 Jan 2024 04:16 PM (IST)

    बुलडाण्यात कोरोनाची एन्ट्री, जिल्ह्यात खळबळ

    बुलडाणा | बुलडाण्यात कोरोनाची एन्ट्री झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चिखली शहरातील आरोग्य कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण झाली आहे. JN.1 व्हेरिएंट तपासणीसाठी नागपूरला स्वॅब पाठवणार असल्याची माहिती आरोग्य विभगाने दिली आहे. लक्षणे जाणवल्याने 48 वर्षीय कर्मचाऱ्याने कोरोना रॅपिड टेस्ट केली. तपासणी दरम्यान कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला. जिल्हयात आतापर्यंत 74 जणांची आरटीपीसीआर आणि 1 हजार 136 जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली आहे.

  • 01 Jan 2024 04:09 PM (IST)

    Chandrakant Patil Sarthi | चंद्रकांत पाटील यांनी सारथी परीक्षा संदर्भात बोलावली बैठक

    पुणे | चंद्रकांत पाटील पुढील आठवड्यात महत्त्वाची बैठक घेणार आहेत. फेलोशिप परीक्षेबाबत बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सारथी विद्यार्थ्यांची फेलोशिप परीक्षेचा पेपर रद्द करण्यात यावा, अशी मागणी होती. मात्र सारथीची परीक्षा 10 जानेवारी रोजी नियोजित असून विद्यार्थ्यांचा मात्र या परीक्षेला मोठा विरोध आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी सारथीच्या कार्यालयाबाहेर आंदोलनही केलं. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत यावर नक्की काय तोडगा निघतो, याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागून आहे.

  • 01 Jan 2024 04:00 PM (IST)

    एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली जळगावमध्ये ठिय्या आंदोलन

    जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील घरकुल योजना, रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. त्याचा निषेध करतानाचा विविध समस्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक पक्षातर्फे पंचायत समिति कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

  • 01 Jan 2024 03:50 PM (IST)

    काशी मंदिर आणि मथुरा यांचाही विवाद संपवला पाहिजे, मुस्लीम समाजाची भावना

    अयोध्या : 22 तारखेला रामलला विराजमान होणार आहे. हर घर मध्ये मुस्लिम समाज दीपोत्सव करणार. आम्ही लोकांना आवाहन करतो भगवान येणार आहे त्या दिवशी मुस्लिम समाज पाच दीप आपल्या घरासमोर लावा. योगी आणि मोदीजी यांनी मुस्लिम समाजासाठी भरपूर काही दिले आहे. याआधी सरकार आली आणि गेली. त्यांनी मुस्लिम समाजासाठी काही केले नाही. काशी मंदिर आणि मथुरा यांचाही विवाद संपवला पाहिजे असे मत अयोध्या येथील जिल्हा पंचायत सदस्य बबलू खान यांनी व्यक्त केले.

  • 01 Jan 2024 03:45 PM (IST)

    प्रत्येक जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार होणार, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

    नागपूर : जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. मागील वर्षाचा आढावा घेऊन नवीन वर्षासंदर्भात चर्चा केली. खर्चाची परिस्थिती समाधान कारक आहे. रस्त्यासंदर्भात नवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार करण्याचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM त्यांच्यासोबत तयार करण्यात आला आहे. त्याचा प्रेझेंटेशन झालेलं असून लवकरच त्या संदर्भात त्या कमेंट्स घेऊन त्याला देखील मान्यता दिली जाणार आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

  • 01 Jan 2024 03:40 PM (IST)

    आरएसएस कार्यकर्त्यांनी दिल्या वडेट्टीवार यांना राम मंदिराच्या अक्षता

    नागपूर : भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना नागपुरातील रामदासपेठ निवासस्थानी राम मंदिराच्या अक्षता दिल्या. राम हृदयात असला पाहिजे. मात्र, भाजप आणि संघाच्या राजकारणात राम आणल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

  • 01 Jan 2024 03:30 PM (IST)

    हलगीच्या कडकडाटात बीडमध्ये ठेवीदारांचे आंदोलन

    बीड : येथील मां साहेब, जिजाऊ, साईनाथ अर्बन यासह इतर पतसंस्था आर्थिक संकटात आल्या आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. या ठेवी परत मिळाव्या या मागणीसाठी पतसंस्थांच्या दारात ठेवीदारांनी हलगीच्या कडकडाटात आंदोलन केलं. ठेवीदारांनी जोरदार घोषणाबाजी करत ठेवी परत द्या अशी मागणी केली.

  • 01 Jan 2024 03:25 PM (IST)

    चंद्रपुरात युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी दूध वितरण करून जनजागृती

    चंद्रपुर : पूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेच्या वतीने नववर्ष दिनानिमित्त दूध वितरण करण्यात आले. युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कार्यक्रमाला हजेरी लावत व्यसनमुक्त समाजाची गरज व्यक्त केली.

  • 01 Jan 2024 03:18 PM (IST)

    परभणी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांकडून काम बंद आंदोलन

    परभणी : केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेत निष्काळजीपणा केल्याचा कारणावरून परभणी जिल्हा परिषदेच्या 5 कर्मचाऱ्यांना जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी निलंबित केले होते. या कारवाई विरोधात जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांकडून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

  • 01 Jan 2024 03:09 PM (IST)

    अयोध्येत बनतायेत राम लल्लाचे अंगवस्त्र बनविण्याचे काम सुरु

    अयोध्या : अयोध्येमधील राम मंदिरात विराजमान होणाऱ्या राम लल्लाचे अंगवस्त्र बनविण्याची तयारी सुरु आहे. भागवत प्रसाद पहाडी हे टेलर राम लल्लाचा पोशाख बनवणार आहेत. राम लल्लासाठी ७ रंगाचे पोशाख बनवले जाणार आहेत. मात्र, नवीन मुर्तीसाठी अजून पोशाख बनविण्यात आलेला नाही. मंदिर ट्रस्टकडून निर्णय कळवल्यावर पोशाख तयार होणार आहे.

  • 01 Jan 2024 03:02 PM (IST)

    मोटार वाहन कायद्याला विरोध, देशभरातील ट्रक चालक संपावर

    नवी मुंबई : केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित केला आहे. यानुसार अपघातास जबाबदार ट्रक चालकास सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. याच कायद्याला विरोध म्हणून आजपासून महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच ट्रक चालक संपावर गेले आहेत. आज पासून तीन दिवसांचा संप आहे. त्याचाच परिणाम म्हणून ट्रक चालक रस्त्यावर उतरले असून रस्ता रोको केला आहे.

  • 01 Jan 2024 02:57 PM (IST)

    एक दुसऱ्याच्या मानेवर बसण्याची गद्दारांची सुरवात झाली, खासदार विनायक राऊत यांची टीका

    रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी सुचक वक्तव्य केलंय. आत्ता गद्दार हे एक दुसऱ्याच्या मानेवरती बसणारच आहे पण त्याचीही सुरुवात झालेली आहे अशी टीकाही त्यांनी केली. महाविकास आघाडी करून जो उमेदवार असेल तो आम्ही अडीच लाख मताच्या फरकाने निवडून आणू हा माझा शब्द आहे, असेही ते म्हणाले.

  • 01 Jan 2024 02:52 PM (IST)

    गिरीश महाजन यांचा नव्या वर्षाचा संकल्प काय ? म्हणाले राम मंदिर आणि…

    जळगाव : नव्या वर्षाचे स्वागत करत असताना काही नाव संकल्प केला नाही. आमचा आता एकच संकल्प आहे तो म्हणजे फक्त राम मंदिर आणि पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. याशिवाय नवीन वर्षाचा दुसरा कोणता संकल्प नाही, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

  • 01 Jan 2024 02:46 PM (IST)

    वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सरकारने टाळाव्या – विजय वडेट्टीवार

    नागपूर : सरकारने कुठल्याही पोस्टवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना त्या संदर्भातली माहिती घेऊन करावी. रश्मी शुक्लाची नियुक्ती होणार असं ऐकत आहे. त्यामुळे मी अधिक त्यावर भाष्य करणार नाही. न्यायालयाने क्लीन चिट दिल्याची माहिती सर्वत्र सांगितली जात आहे. अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सरकारने टाळाव्यात. जरी त्यांना अधिकार असले तरी आरोप प्रत्यारोप असतील तर ते टाळलेले बर असं माझं मत असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

  • 01 Jan 2024 01:47 PM (IST)

    जातनिहाय जनगणनेसाठी परभणीत मोर्चा

    बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी परभणीत जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला आहे. मराठा, ओबीसी बांधवांचा मोर्चात सहभाग झाले आहेत. जनगणना करण्याच्या मागणीसाठी हा राज्यातील पहिला मोर्चा आहे. महात्मा फुले यांच्या पुतळापरिसरातून जिल्हा कचेरीवर हा मोर्चा काढला आहे.

  • 01 Jan 2024 01:35 PM (IST)

    संभाजीनगर जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

    छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवून देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. हजारो अंगणवाडी सेविका आंदोलनात सहभागी आहेत. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत आहेत.

  • 01 Jan 2024 01:17 PM (IST)

    अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहनचालकांचे आंदोलन

    अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने वाहन चालक एकत्र जमले आहेत. जिल्हा मोटार वाहक आणि मालवाहतूक असोसिएशन संघटनेने आंदोलन केले आहे. हिट अँड रन प्रकरणातील प्रस्तावित कायद्या बद्दल वाहन चालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या कायद्याचा वाहन चालकांनी निषेध केला आहे.

  • 01 Jan 2024 12:58 PM (IST)

    तातडीने कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणी 

    ८ जानेवारीपासून शेतकरी संपावार जाणार आहेत.  शेतकरी संघर्ष समितीचा नाशिक येथील बैठकीत निर्णय. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या होणार अडचणीत वाढ. तातडीने कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणी

  • 01 Jan 2024 12:31 PM (IST)

    जिल्हाभरातून हजारो भाविक अंबादेवीच्या दर्शनाला

    नवीन वर्षाच्या निमित्ताने अमरावतीच्या अंबादेवी आणि एकवीरा देवीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो ही अंबामाता चरणी करतायेत भाविक प्रार्थना

  • 01 Jan 2024 12:17 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांनी लगावला संजय राऊत यांना टोला

    पहिल्यांदा नवीन वर्षाचा शुभेच्छा ज्या जनतेच्या अपेक्षा आहे त्या आमच्या अपेक्षा आहेत..लोकांचा अपेक्षा पूर्ण करता याव्यात..तसेच यावेळी संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.

  • 01 Jan 2024 12:03 PM (IST)

    राज्यातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर

    आजपासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संपावर गेले आहेत. विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने पुकारला बेमुदत संप.

  • 01 Jan 2024 11:48 AM (IST)

    पुणे- राज्यातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर

    पुणे- राज्यातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर आहेत. आजपासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप सुरू झाला आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने हा संप पुकारला आहे. बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील सहभागी असणार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील रेशनदुकानदारही बेमुदत संपावर जाणार आहेत.

  • 01 Jan 2024 11:35 AM (IST)

    आरक्षण मिळाल्यास सर्व मराठा समाज अयोध्येला जाऊन प्रभू श्री रामाचं दर्शन घेणार- जरांगे पाटील

    जालना- मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास सर्व मराठा समाज अयोध्येला जाऊन प्रभू श्री रामाचं दर्शन घेणार. आम्ही मुंबईला जाण्याची जी 20 तारीख निवडली तिचा आणि 22 जानेवारी प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा काही संबंध नाही. आमची तयारी अगोदर झाली आहे. मंदिराचं बांधकाम तरी अजून अर्धवट आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

  • 01 Jan 2024 11:26 AM (IST)

    नागपूर- भंडारा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांचं चक्काजाम आंदोलन

    नागपूर- भंडारा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांनी चक्काजाम आंदोलन सुरू केला आहे. अपघातानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱ्या वाहन चालकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, या केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाच्या विरोधात ट्रक चालक हे चक्काजाम आंदोलन करत आहेत. या कायद्यात वाहन चालक खास करून ट्रक चालकांविरोधात एकतर्फी कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. अपघाताच्या स्थळावर थांबल्यावर लोक ट्रक चालकाला मारहाण करतात म्हणून ट्रकचालक पळून जातात. मात्र नंतर ते पोलिसांपर्यंत जाऊन माहिती देतात. त्यामुळे हा कायदा अपघात घडवणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात आहे अशी प्रतिक्रिया देत ट्रकचालकांनी हे चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे.

  • 01 Jan 2024 10:50 AM (IST)

    नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने

    नवीन वर्षाच्या सुरुवातीला भाविक मोठ्या संख्यने मध्य प्रदेशातील उज्जैन महाकालेश्वर मंदिरात शंकराच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. नववर्षाची सुरुवात अनेक भाविक देवदर्शनाने करत आहेत.

  • 01 Jan 2024 10:40 AM (IST)

    झारखंड- जमशेदपूरमधील कार अपघातात 6 जणांचा मृत्यू

    झारखंड- जमशेदपूरमध्ये कार अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण 8 जण होते. हे सर्वजण आदित्यपूरचे रहिवासी होते. पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन जण गंभीर जखमी आहेत.

  • 01 Jan 2024 10:30 AM (IST)

    नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रभू रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी भाविक अयोध्येत दाखल

    नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रभू रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी भाविक उत्तर प्रदेशातील अयोध्येत दाखल होत आहेत. “भगवान रामलल्ला यांचं भव्य मंदिरात प्रवेश होण्यासाठी फक्त 21 दिवस उरले आहेत”, अशी प्रतिक्रिया एका भाविकाने दिली.

  • 01 Jan 2024 10:20 AM (IST)

    इस्रोची PSLV-C58 XPoSat मोहीम यशस्वी

    इस्रोची PSLV-C58 XPoSat मोहीम यशस्वी ठरली आहे. उपग्रहाचं लिफ्ट-ऑफ सामान्य असून XPoSat यशस्वीरित्या प्रक्षेपित झाल्याची माहिती इस्रोने दिली आहे.

  • 01 Jan 2024 10:10 AM (IST)

    पुणे- पालकमंत्री अजित पवार यांच्या पुण्यात बैठका

    पुणे- पालकमंत्री अजित पवार यांच्या पुण्यात बैठका आहेत. पुण्यातील सर्किट हाऊस येथे अजित पवार यांच्या प्रशासकीय बैठकीला सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने अजित पवार यांना भेटण्यासाठी अनेक स्थानिक पदाधिकारी सर्किट हाऊसमध्ये दाखल झाले आहेत. आज दुपारपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात असतील.

  • 01 Jan 2024 09:57 AM (IST)

    डेक्कन क्वीन 25 मिनिटांनी उशीरा धावतेय

    पुणे मुंबई डेक्कन क्वीन पुण्यावरून मुंबई लोहमार्गावर प्रवास करत असताना मंकी हिल ते पळसदरी घाट दरम्यान रेल गाडीच्या तीन डब्यांना ब्रेक बाइंडिंग झालं. त्यामुळे डेक्कन क्वीन जाग्यावर थांबली. त्यामुळे पुणे मुंबई रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमानी यांना आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी उशिरा कामाची हजेरी लागणार  आहे. 25 मिनिटे गाडी जाग्यावर थांबून होती. रेल्वे अभियंते कर्मचारी यांनी तात्काळ गाडीचे ब्रेक दुरुस्ती केले. गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.

  • 01 Jan 2024 09:45 AM (IST)

    “हे’ मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला द्या”

    सोलापूर आणि शिर्डी राखीव लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला द्या, अशी मागणी अक्कलकोट आरपीआयच्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  शिर्डी लोकसभा मतदारसंघ आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांना तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना द्यावी, अशी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आरपीआयच्या वतीने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ही मागणी करण्यात आली.

  • 01 Jan 2024 09:30 AM (IST)

    तळीरामांना पुणे पोलिसांचा दणका

    नववर्षाच्या निमित्ताने रात्रभर शहरात पुणे पोलिसांनी गस्त घातली.  मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्या अनेक नागरिकांवर पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. शहरातील चौका चौकात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अनेक पुणेकरांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौक स्वारगेट चौक आणि शहरातील मुख्य रस्त्यांवर मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली आहे.

  • 01 Jan 2024 09:15 AM (IST)

    पुणे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ

    पुणे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.  पुणे रेल्वे विभागाचे उत्पन्न 300 कोटी रुपयांनी वाढलं आहे.  पुणे रेल्वे विभागाला 2023 मध्ये 1700 कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून एका वर्षात 5 कोटी प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला आहे. पुणे रेल्वे विभागाच्या एकूण 74 रेल्वे स्थानकावरून प्रवाशांनी प्रवास केला.

  • 01 Jan 2024 08:55 AM (IST)

    Ayodya News | अयोध्या नगरी गर्दीने फुलली

    अयोध्येत नवीन वर्षाची सुरुवात दर्शनाने करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल. हनुमान गढी परिसरात मोठी गर्दी. राम मंदिराकडेही जाणाऱ्या मार्गावर मोठी गर्दी. अयोध्या नगरी गर्दीने फुलली

  • 01 Jan 2024 08:46 AM (IST)

    Amravati news | अमरावतीमध्ये 11 महिन्यात 297 शेतकऱ्यांची आत्महत्या

    अमरावती जिल्ह्यात मागील 11 महिन्यात 297 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या. सततची नापिकी, बँकांचे कर्ज आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी संपवत आहे जीवनयात्रा. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या एप्रिल महिन्यात.

  • 01 Jan 2024 08:26 AM (IST)

    Nashik news | नाशिक शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचे किती रुग्ण आढळले?

    नाशिक शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचे आढळले तीन रुग्ण. एकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, दोन जण होम क्वारंटाइन. इतर 200 जणांच्या अँटिजन चाचण्या आल्या निगेटिव्ह. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आढळले कोरोनाचे रुग्ण. मनपा आरोग्य विभाग सतर्क, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

  • 01 Jan 2024 08:09 AM (IST)

    Kolhapur news | कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर भक्तांनी फुललं

    अंबाबाईच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो भाविक अंबाबाई मंदिरात. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर भक्तांनी फुललं. पर्यटकांसोबतच स्थानिक भाविकांची सकाळी सकाळी मंदिरात गर्दी. अंबाबाई मंदिराची दर्शन रांग हाउसफुल

  • 01 Jan 2024 07:55 AM (IST)

    Marathi News | शिर्डीत भाविकांची साई दर्शनासाठी मोठी गर्दी

    नववर्ष निमित्ताने भाविकांची शिर्डीत साई दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. साई दर्शनाने नवीन वर्षाची सुरूवात करण्यासाठी भाविकांची सकाळपासूनच मांदियाळी सुरु आहे. साई नामाचा जयघोषाने शिर्डी नगरी दुमदूमली आहे.

  • 01 Jan 2024 07:42 AM (IST)

    Marathi News | राज्यात लाचखोरीत नाशिक विभाग अव्वल

    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक विभागाकडून वर्षभरात सर्वाधिक १६३ जणांवर कारवाई करण्यात आले. राज्यात लाचखोरीत नाशिक विभाग यंदा अव्वल आहे. गेल्यावर्षी पेक्षा नाशिक विभागात यंदा ४० सापळे जास्त आहे.

  • 01 Jan 2024 07:25 AM (IST)

    Marathi News | अजित पवार यांचा राऊत यांना टोला

    अजितराव हवा बहुत जोर से बेह रही है टोपी उड जायेगी अशी टीका संजय राऊत संजय राऊत यांनी पुण्यामध्ये अजित पवार यांच्यावर केली होती. त्याला अजित दादांचे प्रत्युत्तर दिले आहे. सोम्या गोम्याच्या प्रश्नावर मी बोलत नाही, असे अजित पवार म्हणाले.

  • 01 Jan 2024 07:14 AM (IST)

    Marathi News | नागपूर विमानतळावर सोने जप्त

    शारजा येथून आणलेली दोन किलो सोन्याची पेस्ट नागपूर विमानतळवर जप्त करण्यात आली. या प्रकरणात एका प्रवाशाला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला आरोपी हा नागपूर येथील रहिवासी आहे. बेल्ट मध्ये पेस्ट केलेले सोन ठेऊन त्यावर शिलाई केली होती. पकडण्यात आलेल्या सोन्याची किंमत एक कोटी रुपया पेक्षा जास्त आहे.

Published On - Jan 01,2024 7:11 AM

Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.