LIVE | धुळ्यात नागपूर-सुरत महामार्गावर भीषण अपघात, ट्रकला आग
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी (Maharashtra Breaking News Live Updates)

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
धुळ्यात नागपूर-सुरत महामार्गावर भीषण अपघात, ट्रकला आग
धुळे : नागपूर-सुरत महामार्गावर भीषण अपघात, ट्रकला आग
ट्रकचा अपघात झाल्याने ट्रकला भीषण आग
धुळ्याकडून पिंपळनेरकडे जात होता ट्रक
नेर गावजवळ झाला अपघात
-
अनिल देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला असून गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांचेकडे देण्यास मंजूरी दिली आहे.
-
-
जनतेकडे लक्ष देण्याचे सोडून मंत्र्यांचे प्रकरण लपविण्याकडे नेत्यांचे लक्ष – रक्षा खडसे
जळगाव – जनतेला तीन पक्षाच्या सरकारकडून अपेक्षा होती
परंतु दर महिन्याला मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर येत आहेत.
सामान्य जनतेकडे लक्ष देण्याचे सोडून मंत्र्यांचे प्रकरण लपविण्याकडे सर्व नेत्यांचे लक्ष
जनता ही सरकारच्या कामाने समाधानी नसल्याचे दिसून येत आहे. – रक्षा खडसे
-
शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना जनहित शेतकरी संघटनेचा पाठिंबा
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूक
शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना जनहित शेतकरी संघटनेचा पाठिंबा
जनहित शेतकरी संघटनेचे भैय्यासाहेब देशमुख यांनी दिला जाहीर पाठिंबा
शेतकरी संघटनेचा पाठिंबा मिळाल्याने शैला गोडसे यांचे पारडे झाले जड
-
वणी येथील खासगी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये जाऊन डॉक्टरवर प्राणघातक हल्ला
यवतमाळ : वणी येथील खासगी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये जाऊन डॉक्टरवर प्राणघातक हल्ला
हल्ल्यात डॉ. पद्माकर मत्ते गंभीर जखमी प्रकृती चिंताजनक
वणी येथील यात्रा मैदान परिसरात 2 ते 3 हल्लेखोरांनी डॉ. पद्माकर मत्ते यांच्या वरधारदार शास्त्राने हल्ला चढवला.
या घटनेची माहिती वणी पोलिसांना देण्यात आली असून कुठल्या घटनेतून हल्ला झाला याचा तपास आता वणी पोलीस करीत आहेत
-
-
बोईसर-चिल्हार रोडवर गुंदले येथे ट्रक आणि स्कुटीचा अपघात, तीन जण गंभीर
पालघर : बोईसर-चिल्हार रोडवर गुंदले येथे ट्रक आणि स्कुटीचा अपघात अधिकारी पेट्रोल पंप समोर घडली घटना
अपघातात तीन जण गंभीर जखमी
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल
-
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉल तिकीट मिळायला सुरुवात
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट मिळायला सुरुवात,
दहावी आणि बारावीची परीक्षा देण्यासाठी यंदा ट्रान्सजेंडर मुलांची संख्या वाढली,
बारावीचे 162 विद्यार्थी तर दहावीचे 102 विद्यार्थी देणार बोर्डाची परीक्षा,
पुणे विभागातून सर्वाधिक ट्रान्सजेंडर मुलं परीक्षा देतील,
यंदा बारावीचे 13 लाख 17 हजार 76 विद्यार्थी तर दहावीचे 16 लाख 206 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत
-
दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात उद्या महत्त्वाची बैठक
– दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात उद्या महत्त्वाची बैठक
– शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बोलवली महत्त्वाची बैठक
– शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर होणार बैठक
– राज्यात कडक निर्बंध लागू झाल्यानंतर परीक्षा कशा पद्धतीने घ्यायची यावर होणार चर्चा
– शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन घोषित झाला आहे
– त्यामुळे शनिवारी होणार्या पेपरचं काय होणार यावरही होणार चर्चा
-
आता तरी सरकारने आणि शरद पवारांनी देशमुखांचा राजीनामा घ्यावा – चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील –
– आता तरी सरकारने आणि शरद पवारांनी अनिल देशमुखांचा राजीनामा घ्यावा,
– तपास यंत्रणांवर अविश्वास म्हणजे बाबसाहेबांच्या घटनेवर अविश्वास दाखवणे,
– शरद पवारांनी दबाव झुगारून अनिल देशमुख आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा
– सीबीआय चौकशीत सत्य बाहेर येणार
-
अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला हवा – फडणवीस
अत्यंत महत्वाचा निर्णय कोर्टाने आज दिला आहे
15 दिवसात प्राथमिक चौकशी करावी आणि पुढची चौकशी करावी
जी वसुली ह्या सरकार मध्ये होत होते त्याच सत्य समोर येईल
काळिमा फासणारा हा जो मधला कारभार झाला आहेतयात सत्य समोर येईल
काही लोकांनी प्रयत्न केला की सीबीआय चौकशी होऊ नये
त्याला जोरदार उत्तर हायकोर्ट ने दिला आहे, आम्ही त्याच स्वागत करतो
अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला हवा, नाही तर मुख्यमंत्र्यांनी तो घ्यालला हवा
चौकशी ला सामोरं जावं त्यातून जर सत्य समोर येत आणि त्यातून ते निर्दोष सुट्त असतील तर त्यांना पुन्हा मंत्री मंडळात घेता येतं, पण तूर्तास त्यांनी राजीनामा घ्यावे
-
छत्तीसगढ बीजापुर येथील नक्षल हल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अलर्ट
– छत्तीसगढ बीजापुर येथील नक्षल हल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अलर्ट
– गडचीरोली, गोंदियाच्या नक्षल भागात पोलीसांचं कोबिंग ॲापरेशन सुरु
– सीमाभागात नक्षलवाद्यांच्या हालचालींवर पोलीसांचा वॅाच
– इंटेलिजेन्स मार्फत नक्षलवाद्यांच्या हालचालींवर नजर
– नक्षलवाद्यांचा सामना करण्यास पोलीस सज्ज
– गोंदिया, गडचिरोलीतील पोलीस स्टेशन अलर्टवर
-
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचा तपास सीबीआयकडे – मुंबई हायकोर्ट
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचा तपास सीबीआयकडे, मुंबई हायकोर्टाचा निर्णय
On petition of Dr Jaishri Patil, Bombay HC asks CBI to start a preliminary inquiry within 15 days into corruption allegations of former Mumbai Police Commissioner Param Bir Singh against Maharashtra Home Minister Anil Deshmukh. pic.twitter.com/qfdQV1Pis7
— ANI (@ANI) April 5, 2021
-
किरीट सोमय्या यांचा औरंगाबाद दौरा, देणार जिल्हा रुग्णालयाला भेट
औरंगाबाद –
किरीट सोमय्या यांचा औरंगाबाद दौरा
किरीट सोमय्या देणार जिल्हा रुग्णालयाला भेट
किरीट सोमय्या जिल्हा रुग्णालयात दाखल
सोबत भाजप कार्यकर्तेही उपस्थित
औरंगाबादच्या जिल्हा 250 कोरोना रुग्णांवर सुरु आहेत उपचार
-
गेल्या 10 दिवसापासून बंद असलेल्या मनमाड, नांदगाव मालेगाव सह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या आजपासून सुरु
मनमाड –
मार्च एन्ड आणि विविध सुट्ट्यांमुळे गेल्या 10 दिवसापासून बंद असलेल्या मनमाड, नांदगाव मालेगाव सह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या आजपासून सुरु
मनमाड बाजार समिती कांद्याची मोठया प्रमाणात झाली आवक
आवक जास्त असल्याने कांद्याच्या सरासरी भावात घसरण
कांद्याला मिळाला सरासरी 7 ते 8 रुपये प्रति किलो भाव
कांद्याच्या भावत घसरण झाल्याने शेतकरी चिंतेत
-
अहमदनगरात शेतकऱ्यांची फसवणूक करणारे व्यापारी अटकेत
अहमदनगर –
शेतकऱ्यांची फसवणूक करणारे व्यापारी अटकेत
श्रीरामपुरातील मातुलठाण येथील शेतक-यांची फसवणूक
2 कोटी 80 लाखांची फसवणुक केल्या प्रकरणी गणेश मुथ्था आणि आशा मुथ्था या दोघांना जळगाव येथुन अटक
दोन आरोपी अद्याप फरार
शेतक-यांचा शेतमाल खरेदी करून झाले होते फरार
न्यायालयाने सुनावली 10 दिवसांची पोलिस कोठडी
-
महाराष्ट्रातून यंदा द्राक्षाची पाच हजार मेट्रिक टन अधिक निर्यात
सोलापूर-
यंदा द्राक्षाची पाच हजार मेट्रिक टन अधिक निर्यात
यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातून 97 हजार 46 मेट्रिक टन द्राक्षे युरोपीयन देशात निर्यात
मागील वर्षाच्या तुलनेत हे निर्यात पाच हजार मेट्रिक टनाने अधिक
-
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांची आज निवडणूक
औरंगाबाद ब्रेकिंग :-
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांची आज निवडणूक
अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष
जिल्हा बँक सदस्यपदी निवडुन आलेत शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य
बँकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत जिल्हा बँक पहिल्यांदाच सेनेच्या ताब्यात
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नितीन पाटील यांची अध्यक्षपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता
नितीन पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी केलाय शिवसेनेत प्रवेश
-
भाजपचे जेष्ठ किरीट सोमय्या आज औरंगाबाद दौऱ्यावर
औरंगाबाद –
भाजपचे जेष्ठ किरीट सोमय्या आज औरंगाबाद दौऱ्यावर
शहरातील घाटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि लसीकरण केंद्राला देणार भेट
भेटीनंतर दुपारी चार वाजता किरीट सोमय्या पत्रकारांशी साधणार संवाद
औरंगाबाद कोरोना परिस्थितीवर किरीट सोमय्या काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष
किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा झाली सतर्क
-
औरंगाबाद शहराजवळ असलेल्या गांधेली शिवारात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू
औरंगाबाद शहराजवळ असलेल्या गांधेली शिवारात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू
गारखेडा परिसरातील नुरानी मस्जीदजवळ राहणारे अतीक अकील शेख वय 19, नदिम नाशेर शेख वय 17 हे दोघे पोहण्यासाठी तलावात उतरले
पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू
याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
या प्रकरणामुळे गारखेडा परिसरात शोककळा पसरली
-
पतीनेच केले पत्नीचे अश्लील व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल, पत्नीशी पटत नसल्याने तिला बदनाम करण्याचा प्रयत्न
नागपूर –
– पतीनेच केले पत्नीचे अश्लील व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल
– पत्नीशी पटत नसल्याने तिला बदनाम करण्याचा प्रयत्न
– नागपूरातील यशोधानगर पोलीस स्टेशन हद्दीतील धक्कादायक प्रकार
– पती सुरेश सुमन विरोधात यशोधानगर पोलीसांत गुन्हा दाखल
– बनावट फेसबुक आयडी करुन पत्नीचे अश्लील व्हीडीओ केले व्हायरल
-
लासलगाव जवळील विंचूर येथील दोन चुलत बहिणींचे मृतदेह पालखेड डाव्या कालव्यात आढळल्याने खळबळ
लासलगाव– लासलगाव जवळील विंचूर येथील दोन चुलत बहिणींचे मृतदेह पालखेड डाव्या कालव्यात आढळल्याने खळबळ
– 2 एप्रिल दुपार 3.30 पासून घरातून बाहेर गेल्यानंतर होती बेपत्ता
– अर्पिता सुनील गायकवाड व कोमल संतोष गायकवाड असे मृत बहिणीचे नाव
– लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
-
अवैध वाळू उपसा करणारे 2 पोकलेन, जेसीबीसह दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मानवत तालुक्यातील वांगी येथे सुरू असलेल्या अवैध वाळू उपश्यावर सायंकाळी छापा मारत दोन पोकलेन, जेसीबी मशीनसह सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
मानवत तालुक्यातील वांगी येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली
त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार विश्वास खोले, फौजदार चंद्रकांत पवार यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारला
त्यावेळी तेथे वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले
पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वाळू उपसासाठी वापरण्यात येत असलेले दोन पोकलेन, एक जेसीबी मशीन, पाच टिप्पर, सात ट्रॅक्टर, एक लोडर असा अंदाजे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला
-
सामना अग्रलेख – निवडणूक आयोगाची झोलबाजी!
आसाम आणि प. बंगालातील घटनांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण झाल्या. बिहारात तेजस्वी यादव यांचा पराभव घडवून आणला गेला व मतमोजणीच्या त्या अखेरच्या क्षणी निवडणूक आयोगाने डोळे व कान बंद करून घेतले असे लोकांच्या मनात आहे. हे चित्र देशासाठी चांगले नाही . ‘ईव्हीएम’वरचा उरलासुरला विश्वास उडिवणारे हे प्रकार आहेच, पण निवडणूक आयोगाच्या झोलेबाजीवरही त्यामुळे शिक्कामोर्तब होतेय. लोकशाही परंपरेची चाड थोडी जरी शिल्लक असेल तर या सगळ्यांवर संसदेत तरी चर्चा व्हावी! – सामना अग्रलेख
Published On - Apr 05,2021 10:19 PM





