LIVE | अंबाजोगाईच्या तरुण दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
अंबाजोगाईच्या तरुण दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू
बीड : अंबाजोगाईच्या तरूण दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू
नोकरीनिमित्त अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अंबाजोगाई येथील तरूण दाम्पत्याचा बुधवारी रात्री संशयास्पद मृत्यू
पती-पत्नीचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आल्याने खळबळ
आत्महत्या केली की त्यांचा खून झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही
दाम्पत्याची चार वर्षीय मुलगी सुखरूप
-
बुलडाण्यात मोताळा येथे भरला आठवडी बाजार, व्यापाऱ्यांची पोलिसांसोबत हुज्जत
बुलडाणा : मोताळा येथे भरला आठवडी बाजार
निर्बंध असताना व्यापाऱ्यांनी थाटली दुकाने
तहसीलदार बाजार बंद करण्यासाठी गेले असताना व्यापाऱ्यांनी घातला घेराव
तहसीलदार समाधान सोनवणे यांनी काढला पळ
व्यापाऱ्यांची पोलिसांसोबतसुद्धा हुज्जत
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल..
-
-
अनिल देशमुख 100 कोटी वसुली आरोप प्रकरण, सीबीआय शुक्रवारी बड्या नेत्यांचे जबाब नोंदवण्याची शक्यता
अनिल देशमुख 100 कोटी वसुली आरोप प्रकरण
सीबीआय शुक्रवारी काही बड्या राजकीय नेत्यांचे जबाब नोंदववण्याची शक्यता
आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा नोंदवला जबाब
सिंह यांनी देशमुखांवरील सर्व माहिती सीबीआयला दिली
सीबीआयने सिंह यांना विचारले अनेक प्रश्न
तुम्ही केलेल्या आरोपांना काय आधार आहे ? या संपूर्ण प्रकरणाची त्यांना माहिती होती का? अशा प्रकारचे विचारले प्रश्न
परमबीर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर होऊ शकते अनेकांची चौकशी
-
अनिल देशमुख 100 कोटी वसुली आरोप प्रकरण, सीबीआयने परमबीर सिंहांचा जबाब नोंदवला
मुंबई : 100 कोटी वसुली प्रकरण
माजी आयुक्त परमबीर सिंहांचा जबाब नोंदवला
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केला होता 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या सीबीआय या आरोपांची प्राथमिक चौकशी करत आहे.
-
महाविकास आघाडीच्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाने उत्तर दिलं, सीबीआय चौकशीने खरं-खोटं बाहेर येईल : देवेंद्र फडणवीस
“उच्च न्यायालयाने अतिशय स्पिकिंग ऑर्डर दिली होती. ज्याप्रकारे हे प्रकरण आहे त्यानुसार सीबीआयने चौकशी करावं, असं उच्च न्यायालयाने कारणासह सांगितलं होतं. तरीही राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा प्रयत्न केला. स्वत: अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाबाबत जी टिप्पणी केली आहे ती मला अतिशय महत्त्वाची वाटते. महाविकास आघाडीचे नेते याबाबत जे बोलत होते त्यांना उत्तर देण्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केलीय. आता योग्यप्रकारे चौकशी होईल. त्यातून काय खरं-खोटं ते बाहेर येईल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचं आम्ही स्वागत करतो”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
-
-
नागपुरात पोलिसांचा रुट मार्च, नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन
नागपूर : नागपूर पोलिसांनी व्हेहीकल रूट मार्च केला, नागपुरात वाढत असलेली रुग्ण संख्या आणि मृत्यूचं प्रमाण बघता नागपूरकरांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं, शहराच्या वेगवेगळ्या हा रूट मार्च जात आहे, या मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस सहभागी झाले, हा मार्च चारचाकी आणि दुचाकी वाहनांवरून काढण्यात आला
-
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग
यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग
वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
उन्हाच्या उकड्यातूनन नागरिकांना काहीसा दिलासा
-
अनिल देशमुख आणि राज्य सरकारला मोठा धक्का, कोर्टाने याचिका फेटाळल्या
अनिल देशमुख आणि राज्य सरकारला मोठा धक्का
सुप्रिम कोर्टानं महराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुखांची याचिका फेटाळल्या
मुंबई उच्च न्य़ायलयाच निर्णय कायम राहणार
परमीबीर सिंहांनी अनिल देशमुखांवर लावले आरोप गंभीर – सुप्रिम कोर्ट
-
दाउद इब्राहिमचा हस्तक दानिश चिकना उर्फ दानिश मर्चेंट याला एनसीबीकडून अटक
मुंबई : दाउद इब्राहिमचा हस्तक दानिश चिकना उर्फ दानिश मर्चेंट याला एनसीबीने केली अटक
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोची टीम आज दानिशला घेऊन मुंबईत पोहोचणार
एनसीबीच्या दोन महत्वाच्या केसेसमध्ये दानिश चिकना हा वांटेड होता
दानिश हा चिंकू पठाण प्रकरणामध्ये फरार होऊन राजस्थानला निघून गेला होता
राजस्थान पोलिसांनी त्याला अटक करून संबंधित कोर्टातून त्याची कस्टड़ी घेतली
त्यानंतर राजस्थान पोलिसांकडून एनसीबी त्याला ट्रांजिट रिमांडवर आज संध्याकाळी मुंबईत घेऊन येणार आहे
-
अजित पवारांच्या सभेला तुफान गर्दी
पंढरपूर : राज्यात कोरोनाची भयानक परिस्थिती असताना पंढरपुरात धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत शेकडो लोकांनी एकत्र जमल्यची घटना समोर आली आहे. एकीकडे देशात दिवसा कडक नर्बंध लागू असताना अशाप्रकारे नियमांचं उल्लंघन होत असल्याने नियम नेमके कुणासाठी? असा प्रश्न उपस्थित होतोय. पंढरपुरातील गादेगाव येथे जाहीर सभेत मोठी गर्दी बघायला मिळाली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री ज्या ठिकाणी बसले आहेत तिथेही मोठी गर्दी बघायला मिळाली आहे.
-
काँग्रेस राज्यभर रक्तदान शिबिरांचं आयोजन करणार, नाना पटोलेंची घोषणा
राज्यात रक्ताचा साठा कमी असल्याने काँग्रेस पक्षही आता राज्यभरात रक्तदान शिबिरांचं आयोजन करणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून या रक्तदान मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
राज्यात मोठ्या प्रमाणात रक्त पुरवठा कमी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर काँग्रेसच्यावतीने घेतलं जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे राज्यात बेड्सचा आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. या अडचणी सोडवण्यासाठी काँग्रेस सर्व जिल्हा आणि तालुका स्तरावर मदत साहाय्य केंद्र सुरु करत आहे.
आम्ही कोरोनामुक्त अभियान काँग्रेसच्यावतीने सुरु करत आहोत. कोरोना वॉररुमही सुरु करतोय. त्याचं मुख्य कार्यालय मुंबईत असेल. काँग्रेसचे सर्व जिल्हा कार्यालये चोवीस तास सुरु राहतील. आमच्या सहा प्रदेश कार्याध्यक्षाना जबाबदारी देतोय. आमचे संपर्क प्रमुख त्या त्या भागात जाऊन मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. आमचे मंत्री विजय वडेट्टीवार आणि अमित देशमुख यांची देखील मदत घेतली जाणार आहे. कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न आम्ही करत आहोत.
-
नाशकातील जिल्हा रुग्णालयाच्या सिव्हिल सर्जन रत्ना रावखंडे यांची उचलबांगडी
नाशिक –
जिल्हा रुग्णालयाच्या सिव्हिल सर्जन रत्ना रावखंडे यांची उचलबांगडी
रावखंडे यांना पालकमंत्री भुजबळ यांनी पाठवलं होत सक्तीच्या रजेवर
डॉ अशोक थोरात यांच्याकडे सिव्हिल सर्जन म्हणून पदभार
-
कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहेत – संभाजी भिडे
सांगली – संभाजी भिडे
हातावरचे माणस उध्वस्त होत आहे, शिक्षण क्षेत्र उध्वस्त झाले आहे, लॉकडाऊनची गरज नाही
व्यसन वाढवायची गांजा अफ्यु दारू दुकाने वाढवायचे
गांधी आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे
कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहेत
कोणत्या शहाणाने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे
काही गरज नाही मास्क लावण्याची हा सगळा मूर्खपणा आहे
-
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अखेर बरखास्त, राज्य सरकारचा अध्यादेश जारी
कोल्हापूर
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अखेर बरखास्त
राज्य सरकारने काढला अध्यादेश
समितीवर जिल्हाधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सुरू होती बरखास्तीची चर्चा
भाजपचे महेश जाधव देवस्थान समितीचे विद्यमान अध्यक्ष
-
नागपुरात व्यापाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस
– नागपुरात व्यापाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस
– थाळी वाजवत व्यापारी करत आहेत, सरकारचा निषेध
– मिनी लॅाकडाऊनचा विरोध करत व्यापारी रस्त्यावर
– मध्य भारतातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या इतवारी भागात आंदोलन
– दुकानं उघडण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांचं आंदोलन
-
माझे नेते अजित पवारच – आमदार संजय शिंदे
पंढरपूर –
मी राष्ट्रवादी सोडून कोणत्याही पक्षात गेलेलो नाही
माझे नेते अजित पवारांचं
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जिल्ह्यात अनेक घडामोडी झाल्या
याबाबत सर्व गोष्टी मी दादांच्या कानांवर घातल्या
आमदार संजय शिंदे
-
पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा
पुणे –
पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा,
पुण्यासह ,मध्य महाराष्ट्र, कोकण,मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज,
झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण,
त्यामुळे या भागात ढग साचण्याची शक्यता,
पुणे हवामान वेधशाळेनं वर्तवला अंदाज,
राज्यात अकोला इथं सर्वाधिक 42.2 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली
-
मार्च एंडला थर्ट पार्टी ऑडिट करण्याच्या कामात प्रचंड गोंधळ असल्याचं आयुक्तांच्या निदर्शनास
पुणे –
मार्च एंडला थर्ट पार्टी ऑडिट करण्याच्या कामात प्रचंड गोंधळ,
अनेक कामं अर्धवट असताना कामाची बिलं काढल्याचा प्रकार आला आयुक्तांच्या निदर्शनास,
पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी उपायुक्तांसह 18 अधिकाऱ्यांना बजावली कारणे दाखवा नोटीस,
समाधानकारक उत्तर न दिल्यास दिला कारवाईचा इशारा,
कामे पुर्ण झालेली नसतानाही बिलांसाठी फाईल्स केल्या सादर,
निकृष्ठ दर्जाची कामं केल्याचा धक्कादायक प्रकार,
-
पंढरपुरात अजित पवारांच्या उपस्थित कल्याणराव काळे करणार रराष्ट्रवादी प्रवेश
पंढरपूर –
मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीचे राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूरच्या दौऱ्यावर
अजित पवारांच्या उपस्थित कल्याणराव काळे करणार रराष्ट्रवादी प्रवेश
पंढरपूरातील श्रेयस लॉन्स येथे होणार जाहिरसभा
-
गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या खेड इथल्या मुंबके गावातील मालमत्ता लिलावानंतरच्या प्रक्रियेला सुरुवात
रत्नागिरी-
गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या खेड इथल्या मुंबके गावातील मालमत्ता लिलावानंतरच्या प्रक्रियेला सुरुवात
जमिनीची मोजणी प्रक्रियेला सुरवात, साफेमाचे अधिकारी उपस्थित
भुमिअभिलेख विभागाने सुरु केली जमिन मोजणीची प्रकिया, आणखी दोन दिवस मोजणी चालणार
लिलावात मालमत्ता विकत घेतलेले वकील भुपेंद्रकुमार भारद्वार मुंबकेत
प्रत्यक्ष मोजणीच्या ठिकाणी हजर, जमिन नावावर करण्याची प्रक्रिया लवकरच होणार पुर्ण
मालमत्तेचा उपयोग दहशदवाद विरोध पथकासारखे उपक्रम राबवण्याचा भुपेंद्रकुमारांचा मानस
-
मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ 8 दिवस राहणार बंद
औरंगाबाद –
मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ 8 दिवस राहणार बंद
11 ते 17 एप्रिल या कालावधीत खंडपीठ राहणार बंद
उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी केली सुट्टी जाहीर
कोरोना संसर्ग आणि इतर कारणामुळे न्यायालयाला दिली सुट्टी
आठवडाभर उच्च न्यायालयातील सर्वच कामे राहणार बंद
-
औरंगाबादेत आत्रा फार्म कंपनीसमोर कामगारांचे ठिय्या आंदोलन सुरू
औरंगाबाद –
आत्रा फार्म कंपनीसमोर कामगारांचे ठिय्या आंदोलन सुरू
कामगारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन
25 ते 30 कामगारांचे सुरू आहे ठिय्या आंदोलन
कंपनीच्या गेटसमोरच कामगारांचे सुरू आहे ठिय्या आंदोलन
युनियन लावल्याच्या रागातून कामगारांना कंपनीने केलंय निलंबित
निलंबनच्या निषेधार्थ कामगारांचे ठिय्या आंदोलन सुरू
कामगारांना कंपनीत पूर्ववत सामील करून घेण्याची कामगारांची मागणी
-
औरंगाबादेत रोजगार हमी योजनेच्या मजुरांना दिली जातेय तुटपुंजी मजुरी
औरंगाबाद –
रोजगार हमी योजनेच्या मजुरांना दिली जातेय तुटपुंजी मजुरी
रोजगार हमी योजना मंत्र्यांच्याच गावात मजुरांची थट्टा
8 तासांच्या कामाची फक्त 108 रुपये तुटपुंजी मजुरी
दिवसभर उन्हात जीवतोड काम करून मिळतोय फक्त 108 रुपये मेहनताना
पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामावर फक्त 108 रुपये मजुरी
मजुरांसाठी पाणी आणि सावलीचीही सोय नसल्याची मजुरांची तक्रार
-
सांगली जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्काचा महसूल दुपटीवर, यावर्षी केला तब्बल 321 कोटी महसूल गोळा
सांगली –
जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्काचा महसूल दुपटीवर
यावर्षी केला तब्बल 321 कोटी महसूल गोळा
रिक्त पदाचा बसतोय फटका तर
विदेशी मद्यनिर्मिती कारखाना पुन्हा सुरू झालेने होते महसूल मध्ये वाढ
सध्या 2कारखान्यात विदेशी मद्यनिर्मिती तर 4 देशी निर्मिती चे कारखाने चालु आहेत
सण 2018-19 वर्षात 143 कोटी 53 लाख
सण 2019-20 वर्षात 138 कोटी आणि
सण 2020-21 या गत वर्षात तब्बल 321 कोटी महसूल झाला गोळा
उद्दिष्टपूर्ती च्या 116 टक्के वसुली
-
शॉर्ट सर्किटमुळे कचऱ्याला आग, औरंगाबादच्या ओयासिस चौकातली घटना
औरंगाबाद –
शॉर्ट सर्किटमुळे कचऱ्याला आग
औरंगाबादच्या ओयासिस चौकातली घटना
आग लगल्यानंतरही बराच काळ सुरू होते शॉर्ट सर्किट
अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली आग
रस्त्याच्या कडेलाच आग आणि शॉर्ट सर्किटमुळे भीतीचे वातावरण
-
शिवाजी विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा आता होणार ऑनलाईन
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा आता होणार ऑनलाईन
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी परीक्षा मूल्यमापन मंडळाकडून तयारी सुरू
ऑफलाइन चा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईनच परीक्षा द्यावी लागणार
कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील 54 हजार विद्यार्थ्यांनी निवडला होता ऑफलाईन चा पर्याय
पर्याय बदलण्याचा विद्यापीठाचं विद्यार्थ्यांना आवाहन
वाढत्या करून परिस्थितीमुळे विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय
-
बीड जिल्हा बँकेवर अखेर प्रशासक मंडळ नियुक्त
बीड :
बीड जिल्हा बँकेवर अखेर प्रशासक मंडळ नियुक्त
कोरम पूर्ण होत नसल्याने प्रशासक नियुक्त
पाच सदस्यीय प्रशासक मंडळ चालविणार बँकेचा गाडा
मंडळाच्या अध्यक्ष पदी अप्पर आयुक्त अविनाश पाठक यांची नियुक्ती
-
नागपुरातील व्यापारी सरकार विरोधात आक्रमक, शुक्रवारपासून दुकानं उघडण्याचा व्यापाऱ्यांचा इशारा
– नागपुरातील व्यापारी सरकार विरोधात आक्रमक
– शुक्रवारपासून दुकानं उघडण्याचा व्यापाऱ्यांचा इशारा
– सिताबर्डी दुकानदार असोसियशनने दिला दुकानं उघडण्याचा इशारा
– व्यापारी आणि प्रशासनातला वाद आणखी चिघळण्याची शक्यता
– आजंही नागपूरातील व्यापारी करणार सरकारचा विरोध
-
नाशकात कारवाई करायला गेलेल्या मनपा कर्मचाऱ्यांवर मद्यपींचा हल्ला
नाशिक –
कारवाई करायला गेलेल्या मनपा कर्मचाऱ्यांवर मद्यपींचा हल्ला
नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील घटना
हॉटेल मध्ये बसून दारू पिण्यास बंदी असतांना अनेक जण हॉटेल मध्ये पित होते दारू
हॉटेल मालक आणी मद्यपीन विरोधात इंदिरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू
-
अघोरी कृत्यातून पैशाचा पाऊस पाडण्याचा दावा, युवतीचा शारीरिक, मानसिक छळ
पैशाचा पाऊस पाडणे, गुप्तधनासाठी 21 वर्षीय युवतीचा शारीरिक, मानसिक छळ
अघोरी कृत्यातून पैशाचा पाऊस पाडण्याचा दावा
पीडितेच्या शरीराला लिंबू लावण्याचा केला प्रकार
दोन जणांना अटक केली असून रामनगर पोलीस पुढील तपास करीत आहेय
Published On - Apr 08,2021 8:55 PM