LIVE | धुळ्यात उभ्या ट्रकला भीषण आग, रस्त्यावर वाहनांच्या रांगा

| Updated on: Apr 15, 2021 | 12:01 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | धुळ्यात उभ्या ट्रकला भीषण आग, रस्त्यावर वाहनांच्या रांगा
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Apr 2021 08:58 PM (IST)

    धुळ्यात उभ्या ट्रकला भीषण आग, रस्त्यावर वाहनांच्या रांगा

    धुळे : चाळीसगाव चौकात उभ्या ट्रकला भीषण आग

    घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 2  गाड्या दाखल

    आगीची करण अजून अस्पष्ट, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

  • 14 Apr 2021 06:50 PM (IST)

    बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात

    बीड: बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात

    गेवराई, माजलगाव, वडवणी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

    माजलगाव, गेवराई तालुक्यात गारपीट

    गारपीटीमुळे आंब्यासह फळबागांचे मोठे नुकसान

    जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा चिंतातुर

  • 14 Apr 2021 06:38 PM (IST)

    पोलिसांनी उगाच लाठीचा वापर करु नये, पण जाणीवपूर्वक नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना : पोलीस महासंचालक

    राज्याच्या पोलीस महासंचालकांनी आज पत्रकार परिषद घेऊन सर्व नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं. तसेच पोलिसांनी कारण नसताना लाठीचा वापर करू नये, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच लोकांनी जाणीवपूर्वक नियमांचं उल्लंघन केलं तर कडक कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला.

    महासंचालक नेमकं काय म्हणाले?

    सध्याची परिस्थिती कठीण आहे. राज्यात संचारबंदी लागू असल्याने लोक उगाच घराबाहेर पडणार नाहीत, हे स्पष्ट आहे. कुणी घराबाहेर पडलेलं असेल तर काहीतरी महत्त्वाचं कारणच असेल. त्यामुळे विनाकारण फटकावणं किंवा चार्ज लावणं हे सर्व होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. आम्ही सर्व युनिटला याबाबत सूचना दिल्या आहेत. कुठल्याही प्रकारचं जाणीवपूर्वक उल्लंघन होत असल्याचं स्पष्ट होत नाही तोपर्यंत लाठीचा उपयोग करु नका. कारण परिस्थिती नाईलाजाने झाली आहे. होमगार्ड, पोलीस आम्ही सुरळीतपणे काम करतोय.

  • 14 Apr 2021 05:54 PM (IST)

    LIVE | बेळगावात संघर्ष सुरु, प्रशासनाने महाराष्ट्र एकीकरण समितीचा मंच तोडला

    बेळगावात संघर्ष सुरु, प्रशासनाने महाराष्ट्र एकीकरण समितीचा मंच तोडला, गोळ्या झाडल्या तरी भाषण करणार, शिवसेना नेते संजय राऊत यांचा ठाम निर्धार. राऊत यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली.

    संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

    बेळगावात उतरलोय. कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरूवात. संयुक्त महाराष्ट्र चौकीतील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले..सभा होणारच!गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही. ही अस्मितेची लढाई झालीय, असं संजय राऊत म्हणाले.

  • 14 Apr 2021 05:01 PM (IST)

    संजय राऊत यांच्या सभेची धास्ती, बेळगावात प्रशासनाकडून स्टेज, साऊंड सिस्टिम काढण्यासाठी दादागिरी

    बेळगाव : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत आज बुधवारी (14 एप्रिल) बेळगावात दाखल झाले आहेत. बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीतील महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ सायंकाळी साडेसात वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक, खडे बाजार येथे त्यांची सभा होणार आहे. खासदार संजय राऊत यांची बेळगावात तोफ धडाडणार आहे. समिती उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ त्यांची सभा होणार आहे.

    समितीचे उमेदवार शुभम शेळके हे युवकांचे आकर्षण ठरत आहेत. त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून बेळगावसह महाराष्ट्रातील नेत्यांनी सभा घेण्याची घोषणा केली आहे. याचाच भाग म्हणून खासदार राऊत बुधवारी बेळगावात शेळके यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

  • 14 Apr 2021 04:53 PM (IST)

    शिवसेना नेते खासदार संजय राऊत बेळगावात दाखल

    शिवसेना नेते खासदार संजय राऊत बेळगावात दाखल

    संजय राऊत यांचा दोन दिवस बेळगावात मुक्काम

    बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांचा प्रचार करणार

    शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी संजय राऊत यांचा बेळगावात आज रोड शो आणि जाहीर सभा

    17 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी प्रचार अंतिम टप्प्यात.

    भाजपचे राज्यमंत्री सुरेश अंगडिया यांच्या निधनामुळे होत आहे पोटनिवडणुक.

  • 14 Apr 2021 03:54 PM (IST)

    औरंगाबादेत पोलिसांच्या मारहाणीत सलून चलकाचा मृत्यू झाल्याचा आरोप, नातेवाईकांचं पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

    औरंगाबाद :

    पोलिसांच्या मारहाणीत सलून चलकांचा मृत्यू झाल्याचा आरोप

    नातेवाईकांनी मृतदेह ठेवला पोलीस ठण्यासमोर..

    औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा पोलीस ठाण्यातील घटना

    फिरोज खान कादिर खान असे मयत सलून व्यवसायिकाचे नाव

    निर्बंध असताना सलून सुरू असल्याने पोलीस गेले होते सलून मध्ये..

    दोषींवर कारवाई करण्यासाठी नातेवाईकांचा ठण्यासमोर ठिय्या…

  • 14 Apr 2021 03:48 PM (IST)

    ‘ज्याला कावीळ झालाय त्याला सर्व जग पिवळंच दिसतं’, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची गोपीचंद पडळकरांवर टीका

    सातारा: “आमदार गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध टिका करण्याशिवाय दुसरं काम नाही. ज्याला कावीळ झालाय त्याला सर्व जग पिवळंच दिसत या म्हणीप्रमाणे पडळकरांना या सरकारने कितीही चांगले निर्णय घेतले तरी त्यात खोटच दिसते. राज्य सरकार साडेपाच हजार कोटी रुपये महाराष्ट्रातील जनतेसाठी देतीय. तुम्ही केंद्रातून किती मदत देताय? गोपीचंद पडळकरांना चांगल काम दिसत नाही”, अशा शब्दात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली.

  • 14 Apr 2021 02:39 PM (IST)

    कोल्हापुरातील पेठ वडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षकाची आत्महत्या

    कोल्हापूर

    पेठ वडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक प्रदीप काळे यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

    चिकुर्डे पुलावरून वारणा नदीत मारली उडी

    काळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू

    काळे यांची काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती तडकाफडकी बदली

    बदलीवरून काळे नाराज असल्याची चर्चा

  • 14 Apr 2021 02:37 PM (IST)

    काँग्रेसची ऑनलाईन माध्यमाद्वारे महत्त्वाची बैठक, अनेक पदाधिकारी उपस्थित

    काँग्रेस ची वर्चुवल मिटिंग विडिओ काँफॉरन्स मिटिंग

    नाना पटोले,सुशील कुमार शिंदे,संजय निरूपण ,बाळासाहेब थोरात,नसीमखान ,चरणसिंग सप्रा ,चंद्रकांत हंडोरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा जोतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले हे सर्व नेते एकत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात हजार

    विडिओ कॉन्फरन्सद्वारे अभिवादन करून वर्चुवल मिटिंग

    वर्चुवल मिटिंगमध्ये दिल्ली वरून मालिकार्जुन खरगे उपस्थित

    व इतर मोजके काँग्रेस पदाधिकारी आहेत

  • 14 Apr 2021 01:16 PM (IST)

    छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्यात पायावर कोड केलेले कबुतर आढळल्याने खळबळ

    छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्य़ात जामपदर येथे एक कबुतर सापडलं

    ज्याच्या पायात चीनी भाषेत लिहीलेले टॅग आढळल्याने पोलीसांनी याची गंभीर दखल घेतली आहे,

    अरुण खिलवारे यांच्या अंगणात हे कबुतर उतरले त्याच्या पायावर टॅग दिसल्यावर त्या कबुतरला पकडण्यात आले.

    विदेशी भाषेतला मजकुर बघितल्यावर तात्काळ पोलिसांना त्याची माहिती देण्यात  आली

    यानंतर पोलिसांनी कबुतर आपल्या ताब्यात घेतले आहे.

    चायनीज भाषेतला मजकूर असल्याने पोलिसांनी गंभीरतेने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे

  • 14 Apr 2021 01:11 PM (IST)

    लोकांच्या मृत्यूवर देखील भाजप राजकारण करतंय : नाना पटोले

    नाना पटोले यांची प्रतिक्रिया

    ही राष्ट्रीय आपत्ती आहे. पंतप्रधान मोदी यांना नियमांचं विसर पडला

    विना मास्क फिरून मोदी प्रचार करत आहेत, काय संदेश जाईल यातून

    प बंगालच्या निवडणुकीनंतर देशात लॉकडाऊन जाहीर होईल

    मध्य प्रदेश च सरकार पडल, मग लॉक डाऊन केलं

    देशाचे कर्ते पंतप्रधान आणि गृहमंत्री विना मास्क फिरत आहेत

    अनिल देशमुख – त्यांची CBI चोकशी सुरू आहे.. त्यातून काय बाहेर येईल हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे

    परमबीर सिंग हे आता स्वतःच माफीचे साक्षीदार झालेत, त्यामुळे यावर आता विचार होणं गरजेचं आहे

    आपल्याकडे वेळीच लसीचा साठा केला असता तर राज्याची परिस्थिती नियंत्रणात राहिली असती

    केंद्राकडून भेदभाव केला जातोय

    राज्य सरकार चांगलं काम करत असताना, केंद्रातून टीका केली जात आहे

    लोकांच्या मृत्यूवर देखील भाजप राजकारण करत आहे

  • 14 Apr 2021 12:33 PM (IST)

    भाजप वाळवीप्रमाणे, त्यांना टीका करण्याचा रोग जडलाय, विजय वड्डेटीवारांची टीका

    विजय वड्डेटीवारांची प्रतिक्रिया

    भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कोरोनामुळे घरात साजरी करण्याचं आव्हान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं, त्यामुळे आम्ही घरीच आंबेडकर जयंती साजरी केलीय

    – सरकारच्या मदतीतून काही घटक सुटले, त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार

    – नाभीक समाज आणि बारा बलुतेदारांना मदत करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार

    – गेल्या वेळेसच्या लॅाकडाऊनमध्ये सामान्य माणसांना काहीही मदत झाली नव्हती

    – भाजपला टीका करण्याचा रोग जडलाय, एखाद्या वाळवी प्रमाणे त्यांना टीका करण्याचा रोग जडला आहे

    – गेल्या लॅाकडाऊनच्या वेळेस केंद्र सरकारने गरिबांना मदत केली नाही

    – केंद्र सरकारने बोलल्याप्रमाणे 15 लाख दिले असते तर ही वेळ आली नसती

    – गेल्या वेळपेक्षा हे लॅाकडाऊन थोडं सौम्य असेल

    – चंद्रपुरात बेडची संख्या वाढवत आहे

    – राज्यातील काही रुग्ण तेलंगणाला जात असतील, तर मध्य प्रदेशातले रुग्ण नागपुरात येतात. ही राजकारण करण्याची वेळ नाही

  • 14 Apr 2021 12:29 PM (IST)

    अँटी नार्कोटिक्स सेलची कारवाई, 2 ड्रग्ज पेडलर्सना अटक

    अँटी नार्कोटिक्स सेल बांद्रातर्फे 2 ड्रग पेडलर्सना अटक

    वर्सोवा अंधेरी पश्चिम स्थित नाना नानी पार्कजवळून अटक

    आरोपींकडून 1 किलो 500 ग्रॅम चरस जप्त, किंमत ३० लाखांच्या आसपास

    मंगळवारी रात्री गस्त करत असताना केली कारवाई

  • 14 Apr 2021 11:37 AM (IST)

    भाजपची भूमिका भारत भालकेंविरोधात नाही, सरकारविरोधात आहे : गोपीचंद पडळकर

    पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक, भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर सभास्थानी दाखल

    गोपीचंद पडळकर यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

    • भाजपची भूमिका भालके याच्या विरोधात नाही.
    • विश्वासघाताने आलेले जे सरकार आहे त्याच्या विरोधात आहे
    • कोरोनाच्या काळात अनेकंचे कंबरडे मोडले
    • एक वर्ष झाले तरी सरकारने काही ठोस केले नाही
    • काल लॉकडाऊन जाहीर केला पण थातुर मातुर अशा जुन्याच योजना केल्या
    • या मतदारसंघामध्ये सगळे मंत्री येतात पण शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्यांना दिसत नाहीत
    • हे सरकार बलात्कारी आहे
    • या सरकारला निवडणुकीचे काही पडले नाही त्याना विठ्ठल कारखाना घशात घालायचा आहे
    • अनेक कारखाने त्यानी कवडीमोल भावात घेतले
    • 35 गावाचा शेतीचा प्रश्न केंद्रातून पैसे आणून सोडवणर
  • 14 Apr 2021 10:51 AM (IST)

    धारावीतील सर्व नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला त्वरित सुरुवात करा, राहुल शेवाळेंची मागणी

    आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील सर्व नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला त्वरित सुरुवात करावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

  • 14 Apr 2021 10:40 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी चैत्यभूमी स्मारक येथे जाऊन अभिवादन केले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल व इतर मान्यवरांनी देखील अभिवादन केले.

  • 14 Apr 2021 10:05 AM (IST)

    सोलापुरात कोरोनाच्या संकटाबरोबर जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान

    सोलापूर –

    कोरोनाच्या संकटाबरोबर जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान

    सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतामध्ये असलेल्या पिकांचे झाली माती

    ग्रामीण भागात द्राक्ष, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

    ज्वारी, गहू ,कडबा यांचे अतोनात नुकसान

    तर काही ठिकाणी बेदाणा शेड उडून गेल्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान

  • 14 Apr 2021 09:57 AM (IST)

    सातारा जिल्हयात अवकाळी पावसाचा आंबा उत्पादकांना फटका

    सातारा जिल्हयात अवकाळी पावसाचा आंबा उत्पादकांना फटका

    दोन दिवसापुर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या झाडाला आलेल्या कैर्यांचे नुकसान

    जिल्हयातील शेतकरी चिंताग्रस्त

  • 14 Apr 2021 09:29 AM (IST)

    मुंबई पोलिसांच्या गाडीतच झाली महिलेची प्रसूती, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आई आणि बाळ सुखरुप

    मुंबई पोलिसांच्या गाडीतच झाली महिलेची प्रसूती, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आई आणि बाळ सुखरुप

    पोलिसांमुळे दोघांचे वाचले प्राण

    वरळी नाका येथे 13 एप्रिल रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास एक गरोदर महिला रस्त्याने जात असताना अचानक चक्कर येऊन पडली

    लोकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या दोन गाड्या त्या ठिकाणी पोहचले

    पोलिसांना सदर महिला गरोदर असल्याचं कळलं आणि तिला प्रसूती कळा येत होती

    महिला सोबत तिच्या कुटुंबिय किंवा ओळखीचे कोणीही नव्हते

    ऍम्ब्युलन्स बोलवण्यात इतका वेळ पोलीसांकडे नव्हता

    पोलिसांनी विलंब न करत महिलेला पोलिसांच्या गाडीत ठेवलं आणि नायर रुग्णालयात निघाले

  • 14 Apr 2021 09:05 AM (IST)

    बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी दीक्षाभुमीवर शुकशुकाट

    नागपूर –

    – बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी दीक्षाभुमीवर शुकशुकाट

    – कोरोनामुळे अनुयायांना दर्शन बंद

    – दीक्षाभुमी परिसरातील दोन्ही रस्ते बंद, पोलिसांनी लावले बॅरीकेट्स

    – दरवर्षी १४ एप्रिलला लाखो लोक दीक्षाभुमीवर येतात

    – कोरोनाच्या भयावह स्थितीमुळे यंदा दीक्षाभुमीवर शुकशुकाट

  • 14 Apr 2021 08:31 AM (IST)

    मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर अपघात, एकाचा मृत्यू

    रायगड –

    मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर अपघात

    मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर अपघातात एक मृत्यू

    रसायनी पोलीस स्टेशन हद्दीतील रात्री 2 वाजताची घटना

    चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक उजव्या बाजूच्या रेलिंगवर धडकला

    अपघातात चालकाचा जागीच मृत्यू

  • 14 Apr 2021 07:53 AM (IST)

    नाशकात कोव्हिड रुग्णालयात ड्युटी करण्यास शिक्षकांचा विरोध

    नाशिक –

    कोव्हिड रुग्णालयात ड्युटी करण्यास शिक्षकांचा विरोध

    महापालिकेचे नियोजन धोक्यात

    सेंट्रल बेड सिस्टीम साठी 800 शिक्षकांची लावली होती ड्युटी

    शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन क्लास सुरू असल्याने शिक्षकांचा विरोध

    इतरही कामांचा बोजा असल्याची शिक्षक संघटनांची तक्रार

    रात्र पाळीस कोव्हिडं रुग्णालयांमध्ये ड्युटी लावण्याचा प्रकार चुकीचा असल्याची संघटनांची ओरड

  • 14 Apr 2021 07:52 AM (IST)

    नागपुरात पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मारण्याचा प्रयत्न, घराचं दार पेटवलं

    – नागपुरात पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मारण्याचा प्रयत्न

    – कुटुंबीय घरी असताना घराच्या दाराला समाजकंटकाने लावली आग

    – शेजाऱ्यांनी आग विझवल्याने तीन जीव वाचले

    – एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडली घटना

    – आरोपीला शोधण्यासाठी पोलीसांचे प्रयत्न सुरु

  • 14 Apr 2021 07:47 AM (IST)

    नाशकात बालगणेश फाउंडेशन तर्फे ऑक्सिजन बँकेची स्थापना

    नाशिक – बालगणेश फाउंडेशन तर्फे ऑक्सिजन बँकेची स्थापना

    नोंदणी करणार्यांना दिले जाणार ऑक्सजिन कॉन्सनट्रॅटेड मशीन

    ऑक्सजिन अभावी अनेकांचे जीव जात असल्याने उभारली ऑक्सजिन बँक

    शिवसेना नेते आणि महापालिका विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांच्या पुढाकाराने साकारली ऑक्सजिन बॅंक

  • 14 Apr 2021 06:19 AM (IST)

    मृत रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरच्लाया कानशिलात लगावली, हिंगणघाट येथील घटना

    मृत रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरच्लाया कानशिलात लगावली, हिंगणघाट येथील घटना

    निर्मेश कोठारी असं डॉक्टरच नाव

    रुग्णाला दवाखान्यात उपचारासाठी आणले असता त्याचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह असून त्याचा मृत्यू झाल्याचे
    निदर्शनास आल्याने डॉक्टरांनी तशी माहिती रुग्णाच्या नातलगास दिली

    त्यावेळी नातलग असलेल्या एकाने डॉक्टरांना थापड मारल्या

    डॉक्टरच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे

    हिंगणघाट पोलिसात रुग्णाच्या नातेवाईकांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल

    घटनेचा डॉक्टरांनी नोंदवला निषेध

    हिंगणघाट येथील कोठारी यांच्या खाजगी रुग्णालयातील घटना

Published On - Apr 14,2021 8:58 PM

Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.