Maharashtra CM Uddhav Thackeray LIVE : “जी गोष्ट डब्ल्यूएचओला दिसली, वॉशिग्टन पोस्टला दिसली ती तुम्हाला दिसली नाही याचं वाईट वाटतं”

| Updated on: Dec 28, 2020 | 4:06 PM

राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज,  दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या लाईव्ह

Maharashtra CM Uddhav Thackeray LIVE :  जी गोष्ट डब्ल्यूएचओला दिसली, वॉशिग्टन पोस्टला दिसली ती तुम्हाला दिसली नाही याचं वाईट वाटतं

Maharashtra CM Uddhav Thackeray Vidhan Sabha Speech Live Updates: मुंबई : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज,  दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, मुंबईतील बातम्या, पुण्यातील बातम्या, मनोरंजन विश्व, क्रीडा जगत, शेती, उद्योग, व्यापार, सोने यासह सर्व घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर पाहू शकाल. त्याशिवाय, राजकीय सर्व अपडेट पाहा टीव्ही 9 मराठीवर. (Live Updates Maharashtra)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Dec 2020 05:56 PM (IST)

    जी गोष्ट डब्ल्यूएचओला दिसली, वॉशिग्टंन पोस्टला दिसली ती तुम्हाला दिसली नाही याचं वाईट वाटतं: उद्धव ठाकरे

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाजपला टोले लगावले आहेत.  कोरोना विषाणू रोखण्यासाठी महाराष्ट्रानं केलेल्या कामाबद्दल कौतुक न करणाऱ्या भाजपवर मुख्यमंत्र्यांनी टीका केली. कोरोना संपला नसल्यामुळे अधिवेशन दोन दिवसाचे घ्यावे लागले. जी गोष्ट डब्ल्यूएचओला दिसली, वॉशिग्टंन पोस्टला दिसली ती तुम्हाला दिसली नाही याचं वाईट वाटतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 15 Dec 2020 05:53 PM (IST)

    सभागृहात सांगतोय, कुणालाही धक्का न लावता मराठा आरक्षण देणार : मुख्यमंत्री

    विरोधकांच्या सर्वच आरोपांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही, माझ्या सहकारी मंत्र्यांनी उत्तर दिलं आहे, तुम्ही मानगुटीवरच बसायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही काही करु शकणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात वकिलांची फौज जशीच्या तशी आहे, भूमिकेत बदल नाही, काहीही बदलेलं नाही – मुख्यमंत्री

    मराठा आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात, ही लढाई आम्ही जिंकणारच, ही लढाई लढत असताना मध्येच कुणी टुमणं काढलं इतर समाजाचं आरक्षण काढणार का वगैरे..पण मी सभागृहात ग्वाही देतो, मराठा आरक्षण देताना अन्य कुणाचं आरक्षण काढणार नाही. हे रेकॉर्डवर आहे, समाजात जे कोणी आग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर पाणी टाकावं लागेल. मी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने बोलतोय

  • 15 Dec 2020 05:13 PM (IST)

    आ बैल मुझे मार अशी सरकारची सुप्रीम कोर्टातील भूमिका : देवेंद्र फडणवीस

    मराठा आरक्षण उच्च न्यायालयात गेलं तेव्हा केवळ दोन आरक्षणच टिकली, एक तामिळनाडूचं दुसरा मराठा आरक्षण. सर्वोच्च न्यायालयात आमच्या सरकारच्या काळात प्रकरण गेलं, तेव्हा आम्ही तयारी केली, त्यावेळी सरन्यायाधीशांनी स्टे देण्यास नकार दिला. परंतु त्यानंतर त्याबाबतची सुनावणी या सरकारच्या काळात झाली. आ बैल मुझे मार असं झालं. यांनीच कोर्टाने न विचारता सांगितलं आम्ही कुठलीही भरती करणार नाही वगैरे.. तसं करण्याची गरज नव्हती, कोर्टाने विचारलं नव्हतं. ज्या नियुक्त्या दिल्या त्या ठिक आहेत, मात्र तुमच्या आदेशापर्यंत नव्या नियुक्त्या करत नाही असं सुप्रीम कोर्टात यांनी सांगितलं असतं तर योग्य ठरलं असतं. या सरकारने जर मनात आणलं तर काही ना काही मार्ग काढता येऊ शकेल. प्रोटेक्शन देता येईल का वगैरे विचार करता येऊ शकतो. मात्र दुर्दैवाने सरकारच्या वतीने टोलवा टोलवी शिवाय काहीही होत नाही. मात्र जोपर्यंत हा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करु. सरकारला चांगले पर्यायही सूचवू. मराठा आरक्षण हा रजकीय प्रश्न नाही, राजकीय पोळी भाजायची नाहीय, हा तरुणांचा प्रश्न आहे. सरकारने मार्ग काढायला हवा. तरुणांच्या स्वप्नांवर आघात झालाय. टोकाचा संघर्ष करावा लागला तर करु, पण तरुणांना न्याय मिळावा- देवेंद्र फडणवीस

  • 15 Dec 2020 04:44 PM (IST)

    फडणवीस फुलप्रूफ देत होते, मग कोर्टात आरक्षण का रखडलं? : अशोक चव्हाण

  • 15 Dec 2020 04:33 PM (IST)

    वर्षा बंगल्याचा एक रुपयाही थकीत बिल नाही : अजित पवार

    वर्षा बंगल्याचा एक रुपयाही थकीत बिल नाही, तशीच स्थिती देवगिरी बंगल्याची, बातम्यात कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही. ड्रेसकोडबाबत सरकार फेरविचार करतंय, जे योग्य आहे ते केलं जाईल

  • 15 Dec 2020 04:12 PM (IST)

    केंद्राने 30 हजार 537 कोटी अजून दिलेले नाहीत : अजित पवार

    केंद्राकडून जीएसटीचा राज्याला जो हिस्सा यायला हवा तो मिळाला नाही. केंद्राकडून ३० हजार ५३७ कोटी अजून दिलेले नाहीत. कायदा करत असताना राज्याला ठराविक रक्कम दरवर्षी दिली जाते पण ती दिली जात नाही. केंद्राचा निधी आला नाही, आपल्यालाही जेवढे उत्पन्न मिळायला हवं ते मिळालं नाही. १२ हजार कोटी पगार आणि पेन्शनला जातात, ते राज्याने थकवले नाहीत. बाकीच्या बाबतीत जितकी काटकसर करता येईल तेवढी केली. आमदार निधी, डोंगरी विकास निधी, जिल्हा नियोजन निधीला आम्ही कात्री लावली नाही- अजित पवार

  • 15 Dec 2020 02:10 PM (IST)

    आरेमधील मेट्रो कारशेड विरोधातील याचिका उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली: देवेंद्र फडणवीस

    राज्यात दिसत असणारी विकासकामं आमच्या सरकारच्या काळात सुरु झाली होती. आरेमध्ये कारशेड तयार करण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतला. उच्च न्यायालयानं, सर्वोच्च न्यायालयानं आरेविरोधातील याचिका फेटाळली. आरेमध्ये काम सुरु केले. त्यानंतर 100 कोटी खर्च करण्यात आले. त्यांनंतर कारशेड कांजूरला हलवण्यात आले, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

  • 15 Dec 2020 02:05 PM (IST)

    कोरोनामुळं राज्यातली माणसं किड्या मुंगी सारखी मेली: देवेंद्र फडणवीस

    देशामध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले. राज्यात 50 हजार लोकं मेली. देशातील कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असूनही राज्यात सर्वात जास्त मृत्यू होत आहेत. सरासरी मृत्यूमध्ये वाढ होत आहे.  कोरोना काळातील भ्रष्टाचार रोखायला हवा होता.

  • 15 Dec 2020 02:01 PM (IST)

    तुमच्या पुस्तकात आमचीच कामं का? विधानसभेत फडणवीसांचा ठाकरेंना सवाल,

  • 15 Dec 2020 02:00 PM (IST)

    कृषी विभागानं बोंडअळी रोखण्यासाठी काही केलं नाही: फडणवीस

    महाबीजच्या बियाण्यामुळे शेतकऱ्यांना तिबार पेरणी करावी लागली. तिसऱ्या पेरणीनंतर उगवलेलं पावसानं गेले. शेतकऱ्यांना घोषणा केलेले पैसे मिळाले नाहीत.  मदतीच्या वाटपातही दुजाभाव करण्यात आला. सरकारच्या कृषी विभागानं बोंडअळीच्या संदर्भातील शेतीशाळा घेतल्या नाहीत. बोंडआळीमुळं कापूस गेला. सोयाबीन गेलं, तूर गेली. शेतकरी उद्धवस्त झाला आहे.

  • 15 Dec 2020 01:55 PM (IST)

    तुमच्या पुस्तकात आमच्याच काळातील कामं का?, देवेंद्र फडणवीसांचा सवाल

    2013 साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह, शरद पवार यांनी देशभरातील मंत्र्यांची एक कमिटी स्थापन केली होती. त्यासमितीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील होते. त्या समितीनं दिलेल्या अहवालात अत्यावश्यक सेवा कायद्यातील तरतुदींमुळे शेती क्षेत्रात गुंतवणूक होण्यात अडचणी होत असल्याचे नमूद असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी पुढे बोलताना तुमच्या वर्षभराच्या कार्यकाळाच्या कामकाजाचा अहवाल सांगणाऱ्या पुस्तकात आमच्याच काळातील कामं का?, असा सवाल विचारला.

  • 15 Dec 2020 01:47 PM (IST)

    काँग्रेसच्या आंदोलनात शेतकरी उतरले नाहीत: देवेंद्र फडणवीस

    महाराष्ट्रात खासगी एपीएमसीमधून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतोय. बाळासाहेब थोरात यांनी ट्रॅक्टर चालवले. मात्र, त्यांच्या आंदोलनात शेतकरी उतरले नाहीत.

  • 15 Dec 2020 12:24 PM (IST)

    कृषी कायदे कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, भाजपच्या माजी खासदाराने दरडावलं

    सोलापूर- शेतीविषयक तीनही विधेयके शेतकऱ्यांचे कवच कुंडले आहेत, हे विधेयक कोणत्याही परिस्थितीत मागे घेतली जाणार नाहीत, किसान संघटनांनी ठेका घेतला आहे तो देश विघातक आहे. बळीराजाचा जीव धोक्यात आणला जात आहे, भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांचं विधान

  • 15 Dec 2020 11:20 AM (IST)

    सरपंच आरक्षण सोडत, जानकर भडकले

    सरकारच्या निर्णयावर दरेकांचीही टीका

    मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याच्या निर्णयाला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी विरोध केला आहे. गावच्या प्रस्थापितांच्या हातात रिमोट जाईल, आणि घोडेबाजारही थांबणार नाही, अशा शब्दात जानकरांनी संताप व्यक्त केला. तर सरकारचा हा निर्णय राजकीय हेतूनं प्रेरीत असल्याची टीकाही विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केलीय.

  • 15 Dec 2020 10:48 AM (IST)

    अनेक राज्यात निवडणुकांनंतर आरक्षणाची पद्धत : मुश्रीफ

    अनेक राज्यांमध्ये निवडणुकांनंतर सरपंचपदाची आरक्षण काढण्याची पद्धत, पद मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने निर्णय – हसन मुश्रीफ

  • 15 Dec 2020 10:13 AM (IST)

    जानेवारीपासून लोकल सुरु करण्यावर विचार सुरु : वडेट्टीवार

    पुढील नवीन वर्षात 1 तारखेपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार आहे, त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे, मंत्री वडेट्टीवारांची माहिती

  • 15 Dec 2020 07:56 AM (IST)

    औरंगाबादेत कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ, 5 महिन्यात 130 कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना

    औरंगाबाद : औरंगाबादेत कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ, 5 महिन्यात 130 कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना, तर 5 महिन्यात 25 महिलांना पतीने दिले घरातून हाकलून, 130 महिलांनी दिलेल्या तक्रारीतून माहिती समोर, मोबाईलवर बोलण्याच्या संशयावरून सर्वाधिक घडतायत कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना

  • 15 Dec 2020 07:47 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांनी केला 1 लाखांचा आकडा पार

    नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांनी केला 1 लाखांचा आकडा पार, गेल्या 24 तासात जिल्ह्यात 237 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह, तर 3 रुग्णांचा मृत्यू, जिल्ह्यात मृत्यूचा एकूण आकडा झाला 1,867 वर, सद्य स्थितीत जिल्ह्यात 3,467 रुग्णांवर उपचार सुरु

  • 15 Dec 2020 07:45 AM (IST)

    औरंगाबाद शहरात 11 वी आणि 12 वीचे वर्ग सुरु, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांचा निर्णय

    औरंगाबाद : आजपासून औरंगाबाद शहरात 11 वी आणि 12 वीचे वर्ग सुरु, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांचा निर्णय, 3 जानेवारीपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा यापूर्वी घेतला होता निर्णय, मात्र, कोरोना कमी होत असल्यामुळे 11 वी आणि 12 चे वर्ग आजपासून सुरु, मात्र प्राथमिक आणि माध्यमिक शाळा अजूनही रहाणार बंदच

  • 15 Dec 2020 07:42 AM (IST)

    नागपूर सुधार प्रन्यास विश्वस्तपदी आमदार विकास ठाकरेंची नियुक्ती

    नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास विश्वस्तपदी आमदार विकास ठाकरेंची नियुक्ती, फडणवीस सरकारकडून नासुप्र बरखास्तीची घोषणा, ठाकरे सरकारकडून नासुप्र पुनरुज्जीवीत करण्याच्या हालचाली, आमदार विकास ठाकरेंना विश्वस्त करुन नासुप्र पुनरुज्जीवीत करण्याच्या हालचाली

  • 15 Dec 2020 07:40 AM (IST)

    थकीत मालमत्ता करावरील दंड माफ करण्याचा नागपूर मनपाचा निर्णय, थकीत करवसुलीसाठी अभय योजना लागू

    नागपूर : थकीत मालमत्ता करावरील दंड माफ करण्याचा नागपूर मनपाचा निर्णय, थकीत करवसुलीसाठी मनपाने लागू केली अभय योजना, नागपूरातील लाखो थकबाकीदारांना मोठा दिलासा, अभय योजनेचा कालावधी 15 डिसेंबर 2020 ते 15 फेब्रुवारी 2021, कोरोनामुळे आर्थिक स्थिती खालावल्याने मनपा मोठा निर्णय

  • 15 Dec 2020 07:37 AM (IST)

    नागपुरात हुंडी दलालाने व्यापाऱ्यांना 10 कोटी रुपयांनी गंडवले

    नागपूर : नागपुरात हुंडी दलालाने व्यापाऱ्यांना 10 कोटी रुपयांनी गंडवले, प्रसिद्ध फर्मच्या नावावर खोटे दस्तावेज तयार करुन व्यापाऱ्यांना गंडवले, इतवारी परिसरात अनेक हुंडी दलाल सक्रिय, व्यापाऱ्यांच्या फसवणुकीची वर्षभरातील पाचवी घटना, नागपूरात वाढत आहेत आर्थिक फसवणुकीचे प्रकार

  • 15 Dec 2020 07:35 AM (IST)

    वाढवण बंदरा विरोधात मुंबई ते गुजरातच्या सीमेवरील झाई किनारपट्टीपर्यंत बंदची हाक

    पालघर : वाढवण बंदरा विरोधात जन आंदोलन आक्रमक, वाढवण बंदरा विरोधात मुंबई ते गुजरातच्या सीमेवरील झाई किनारपट्टीपर्यंत बंदची हाक, 15 डिसेंबरला राहणार वसई, पालघर, डहाणू पर्यंत किनारपट्टीवरील मासळी बाजरपेठ गावात कडकडीत बंद , वाढवण बंदरा मुळे शेतकरी, बागायतदार, डायमेकींग व्यवसायिक उद्धवस्त होऊन देशोधडीला लागणार असल्याने होतोय बंदराला मोठा विरोध

Published On - Dec 15,2020 5:56 PM

Follow us
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.